- परमजीत सोई, ब्यूटी एक्सपर्ट

  • मी २० वर्षीय तरुणी आहे. चेहऱ्यावर व वरच्या ओठांवर लव आहे. वॅक्स केल्यानंतर डाग राहातात. हे हटविण्याचा उपाय सांगा?

अपरलिप्स व चेहऱ्यावरची लव व डाग हटविण्यासाठी हळदीची घट्ट पेस्ट बनवा व त्यामध्ये लिंबाचा रस एकत्रित करून त्या जागी लावा. सुकल्यानंतर पाण्याने धुवा. असं ४-५ आठवडे सतत करा. हळूहळू डाग व लव विरळ होतील.

मी ३० वर्षीय महिला आहे. माझ्या समस्या डोळ्यांखालच्या काळ्या वर्तुळांबद्दल आहे. ते दूर करण्याचा उपाय सांगा?

डोळ्यांखालची काळी वर्तुळं कम्प्युटर स्क्रीनसमोर अधिक वेळ बसल्याने व झोप पूर्ण न होण्यामुळेदेखील होऊ शकतात. ते काढण्यासाठी झोपतेवेळी डोळ्यांच्या आजूबाजूला बदाम तेल वा अंडर आय जेल लावा. फायदा होईल. यासोबत पौष्टिक आहारदेखील घ्या.

  • मी १७ वर्षीय तरुणी आहे. माझ्या चेहऱ्यावर खूपच पिंपल्स आहेत आणि त्याचे डागदेखील पडले आहेत; ज्यामुळे चेहरा खूपच कुरूप दिसतो. मी खूप उपाय केलेत परंतु काहीच फरक पडला नाही. कृपया, मला ही समस्या दूर करण्याचा एखादा घरगुती उपाय सांगा?

चेहऱ्यावर पिंपल्स हे प्रदूषण व हार्मोनल बदलामुळे होतात. पिंपल्सचे डाग हटविण्यासाठी टोमॅटोचा रस कापसाच्या मदतीने डागांवर लावा. याव्यतिरिक्त बटाट्याची सालं चेहऱ्यावर चोळा. दही व बेसनचं उटणे लावा. लिंबाच्या रसात हळद मिसळून पेस्ट बनवा व पिंपल्सवर लावा. या सर्व घरगुती उपायांनी तुमच्या समस्येचं समाधान होईल आणि हळूहळू पिंपल्सचे डागदेखील विरळ होतील. याव्यतिरिक्त अधिक तेलकट अन्न खाऊ नका. जंक फूड खाऊ नका.

  • माझं वय २२ वर्षं आहे. माझी समस्या अशी आहे की थंडीत माझी त्वचा कोरडी व रुक्ष होते. त्वचेवर अजिबात चमक नसते. त्वचेतील ओलावा कायम राहावा यासाठी मला काय करायला हवं?

त्वचेतील कोरडेपणा दूर करण्यासाठी भरपूर पाणी प्या. कारण पाण्याच्या अभावामुळेदेखील त्वचा कोरडी व रुक्ष होते. याव्यतिरिक्त त्वचेवर अंघोळीनंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी मॉश्चरायझर लावा. त्वचेचा थंड वाऱ्यापासून बचाव करा. बाहेर पडण्यापूर्वी स्कार्फने चेहरा झाकून घ्या. त्वचा जर अधिक कोरडी असेल, तर गुलाबपाण्यात ग्लिसरीन एकत्रित करून त्वचेवर लावा. यामुळे चेहऱ्याला ओलावा मिळण्याबरोबरच चेहऱ्याचं टोनिंगदेखील होईल.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...