कथा * रितु वर्मा

कार्यालयातील घडयाळात संध्याकाळचे ५ वाजताच जियाने घाईघाईत स्वत:ची बॅग उचलली आणि भराभर पावले टाकत मेट्रो स्टेशनच्या दिशेने निघाली. आज तिचे मन स्वच्छंदी पाखराप्रमाणे आकाशात उंच भरारी घेत होते. कारण आज तिला पहिला पगार मिळाला होता. तिला घरातल्या सर्वांसाठी काही ना काही घ्यायचे होते. रोज संध्याकाळ होत आली की तिचे शरीर आणि मन दोन्हीही थकून जायचे. पण आज मात्र तिचा उत्साह कायम होता. चला, आता जियाची ओळख करून घेऊया...

जिया आजच्या युगातली २३ वर्षीय नवतरुणी आहे. सावळा रंग, कैरीसारखे बटबटीत डोळे, छोटे नाक, मोठाले ओठ असल्यामुळे सौंदर्याच्या व्याख्येत तिचा कुठेच नंबर लागत नव्हता. मात्र तिचा चेहरा सोज्वळ होता. ती घरात सर्वांची लाडकी होती. आयुष्यात जे हवे ते सर्व आतापर्यंत तिला मिळाले होते. फार मोठी स्वप्ने नव्हती तिची. ती थोडक्यातच समाधान मानायची.

भराभर पावले टाकत ती दुकानाच्या दिशेने निघाली. आपल्या २ वर्षांच्या भाच्यासाठी तिने रिमोटवर चालणारी गाडी घेतली. वडिलांसाठी त्यांच्या आवडीचे अत्तर, आई आणि वहिनीसाठी साडी आणि चुडीदार घेतला. भावासाठी टाय घेतला तेव्हा लक्षात आले की, तिच्याकडे फारच कमी पैसे शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे स्वत:साठी ती काहीच खरेदी करू शकली नाही. अजून संपूर्ण महिना बाकी होता. पण तिच्याकडे मात्र कमी पैसे शिल्लक होते. त्यातच तिला महिना काढायचा होता. आईवडिलांकडून तिला काहीच घ्यायचे नव्हते.

जशी ती कपडयांच्या दुकानातून बाहेर पडली तिला शेजारच्या पडद्यांच्या दुकानात आकाशी आणि मोरपिशी रंगाचे खूप सुंदर पडदे दिसले. अशा प्रकारचे पडदे आपल्या घरातही असावे असे फार पूर्वीपासून तिच्या मनात होते. दुकानदाराला किंमत विचारताच ती ऐकून मात्र जियाला घाम फुटला. दुकानदाराने स्मितहास्य करीत सांगितले की, हे चंदेरी सिल्कचे पडदे आहेत, म्हणूनच किंमत थोडी जास्त आहे. पण यामुळे तुमचे घर खूपच आकर्षक दिसेल.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...