कथा * इंजी आशा शर्मा

‘‘कशी आहेस पुन्नू?’’ मोबाईलवर आलेला एसएमएस वाचून पूर्णिमाच्या कपाळावर चिंतेच्या रेषा उमटल्या.

‘मला अशा नावाने हाक मारणारा कोण असेल? अजय तर नसेल ना? पण, त्याच्याकडे माझा हा नंबर कसा असेल? शिवाय त्याला १० वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर मला आठवण्याची अशी कोणती गरज पडली असेल? आमच्यामध्ये जे होते ते सर्व कधीच संपले आहे,’ मनात आलेल्या विचारांना थांबवत पूर्णिमाने तो नंबर ट्रुकॉलरवर टाकला आणि तिचा संशय खरा ठरला. तो अजयच होता. पूर्णिमाने त्या एसएमएसला काहीच उत्तर न देता तो डिलीट केला.

अजय तिचा भूतकाळ होता... महाविद्यालयीन दिवसांत त्यांच्या प्रेमाला बहर आला होता. दोघांनी लग्नाच्या आणाभाका घेतल्या होत्या. अजयचे तिच्यावर खूप प्रेम होते. पण त्याच्या प्रेमात एकाधिकारशाही अधिक होती. अजयचे तिच्यावरील प्रेम पाहून सुरुवातील पूर्णिमाला स्वत:चा खूपच अभिमान वाटायचा. इतके प्रेम करणारा प्रियकर मिळल्यामुळे तिला आभाळही ठेंगणे वाटू लागले होते. पण हळूहळू अजयच्या प्रेमाचे हे बंधन तिला बेडयांप्रमाणे वाटू लागले. त्याच्या प्रेमाच्या पाशात अडकलेल्या पूर्णिमाचा श्वास कोंडू लागला.

अजयला कुठलीही व्यक्ती पूर्णिमाच्या जवळ साधी उभी जरी राहिली तरी आवडत नसे. पूर्णिमा एखाद्याशी हसून बोलली तरी सहन होत नसे. त्यानंतर त्याच्या रुसण्याचा आणि पूर्णिमाने त्याची समजूत काढण्याचा क्रम नित्याचाच होत असे. कित्येक दिवस अजय रुसून बसायचा.

पूर्णिमा त्याच्या मागे-पुढे फिरायची. समजूत काढायची. त्याने बोलावे यासाठी मनधरणी करायची... मी तुझीच आहे असे शपथ घेऊन सांगायची... स्वत:ची काहीही चूक नसताना माफी मागायची. तेव्हा कुठे अजय राग विसरून शांत व्हायचा आणि पूर्णिमा सुटकेचा नि:श्वास टाकायची. मात्र त्यानंतर पुन्हा काही दिवसांनी तो रागाने रुसून बसायचा.

महाविद्यालयात अनेक मित्र होते, बरेच कार्यक्रम व्हायचे. अशा वेळी एकमेकांशी बोलावेच लागायचे. पण असे घडताच तो पूर्णिमाशी बोलणे बंद करायचा. मग काय, ती पुन्हा एकदा त्याची मनधरणी करण्यासाठी शक्य तेवढे सर्व प्रयत्न करायची.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...