कथा * शालू गुप्ते

शॉपिंग करून बाहेर आले तेव्हा मी उकाड्यानं हैराण झाले होते. समोरच्या शॉपिंग मॉलच्या कॉफी हाऊसमध्ये जाऊन कॉफी घ्यावी अन् काही तरी खावं असा विचार करून मोर्चा तिकडे वळवला. आज मुलांची शाळेची ट्रिप गेली होती अन् माझ्याकडे रिकामा वेळही होता.

पती शशांक सध्या त्यांच्या नव्या बिझनेसमुळे खूपच बिझी आहेत. त्यामुळे मुलं, घरातल्या जबाबदाऱ्या, सासूसासऱ्यांची काळजी घेणं यातच माझा सगळा वेळ संपतो. कित्येकदा वाटतं, स्वत:च्या मनाप्रमाणेही कधी तरी करावं पण जमत नाही. आज मात्र तशी संधी मिळाली होती.

मी ऑर्डर देऊन जरा रिलॅक्स होतेय तोवर फोन वाजला. फोनवर शशांक होते.

‘‘कुठं आहेस?’’ त्यांनी घाईनं विचारलं.

‘‘थोड्याच वेळात घरी पोहोचेन,’’ मी म्हटलं.

‘‘बरं, असं बघ, चार वाजता शिपायाला पाठवतोय, मी टेबलवर जी फाइल विसरून आलोय, ती त्याच्या हाती पाठव,’’ त्यांनी फोन कट केला.

शशांकचं ते कोरडं बोलणं खरं तर मला खटकलं. पण मी स्वत:ची समजूत घातली. ते नक्कीच खूप घाईत असतील. पण तरीही प्रेमाचे दोन शब्द बोलायला तर काहीच हरकत नव्हती.

एके काळी शशांक प्रेमवीराप्रमाणे सतत माझ्याभोवती असायचे. पण नव्या बिझनेसच्या कामाच्या व्यापात बिचारे अगदी कोरडे झाले आहेत. अजून किती दिवस असे जातील कुणास ठाऊक...मी विचार करत होते तेवढ्यात वेटर कॉफी अन् ग्रिल्ड सॅन्डविच टेबलवर ठेवून गेला. मी आपलं लक्ष आता त्यावर केंद्रित केलं.

कॉफीचे दोन घोट घेतेय तोवर ओळखीचं हसू कानावर आलं. वळून बघितलं तर चकित झाले. एका पोक्तशा गृहस्थाबरोबर मानवी बसली होती. आम्ही दोघी कॉलेजात सोबत शिकत होतो.

मानवीला बघून माझं मन एकदम उल्हसित झालं. कॉलेजचे ते फुलपाखरी दिवस पुन्हा आठवले.

खरंच कसले बिनधास्त दिवस होते. आम्ही मुली निर्धास्तपणे कॉलेजात वावरत असू. आमचा एक ग्रुप होता. आम्ही अभ्यासाला कायम महत्त्व दिलं. त्या बरोबरच कॉलेजातल्या इतर अॅक्टीव्हिटीजमध्येही सहभागी होत असू. पण मानवीला मात्र अभ्यासात अजिबात गती नव्हती. तिला फक्त गप्पा, कॅन्टीन, भटकणं, सिनेमा, शॉपिंग एवढंच आवडायचं.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...