* अनुराधा गुप्ता
नात्यांना अधिक दृढ करण्यासाठी काही असे उपाय करा जे तुमच्या कौटुंबिक आणि सामाजिक नात्यांमध्ये गोडवा भरून ते अधिक सुखद करतील.
कौटुंबिक नाती
सर्वप्रथम आपण कौटुंबिक नात्यांबद्दल बोलूया जी आपल्याला वारसाने मिळतात आणि जी एखाद्या संपत्तीपेक्षा अधिक असतात. चला तर मग आम्ही तुम्हाला अशा काही 10 पद्धती सांगतो ज्यामुळे तुम्ही तुमची कौटुंबिक नाती अधिक दृढ करू शकाल :
1) प्रपंच सोडा : प्रपंच खूपच खमंग शब्द आहे. लोक याचा मिटक्या मारत वापर करत असतात. उदाहरणार्थ. सुनेच्या भावाने आंतरजातीय लग्न केलं. मग काय सुनेला लोकांना उत्तर देणं कठीण होऊन बसतं. सासूबाई तर त्यांच्या संस्काराची उदाहरणं देऊन देऊन सुनेच्या माहेरच्या लोकांना नावे ठेवण्यात गर्क झाल्या.
अहो, ही गोष्ट एवढा इश्यू बनविण्याची मूळात गरजेचं काय? आंतरजातीय लग्न कोणता गुन्हा तर नाहीए ना. हा, एक आहे तो म्हणजे तुमच्या समाजातील लोक ही गोष्ट पचवू शकत नाहीत. परंतु सून तर तुमच्याच घरची आहे. तिच्या सुखदु:खात सहभागी होणं तुमचं कर्तव्य आहे, जे तुम्ही प्रपंचाच्या नादात उडवत आहात. तुम्हाला काय वाटलं की प्रपंच केल्याने तुम्ही दुसऱ्यांच्या नजरेत मोठं बनता आणि समोरच्याला दुसऱ्यांच्या नजरेतून कमी करता. तसं नाहीए उलट यामुळे तुमचीच पत कमी होते. तुमच्याच कुटुंबाची खिल्ली उडते, ज्यामध्ये तुमचादेखील समावेश होतो.
म्हणूनच या रोगापासून स्वत:ला कसे मुक्त कराल आणि दुसऱ्यांना कोणता सल्ला द्याल हे नक्की ठरवा.
2) तुमचं कर्तव्य समजून घ्या : कर्तव्याचा अर्थ केवळ आईवडिलांची सेवा करणं एवढंच नाहीए, उलट तुमच्या मुलांबद्दलदेखील तुमची काही कर्तव्य असतात. अलीकडचे आईवडील आधुनिकतेच्या चादरीने लपेटलेले आहेत. मुलांना जन्म देणं आणि त्यांना सुखसुविधा देण्यातच ते आपली जबाबदारी मानतात. परंतु यापेक्षादेखील ते स्वत:;चा वैयक्तिक आयुष्याला अधिक महत्त्व देतात. अशावेळी एवढंच म्हणू शकतो की तुम्ही एक आदर्श आईबाबा नाही आहात. परंतु या वर्षात तुम्हीदेखील आदर्श होण्याचा किताब मिळवू शकता. मात्र, यासाठी तुम्हाला तुमची कर्तव्य अधिक योग्यतेने अमलात आणायला हवीत.