* मदन कोथुनिया
पतिपत्नी यांचे आपसातील संबंध सुरळीत असणे हे फक्त दांपत्य जीवनासाठीच नाही तर आदर्श कुटुंबासाठीही गरजेचे आहे. इथूनच मुले शिकतात मधुर वाणी, समतोल वर्तन आणि ताळमेळ, ज्यामुळे त्यांचेही वैवाहिक जीवन आश्चर्याने व्यापते. तुम्ही दिला आहे का मुलांना हा वारसा?
तुम्ही एक गृहिणी आहात का आणि गोंडस मुलांची आईसुद्धा? मग तर आपल्या मुलांचे भविष्य उज्ज्वल व्हावे असे नक्कीच तुम्हाला वाटत असेल. पण याची योग्य पद्धत काय हे माहीत आहे का तुम्हाला? मुलांचे भावी आयुष्य सुखी असावे. यासाठी आईवडिलांचे नाते आपसात प्रेमपूर्ण असणे अत्यंत आवश्यक आहे.
तुम्हा उभयतांमध्ये जेवढे प्रेम, सन्मान असेल, मुलंही त्यांच्या वैवाहिक आयुष्य तितक्याच आनंदाने जगतील. शेवटी प्रत्येक गोष्ट जे तुमच्याकडूनच शिकणार आहेत. चला तर मग, या दांपत्य जीवनात गोडवा आणण्यासाठी जाणून घ्या काही बाबी :
लग्नाला प्राधान्य द्या
नेहमी लक्षात ठेवा की लग्नाला महत्त्व देणे गरजेचे आहे. थोडीशी चूकही महागात पडू शकते. लहान लहान बाबींमध्ये एकमेकांची बाजू घ्या, प्रेम दर्शवा. जेव्हा पती ऑफिसला जायला निघतील, तेव्हा दृष्टीआड होईपर्यंत त्यांना पाहात राहा. पतिनेही विनाकारण कधीतरी पत्नीला भेटवस्तू आणावी. यामधून मुलांना शिकायला मिळेल की पतिपत्नी एकमेकांसाठीच बनलेले असतात.
काही क्षण असावेत खाजगी
मुले झाली म्हणजे असे नाही की, तुमचे खाजगी आयुष्य संपुष्टात आले. सायंकाळी पती जेव्हा घरी परततात, तेव्हा मुलांसोबत वेळ घालवल्यानंतर १०-१५ मिनिटे खाजगी बोलण्यासाठी ठेवावीत. मुलांनाही स्पष्ट सांगावे की ही वेळ मम्मीपप्पांसाठी राखीव आहे. यावेळी तुम्ही दोघांनी सोबत राहा व मुलांना त्यांच्या कामात व्यग्र राहू द्या. १०-१५ मिनिटे केवळ आपल्याविषयी बोला.
दोघांनीही बाहेर जावे
पतिपत्नींनी एकत्र वेळ व्यतित करणे त्यांना नवी उर्जा मिळवून देते. मुले झाल्याने जबाबदाऱ्यांनी वेढून जाऊन हा आनंद गमावू नका. मुलांना घरी ठेवून तुम्ही बाहेरही फिरायला जावे. मुले जर लहान असतील तर तुम्ही शेजाऱ्यांची किंवा नातेवाईकांची मदत घ्यावी.