* मिनी सिंह
आपण २१ व्या शतकात जगत आहोत. माणूस चंद्रावर पोहोचला आहे. अनेक क्षेत्रात मुली मुलांच्या समानतेने वाटचाल करत आहेत. उलट अनेक क्षेत्रात तर मुलींनी मुलांनाही मागे टाकले आहे. तरीही अजूनही काही लोक असे आहेत जे मुलींचे पावित्र्य त्यांच्या कौमार्यावरून ठरवतात. पुरुषांसाठी आजही मुलीचे कौमार्य महत्वाचे मानले जाते. आजही त्यांच्या पावित्र्याची पडताळणी केली जाते.
जरी आपण पाश्चिमात्य संस्कृतीचे पालन करतो, त्यांच्यासारखे खाणेपिणे, त्यांच्यासारखे उठणेबसणे, शिकणे, बोलणे, राहू इच्छितो, पण तरीही मानसिकता अजूनही १४-१५व्या शतकातील आहे. सुशिक्षित असूनही कुठेतरी मुलांची मानसिकता अजूनही अशीच आहे की त्यांची नववधू व्हर्जिन असायला हवी.
आजही भारतीय समाजात लग्नात मुलगी व्हर्जिन असणे अनिवार्य मानले जाते. मुली व्हर्जिन असणे घराची प्रतिष्ठा व चारित्र्य यांच्याशी तोलले जाते. जर लग्नाआधी मुलगी आपल्या पुरुष मित्रांसोबत शारीरिक संबंध ठेवत असेल तर तिला चारित्र्यहीन म्हटले जाते. पण जर मुलाने असे केले तर म्हटले जाते की हे वयच असे असते.
व्हर्जिनिटीचा अर्थ
व्हर्जिनिटीचा अर्थ कौमार्य म्हणजे मुलगी कुमारिका आहे व तिने याआधी कोणाशीच शारीरिक संबंध ठेवले नाहीत. ती व्हर्जिन आहे. हे तपासण्यासाठी आपल्या समाजात अनेक मार्ग उपलब्ध आहेत. ज्यात सर्वात विचित्र मार्ग म्हणजे पहिल्या रात्री बेडवर पांढरी चादर टाकून पाहणे की संभोगानंतर चादरीवर रक्ताचे डाग पडले आहेत की नाही. कौमार्याबाबत आजही इतके गैरसमज आहेत की शिकलेसवरलेले लोकसुद्धा ही गोष्ट नाकारत नाही.
कौमार्याबाबत गैरसमज
पहिल्यावेळी शरीरसंबंध ठेवले की रक्तस्त्राव होतोच हा सर्वात मोठा गैरसमज आहे, कारण ९० टक्के घटनांमध्ये पहिल्यावेळी सेक्स केल्यास रक्तस्त्राव होत नाही. एका संशोधनात असे आढळले की सेक्स दरम्यान रक्तस्त्राव होत नाही. घोडेस्वारी व टेम्पोन अशा खेळांमुळे पडदा फाटतो किंवा तो अत्यंत पातळ होतो किंवा राहातच नाही.
पहिल्या वेळी सेक्स करताना वेदना होतात, हा एक दुसरा गैरसमज आहे. जर सेक्सच्या वेळी मुलगा व मुलगी मानसिकदृष्टया तयार असतील तर शक्यता आहे की वेदना होणार नाहीत. पण जर मुलगी तणावाखाली असून सेक्ससाठी मानसिकदृष्टया तयार नसेल तर योनी कोरडी व आकुंचन पावली तर पहिल्या वेळी वेदना होण्याची शक्यता असते. जर सेक्सआधी योग्य प्रकारे फोरप्ले केला गेला तरी वेदनेची शक्यता कमी असते किंवा नसतेच.