* मेनका गांधी

१९९०मध्ये कोलकाताच्या प्रसिद्ध प्राणिसंग्रहालयात एका मादी जिराफाला आफ्रिकेतून मागवण्यात आले होते. मादी जिराफ प्रत्यक्षात खूपच सुंदर होती. तिचं नाव एका तिस्ता नावाच्या नदीवरून ठेवण्यात आलं होतं. त्यावेळी जेव्हा हरकत घेतली गेली की अलीपूर प्राणिसंग्रहालय खूप छोटे आहे, त्यावेळी तत्कालीन मंत्र्यांनी सांगितले की, प्राणिसंग्रहालयाला मोकळ्या जागेत नेलं जाईल, जिथे तिस्ता मोकळेपणाने फिरू शकेल. तो दिवस अजूनपर्यंत उगवला नाहीए. तिस्ताही वाचली नाही आणि ४००० इतर प्राणीही अकाली मृत्यूचे शिकार झाले.

कोलकाता प्राणिसंग्रहालयाने जिराफांना एका ट्रकमधून ओडिशाच्या नंदनकानन प्राणिसंग्रहालयात पाठविलं होतं, पण वाटेत लागलेल्या खराब रस्त्यांच्या धक्क्यांमुळे तिस्ताची कातडी सोलवटली आणि डोकं एका विजेच्या वायरीला लागलं. त्यामुळे करंट लागून तिचा मृत्यू झाला.

मोजकेच राहिलेत जिराफ

जगाला वाघ, हत्ती आणि चिंपांजींची काळजी आहे, पण लुप्तप्राय होणाऱ्या जिराफांची कोणी काळजी करत नाहीए. गेल्या १५ वर्षांत त्यांची संख्या ४० टक्के घटली आहे आणि आता जगभरात केवळ ८०,००० जिराफ राहिले आहेत.

यातील मुख्य दोषींमध्ये अमेरिकाही आहे, जी त्यांना धोकादायक स्थितीत पोहोचलेल्या प्राण्यांच्या यादीमध्ये समाविष्ट करायला तयार नाहीए, अमेरिकी पर्यटक जिराफांच्या हाडांपासून बनलेल्या सजावटी वस्तू आवडीने खरेदी करतात. अमेरिकी शान मिरवण्यासाठी रोज सरासरी १ जिराफ मारले जाते. अजून चीनींना याची नशा चढलेली नाही. ज्या दिवशी त्यांच्यावर जिराफांपासून बनलेल्या वस्तू खरेदी करण्याची नशा चढेल, ते आपल्या मनी पॉवरने सर्व जिराफांना एका महिन्यात मारून तुकडे करून चीनमध्ये मागवतील. जिराफांची संख्या आता हत्तींपेक्षा कमी आहे.

जिराफ जगातील सर्वात उंच प्राणी आहे. त्यांचे पाय साधारण उंच माणसापेक्षाही जास्त उंच असतात. ते आफ्रिकेतील ओसाड व कोरड्या भागात चरताना दिसून येतात. ते खूप वेगाने धावू शकतात - प्रतितास ३५ मिलोमीटर वेगाने, पण हा वेग बंदुकीच्या गोळीपेक्षा खूप कमी आहे.

सहजपणे शिकार

जिराफांची मान उंच असते, त्यामुळे जमिनीवरील गवत तर खाऊ शकत नाहीत, पण झाडांची पाने खाऊ शकतात. जवळपास ४५ किलो दिवसातून दोनदा.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...