* प्रतिनिधी
‘‘रूठे रुठे पिया मनाऊ कैसे’ नाराज पतीराजांकडे एक प्रेमभरा कटाक्ष टाका आणि प्रेमाने त्यांना आपल्या बाहुपाशात येण्याचं निमंत्रण द्या. मग पहा मनातल्या निरगाठी कशा उकलतात ते. प्रेमाने आसुसून त्यांनी बाहुपाशात घेतलं की सुरुवातीच्या रोमॅण्टिक दिवसांतल्या मधुर क्षणांच्या आठवणी ताज्यातवान्या होतील. या विचारात हरवून गेलेली सजणी रुसलेल्या प्रियतमाचा रुसवा काढण्यासाठी काही ना काही अल्लड आणि खट्याळ खोड्या करण्यात गुंतून जाते.
तसं तर रुसणं हा तर स्त्रियांचा स्वभावधर्म. पण पतीराज नाराज झाले तर त्यांचा रुसवा काढायचं कसब तिच्याकडे नक्कीच आहे. निसर्गाने स्त्रिला अनेक कौशल्य प्रदान केली आहेत. त्यांपैकी एक म्हणजे त्या प्रेमाने आणि आपलेपणाने सर्वांचं मन जिंकून घेतात. याच कौशल्यामुळे त्यांचे वैवाहिक संबंधही मधुर बनतात. पण पतीराजांची नाराजी जास्तच वाढलेली असेल तर त्यांचा रुसवा काढण्याच्या सर्व युक्त्या असफल होतात. अशा वेळी सणासुदीच्याप्रसंगी एकमेकांना बांधून ठेवणाऱ्या प्रेमाची जाणीव पतीराजाना करून द्या. मग पहा, ते आपणहून तुमच्या जवळ कसे येतात ते.
रम्य सकाळ तुमच्यासाठी
सकाळी डोळे उघडण्यापूर्वी तुमचा प्रेमळ स्पर्श आणि मग तुमच्या नुकत्याच न्हायलेल्या केसांतून पाण्याचे थेंब त्यांच्या चेहऱ्यावर पडणं आणि डोळे उघडत असतानाच कपाळावर उमटलेली तुमच्या प्रेमाची मोहर या सर्वांमुळे त्यांच्या दिवसाची सुरुवात कशी प्रसन्न होते ते पहा. सणासुदीच्या उत्साहाने आणि उल्हासाने त्यांचं मन आनंदाने भरून जाईल.
ते बेडवरून उठताक्षणी अशा नखऱ्याने त्यांना गुलाबाचं फूल द्या जणू काही एखादी प्रेमिका पहिल्यांदाच आपलं प्रेम व्यक्त करत आहे. अशा प्रकारे सकाळी लवकर त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा द्या. शयनगृहाच्या भिंतीवर लावलेल्या रंगीत कागदावर मोठ्या अक्षरात काही प्रेमळ ओळी लिहा. जसं की, ‘दिवाळीच्या पहिल्या शुभकामना माझ्या प्रिय पतीराजाना किंवा ‘सणासुदीच्या या रम्य सकाळी माझ्या प्रियतमाला मन:पूर्वक शुभेच्छा.’ तुमच्या या प्रेमळ शब्दांमुळे त्यांना जाणीव होईल की, त्यांच्या मनात सर्वप्रथम स्थान त्यांच्या पतीराजांना आहे, त्यानंतर अन्य नात्यांना.