* मधू शर्मा कटिहा

पार्टी संपताच कावेरी नेहमीप्रमाणे तोंड फुगवून पती संदीपच्या पुढे-पुढे चालू लागली. गाडीत बसताच तिने संदीपसमोर प्रश्नांचा भडीमार केला, ‘‘जेव्हापण तुम्हाला श्रीमती टंडन भेटते, ती तुम्हाला पाहून इतकी का हसते? टंडन सरांसमोर तर ती आपले तोंड वाकडे करून राहते...नेहाने तुम्हाला मिस्टर हँडसम असे का म्हटले आणि जरी तिने असे म्हटले तरी तुम्हाला हसत आपल्या छातीवर हात ठेवण्याची आणि डोकं झुकवण्याची काय गरज होती? आणि ही जी तुमची सहाय्यक सोनाली आहे ना, तिची तर एखाद दिवशी तिच्याच घरी जाऊन चांगली खरडपट्टी काढीन. आपल्या नवऱ्याला घरी सोडून पार्टीत येते आणि बहाणा असा करते की त्यांची तब्येत ठीक नसते. दुसऱ्यांचेच पती मिळतात हिला थट्टा-मस्करी करण्यासाठी?’’ कावेरीचे कुरकुर करणे चालूच होते.

दोन वर्षांपूर्वी कावेरीचे लग्न झाले होते तेव्हा संदीपसारखा स्मार्टड्ड आणि देखणा नवरा मिळाल्याने तिचे पाय जमिनीवर टेकत नव्हते. पण काही दिवसांनंतरच तिचा सर्व आनंद गायब झाला. आता संदीपच्या सभोवताली कुणा महिलेला पाहून ती क्रोधीत होते.

कावेरीप्रमाणेच नताशाही तिचा नवरा रितेशच्या स्मार्टनेसला आपली सवत मानू लागली आहे, कारण रितेशच्या स्मार्टनेसमुळे तिची शांतता हिरावून गेली आहे. रितेश त्याच्या स्मार्ट असण्याचा फायदा घेत असल्याचे तिला वाटते. एखादी कुमारिका असो की विवाहित तो सर्वांशी घनिष्ठता वाढवतो.

रितेशला एखाद्या बाईशी बोलत असताना पाहून नताशा सर्वांसमोरच भांडणास सुरवात करते. आपला सन्मान वाचवण्यासाठी रितेश आपल्या मित्रांच्या पत्नींद्वारे केले गेलेले ‘हॅलो’, ‘नमस्कार’चे उत्तर देण्यासही कचरतो. नताशाबरोबर असताना त्याला खूप सावधगिरी बाळगावी लागेल. नताशाच्या निराधार संशयामुळे रितेशचे जीवन जवळजवळ संपले आहे.

नताशा आणि कावेरी यांच्याप्रमाणेच अशी कितीतरी बायकांची उदाहरणे आहेत, ज्या आपल्या पतीवर कुण्या स्त्रीची दृष्टी केवळ यासाठी सहन करू शकत नाहीत की त्यांचे पती त्यांच्यापेक्षा अधिक आकर्षक दिसतात. अशा परिस्थितीत कोणतीही महिला जवळ आल्याबद्दलचा दोषी त्या त्यांच्या पतीलाच मानून त्यांच्यावर शंका घेऊ लागतात.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...