* सुमन बाजपेयी
लग्नात काय भेटवस्तू द्यावी हे यावर अवलंबून असते की ज्याचे लग्न आहे त्यांच्याशी तुमचे काय नाते आहे. त्यानंतर हे महत्त्वाचे ठरते की तुम्ही कोणत्या प्रकारचे गिफ्ट त्यांना देऊ इच्छिता. गिफ्ट चांगले असेल याची काळजी अवश्य घ्या, पण त्याचबरोबर हे ही पहा की तुमचे बजेट कोलमडणार नाही. जर तुम्हाला वर किंवा वधूची पसंत नापसंत माहीत असेल तर मग त्यानुसारच गिफ्ट निवडा. जर ते शक्य नसेल तर अशी एखादी वस्तू द्या जी भविष्यात त्यांच्या कामी येईल. त्यांच्या संसारात उपयोगी ठरेल अशीच वस्तू द्या नाहीतर तुमचे गिफ्ट त्यांच्या घरातल्या एखाद्या कोपऱ्यात नुसतेच पडून राहील. सादर आहेत गिफ्ट निवडण्याच्या काही टीप्स :
डेकोरेटिव्ह आयटम्स
नवीन घर सजवायला डेकोरेटिव्ह आयटम्सची फार गरज असते. म्हणूनच तुम्ही हे गिफ्ट म्हणूनही देऊ शकता. बाजारात शोभेच्या सजावटी वस्तूंची खूप व्हरायटी उपलब्ध असते. शो पिसेस, फोटो फ्रेम, कलात्मक वस्तू, पेंटिंग आणि हँडीक्राफ्टचे सामान देता येईल. पण अशा वस्तू देताना या गोष्टी विचारात घ्या की ज्यांना तुम्ही हे गिफ्ट्स देणार आहात त्यांना अशा प्रकारच्या वस्तू आवडतात की नाही अन्यथा तुमचे गिफ्ट त्यांच्यासाठी कुठल्या निरुपयोगी वस्तूपेक्षा कमी ठरणार नाही.
सिल्व्हर गुड्स
चांदीच्या वस्तू अशा ओकेजन्ससाठी सर्वात उत्तम पर्याय असतात, कारण त्यांना एक ट्रॅडिशनल व्हॅल्यू असते. चांदीच्या वस्तूंचे वैशिष्टय म्हणजे वर आणि वधू दोघांनाही भेट देता येते. सिल्व्हर ज्वेलरी मग ती अंगठी असो किंवा इयररिंग्स, नेकलेस, ब्रेसलेट किंवा मग चांदीचे पैंजण वधूसाठी सर्वोत्तम असतात. सिल्व्हर ज्वेलरी फार एलिगंट दिसते. खासकरून तेव्हा जेव्हा त्यावर डायमंड, रुबीसारखे स्टोन्स जडलेले असतात. चांदीची हेअर पिन, ब्रोचेस किंवा घडयाळसुद्धा देता येते. सिल्व्हर वर्क केलेल्या हॅन्डबॅग्स या उपयुक्त असतातच शिवाय ट्रेंडी लुकसुद्धा देतात. वराला सिल्व्हर चेन, रिंग आणि ब्रेसलेट देऊ शकता. दाम्पत्याला सिल्वर कटलरी सेट, सिल्व्हर पेपर आणि सॉल्ट शेकर्स किंवा सिल्व्हर बॉटल ओपनरसुद्धा देता येतो.