* पूनम अहमद

जीवनाच्या सफरीत दिर्घकाळ एकमेकांची साथ निभावणं हाच विवाहाचा उद्देश असतो. मात्र, लाँग डिस्टन्स विवाहाचा आपल्या बहरणाऱ्या करिअरवर परिणाम का होऊ द्यावा? आजकालच्या अनेक तरुणींना आपली लाँग डिस्टन्स रिलेशनशिप आपल्या करिअरमध्ये अडथळा ठरावी, असे मुळीच वाटत नाही. या विषयावर अनेक विवाहितांशी बोलल्यावर व त्यांचे विचार जाणून घेतल्यावर, समाजातील बदल आता ठळकपणे दिसून येत आहेत.

वेगळं राहाणे सोपे नाही

मुंबईतील कविता टीव्ही मालिकांमध्ये काम करते. सात वर्षांपूर्वी तिचा विवाह दिल्लीच्या एका बिझनेसमॅनशी झाला होता. ती सांगते, ‘‘वेगळे राहणे सोपे नाही. खूप धाडस असावे लागते. एकमेकांवर विश्वास ठेवावा लागतो आणि एकमेकांना समजून घ्यावे लागते. आम्ही बऱ्याच वेळा फोनवरच बोलत असतो. व्हिडीओ कॉल करतो. आम्ही आमचे नाते आणखी चांगले बनविण्याचा प्रयत्न करतो. आम्ही रोज एकमेकांबद्दल माहिती घेत राहतो. २-३ महिन्यांनंतरच आमची भेट शक्य होते. अधूनमधून काही वेळा काम नसतं, तेव्हा आम्ही एकमेकांसोबत असतो. आम्ही जेव्हा कधी बऱ्याच कालावधीनंतर भेटतो, तेव्हा असे वाटते की, हरविलेले प्रेम परत मिळाले आहे. इथे मुंबईमध्ये मी माझ्या आईवडिलांसोबत राहते. जेव्हा मुंबईमध्ये असते, तेव्हा पती आणि सासरची प्रत्येक गोष्ट आठवत राहते. दिल्लीमध्ये असते, तेव्हा पेरेंट्सची आठवण येते.’’

नात्यात विश्वास आवश्यक

अंधेरी, मुंबई निवासी सीमा बंसलने दुबईचे रहिवासी अनिल मेहरांशी विवाह केला आहे. सीमाने तिकडे जाऊन घरसंसार सांभाळताच, तिला मुंबईमध्ये ड्रेस डिझायनिंगचे एक नवीन काम मिळाले. तेव्हापासून ती दर महिन्याला १५ दिवसांसाठी मुंबईमध्ये येते. सीमाने आपल्या अनुभवांबाबत सांगितले, ‘‘आता जीवन खूप सुंदर वाटते. मी दुबईला शिफ्ट झाले होते. कारण मला माझ्या संसारावर लक्ष केंद्रित करायचे होते, पण मला आलेली ही ऑफर नाकारायला माझे मन मानले नाही. माझ्या सासरची मंडळी आधुनिक आणि विकसित विचारसरणीची आहेत. त्यांना मला पारंपरिक सून बनवून ठेवायचे नव्हते. अनिल माझे सर्वात उत्तम मित्र आहेत. त्यांना चांगल्याप्रकारे माहीत आहे की, ते माझ्यासाठी सर्वात महत्त्वपूर्ण आहेत आणि तेच माझी दुनिया आहेत. आमचे अफेअर दोन वर्षांपर्यंत चालू होते. तरीही हे लाँग डिस्टन्स रिलेशनच होते. खरे तर दूर राहण्यामुळे आम्ही एकमेकांना चांगल्याप्रकारे जाणू शकलो. आमचे छंदही एकसारखेच आहेत आणि आम्ही एकमेकांच्या स्पेसचा सन्मान करतो. आमच्या नात्यात विश्वास आणि अंडरस्टँडिंगसारख्या या दोन मजबूत गोष्टी आहेत. मी जेव्हा मुंबईत असते, तेव्हा मला त्यांची खूप आठवण येते.’’

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...