* प्रतिनिधी
- मी २७ वर्षांची तरुणी आहे. माझा विवाह ८ महिन्यांपूर्वी झाला आहे. मी आपल्या पतिला अजिबात पसंत करत नाही. ते एक उच्च अधिकाऱ्याच्या हुद्दयावर आहेत आणि स्वभावाने सरळही आहेत. मी मुंबईतील एका मल्टिनॅशनल कंपनीत जॉब करते. मुंबईत राहत असतानाच मागच्या ४ वर्षांपासून आपल्या बॉयफ्रेंडबरोबर रिलेशनशिपमध्ये होते. आम्ही एकाच फ्लॅटमध्ये बरोबर राहत होतो. बॉयफ्रेंड बंगालचा निवासी आहे. तर मी उत्तराखंडची राहणारी आहे.
आमच्या संबंधाबद्दल माझ्या पॅरेंट्सना माहिती होती. परंतु त्यांना हे स्थळ मंजूर नव्हते. बॉयफ्रेंड लग्नासाठी तयार होता. त्याच्या घरच्यांचाही विरोध नव्हता. पण माझे घरचे आग्रह करून मला सोबत घेऊन गेले आणि लग्नाचा दबाव टाकू लागले. या दरम्यान त्यांनी मला तयार करण्यासाठी जात-धर्म व सामाजिक बदनामीची भीतीही दाखवली. तरीही मी तयार झाले नाही.
एके दिवशी माझ्या आईने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिला हॉस्पिटलला अॅडमिट करण्यापर्यंत वेळ आली. घर-कुटुंब, मामा-मामी आणि त्याचबरोबर माझी एक टीचर, जिचा मी खूप सन्मान करते अशा सर्वांकडूनच माझ्यावर दबाव आणला गेला. मी आतून खचले आणि विवाहासाठी हो म्हटले. पती मोकळया मनाचे व विचारांचे वाटले. मी त्यांच्याबरोबर देहरादूनला गेले. जेथे त्यांची पोस्टिंग होती. परंतु रात्रं-दिवस बॉयफ्रेंडच्या आठवणीत गुंतून राहायची. नोकरीचे निमित्त करून नंतर मी मुंबईला येऊ लागले आणि पुन्हा बॉयफ्रेंडबरोबर राहू लागले. बॉयफ्रेंड खूप रडला आणि पतिकडून डिवोर्स घेण्यासाठी जोर देऊ लागला. मी त्याला सांगितले की मी पतिबरोबर सेक्स संबंध ठेवले आहेत, तरीही तो म्हणतो की त्याचा काही आक्षेप नाही आहे आणि तो मला जीवनभर प्रेम करत राहणार. त्याच्या दबावात येऊन मी एके दिवशी पतिला फोनवर सर्व सत्य खरं-खरं सांगितले.
ते काही वेळ तर शांत राहिले, नंतर म्हणाले की तुझे आपले जीवन आहे. तू ज्याच्याबरोबर राहू इच्छिते, राहा. पण मी डिवोर्स देणार नाही आणि तू स्वत: माझ्याकडे परत येशील याची वाट बघेन. मी पतिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी ऐकले नाही आणि म्हणत राहिले की तू नाही तर कोणीच नाही.