* भारत भूषण श्रीवास्तव

२३ डिसेंबर २०२३ रोजी मोक्षदा एकादशीच्या दिवशी विष्णूसह इतर देवी-देवता नीट उठलेही नव्हते, तोच खाली जमिनीवर असलेले तरुण अविवाहित आरडाओरड करू लागले की, आता जर तुम्ही खरोखरंच जागे झाले असाल तर आमचे लग्न लावून द्या. तुम्ही जर हे करू शकत नसाल तर नैतिक जबाबदारी स्वीकारा आणि पदाचा राजीनामा द्या, अशी मागणीही या तरुणांनी केली.

भारत भूमीतील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर येथे सकाळीच सुमारे ५० अविवाहित, वराची वेषभूषा करून घोड्यावर स्वार झाले होते. बँड, लग्नाच्या मिरवणुकीसह हे अविवाहित डीएम ऑफिस म्हणजे जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या दिशेने नवरदेव मोर्चा घेऊन निघाले होते.

आजकाल, विष्णुजींना जगात जास्त काम आहे, ते पालनकर्ते असल्याने कदाचित लग्नासारख्या क्षुल्लक प्रश्नांकडे लक्ष द्यायला त्यांच्याकडे वेळ नाही. म्हणूनच भजन आणि आरती गाऊन त्यांना याचसाठी जागे केले जाते की, हे भगवंता उठ आणि विश्वाच्या शुभ कार्यांसह लग्न लावून दे. जी प्रत्येक अविवाहित तरुणाची रोजगारानंतरची दुसरी सर्वात मोठी इच्छा असते. या तरुणांनी शहाणपण दाखवत लग्न पार पाडण्यासाठी कलियुगात पृथ्वीवरील विष्णूचे प्रतिनिधी असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

निवेदनाऐवजी जाहिरात आवश्यक

या अविवाहित तरुणांचे दयनीय रडगाणे वरच्यापर्यंत पोहोचले असेल, अशी आशा कमीच आहे. खालच्या देवांबद्दल, बोलायचे झाल्यास ते फक्त मनातल्या मनात हसून केवळ निवेदनच स्वीकारू शकतात. जर कोणी थोडेसेही संवेदनशील असेल तर निदर्शनास आणून देईल की, हे बंधूंनो, मला निवेदन देण्याऐवजी जाहिरातीची मदत घ्या. माझ्यावर किंवा देवावर विसंबून राहू नका, अन्यथा तुमचे संपूर्ण आयुष्य फक्त वधू शोधण्यातच खर्ची पडेल आणि तुम्ही या नश्वर जगाला अविवाहित म्हणूनच सोडून जाल.

हा सल्लाही त्यांच्या मनात कुठेतरी दडला असेल की, खरा पुरुष असशील तर पृथ्वीराज बनून तुझ्या संयोगिताला घेऊन येशील. सोलापुरातील नवरदेव मोर्चा पाहून लोक आस्थेने आणि आश्चर्याने बघतच राहिले होते, हे तुमच्याही कानावर आले असेलच ना?

काहींना या अविवाहित वऱ्हाडींबद्दल कमालीची सहानुभूती होती, पण त्यांनाही हा प्रश्न पडला होता की, जर तो वरचा या अभागी तरुणांचे ऐकत नसेल तर आम्ही पामर काय करू शकणार? आम्ही कसेबसे आमचे लग्न केले आणि अजूनही ते बोलत आहोत. या वेड्या लग्नाळूंना कोण समजावणार की भावा, संसाराच्या भानगडीत पडू नकोस, पश्चातापच करायचा असेल तर तो लाडूची चव न चाखता कर.

समजावू शकत नाही आणि वाचवूही शकत नाही

हे देखील एक मनोवैज्ञानिक तत्त्व आहे की, आत्महत्येला प्रवृत्त झालेल्या आणि लग्न करण्याची इच्छा असलेल्या व्यक्तीला ब्रह्मादेखील समजावू शकत नाही आणि वाचवूही शकत नाही, कारण जे भाग्यात असते तेच घडते. आता या लग्नाळूंबद्दल बोलायचे तर, तुलसीदासांनी खूप आधीच स्पष्ट केले आहे की, ज्यांना भगवंत दारुण दु:ख देतो त्यांची बुद्धी आधीच भ्रष्ट करतो.

पादचाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष करत नवरदेवांच्या मोर्चात रस घेतला, तेव्हा त्यांना समजले की, या बिचाऱ्यांना मुली अजिबात मिळत नाहीत आणि ज्यांना त्या कशाबशा मिळतात, त्या या विवाहोच्छुक तरुणांना कुजलेल्या आंब्यासारखे नाकारतात, कारण त्यांच्याकडे रोजगार नाही.

सोलापुरातील हे दृश्य पाहून कदाचित काहीना तो प्राचीन काळ आठवला असेल जेव्हा मुली तोंडातून चकार शब्दही काढू शकत नव्हत्या आणि आई-वडील ज्याच्या गळ्यात बांधायचे त्यालाच सर्वस्व मानून त्याच्यासोबत सावित्री बनून आयुष्य व्यतीत करायच्या. बेरोजगार तर दूरचीच गोष्ट, मुलगा लंगडा, पांगळा, आंधळा किंवा काणा असला तरी ‘जन्मोजन्मी हाच पती मिळो,’ अशी प्रार्थना करत त्या वटसावित्रीचा उपवास करत आणि पुढील प्रत्येक जन्मासाठी त्याचेच बुकिंग करून ठेवत.

काळ बदलला आहे

पण, आता काळ आणि मुली दोन्ही बदलले आहे. मुली सुशिक्षित, हुशार, स्वाभिमानी आणि जागरूक झाल्या आहेत. त्यामुळेच आता त्यांना ऐऱ्यागैऱ्या कोणाच्याही गळ्यात बांधले जाऊ शकत नाही. पूर्वी मुलींना गाय म्हटले जायचे. आयुष्यभर त्या त्याच खुंटीला बांधून पडलेल्या असायच्या. आई-वडीलच त्यांना असे बांधून ठेवायचे. पण, आता मुलींनी स्वत:च स्वत:चा जोडीदार शोधायला सुरुवात केली आहे. अर्थात त्या कोणावरही अवलंबून नसल्याने स्वत:साठी योग्य वर शोधू लागल्या आहेत. स्वत:च्या पायावर उभ्या आहेत.

बेरोजगार जोडीदार हा त्यांचा शेवटचा प्राधान्यक्रमही नाही, त्यामुळेच सोलापुरातील अविवाहित तरुणांचा मोर्चा हा प्रत्यक्षात बेरोजगारीविरोधातील मोहीम आहे, हे समजून घेतले पाहिजे, ज्या अंतर्गत वधूच्या वेशात सरकारकडून नोकरी किंवा नोकरीची मागणी केली जात आहे. असे मोर्चे देशाच्या प्रत्येक भागात पाहायला मिळतात, जिथे या लग्नाळू तरुणांचे दु:ख ओसंडून वाहताना दिसते.

स्वस्तातला तमाशा नाही

कर्नाटकातील ब्रह्मचारिगलू पदयात्रेत, असेच दु:ख मंड्या जिल्ह्यातील तरुणांनी मार्च महिन्यात व्यक्त केले होते. सोलापुरात ज्याला अविवाहित नवरदेवांचा मोर्चा असे संबोधले गेले त्याला कर्नाटकात ब्रह्मचारीगलू पदयात्रा म्हटले गेले. या पदयात्रेत सुमारे ६० अविवाहित तरुणांनी १२० किलोमीटरचा प्रवास करून चामराजनगर जिल्ह्यातील महादेश्वर मंदिर गाठले. तेव्हा सर्वांनी हे मान्य केले होते की, ही कोणतीही स्वस्तातली पदयात्रा किंवा प्रसिद्धीसाठीचा स्टंट नाही. खरंतर या तरुणांना नोकरी नाही. काही तज्ज्ञांनी दिला असा निष्कर्ष काढला होता की, या अविवाहित तरुणांना चांगली नोकरी नाही आणि मुळात हे पदयात्री शेतकरी कुटुंबातील आहेत.

या समस्येचा दुसरा पैलू असा समजला की, नव्या युगातील मुलींना लग्नानंतर गावात राहायचे नाही आणि आता शेती हा तोट्याचा व्यवसाय झाला आहे, ज्यामध्ये आर्थिक सुरक्षितता नाही, त्यामुळे मुलींसोबत मुलींचे पालकही धोका पत्करायला तयार नाहीत.

केवळ कर्नाटकातीलच नाही तर प्रत्येक भागातील शेतकऱ्यांचे मुलगे आपली शेती सोडून शहरांकडे धाव घेत आहेत. ते गावातील नोकरांना जेवढा पगार देतात त्यापेक्षा कमी पैशांत शहरात छोटी-मोठी नोकरी करतात, जेणेकरून त्यांच्या लग्नात कोणतेही अडचण येऊ नये.

मुलींना अशी मुलं आवडत नाहीत

याला दुजोरा देताना मंड्या येथील शेतकऱ्याचा मुलगा कृष्णा यानेही मीडियाला सांगितले की, आतापर्यंत सुमारे ३० मुलींनी त्याला नाकारले आहे. कारण माझ्याकडे कमी शेती आहे त्यामुळे माझी जास्त कमाई होत नाही.

ही एक गंभीर समस्या आहे. याबद्दल सोलापूरच्या ज्योती क्रांती परिषदेचे प्रमुख रमेश बारस्कर, ज्यांच्या बॅनरखाली अविवाहित तरुणांच्या  मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते, ते सांगतात की, महाराष्ट्रातील प्रत्येक गावात २५ ते ३० वर्षे वयोगटातील १०० ते १५० मुलं अविवाहित आहेत.

एकत्र येत आहेत अविवाहित तरुण

हरियाणातील अविवाहित तरुण देखील या आणि तत्सम मागण्या मांडत आहेत, पण कुठूनही तोडगा निघताना दिसत नाही आणि भविष्यातही तशी कोणतीच शक्यता दिसत नाही. चांगली गोष्ट अशी की, सर्वत्र असे तरुण रस्त्यावर जमा होत आहेत. त्यांच्या कौमार्याबाबत त्यांच्यात कुठलाही न्यूनगंड नाही. ही समस्या फार गंभीर बनत चालली आहे असे दिसते, पण त्याबाबत कोणीही गांभीर्य दाखवत नाही.

एका अंदाजानुसार, देशात सुमारे ५ कोटी ६३ लाख तरुण अविवाहित आहेत. त्यापैकी मुलींची संख्या केवळ २ कोटी ७ लाख आहे. मुलींची कमी होणारी संख्या आणि लिंग गुणोत्तर वाढणे हा एक वेगळा वादाचा मुद्दा आहे, पण महाराष्ट्र, कर्नाटक, हरियाणा आणि मध्य प्रदेशातील जे तरुण संघटित पद्धतीने आंदोलन करत आहेत ते बेरोजगार, अर्धवट बेरोजगार आणि शेतकरी कुटुंबातील आहेत. चांगली नोकरी किंवा रोजगार मिळाला तर लग्नासाठी मुलगीही मिळेल, असा विश्वास त्यांना आहे. वरचा ऐकत नसल्यामुळेच ते खालच्याकडे विनवणी करत आहेत.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...