• मी २३ वर्षीय तरुणी आहे. माझ्या लग्नाचं जमत आहे. मात्र, अनेक स्थळांनी या कारणामुळे मला नकार दिला आहे; कारण त्यांना चष्मा असलेली मुलगी नको आहे. मी आता कॉन्टॅक्ट लेन्स घेतल्या आहेत जेणेकरून माझं लग्न ठरेल. सध्या एकदोन ठिकाणी माझ्या लग्नाची बोलणी सुरू आहे. मी त्यांना कॉन्टॅक्ट लेन्सविषयी सांगावं की नाही? यावरून घरात खूप तणाव असतो. मला काय करायला हवं?

कॉन्टॅक्ट लेन्स हा चांगला पर्याय आहे आणि यात काही धोका नाही. पण लग्नाआधी दोन्ही पक्षांनी आपल्याविषयीची सविस्तर माहिती एकमेकांना देणं गरजेचं असतं.

जर तुमच्या कुटुंबियांना असं वाटत असेल की मुलाकडील लोकांना हे सांगू नये तर तुम्ही स्वत:हूनच मुलाला ही गोष्ट सांगू शकता.

मुलगा जर समंजस असेल तर तुमचा हा प्रामाणिकपणा पाहून प्रभावित होईल. शिवाय तुम्हालाही लग्नानंतर ही गोष्ट लपविल्याची हुरहुर लागणार नाही.

  •  मी ३० वर्षीय विवाहित महिला आहे. आमचं विभक्त कुटुंब आहे. माझी लहान बहीण आमच्यासोबतच राहाते. माझं माहेर खेडेगावात आहेत म्हणून ती पुण्यात आमच्यासोबत राहून बीए करत आहे. माझे आईबाबा तिला हॉस्टेलमध्येच ठेवणार होते पण मी आणि माझ्या पतीने बळजबरीने तिला आमच्यासोबत ठेवून घेतलं.

माझ्या बहिणीने मला सांगितलं की भावोजींनी रात्री दारू पिऊन तिच्यासोबत गैरवर्तन केलं. या आधीही तिने मला सांगितलं होतं की, भावोजी तिची चेष्टामस्करी करतात आणि तिच्यासोबत गैरवर्तनही करु पाहातात. तेव्हा ही गोष्ट मी फारशी गंभीरपणे घेतली नव्हती, पण आता मी खूप चिंतित आहे, पतीला याविषयी कसं विचारायचं याची मला भीती वाटते. हे प्रकरण आणखी पुढे वाढू नये, यासाठी मी काय करू?

तुमच्या बहिणीने जेव्हा पहिल्यांदा तुमच्या पतीच्या गैरवर्तनाविषयी तुम्हाला सांगितलं होतं तेव्हा तुम्ही सावध व्हायला हवं होतं. तुम्ही तेव्हा गप्प बसल्यामुळे त्यांचं धाडस वाढलं आणि त्यांनी पुन्हा ते कृत्य केलं. आता तुम्ही त्यांना मोकळं सोडू नका. चांगलं खडसावून विचारा. याचबरोबर बहिणीला हॉस्टेलमध्ये पाठवण्याची व्यवस्था करा.

जोपर्यंत बहीण तुमच्या घरी असेल तोपर्यंत तुम्ही तिला एकटीला सोडू नका. तसंही तुमच्या पतीला जर कळलं असेल की तुम्हाला ही गोष्ट आता माहीत पडली आहे तर आता ते पुन्हा असं करण्याचं धाडस करणार नाहीत.

  • मी २४ वर्षांची विवाहित महिला आहे. माझ्या विवाहाला २ वर्षं झाली आहेत. पती आणि कुटुंबियांचं माझ्यावर खूप प्रेम आहे. पण तरीसुद्धा माझं या घरात मन लागत नाही. कारण मला माझ्या प्रियकराचा विसर पडत नाहीए. खरतर त्याने मला अगोदर लग्नाचं वचन दिलं होतं. पण नंतर त्याच्या कुटुंबियांच्या मर्जीनुसार त्याने दुसऱ्या मुलीशी लग्न केलं. आता मी काय करू, जेणेकरून त्याचा विसर पडेल आणि मी माझ्या संसारात रममाण होईन?

हे खरंय की, पहिलं प्रेम विसरता येत नाही. पण विसरता न येणं ही गोष्टही तितकी कठीण नाही. आणि तसं पाहिलं तर तुमच्या प्रियकराने तुमची फसवणूकही केली आहे. तुम्हाला लग्नाचं वचन दिलं आणि तुम्हाला संकटात टाकून दुसऱ्याच कुणासोबत लग्नदेखील केलं. म्हणूनच हे एक वाईट स्वप्न समजून ही गोष्ट विसरून जाण्यातच तुमचं हित आहे.

तुमच्या पतीचं आणि कुटुंबियांचं जर तुमच्यावर इतकं प्रेम आहे, तर त्या बदल्यात तुम्हीदेखील त्यांच्यावर प्रेम करायला हवं. तुम्ही संसारात मन रमवलं तर भूतकाळातील या घटनेचा काही दिवसांनी तुम्हाला विसर पडेल.

  • मी १८ वर्षांची विद्यार्थिनी आहे. शाळेत असताना केवळ मैत्रिणीच होत्या. मात्र, आता कॉलेजात मित्रही सोबत शिकत आहेत. जेव्हादेखील एखादा मुलगा माझ्या शेजारी बसतो, तेव्हा मला असं वाटू लागतं की मी त्याच्यावर प्रेम करू लागली आहे. मी जेव्हा एकटीच असते तेव्हादेखील त्या मुलाचाच विचार करत राहाते. हे कुणा एका मुलाला पाहून नाही, तर कुणीही मुलगा जो माझ्या संपर्कात येतो, तेव्हा माझ्या मनात अशीच भावना जागृत होऊ लागते. यामुळे मी अभ्यासात मागे पडू लागली आहे.

ही गोष्ट माझ्या दृष्टीने घातक तर नाही ना? मला काय करायला हवं?

तू याविषयी काळजी करू नको. खरं तर या वयात विरूद्ध सेक्सप्रती आकर्षण वाटणं स्वाभाविक आहे. हे लैंगिक आकर्षण असतं. जसजशी समज येत जाईल तसतसे सर्व काही सामान्य होत जाईल.

हो, पण यासाठी तू अभ्यासात किंवा घरकामात स्वत:ला गुंतवून ठेव. काही दिवसांनंतर तुझी ही समस्या दूर होईल.

  • मी २० वर्षीय विवाहित महिला आहे. माझं अलीकडेच लग्न झालं आहे. माझी ही समस्या आहे की माझ्या स्तनांची पुरेपूर वाढ झालेली नाहीए. त्यामुळे माझ्या पतींना संबंधाच्या वेळेस माझ्या स्तनांमध्ये अधिक रूची वाटत नाही.

शरीरसंबंधादरम्यानही आम्हाला आनंद मिळत नाही. आम्ही काय करायला हवं, जेणेकरून आम्हाला शरीरसुखाचा उपभोग घेता येईल?

स्तनांची वाढ ही आनुवंशिकतेनुसार होत असते. म्हणजेच स्त्रीची शारीरिक रचना आपल्या आईच्या शरीररचनेनुसार असते. एक मूल झालं की स्तनांच्या आकारात बदल होतो, पण स्तनांच्या आकारामुळे शरीरसंबंधाच्या आनंदावर कोणताही परिणाम होत नाही. म्हणूनच मनामध्ये कोणतीही हीनभावना न आणता सहवासाचा आनंद घ्या.

सहवासापूर्वी फोरप्ले केल्यानेही उत्तेजना मिळेल आणि शरीरसुखाचा संपूर्ण आनंद घेता येईल.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...