* मोनिका अग्रवाल

राधेराधे... राधेराधे... राधेराधे... जय श्रीराम... जय श्रीराम... जय श्रीराम... रमाकांत पूर्ण श्रद्धेसह भक्तीत लीन झाले होते. सोबत घरातली मंडळी घंटा वाजवत होती. या आवाजामुळे मुलाचे अभ्यासात लक्ष लागत नव्हते. तो सतत जाऊन आईला सांगत होता, ‘‘आई, कृपा करून बाबांना सांग की, सर्वांना थोडया हळू आवाजात पूजा करायला लावा. उद्या माझा बोर्डाचा पेपर आहे आणि आवाजामुळे मी नीट अभ्यास करू शकत नाही.’’

त्याचे बोलणे रमाकांत यांनी ऐकले आणि रागाने म्हणाले, ‘‘ही काय अभ्यासाची वेळ आहे? उद्या परीक्षा असेल तर तुला आज देवासमोर नतमस्तक होऊन बसायला हवे.’’

बोला जय सीताराम... जय जय सीताराम... असे म्हणत ते बायकोवरच रागावले. अक्कल नाही का तुला? इथे महाराज पूजा करत आहेत आणि तू मुलामध्ये वेळ का घालवतेस? मूर्ख बाई... जा, सर्वांसाठी गरमागरम दूध आण. बिचारी, ‘हो’ असे म्हणत आत गेली.

प्रसाद तयार झाला का? महाराजांच्या सेवेत काही कमतरता नको. जितकी मनोभावे सेवा करशील तितकाच मेवा मिळेल... आपले अहोभाग्य म्हणून महाराज आपल्या घरी आलेत... किती जणांनी त्यांना आमंत्रण दिले असेल...  पण ते मात्र आपल्याकडेच आले. आज आपण जे काही आहोत ते केवळ त्यांच्यामुळेच, असे अधूनमधून सासू मोठयाने बोलत होती.

महाराजांच्या सेवेत संपूर्ण दिवस आणि अर्धी रात्र निघून जायची. झोपायला कसेबसे २ तास मिळायचे, मात्र तितक्यातच ४ वाजायचे आणि सासू आवाज द्यायची की, महाराजांच्या अंघोळीची वेळ झाली... तयारी केलीस का...? ६ वाजता त्यांना फेरफटका मारायला जायचे असेल... लक्षात आहे ना तुझ्या? सर्वात आधी उठून अंघोळ कर.

असे दरवर्षी व्हायचे. या घरी आली आल्यापासून हेच बघत आली होती. एखाद्या गरीब, गरजूने विनवणी करूनही त्याला घरातले कोणी साधे १० रुपये देत नसत, पण महाराज, बाबा-बुवांवर लाखो रुपये खर्च केले जात, याचे तिला दु:ख व्हायचे. ती लग्न करून आली तेव्हा सुरुवातीला फक्त एकच महाराज येत असत. तेही फक्त २ किंवा ३ तासांसाठी, पण हळूहळू नवऱ्याचा बाबा-बुवा, महाराजांवरील विश्वास वाढला. त्यातच उत्पन्नही वाढले आणि एका महाराजासोबत आणखी दोघे येऊ लागले. आता तर महाराज त्यांची पत्नी आणि सोबत ११ माणसांना घेऊन येतात. एकाचा पाहुणचार करणे सोपे होते, आता एवढ्या सर्वांची उठबस करावी लागते. त्यातच शेजारी, नातेवाईक महाराजांना भेटायला येतात आणि काम करणारी ती फक्त एकटीच असते.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...