* सोमा घोष

नवीन वर्षाची सुरुवात उत्साहात आणि आनंदात करण्यासाठी प्रेक्षकांवर अफाट प्रेम मिळवलेला कार्यक्रम "महाराष्ट्राची हास्यजत्रा" पुन्हा एकदा हास्याची धमाल घेऊन परत येत आहे. महाराष्ट्रातील लाखो कुटुंबांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या शोचा नवीन सीझन ५ जानेवारीपासून दर सोम आणि मंगळवार रात्री ९ वा. सोनी मराठी वर प्रदर्शित होणार आहे. "आपल्या हसण्याचा नवा रिजन कारण येतोय नवा सिझन!"

नव्या वर्षात नवा सीझन – धमाल दुप्पट, एंटरटेनमेंट दुप्पट! नवीन वर्षाची सुरुवात सकारात्मकतेने करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राला हास्याचा ताजातवाना डोस देण्याची जबाबदारी या शोने पुन्हा एकदा उचलली आहे. गेल्या अनेक सीझन्सपासून कुटुंबांना एकत्र बसून बिनधास्त हसण्याचं कारण देणाऱ्या या शोचे कलाकार, लेखक आणि दिग्दर्शक नव्या ऊर्जेसह सज्ज झाले आहेत.

या सीझनमध्ये प्रेक्षकांसाठी खास असे नव्या संकल्पनेवर आधारित नवे स्किट्स, नवीन व्यक्तिरेखा आणि खास नवीन ट्विस्ट आणि अर्थातच प्रेक्षकांच्या मनात घर केलेली मराठमोळी विनोदाची शैली, नवे विषय आणि नव्या प्रहसनासह हा सीझन आणखी भव्य, रंगतदार आणि मनोरंजक ठरेल अशी खात्री प्रेक्षकांना आहे. प्रेक्षकांचा आवडता ओंकार भोजने याने नुकताच महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात पुनरागमन केले होते. त्याच्या नवीन प्रहसनाची देखील प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते आणि तेच नवे विषय घेऊन ओंकार ५ जानेवारीपासून आपल्या भेटीस येत आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ने महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग बनलेला आहे. दिवसातील सगळी धावपळ, ताणतणाव विसरून लोक या शोसोबत मनमुराद हसतात. त्यामुळेच नवीन वर्षात शोच्या पुनरागमनाची घोषणा होताच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आणि आनंदाचे वातावरण आहे.

या शोमधील कलाकारांची केमिस्ट्री, त्यांचे लयबद्ध पंचेस, लोकजीवनाशी जोडणारे विषय आणि मानवी भावनांना स्पर्श करणारे विनोद हे सगळं असल्यामुळे  ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम प्रेक्षकांचा पसंतीस पडत आहे. नवीन वर्ष म्हणजे नवीन सुरुवात आणि नवीन उत्साह. याच उत्साहाला सलाम करत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चा नवा सीझन प्रेक्षकांसमोर येत आहे. या कार्यक्रमाचा प्रयत्न नेहमीच कुटुंबांना एकत्र आणणे, हास्याने प्रेक्षकांचे मनोरंजन करणे हा आहे. नवीन सीझन प्रेक्षकांना दुप्पट मजा आणि दुप्पट एंटरटेनमेंट देईल.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...