धर्म फूट पाडा राज्य करा

* हरिदत्त शर्मा

जर लोकांमध्ये भय आणि घृणेच विष भरलं तर त्यांना सहजपणे संघटित करता येतं. याचा नमुना आपण ३० वर्षांपासून पाहत आहोत. घृणा पसरविण्यासारख्या कार्यासाठी धर्मच सर्वाधिक सुलभ आणि स्वस्त विष आहे. ज्याचा वापर वर्षानुवर्षे शासक वर्ग आणि धार्मिक गुरु करत आले आहेत.

मतांच्या राजकारणासाठी धर्मरूपी विषाचा वापर जवळजवळ सर्वच राजकीय पक्ष कोणत्या ना कोणत्या रूपात करत आहेत. भारतीय जनता पार्टीचं पाहून काँग्रेस, समाजवादी, तृणमूल काँग्रेस इत्यादी भयभीत लोकांप्रती सहानुभूती दाखवून त्यांची मतं आपल्या पक्षासाठी पक्की करून घेण्याच्या मागे जुटलेली आहेत. आता मुसलमानांना देशद्रोही सिद्ध करून हिंदूंची मतं स्वत:च्या बाजूने करून घेऊ इच्छितात. लोकांचा विकास आणि त्यांच्या समस्या सोडविण्याची चिंता कोणालाही नाही आहे. सर्व पक्ष ‘फूट टाका आणि राज्य करा’च्या सिद्धांताचा पुरेपूर फायदा घेण्यात जुंपलेले आहेत.

लोकसभेमध्ये चालणारे वादविवाद सामान्य जनतेला असा संकेत देत आहेत की धर्माच्या आड सत्तेला कसं बनवता येईल वा सत्तेला कसं मिळवता येईल. आता तर कोणत्याही पक्षाला हिंदू आणि मुस्लिमांमध्ये बंधुत्व व्हावं असं वाटतच नाही.

धर्माच्या नावावर विभागले जातात

नेते वा धर्मगुरूंची रोजीरोटी याच गोष्टीवर निर्भर करते की लोक धर्माच्या नावावर विभागत आहेत. खरंतर वर्षानुवर्षे असंच होत आहे. फोडा आणि राज्य करा. धर्माच्या नावावर आणि जातीच्या नावावर लोकांना अगदी सरळपणे विभागलं जाऊ शकतं. पूर्ण जातीला संघटित ठेवण्यात देखील या धर्मरूपी विषाचाच उपयोग केला जातो. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या धर्म विषयाच्या आधारे स्वत:च अस्तित्व राखून आहेत. पश्चिमी आशियातील सर्व हुकूमशाहा अशा युक्तीचा वापर करूनच स्वत:ची सत्ता राखण्यात यशस्वी झाले आहेत.

धर्माच्या आड लाखो निरपराध लोकांना तुरुंगात  टाकणं आणि निरपराध लोकांवरती बॉम्ब वर्षाव करण्याला पुण्याचं कार्य म्हटलं जातं. सामाजिक वाईट गोष्टींना उचित मान देऊन त्यांचा सन्मान केला जाऊ लागला आहे.

रशिया आणि युक्रेनच्या युद्धात मास्कोच्या ऑर्थोडॉक्स चर्चचा खूप मोठा हात आहे. जे रशियाच्या आक्रमणाला होली म्हणतात. आपल्या पूर्वग्रहांना सोडून एकदा मोकळेपणे आणि शांतपणे विचार कराल तेव्हा एक गोष्ट स्पष्ट होईल की धर्म हा जगतातील सर्वात मोठा रोग आहे.

हजारो वर्षापासून लोकं धर्माच्या नावावर मारझोड करत आले आहेत. असं मानलं जातं की गेल्या ३ हजार वर्षांपासून जीदेखील १५,००० पेक्षा अधिक मोठी युद्ध लढली गेली ती प्रामुख्याने धर्माच्या नावावरतीच होती. धर्म रक्षेच्या नावावर, धर्म वाचविण्याच्या नावावर वा धर्म पसरविण्याच्या नावावरदेखील होती.

घटनांमागे कोण

ईसाई पूर्व फैलावाच्या दरम्यान धर्मगुरूंच्या मनात देखील हाच विचार निर्माण झाला होता की धर्माच्या नावावरदेखील युद्ध लढली जाऊ शकतात व युद्धदेखील धार्मिक होऊ शकतात. मग इस्लाम व इतर धर्मांनीदेखील त्याचं अनुकरण करायला सुरुवात केली. ज्यामुळे जगात अशी युद्ध होऊ लागली. ज्यांना धर्मयुद्ध म्हटलं गेलं.

धर्मगुरूंनी लोकांच्या मनात ही गोष्ट ठसवली की मातृभूमीचं रक्षण करताना जी माणसं स्वत:चे प्राण गमावतात त्यांना सरळ स्वर्गवास मिळतो. रामायण आणि महाभारताच्या युद्धांना या धर्मग्रंथांच्या कल्पित कथांमध्ये धर्मयुद्धच म्हटलं गेलं होतं. जवळजवळ सर्व घटनांमागे कोणता ना कोणता धर्मगुरु उभा राहिला आहे.

शासक वर्गाने स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी धर्मगुरूंच्या मदतीने धर्माचा सर्वात जास्त दुरुपयोग केला आहे. धर्मगुरूंनीदेखील आपली आजीविका व शक्ती कायम राखण्यासाठी शासक वर्गाला पूर्णपणे साथ दिली आणि धर्माच्या आड सामान्य जनतेला मूर्ख बनवलं.

सत्य तर हे आहे की कोणतीही व्यक्ती हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन व बौद्ध फक्त यासाठी आहेत कारण त्यांचे आई-वडील तो धर्म मानत आहेत. हिंदुत्व काय आहे हे अनेक हिंदूंनाच माहीत नाही. माणुसकी काय आहे हे कोणाला माहित नाही. ख्रिश्चन काय आहे हे ख्रिश्चनांनादेखील माहित नाही. इस्लाम काय आहे हे तर कितीतरी मुसलमानांना माहिती नाही. जसे धार्मिक संस्कार त्यांना त्यांच्या कुटुंबाकडून मिळाले आहेत तेच ते पुढे चालवत आहेत.

तसं तर संसारातील सर्व धर्म सत्य, अहिंसा, प्रेम, सहनशीलता व बंधुत्वाचा संदेश देताना दिसतात. परंतु संपूर्ण जगतात धर्माच्या नावावरती हिंसा, आतंकवाद व युद्ध चालली आहेत. एक धर्माचे अनुयायी दुसऱ्या धर्माच्या अनुयायींना आपल्या शत्रू मानत आहेत आणि त्यांच्या हत्या करण्याला देखील धर्माचं कार्य मानत आहेत.

दुसऱ्या धर्माच्या धार्मिक स्थळांना पाडणं व जाळणं केवळ हीच लोकं करत आहे जी स्वत:चं स्वत:च अस्तित्व व धर्माचे सच्चे अनुयायी मानत आहेत. नास्तीक लोक अशा कार्यांपासून दूर राहतात. आस्तिक लोकं धर्मयुद्ध, जिहाद वा उग्रवादसारख्या घृणीत कार्यांमध्ये सहभागी होतात. जो अस्तिक एखाद्या कारणाने दुसऱ्या धर्माच्या स्थानाला नष्ट करू शकत नाही त्याला दोष देत राहतात.

परंतु मजेची बाब ही आहे की ज्या गोष्टींना लोकं धर्म मानत आहेत ते मनुष्यांना मनुष्यापासून तोडण्याचं काम करत आहेत, जोडण्याचं नाही. जो धर्म माणसाला माणसाशी जोडू शकत नाही, तो माणूस ईश्वराला कसा काय जोडू शकतो?

काल्पनिक कथा

सर्वधर्म आस्था, अंधश्रद्धा व खोटया चमत्कारांच्या आधारे चालत आहे. सर्वधर्मांनी आपल्या धर्मातील देवीदेवतांसोबत अनेक प्रकारच्या चमत्कारांच्या कथा जोडलेल्या आहेत. सर्वधर्म हे आश्वासनदेखील देतात की जो देखील त्यांच्या धर्माला मानेल त्याच्या सर्व आकांक्षा पूर्ण होतील आणि मृत्यूनंतर देखील सरळ स्वर्गात स्थान मिळेल. या जन्माच्या चक्रामधून त्यांना मुक्ती मिळेल.

हे देखील सत्य आहे की सामान्य जनतादेखील सर्वधर्मांच्या चमत्कारांची अपेक्षा करते आणि त्या चमत्कारांना पाहण्याच्या इच्छेमुळे अंधश्रद्धामध्ये बदलते. प्रत्येक धर्माच्या चमत्कारांच्या कथा आहेत. ज्यांचा कोणताही तार्कीक आधार नाही. ते फक्त धर्माच्या पुस्तकांमध्येच आहे.

धर्मगुरु लोकांना कायमच शिकवण देतात की जोपर्यंत तुम्ही धर्माच्या गोष्टीवर श्रद्धा ठेवणार नाही तोपर्यंत तुम्हाला ईश्वर कधीच मिळू शकत नाही. अशा धार्मिक विचार शून्यतेमुळेच धार्मिक व्यक्ती अनेकदा अंधश्रद्धाळू बनते आणि धर्माच्या नावावर आपल्या जीवनाचं बलिदान करायला देखील तयार होते. अशा ईश्वराला मिळवून तुम्ही काय करणार हे समजण्याची चिंता धर्मगुरू करत नाहीत. कारण त्यांनी अगोदरच सांगून ठेवलं आहे की ईश्वर भेटल्यावर त्याच्याजवळ पैसा, सोनं, भरपूर खाणं, आरोग्य आपोआप मिळेल.

एक मोठा व्यापार आहे धर्म

धर्म जगातील सर्वात मोठा व्यापार आहे, ज्यामध्ये लोकांना नरकाचं भय व स्वर्गाचा लोभ दाखवून तसंच मोक्षाच्या नावावर भटब्राह्मण अनेक प्रकारे लोकांना फसवत असतात. धर्म फक्त तिथेच असतो जो एक मनुष्य दुसऱ्या मनुष्याशी जोडला जावा, ना ही तोडला जावा. जेव्हादेखील एखादी व्यक्ती आपल्यावर विशेष धर्माचा लेबल लावू लागते तेव्हा ती दुसऱ्या धर्माच्या लोकांना आपला शत्रू मानू लागते. आणि त्यांच्या धर्मस्थळांच नुकसान करून एक विशेष सुख अनुभवू लागते. आपल्या पूर्वग्रहांनुसार त्याला एक पुण्याचा कार्य मानू लागते.

हे काम आज देशाचे संविधान करत आहे. ते सामान्य लोकांच्या अधिकारांचे रक्षण करत आहे. धर्म आणि सरकारच्या आतंकवादी लोकांना वाचविण्याचा प्रयास करत आहे. धर्मगुरू आता प्रत्येक संविधानाच्या मागे पडले आहेत. भारताचे संविधानाचे रक्षक राम मंदिरसारख्या अतार्कीक निर्णय संविधानाच्या नावावर धर्माच्या रक्षणासाठी देतात आणि अमेरिकेत स्त्रियांना गुलामीत ढकलण्याचा निर्णय देतात.

सक्षम, चतुर धर्माच्या आधारे स्वत:चं जीवन सुखी बनविण्यासाठी सर्व धर्म स्त्रिया आणि गरीबांना गुलामीच्या सीमेपर्यंत ठेवतात. कारण धर्मगुरूंचा फायदा यामध्येच तर आहे.

बाल्कनी अशी बनवा सुंदर

* नसीम अंसारी कोचर

लग्नानंतर शर्मिष्ठा लखनऊहून दिल्लीला आली तेव्हा मोकळया बागेतील घर सोडून सासरच्या तीन बीएचकेच्या फ्लॅटमध्ये राहाणे तिच्यासाठी खूप त्रासदायक झाले. तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये राहाताना तिला गुदमरल्यासारखे वाटत होते. असे घर जिथे छत किंवा जमीन स्वत:ची नव्हती. तिथे सूर्यप्रकाशही येत नव्हता.

शर्मिष्ठा लहानपणापासून तारुण्यापर्यंत ज्या घरात राहिली तो बंगला होता. समोर बाग, मागे किचन गार्डन होते. प्रत्येक खोलीत खिडक्या, स्वच्छ मोकळी हवा होती. सकाळच्या सूर्याची पहिली किरणे घराच्या मध्यभागी अंगण आणि अंगणात पडणारी सूर्यकिरणे होती. त्यामुळे सासरी आल्यानंतर फ्लॅटमध्ये राहताना तिला श्वास कोंडल्यासारखे वाटत होते. फ्लॅट चारही बाजूंनी बंदिस्त होता, त्यात मोकळेपणाच्या नावावर एकच बाल्कनी होती, जिथे ती उभी राहून दीर्घ श्वास घेत असे.

शर्मिष्ठाला या घरात राहाणे भाग होते, कारण दिल्लीसारख्या ठिकाणी बंगल्याची कल्पनाच करता येत नाही, त्यामुळे बाल्कनीलाच असा लुक देण्याचा विचार तिने केला, ज्यामुळे निसर्गाशी जवळीक साधता येईल. शर्मिष्ठाने छोटया कुंडीत काही रोपे लावली.

घरातील तुटलेल्या वस्तू रंगवून त्यात छोटी मोसमी फुले असलेली रोपे लावली आणि बाल्कनीच्या रेलिंगला ठिकठिकाणी टांगली. काही ठिकाणी जुन्या बुटांमध्ये तर काही ठिकाणी चहाच्या किटलीत झाडांच्या वेली लोंबकळू लागल्या, त्या अतिशय आकर्षक दिसत होत्या. त्यांच्या मधोमध तिने रंगीत बल्ब आणि वाऱ्याच्या झुळुकीने कंप पावून कर्णमधुर संगीत ऐकवणाऱ्या लहान घंटा लावल्या.

बाल्कनीच्या एका कोपऱ्यात मोठया कुंडीत तुळस तर सदाहरित आणि गोड कडुलिंबाची काही रोपे मोठया कुंडीत लावली, त्यामुळे तो परिसर अधिकच हिरवागार दिसत होता. हळूहळू तिच्या बाल्कनीचे रूप बदलू लागले. एके दिवशी शर्मिष्ठाने बाजारातून बनावट गवत असलेला एक छोटा गालिचा विकत घेतला. तो बाल्कनीत पसरून तिने त्यावर दोन लहान बांबूच्या खुर्च्या आणि एक छोटासा टेबल ठेवला.

महिनाभरातच शर्मिष्ठाची बाल्कनी एका सुंदर बागेत रूपांतरित झाली, जिथे ती घरातली कामे आटपून सासू-सासऱ्यांसोबत गप्पा मारत बसू लागली. दुपारचे जेवण आणि संध्याकाळचा चहा दोन्ही तिने तिथे बसून प्यायला सुरुवात केली. शर्मिष्ठाच्या मेहनतीमुळे ती जागा त्या घरातील सर्वात सुंदर आणि घरातील प्रत्येक सदस्याची आवडती जागा बनली. हे पाहून आजूबाजूच्या फ्लॅटमधील लोकांनीही आपली बाल्कनी झाडे आणि रोपांनी सजवायला सुरुवात केली.

छोटं घर असो की घराबाहेर मोठी बाग, दोन खुर्च्या आणि एक टेबल, तिथे बसून सकाळचा चहा किंवा संध्याकाळची कॉफी पिणे, निसर्गाच्या सानिध्याचा आनंद लुटणे, हे प्रत्येकाचे स्वप्न असते, पण अपार्टमेंट आणि फ्लॅट संस्कृतीत हे सर्व शक्य नाही, असा विचार करून लोक मन मारून राहातात.

पण असे निराश होण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या छोटयाशा बाल्कनीलाही इतके सुंदर बनवू शकता, जेणेकरून तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात राहाण्याचा आनंद घेऊ शकाल. तुमची बाल्कनी हिरवीगार आणि सुंदर कशी बनवायची ते आम्ही तुम्हाला सांगतो, जेणेकरुन ते तुमचे आवडते ठिकाण बनेल आणि तुम्ही तिथे अधिकाधिक वेळ घालवाल.

कृत्रिम गवताचा वापर करा

तुमच्या बाल्कनीचे क्षेत्रफळ मोजा, त्यानुसार बाजारातून कृत्रिम गवत खरेदी करा. ते फिकट किंवा गडद हिरव्या रंगाचे दिसते, जे अगदी खरेखुरे वाटते. हे कृत्रिम गवत एका मिनिटात तुमच्या बाल्कनीचे रूप बदलून टाकेल. तुम्हाला बागेत असल्यासारखेच वाटेल. त्याची देखभाल करणेही खूप सोपे आहे.

हँगिंग पॉट्स आणि कुंड्यानी सजवा बाल्कनी

बाल्कनी छोटी असली तरी बागकामाचा छंद त्यात पूर्ण होऊ शकतो. तुम्ही बाल्कनीला रंगीबेरंगी फुलांची रोपे आणि वेलींनी सजवू शकता. त्यात झेंडूची रोपे नक्की लावा. हिवाळयाच्या हंगामात, अनेक प्रकार आणि रंगांत मिळणारे क्रायसॅन्थेमम्सचे रोपही तुम्ही लावू शकता. त्याची जास्त देखभालही करावी लागत नाही. पेटुनियाही एक चांगला पर्याय आहे. त्यांना ६ ते ८ तास सूर्यप्रकाश लागतो आणि कमी पाणी लागते.

यासोबतच मॉर्निंग ग्लोरीची फुलेही गुलाबी, निळया, जांभळया आणि पांढऱ्या रंगात उमलतात. तीही तुम्ही लावू शकता. कोरल बेल्स, फर्न इत्यादी हिरवीगार आणि ताजेपणाची अनुभूती देणारी रोपे बाल्कनीत लावायला हवीत. व्यवस्थित काळजी घेऊ शकत असाल तर तुम्ही बोन्सायही नक्की लावा.

भिंतीवर लावा चित्रे

पुढील जागा फुलांनी आणि मागची भिंत सुंदर चित्रांनी सजवा. या भिंतीवर तुम्ही सुंदर वॉलपेपर किंवा स्टिकर्सही लावू शकता. नैसर्गिक सौंदर्याची उधळण असलेले अनेक स्टिकर्स ऑनलाइन मिळतात.

शोपीस नक्की लावा

टेराकोटा, माती किंवा चिनी मातीचे विविध प्रकारचे शोपीस तुम्ही बाजारातून खरेदी करू शकता. हे ऑनलाइनही उपलब्ध आहेत. हे खास बाग नजरेसमोर ठेवून बनवले जातात. वाटल्यास तुम्ही मिनी कारंजेही खरेदी करू शकता. जर तुम्ही ते बाल्कनीच्या एका कोपऱ्यात लावले तर ते तुमची बाल्कनी जास्तच शोभिवंत बनवतील. झळझळ पाण्याच्या आवाजामुळे तुम्हाला निसर्गाच्या सान्निध्यात असल्याचा भास होईल. यामुळे बाल्कनीला अतिशय आकर्षक लुकही मिळेल.

रंगीबेरंगी दिवे किंवा आकाशकंदील लावा

दिवाळीच्यावेळी वापरलेली लायटिंग तुम्ही बाल्कनीत लावू शकता. तुम्ही जुन्या कंदीलाला पिवळा किंवा लाल रंग देऊन तो लटकवू शकता. वाटल्यास मेणबत्तीच्या स्टँडमध्ये आकर्षक रंगांच्या मेणबत्त्याही लावू शकता. बाल्कनीत तुळशीचे रोप असेल तर त्यावर दिवा ठेवण्यासाठी जागा बनवा. तुम्ही तुमची बाल्कनी फुलपाखरू, तारा किंवा चंद्रासारख्या अनेक प्रकारच्या हँगिंग लाइट्स म्हणजे लटकत्या दिव्यांनी सजवू शकता.

आरामदायी खुर्ची किंवा झोपाळा ठेवा

तुम्ही बागेच्या खुर्च्या, उशा, टेबल इत्यादी वापरून तुमची बाल्कनी एका लहान दिवाणखान्यात बदलू शकता. बाल्कनी मोठी असेल तर तिथे एक दिवाही लावू शकता, जेणेकरून तुम्ही तिथे सकाळ, संध्याकाळ बसू शकाल आणि काही एकांतातील क्षण घालवू शकाल. पुस्तक वाचू शकाल, पावसाचा आनंद घेऊ शकाल, चहा किंवा कॉफी पिऊ शकाल.

बाल्कनीला स्टोअररूम म्हणजेच अडगळीची जागा बनू देऊ नका

बाल्कनीत निरुपयोगी वस्तू ठेवू नका. बरेच लोक बाल्कनीत लहान मुलांची सायकल, खेळणी किंवा खोके इत्यादी ठेवतात, त्यामुळे बाल्कनी खराब दिसू लागते. बाल्कनीत कपडे सुकवणेही गरजेचे असते. त्यासाठी असे स्टँड वापरा जे काम झाल्यावर दुमडून आत ठेवता येईल.

तरुणांच्या स्वातंत्र्यावर बंधने का आहेत?

* प्रतिनिधी

एकटेपणा आणि तारुण्य विचित्र वाटेल, पण हे आजचे वास्तव आहे. ही वरवर बेफिकीर दिसणारी तरुण पिढी आतून किती एकाकी आहे हे जाणून घेण्यासाठी, आजच्या काही तरुणांची ओळख करून घेऊया :

उदय एका छोट्या गावात जन्मला, वाढला आणि वाढला. तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवताच त्याला मोठ्या शहरात स्थायिक होण्याची स्वप्ने पडू लागली. स्वतःसाठी चांगल्या आयुष्याची स्वप्ने पाहण्यात गैर काय आहे? हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. नोकरी मिळताच मला नवे पंख लागल्यासारखे वाटले. मोठ्या शहरात आले. नवीन नोकरी, नवीन शहर, खूप आवडलं. नवे मित्र झाले पण काही दिवसातच नव्या शहराची जादू ओसरली.

प्रियजनांचे प्रेम, आपुलकीचा अभाव या नवीन सापडलेल्या आनंदाला कमी करू लागले. ऑफिसमधून घरी आल्यावर तो एकटेपणापासून वाचण्यासाठी धावपळ करत असे. मित्रांचा पोकळपणा दिसू लागला. मैत्रिणींच्या मेळाव्यातही ‘हा मेळावा दारुड्यांचा नाही’ अशा आशयाचे फलक टांगले जायचे. पालकांनी दिलेले मूल्यांचे गठ्ठे दारूसारख्या गोष्टींना स्पर्श करू देत नाहीत. माझे बालपणीचे मित्र मला नकळत कधी सोडून गेले ते मला कळलेही नाही. महानगरात सापडलेल्या या एकाकीपणाने निराश होणे स्वाभाविक होते. त्यामुळे उदय डिप्रेशनमध्ये गेला.

एकटेपणा निराशाजनक आहे

आता आमचा दुसरा मित्र मदनची ओळख करून देतो. तो फक्त त्याच्या आई-वडिलांसोबत राहतो. त्याच शहरात नोकरी मिळाली. पालक खूप आनंदी आहेत, ते आनंदी आहेत पण त्यांचीही निराशा झाली आहे. जे स्वातंत्र्य मिळाले नाही. तुम्ही कोणते स्वातंत्र्य विचारता? कसले स्वातंत्र्य? तर त्याचे उत्तर म्हणजे तुम्हाला हवे तसे करण्याचे स्वातंत्र्य.

होय, आजकाल कोणते पालक व्यत्यय आणतात असे तुम्ही म्हणाल? तर साहेब, काही गोष्टी जबरदस्तीने आपल्या घशात घालतात, आपले आई-वडील काहीही म्हणोत किंवा नसोत, पण आपल्याला काय हवे आहे ते कळते. आपण लहानपणापासूनच अशा पद्धतीने वाढलो आहोत की आपण तरुणपणी आपल्याला पाहिजे ते करू शकत नाही. आता बघा, जर तुम्ही मित्रांना घरी बोलावले तर तुम्ही उघडपणे बोलू शकत नाही. घरात वडीलधारी मंडळी असल्याने खायला प्यायचे असे मित्र खाऊ घालू शकत नाहीत.

तुम्ही तुमच्या मित्रांच्या घरी गेल्यावर, तुमचे आई-वडील वाट पाहत असतील हे पाहण्यासाठी तुम्हाला मेळाव्याच्या मध्यभागी जागे व्हावे लागते. मित्र खूप वेगळी मजा करतात. मदन आपल्याच लोकांमध्ये एकटा आहे. आता हा एकटेपणाही नैराश्याला कारणीभूत ठरत आहे.

आणि ही आमची तिसरी मैत्रीण, अवनी, तिच्या आईवडिलांची लाडकी, स्वप्नात जगणारी. जोपर्यंत त्याला जीवनाचा अर्थ कळत नाही तोपर्यंत एका आयपीएसने आपल्या भविष्याचा विचार केला. अधिकारी लग्न करून निघून गेला. शेवटी ती एका आयपीएस अधिकाऱ्याची मुलगी होती. ते समवयस्कांचे लग्न होते. तिला ना तिच्या क्षुद्र स्वभावाची, रागावलेल्या पतीच्या रागाची भीती वाटत होती ना तिच्या पदाची. तिला सोडून वडिलांच्या घरी आले.

आता तिचे आई-वडील पश्चात्ताप करत आहेत आणि अवनी तिच्या एकाकीपणाशी लढण्यासाठी तिचा चुकलेला अभ्यास पूर्ण करण्यासाठी धडपडत आहे. सगळेच अवनीला दोष देत आहेत. पण कोणी विचारेल, लग्नाआधी अवनीची इच्छा जाणून घेण्याची गरज तिच्या पालकांना का समजली नाही?

दोष कोणाचा आहे

ही पिंकी, एका प्रोफेसरची मुलगी, तिला मॉडेलिंगची आवड होती, पण शिक्षणाच्या या वातावरणात तिची इच्छा समजून घेणारं कुणीच नव्हतं. पण पिंकीला आभाळाला हात लावायचा होता. धाडसाची कमतरता नव्हती, तरूण राहिले. निर्णय घेऊन ती मुंबईला निघाली. पण निसर्गाने असा आघात केला की तिला कौल गर्ल ही पदवी मिळाली.

तिच्या आई-वडिलांनी तिची स्वप्ने समजून घेऊन तिला साथ दिली असती, तर आज ती आपले गंतव्यस्थान गाठण्यासाठी प्रयत्नशील राहिली असती आणि एक दिवस ती गाठली असती. तिला जमले नसते तर निदान या वाईट नशिबातून तरी ती वाचली असती. मात्र दोष नेहमीच तरुणांना दिला जातो.

पिंकीच्या या दुर्दशेला केवळ पिंकीचा घरातून पळून जाण्याचा निर्णयच जबाबदार आहे का? हो, एका मर्यादेपर्यंत, पण त्याला हा निर्णय घेण्याची सक्ती का झाली? या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला किंवा आमच्या समाजाला द्यावे लागेल. आपला समाज किती काळ वाढणार्‍या मुलीला तिच्या आवडीचे काम करण्यापासून रोखणार आहे आणि आपण थांबवले तर अनेक वेळा असे किंवा त्याहूनही वाईट परिणाम होतील.

अशा परिस्थितीत प्रत्येक गोष्टीत तरुणांना दोष देणे थांबवण्याची गरज आहे. आपली स्वप्ने आहेत, आपल्या इच्छा आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी आपण काहीही करायला तयार आहोत हे पाहण्यासाठी समाजानेही तरुणांच्या मनात डोकावले पाहिजे. उदय असो, मदन असो, अवनी असो वा पिंकी, प्रत्येकाला मुक्तपणे जगण्याचा अधिकार आहे.

मुक्तपणे जगण्याचे स्वातंत्र्य

आजचा तरुण विचारतोय की, इज्जतीच्या नावाखाली समाज किती दिवस तरुणांचे मन बोलण्याचा हक्क हिरावून घेत राहणार? प्रौढ झालेल्या मुलांशी पालक कधी बोलायला आणि प्रौढांसारखे वागायला शिकतील? लहान मुलांच्या पालकांनी प्रौढ पालकांसारखे वागणे शिकणे देखील महत्त्वाचे आहे.

एकटेपणाशी झुंजणाऱ्या नैराश्यग्रस्त तरुणांची वाढती संख्या वारंवार इशारे देत आहे. त्यांचे तारुण्य वाचवण्यासाठी आणि त्यांना एकाकीपणातून बाहेर काढण्यासाठी पालकांनी स्वतःच त्यांचे मित्र बनून त्यांना हवे ते बोलण्याचे आणि वागण्याचे स्वातंत्र्य द्यावे लागेल. आम्हाला त्यांच्या पाठीशी उभे राहावे लागेल.

आपल्या तरुणांच्या आनंदासाठी समाजाने एकदा तरी प्रयत्न करावेत. जर तुम्ही आम्हाला मोकळेपणाने जगण्याचे स्वातंत्र्य दिले आणि आम्हाला पाठिंबा दिला तर आम्ही या नैराश्यातून बाहेर पडू शकू.

खूप कामाची खेळणी

* शैलेंद्र सिंह

मुलांच्या विकासात खेळणी महत्त्वाची भूमिका बजावतात, फक्त योग्य वयातच मुलांना योग्य खेळणी देणे गरजेचे आहे. खेळणी अशी असावीत की, त्यांच्यासोबत खेळताना मुलं पूर्णपणे खेळात मग्न होतील आणि खेळता खेळता त्यांचा व्यक्तिमत्व विकासही शिकतील.

रिमोट आणि बॅटरीसह खेळण्यांऐवजी, ती खेळणी शिकण्यास मदत करतात ज्यांच्यासोबत मुले स्वत: खेळतात. अशी अनेक खेळणी आहेत जी स्वस्त असूनही मुलांसाठी खूप उपयक्त आहेत. खेळण्यांच्या किंमतीला पालकांनी स्टेटस सिम्बॉल बनवू नये. ती मुलांसाठी किती उपयुक्त आहेत आणि मुलांना किती आवडतात, हे पाहावे.

जेव्हा आपण मुलांना समजण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्यांचे न बोललेले शब्द आणि मनही समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आपला प्रयत्न कसेबसे त्यांच्या जगात पोहोचण्याचा असतो. ते जग जिथे त्यांना माचिसची पेटी विमानासारखी दिसते, जिथे अनेक मोठी स्वप्ने छोटया छोटया खेळण्यांनी सजलेली असतात आणि मूलं तासनतास स्वत:शीच बोलत असतात. कधी वाहनांच्या चाकांनी तर कधी माचिसच्या काठीने राजवाडा बांधतात. खेळणी तुटल्यावर तासनतास अश्रू ढाळणे किंवा नवीन खेळणी मिळाल्यावर खजिना सापडल्यासारखा आनंद व्यक्त करणे, असे ते निरागस जग असते.

भविष्यातील विकासाचा पाया

खेळण्यांच्या आठवणीशिवाय बालपण काय आहे? पण तुम्हाला माहीत आहे का, की खेळण्यांसोबत खेळणे हे केवळ एक मनोरंजन नसून तो उज्ज्वल भविष्याच्या विकासाचा पाया असतो. क्रीडाविषयक खेळण्यांमधून आपण आत्म-जागरूकता, इतरांशी आत्म-संबंध, आत्म-विकास आणि स्वत:ची अभिव्यक्ती अशा अनेक गोष्टी शिकतो, जे परिपूर्ण व्यक्तिमत्त्व विकासासाठी खूप महत्वाचे आहे.

बाल, किशोर आणि पालक हाताळणी तज्ज्ञ मानसशास्त्रज्ञ डॉ. सोनल गुप्ता सांगतात की, अनेकदा मुले खेळण्यांद्वारे अशा गोष्टी सांगू शकतात, ज्या ते त्यांच्या पालकांना सांगू शकत नाहीत. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांसोबत खेळण्यात थोडा वेळ घालवणे आणि त्यांच्या जगाचा एक भाग बनणे महत्त्वाचे आहे. या प्रक्रियेतून मानसशास्त्रज्ञ ‘प्ले थेरपी’द्वारे मुलांच्या जगात प्रवेश करतात आणि त्यांच्या अनेक समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात.

महाग खेळणी आवश्यक नाहीत

सर्वसाधारणपणे पालकांना वाटते की, मुलांना महागडी खेळणी जास्त आवडतील. हे पूर्ण सत्य नाही. अनेकदा असे दिसून येते की, मुले स्वस्त खेळण्यांकडे जास्त आकर्षित होतात. मुलांची खेळणी खरेदी करताना त्यांच्या प्राधान्यांकडे लक्ष द्या. वयानुसार त्यांना काय शिकवले पाहिजे हे लक्षात घेऊन खेळणी खरेदी करा.

खेळणी हा मुलांच्या आयुष्यातील सर्वात गोड अनुभव असतो, पण ती खेळणी महागडीच असतील असे नाही. खेळण्यांमुळे विकासाऐवजी मुलांच्या हट्टीपणाची आणि अहंकाराची दारं उघडणार नाहीत याची काळजी घ्या. खेळणी ही मुलांच्या कल्पनाशक्तीचे प्रतीक असतात, मग ती कागदाची बोट असो किंवा कोरड्या लाकडापासून बनवलेले तसेच आधुनिक विज्ञानाने परिपक्व झालेले आकाशात उडणारे जहाज असो. गरजेचे हे असते की, त्यांच्या या कल्पनेच्या शहरात तुम्हाला जागा आहे का?

खेळणी मुलांची आवड प्रकट करतात

मानसोपचारतज्ज्ञ डॉ. नेहा आनंद सांगतात की, लहान मूल जेव्हा खेळण्यांसोबत खेळते तेव्हा आपल्याला त्याच्या स्वभावाची माहिती होते. बऱ्याचदा याचवेळी हे स्पष्ट होते की, मुलाचा कल कोणत्या दिशेने आहे. क्रिकेट खेळण्याची आवड असणारा मुलगा क्रिकेटपटू कसा बनतो, हे लक्षात घ्यायला हवे. खेळण्यांशी खेळण्याच्या पद्धतीवरून मुलाचे वागणे दिसून येते. अनेक मुलं खेळताना अशी रागीट कृत्ये करतात, ज्यातून त्यांचा रागीट स्वभाव समजून घेऊन तो दूर करता येतो.

मुले जेव्हा चेंडू पकडण्याचा खेळ खेळतात तेव्हा हा खेळ सोपा दिसतो. वास्तविक, चेंडू पकडण्याच्या खेळात केवळ शारीरिक व्यायामच नाही तर मानसिक व्यायामाचाही समावेश होतो. मुलांमध्ये एकाग्रता वाढते. यासोबतच त्यांना चेंडूच्या वेगाचा अंदाज येतो. मुलांकडून कागद फाडणे, पेन्सिलने भिंतीवर लिहिणे, याला पालक मुलांची वाईट वागणूक समजतात. खरंतर, हा देखील मुलांसाठी एक खेळ आहे, ज्याद्वारे ती अनेक गोष्टी शिकतात. पालकांनीही लहान मुलांसोबत खेळण्यासाठी वेळ दिला तर त्याचा मुलांच्या विकासात खूप उपयोग होईल.

खेळणी ही मुलांना रमवून ठेवण्याचे साधन नाही

बहुतेक पालकांना असे वाटते की, खेळणी ही मुलांना रमवून किंवा कशात तरी गुंतवून ठेवण्याचे साधन आहे. त्यामुळे मुलांसाठी सर्वात महाग आणि सर्वोत्तम खेळणी खरेदी करतात, परंतु ती त्याच्या विकासात मदत करत नाहीत. पालकांच्या या वागण्यामुळे मुलाला हट्टपणा करण्याची सवय लागते. तो स्वत:साठी खेळणी खरेदी करण्याचा आग्रह धरतो.

एखादे मूल रिमोट-नियंत्रित हेलिकॉप्टरशी खेळत असेल तर त्याला रिमोटची बटणेच दाबावी लागतील. त्याला असे वाटेल की, बटण दाबल्याने विमान उडते. जर एखाद्याने सामान्य विमान उडवले तर त्याला त्याच्या चाकांच्या आणि पंखांच्या गरजांची जाणीव असेल. विमान उड्डाण करण्यासाठी सपाट रस्ताही आवश्यक आहे हे त्याला माहीत असेल. यामुळेच मुलांना रिमोटच्या खेळण्यांऐवजी सामान्य खेळण्यांनी जास्त शिकवता येते.

आजच्या काळात मूल जेव्हा कधी रडते तेव्हा आई तिचा मोबाईल किंवा घरात ठेवलेला कोणताही मोबाईल त्याच्या हातात देते. मूल त्याच्याशी खेळू लागते. हळूहळू त्याला त्याची सवय होते. या निळ्या पडद्याच्या व्यसनाचा मुलांच्या मनावर वाईट परिणाम होत असल्याचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. नेहा आनंद सांगतात. केवळ दिखाव्यासाठी पालक मुलांना महागडे फोन देतात. जसजशी स्क्रीन मोठी होते तसतसा त्याचा प्रभाव वाढत जातो. पालकांनी मुलांना खेळण्यांऐवजी मोबाईल देऊ नये. त्याचा वाईट प्रभाव मुलांच्या मनावर दीर्घकाळ राहातो.

६ संकेत जाणा तरूणी सिंगल आहे की नाही

* रवी शोरी नीना

तरुणाईच्या उंबरठयावर पाऊल टाकताच प्रत्येक तरुणाला वाटतं की त्याची एखादी प्रेयसी असावी, परंतु या तरुणांची खरी समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा त्यांना एखादी तरुणी आवडते, परंतु त्यांना हे समजत नाही की ती सिंगल आहे की ऑलरेडी एंगेज्ड म्हणजेच त्या तरुणीला एखादा प्रियकर आहे की नाही. यासाठी इथे काही खास टीप्स देत आहोत, ज्यामुळे तुम्हाला हे सहजपणे जाणून घेता येईल की जी तरुणी तुम्हाला आवडत आहे ती सिंगल आहे का वा अगोदरच तिचा एखादा मित्र आहे.

सम वयोगटातील मुलींमध्ये राहतात सिंगल मुली

सिंगल तरुणीची सर्वात मोठी ओळख म्हणजे त्या अनेकदा आपल्या मैत्रिणींसोबत असतात. जी तरुणी तुम्हाला आवडत आहे, ती मग बाजारात जात असो वा एखाद्या पार्कात फिरायला जात असो ती जर तुम्हाला सगळीकडे तिच्या मैत्रिणींसोबत दिसली तर याचा सरळ अर्थ आहे की तिला आतापर्यंत कोणताही प्रियकर नाही. अशा तरुणीशी तुम्ही मैत्री करण्याचा प्रयत्न करू शकता.

रेस्टॉरंटमध्ये सिंगल तरुणींचं वागणं

एखाद्या तरुणीसोबत मैत्री असणाऱ्या तरुणी रेस्टॉरंटमध्ये घुसताच अशी खास सीट शोधतात जिथे त्या दररोज आपल्या बॉयफ्रेंडसोबत बसतात. अशी सीट रिकामी मिळताच त्यांचा चेहरा आनंदाने चमकतो. अशा तरुणी वारंवार आपल्या घडाळयात वेळ पाहत बसतात, जणू काही प्रियकराशिवाय त्यांना प्रत्येक क्षण निभावणं कठीण होत आहे.

या उलट नाश्ता वा लंचसाठी रेस्टॉरंटमध्ये आलेली सिंगल तरुणी तिच्या आजूबाजूला बसलेल्या तरुण जोडप्यांकडे गुपचूप पाहत राहते. सिंगल तरुणी तिथे बसलेल्या जोडप्यांच्या गोष्टी आणि गप्पांमध्ये उत्सुकता दाखवते. तर ज्यांचा प्रियकर असतो त्या तरुणी आपल्यामध्येच मग्न असतात. त्यांचं लक्ष त्यांच्या प्रियकराची वाट पाहण्यात दरवाज्याकडे लागलेलं असतं.

कधी नजर मिळविता कधी नजर चोरता

सिंगल तरुणांनाच नाही तर सिंगल तरुणींनादेखील स्वत:साठी एक आकर्षक प्रियकरांचा शोध असतो. या शोधामुळे सिंगल तरुणींचं लक्षदेखील एका चांगल्या प्रियकराच्या शोधात असतं. जर एखादी तरुणी हळूच तुम्हाला पाहत असेल लक्ष तिने जर तुम्हाला पाहिलं आणि नेमकं तुम्ही त्यावेळी तिच्याकडे पाहिलं तर ती लाजून मान खाली घालते, परंतु तिच्या मनात घालमेल सुरू असते. याचा सरळ अर्थ आहे की ती तुमच्यावर मनातल्या मनात प्रेम करत आहे आणि तुम्हाला पसंत करत आहे.. तसंच ती अगोदरच एंगेज्ड नाही आहे म्हणजेच सिंगल आहे.

बॉडी लँग्वेज

बॉडी लँग्वेचा प्रेमाशी गाढ संबंध आहे. प्रेमाचे पारखी एखाद्या तरुणीची बॉडी लँग्वेज वाचून सहजपणे सांगतात की ती कोणाच्या प्रेम पाशात पूर्वीपासून आहे वा तिला एखाद्या प्रियकराच्या शोधात आहे.

कोणासोबत जोडलेल्या तरुणींमध्ये एवढा विश्वास येतो की पुरुषांच्या गर्दीतून एकट जाणं त्यांच्यासाठी सामान्य बाब असते, तर सिंगल तरुणी पुरुषांच्या गर्दीपासून दूर होतात.

सिंगल तरुणींचं तरुणांमध्ये स्वारस्य

आपल्या प्रियकराच्या प्रेमात पडल्यानंतर अनेक तरुणी इतर तरुणांशी जास्त बोलत नाहीत आणि इतर तरुणांसोबत त्या फ्रेंडली होण्याचा प्रयत्न करत नाहीत. एखादा तरुण त्यांच्याशी बोलण्यासाठी आला आणि फ्रेंडली होण्याचा प्रयत्न करू लागला तर त्या क्षणी त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव असे असतात जणू काही त्या बोर होत आहेत.

परंतु सिंगल तरुणी सुंदर आणि आकर्षक अशा कोणत्याही तरुणाचं बोलणं मन लावून ऐकतात. या गप्पांचा विषय जर सिनेमा, फॅशन वा एखाद्या तरुण-तरुणीच्या प्रेमाशी संबंधित असेल, तर सिंगल तरुणी अशा गोष्टीं आवडीने ऐकतात आणि अशा गप्पीष्ट तरुणांना त्या बराच वेळदेखील देतात.

ब्रेकअप नंतर बनली सिंगल तरुणी

अनेक वर्षांपासून एखाद्या तरुणासोबत मैत्री केल्यानंतर जर त्या तरुणाशी तिचे सर्व संबंध संपले तर एकदा पुन्हा सिंगल झालेल्या तरुणीशी मैत्री करण्याची संधी मिळते. त्या तरुणीशी हा विचार करून दोस्ती करू नका की हिला अगोदर कोणीतरी सोडलं आहे वा ती मैत्री निभावेल का?

खरं म्हणजे अनेक वर्षांपासून कोणाशी मैत्री राहिल्यानंतर पुन्हा एकदा सिंगल झालेली तरुणी मैत्री आणि प्रेमाच्या मुद्दयावर इतर साधारण तरूणींपेक्षा अधिक संवेदनशील असतात. अशा तरुणी मैत्री आणि प्रेमाच्या नात्याचा आदर करतात व धीरगंभीर होतात. अशा एखाद्या सिंगल तरुणीशी मैत्री करण्याची संधी मिळाली तर ती संधी सोडू नका. हे व्यावहारिक सत्य आहे.

सोशल मीडिया ब्लॅकमेलिंगचा अड्डा

* शिलू अग्रवाल

स्त्रियांची गोपनीय माहिती व खाजगी फोटोंच्या आधारे त्यांना ब्लॅकमेल करण वा त्यांच शारीरिक शोषण करणं खूपच सामान्य गोष्ट झाली आहे. संचार क्रांतीमुळे स्त्रियांचे आपत्ती जनक फोटो मिळवणं वा त्यांचे आपत्ती जनक व्हिडिओ बनवणं हे खूपच सोपं असण्याबरोबरच त्यांना प्रसारित करणंदेखील सहज सोपं झालंय.

बुंदेलखंड महाविद्यालयातील सामाजिक कार्य विभागाच्या एका संशोधनानुसार ब्लॅकमेलची ९० टक्के प्रकरण पीडित व्यक्ती एक स्त्री असते. ६० टक्के प्रकरणांमध्ये स्त्रियांचे फोटो त्यांना न सांगता बनवलेले असतात .

कोणत्याही वयोगटातील स्त्री वा मुलगी आज सुरक्षित नाही आहे. २०-२५ वर्षांची दोन मुलींच्या आईवरती देखील या सैतानांची नजर असते. त्यांना पॉर्न इंडस्ट्रीमध्ये मिल्फ(एमआयएलएफ) म्हणून वर्गीकृत केलं जातं.

कधीकाळी आपण रुढीवादी होतो. स्त्रियांबाबत म्हटलं जायचं की त्यांनी आपल्या घराच्या चार भिंतींमध्येच कैद राहायला हवं. त्यांनी घरचा उंबरठा लांधता कामा नये. नंतर सुसंस्कृत झालो तेव्हा म्हटलं गेलं की स्त्रीने मान आणि मर्यादेचा उंबरठा ओलांडता कामा नये. नंतर आधुनिक झालो, ज्यामुळे आपल्या पतनाला सुरुवात झाली.

कमी लेखणं मोठी चूक

स्त्रियांनी सर्व बंधनं तोडत घोषणा केली की त्या द्वितीय श्रेणीच्या नागरिक नाहीत. त्यांना ते सर्व करायचं आहे जो एक पुरुष करतो. त्यांना त्यांच्या खांद्याला खांदा मिळवून चालायचं आहे.

स्त्रियांनी आपल्या पुरुष मित्रांसोबत पार्टी, डेट वा फिरण्यासाठी बाहेर येणंजाणं सुरू केलं. पुरुषांसोबत हातात हात घालून बीचवर फिरताना, एकमेकांचे चुंबन घेताना, मद्यपान करतानाचे फोटो आज सोशल मीडियावर सर्वसामान्य झाले आहेत.

कधी तुम्ही असा विचार केला होता का की हे फोटो जर तुमच्या पालकांपर्यंत पोहोचवण्यात आले तर त्यांना काय वाटेल?

सामान्यपणे चांगल्या दिवसांमध्ये आपण या गोष्टीची चिंताच करत नाही. आपल्याला वाटतं की आपल्या पालकांची विचारसरणी आधुनिक आहे. त्यांना वाईट वाटणार नाही.

सोशल मीडिया एक छळवाद आहे

चतुर मुलं स्त्रियांना गोड बोलून स्वत:च्या जाळयामध्ये अडकवतात आणि त्यांची गोपनीय माहिती व छायाचित्र मिळवतात आणि जेव्हा एक साधारण दिसणारा फोटो गोष्टी सोबत प्रकाशित केला जातो तेव्हा आपल्या पायाखालची जमीन सरकते.

यामध्ये प्रश्न असा आहे की आपण स्त्रियांनी समाजाच्या या रोगजंतूपासून वाचण्यासाठी आपलं अस्तित्व कसं जिवंत ठेवायला हवं? स्त्रियांना मोकळया हवेमध्ये जगण्याचा अधिकार प्राप्त होणार नाही का? स्त्रियांना दोन मोर्चांवरती कार्य काम करायचं आहे. एका बाजूला स्वत:साठी अधिकाराची मागणी करत आहेत, त्यांना मर्यादेचा उंबरठा पार करून बाहेर पडायचा आहे, तर दुसरीकडे स्वत:ला पुरुषप्रधान समाजापासून शोषित होण्यापासून वाचवायचं आहे.

स्त्रियांनी बाहेर काम करतेवेळी या गोष्टींची काळजी घ्यायला हवी :

मित्र बनवते वेळी : तुम्ही भलेही कॉलेजमध्ये शिक्षण घेत असाल वा कार्यालयात, पुरुषांशी मैत्री करतेवेळी खूप काळजी घेण्याची गरज आहे. मुलं मुलींशी मैत्री करतेवेळी विविध प्रकारे खोटं बोलतात. त्यांना वेगवेगळी स्वप्नं दाखवतात. मुलं चांगल्या घरातील, सुंदर दिसणारी वा श्रीमंत मुलींना सर्वप्रथम फसवतात. या त्यांच्या चारी बाजूंनी ग्लॅमर, संपन्नता आणि ऐश्वर्य पसरवतात.

हळूहळू हे मध त्या बिचाऱ्या मुलीचे पाय आणि पंखांना जखडून टाकायला सुरुवात करतं आणि मग खोलवर तिचं अस्तित्व समाप्त करतं. मुलींनी यासाठी लग्नापूर्वी एखाद्या मुलाशी डेट करतेवेळी या गोष्टीची खास काळजी घ्यायला हवी की त्यांचं बोलणं रेकॉर्डिंग तर केलं जात नाही आहे ना, त्यांना वारंवार फोटो काढण्यासाठी तर विवश केलं जात नाही आहे ना, जर तुमचा सहकारी वा  जोडीदार वारंवार अंतरंग क्षणाचा व्हिडिओ बनवण्याचा वा फोटो काढण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा मित्रांना स्पष्टपणे ‘नकार’ द्यायला उशीर करू नका.

नातेवाईकांमध्ये असताना : बीयुके सामाजिक कार्य विभागाच्या संशोधनात मुलींना अवगत केलं जातं की अंतरंग फोटोच्या आधारावर त्यांना ब्लॅकमेल करणारे व खाजगी गोष्टींची माहिती लिंक करणारे साधारणपणे खास नातेवाईक असतात. त्यामुळे त्यांच्याकडे जातेवेळी भलेही बाथरूम व चेंज रूममध्ये कोणताही कॅमेरा तर नाही ना हे आवर्जून पहा. तुमचे अंतरंग फोटो वा व्हिडिओची सुरक्षा तुम्हाला फक्त पुरुषांबरोबरच स्त्रियांपासूनदेखील करायला हवी. कदाचित तुम्ही तुमचा मास्टरबेट करण्याचा व्हिडिओ तुमच्या नातेवाईक काकी, बहिण व वहिनीला शेअर केला असेल, तर त्या कधीही मानलेला काका, भाऊजी वा भावाच्या मोबाईलमध्ये पोहोचू शकतो.

अनेकदा वहिनी, काकीच्या शॉवरच्या खाली अंघोळ करतानाचे फोटो, कोणीही बिनधास्त काम करण्याचं वा प्रतिमाकात्मक सेक्स करण्याच्या पोझिशनमध्ये फोटो पाठविण्याचे चॅलेंज दिलं जातं. अशा पद्धतीचे चॅलेंज कधीही स्वीकारू नका.

लक्षात ठेवा की तुमचं सेक्स लाईफ आजदेखील खूपच वैयक्तिक आणि खाजगी बाब आहे. याचे महत्त्व तुम्हाला तेव्हा समजतं जेव्हा तुम्हाला कोणी ब्लॅकमेल करू लागतं. त्यामुळे गरजेचं आहे की सुरुवातीला सावधपणे काळजी घ्यायला हवी.

ब्लॅकमेलरचा पहिला कॉल : अनेकदा काळजी घेऊनदेखील कोणी तुमचा व्हिडिओ, फोटो वा चॅट दाखवून तुम्हाला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत असेल, तर अजिबात घाबरू नका. कारण प्रकरण कितीही मोठं असो वा छोटं तुम्ही तुमचं पूर्ण शरीर वा पैसे देऊनदेखील ब्लॅकमेलरला समाधानी करू शकणार नाही.

यासाठी पहिल्या दिवसापासूनच या आव्हानाचा सामना दृढतेने करा. त्वरित महिला हेल्पलाइनवर या गोष्टीची तक्रार करा.

भले ही एखाद्या मित्राने मस्तीमध्ये असं केलं असेल तरी तुम्ही महिला हेल्पलाइनमध्ये तक्रार करण्यासाठी एक मिनिटाचा वेळदेखील वाया घालवू नका. प्रथम पोलिसात तक्रार करायची, त्यानंतरच काही चांगलं वाईट याचा विचार करायचा. पोलिसात तक्रार करण्यासाठी ना तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये जायचं आहे आणि ना ही पोलीस तुमच्या घरी बोलवायचे आहेत.

फोन आणि ईमेलद्वारा तुमची सर्व माहिती एकत्र केल्यानंतर सर्वप्रथम ब्लॅकमेलरला पकडलं जाईल. सर्व प्रकारे तुम्हाला सुरक्षित केल्यानंतरच कोर्टाकडून शिक्षा देण्यासाठी तुमच्याशी संपर्क साधला जाईल.

सोशल मीडियावर स्त्रीचे आपत्ती जनक फोटो वायरल करणं जेवढं सोपं आहे, तेवढेच गुन्हेगारांना पकडणंदेखील सहजसोपं आहे.

तुमच्या आजूबाजूच्या एखाद्या समजूतदार महिलेची मदत घेऊ शकता या नाजूक क्षणी एखाद्या पुरुष मित्राच्या तुलनेत अपरिचित स्त्री महिलेचं सहकार्य अधिक योग्य होईल. शेवटी स्त्रीलाच एकमेकांची ढाल बनायचं असतं.

प्रत्येक रंग काहीतरी सांगतो

* राजीव मर्चेट

आपले विचार, भावना आणि बुद्धिमत्ता विकसित करण्यात रंगांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. अत्यंत आकर्षक, सहज दिसणारे आणि वैविध्यपूर्ण रंगांमध्ये विशिष्ट प्रकारची ऊर्जा सोडण्याची शक्ती असते. हे रंग आपल्या हृदयावर आणि मनावर परिणाम करू शकतात. जर यांना योग्य प्रमाणात समाविष्ट केले गेले तर काही ठराविक रंग आणि त्यांचे कॉम्बिनेशन्स भरपूर चैतन्य आणू शकतात.

सजावटीच्या विविध वस्तू जसे की चित्रे, लँप, फुलदाण्या, वॉलपेपर, फुले, वनस्पती, दिवे, कलाकृती, मूर्त्या, फर्निचर इत्यादींचा समावेश करून विविध रंगांचा समावेश केला जाऊ शकतो. यासह घराचे सौंदर्य वाढविणाऱ्या सजावटीच्या वस्तू, मेणबत्त्यांपासून ते सॉफ्ट फर्निचर जसे की पडदे, ड्रेप, अॅक्सेसरीज, कुशन, ट्यूब पिलो, बेड आणि बाथरूम लिनेन्स, डायनिंग टेबल सेट, मॅट्स आणि रनरने ही रंग जोडले जाऊ शकतात. तसेच किचन वेअर जसे की सर्व्ह वेअर, क्रॉकरी, बेक वेअर, मग, ट्रे इत्यादीदेखील रंग सामील करण्याचा एक चांगला मार्ग असू शकतात. संपूर्ण जग कलेच्या उत्कृष्ट नमुन्यांनी भरलेले आहे, जे घरात सजविता येतात आणि घराला बहुआयामी, सुंदर आणि आकर्षक बनवता येते.

ट्रेंडी शेड्स, पॅटर्न आणि प्रिंट्समध्ये उपलब्ध हे इंटिरियर फॅब्रिक वेअर घराच्या सजावटीमध्ये फार मोठा बदल घडवून आणू शकतात आणि तेही परवडणाऱ्या किंमतीत आणि कुठल्याही जास्त देखभालीशिवाय.

कलेचे रंग थोडे क्लिष्ट असतात, म्हणून योग्य गोष्ट आणि योग्य प्रमाणात निवडा. तज्ज्ञांचे मतही घेता येईल. रंग समजून घेणे की त्याच्यासाठी काय योग्य आणि काय अयोग्य आहे, त्याची ऊर्जा आणि त्याचा परिणाम काय आहे, या सर्व गोष्टी नवीन मुलांचा खेळ आहेत. हे रंग तुमचे व्यक्तिमत्व समजून घेण्यास मदत करतील.

लाल : हा गतिशीलता, उत्साह आणि दृढनिश्चयाचा रंग आहे. हा रंग अतिशय तेजस्वी आहे आणि आधुनिक संदर्भात त्याचा अर्थ शक्तिशाली आणि प्रभावी बनला आहे. हा रंग हुकूमशाही, जलद रागीट होण्याचे आणि निर्भयतेचे प्रतीक आहे. लाल रंग जितका सुंदर आहे, ज्यांना तो आवडतो ते तितकेच उत्साही, आत्मविश्वासू आणि स्पष्टवक्ते असतात.

निळा : हा रंग विश्वास, प्रामाणिकपणा, निष्ठा, सुव्यवस्था, शांती आणि संयम यांचे प्रतीक आहे. ज्या लोकांना निळा रंग आवडतो ते दयाळू, आशावादी, अंदाज लावण्यासारखे, एकटे आणि क्षमाशील नसतात.

हिरवा : ज्या लोकांना हिरवा रंग आवडतो त्यांच्या हृदय आणि मनाचे योग्य संतुलन असते. ते निसर्गप्रेमी, संवेदनशील, अनुकरणीय, व्यवहारकुशल, कुटुंबासाठी समर्पित असतात.

पिवळा : पिवळा हादेखील सकारात्मकता आणि नकारात्मकतेचा संमिश्र रंग असतो, हा रंग आशावाद, उत्साह, बुद्धिमत्ता आणि तर्कसंगतता दर्शवतो. त्याचवेळी तो एखाद्या व्यक्तीला विश्लेषणात्मक, भित्रे आणि गर्विष्ठ बनवतो.

पांढरा : हा परिपूर्णतेचा रंग आहे, जो प्रेरणा आणि खोली देतो. स्वातंत्र्य आणि पावित्र्यतेचे प्रतीक मानला जाणारा हा रंग एकता, सौहार्द, समानता आणि संपूर्णता देतो.

व्हायलेट (जांभळा) : जे लोक व्हायलेट रंग पसंत करतात ते सौम्य, उत्साही आणि करामती व्यक्तिमत्वाचे धनी असतात. ते इतरांवर अवलंबून असतात, म्हणून ते रोजच्या जबाबदाऱ्या घेणे टाळतात. ते लोकांना सहज ओळखतात, त्यांना सत्ता आवडते.

राखाडी : हा सर्वात जास्त मोहक रंग आहे, जो निराशाजनक असूनही सुंदर आहे, कंटाळवाणा असूनही परिपक्व आहे, रुक्ष असला तरीही क्लासिक आहे. हा शेड स्थिरता आणि मोहक लाटांसह तेजस्वी महिमेचे वर्णन करतो.

तपकिरी : या रंगाचे प्रेमी गंभीर, जमिनीशी जुळलेले असूनही भव्यतेची झलक देतात. हे लोक साधे, सरळ, आश्रित असूनही, कधीकधी कंजूस आणि भौतिकवादी असतात.

काळा : मजबूत, मर्यादित, सुंदर, आकर्षक आणि गारवा देणारा काळा रंग खूप गाढ असतो, ज्याला अनेक लोक अशुभ म्हणू शकतात. हा रंग रहस्य, नकारात्मकता, निराशा आणि पुराणमतवादितेचे प्रतीक आहे.

नारिंगी : अत्यंत तेजस्वी रंग नारिंगी हा स्पष्टवक्तेपणाचा आणि रोमांच साधणाऱ्यांचा रंग आहे. आशावादी, आनंदी, दयाळू आणि स्वीकार्य असण्याबरोबरच हा रंग वरवरचा, समाजविघातक आणि अत्याधिक अहंकारी लोकांचे प्रतीक आहे.

छोट्याछोट्या आनंदाने नात्यांमध्ये आणा गोडवा

* गरिमा पंकज

दिवाळी एक प्रकारे अंधारातून प्रकाशाकडे सैर करणारा सण आहे. प्रकाशाचं हे पर्व चंद्रप्रकाशात उजळलेल्या पौर्णिमेला नाही तर चहुबाजुंनी पसरलेल्या अंधारालादेखील परिभाषित करणाऱ्या अमावस्येचा दिवस असतो. म्हणजेच जेव्हा चहूबाजूंनी अंधार पसरलेला असेल, तेव्हाच आपल्याला प्रकाश आणायचा आहे. आनंदाचा शोध करायचा आहे. आनंद आपल्या आजूबाजूलाच आहे, जो छोटयाछोटया गोष्टींमध्ये लपलेला आहे. आपल्याला तो जमा करायचा आहे. दिवाळी जुन्या, विस्मृतीत गेलेल्या नात्यांना जागविण्याचा आणि निभावण्याचादेखील सण आहे.

आजच्या या तंत्रज्ञानाच्या युगात जिथे माणसं सतत एकटी होत चालली आहेत,

तिथे आपल्यासाठी दररोज नात्यांचे नवीन रोपटे लावणं खूपच गरजेचं झालंय.

दिवाळीच्या बहाण्याने आपण कुटुंबिय आणि नातेवाईकांसोबत अधिक छान वेळ घालवून घरदार अधिक उजळविण्याची संधी मिळते. तसंही सणवार आनंद वाटण्याचं एक माध्यम आहे. दिवाळीचा सण प्रकाश आणि आनंद घेऊन येतो. यंदाचा हा सण आपल्या कुटुंबीयांसोबत छोटया छोटया गोष्टींचा आनंद घेत साजरा करूया.

घराला द्या क्रिएटिव्ह लूक

* दिवाळीत आपल्या घराच्या सजावटीत थोडा बदल करा. पत्नी आणि मुलांसोबत २ दिवस अगोदरच या कामाला लागा. यामुळे त्यांच्यासोबत वेळ घालविण्याची संधी मिळेल. पत्नीसोबत थोडी मस्ती करण्याचादेखील आनंद मिळेल. मुलंदेखील तुमचं नवीन कौशल्य आणि खेळकर क्षण व्यतीत करून आनंदित होतील.

* घराच्या अडगळीतील जुन्या वस्तू फेकण्याऐवजी त्या रियुज करण्याचा प्रयत्न करा. त्यांची दुरुस्ती करा आणि त्यांना नवीन लूक द्या. जसं की तुम्ही जुन्या काचेच्या बाटल्यांचा लॅम्प बनवू शकता आणि जुन्या डब्यांना सजवून कुंडया बनवू शकता. अशाप्रकारे तुमच्या जुन्या सामानाने घराला नवीन लूक देऊ शकता. यामुळे तुमचं घर क्रिएटिव्हिटीसोबतच सजलेलं दिसेल. जे सर्वांना आवडेल देखील. या कामांमध्ये मुलांची मदत घ्यायला विसरू नका.

* अलीकडे तर साधारणपणे लहान मूल असलेल्या सर्वच घरांमध्ये क्ले गेम असतातच. हा एक प्रकारचं रबरासारखा हलका पदार्थ असतो, जो लहान मुलांची इमॅजिनेशन आणि त्यांच्या क्रिएटिव्हिटीला लक्षात घेऊन बनविण्यात आलेला आहे. क्ले एक प्रकारचा खूपच फ्लेझिबल पदार्थ असतो, ज्याला आपण आपल्याला हवा तसा आकार देऊ शकतो. शाळेतदेखील मुलांना क्लेच्या मदतीने नवनवीन वस्तू बनवायला शिकवलं जातं.

तर या दिवाळीत तुम्ही तुमच्या मुलांना होम डेकोरेशनसाठी काही नवीन कलाकृती वा मग डिझाईनर दिवे बनविण्याची प्रेरणा द्या. यासाठी तुम्ही त्यांना मदतदेखील करू शकता. यामुळे मुलांचं मन गुंतेल आणि त्यांना काहीतरी नवीन शिकायलादेखील मिळेल आणि तुमचं त्यांच्यासोबत ट्युनिंगदेखील स्ट्राँग होईल.

* फुलं कायमच सर्वांना आकर्षित करतात. म्हणूनच दिवाळीत घराची सजावट फुलांनी करा. तुम्ही बाजारातून आर्टिफिशियल फुलं आणूनदेखील घराची सजावट करू शकता. यामुळे तुमचं घर सुंदर दिसण्याबरोबरच आकर्षकदेखील दिसेल.

* तुम्ही मुलांसोबत मिळून तुमचे नातेवाईक वा मित्रांसाठी हाताने बनवलेले हॅम्पर्सदेखील बनवू शकता. काही रंगीत थर्माकोल बॉक्स बनवू शकता. चॉकलेट, केक, सुकामेवा इत्यादी सजवून हॅम्पर बनवा. याव्यतिरिक्त काही दिवे, मेणबत्त्या वगैरेदेखील जोडा, जे दिवाळीची अनुभूती देतील. तुमच्या हम्परमध्ये विंड चाईम्स लावा आणि मग बघा मुलं अशी हॅम्पर्स बनवण्यासाठी किती उत्साहित होतात.

* दिवाळीसाठी तुम्ही सुंदर घरातल्या घरात रंगीबेरंगी मेणबत्त्या तयार करू शकता. ज्या तुम्ही स्वत: मुलांसोबत मिळून बनविलेल्या असतील.

* मुलांना सुंदर आणि रंगीत रांगोळीदेखील पहायला आवडते. तुम्ही सोबत असाल तर हे काम त्यांच्यासाठी अधिक छान आणि रोमांचक होऊ शकतं. तुम्ही त्यांना रांगोळी काढायला शिकवून दुसरी कामं करू शकता. रांगोळी काढण्यात मुलं व्यग्र होतील. काही क्रिएटिव्ह करण्याचा आनंददेखील त्यांच्या चेहऱ्यावर दिसेल.

* दिवाळीच्या दिवसाला खास बनविण्यासाठी मुलांना दिवाळीशी संबंधित काही कथा सांगा. स्वत:च्या घरातील कुटुंबीयांसोबत या सणाशी संबंधित तुमच्या काही आठवणी ताज्या करा. दिवाळीशी संबंधित काही पुस्तकेदेखील मुलांना देऊ शकता.

दिवाळीच्या अनोख्या भेटवस्तू

* पत्नी आपल्या पतींना दिवाळीत घालण्यासाठी एक सुंदर डिझाईन केलेला पारंपारिक कुर्ता-पायजमा सेट भेट देऊ शकतात.

* तुम्ही तुमच्या कुटुंबियातील सदस्यांचं एक मेमरी कोलाजदेखिल बनू शकता. यामध्ये आतापर्यंतचे आवडते फोटो एक प्रेममध्ये बसवून तुमच्या भिंतीवर लावू शकता. हे सर्वांसाठी सुवर्ण क्षणांची एक संस्मरणीय भेट राहील.

* या दिवाळीत तुम्ही तुमच्या जीवनसाथीला पर्सनलाइज्ड ज्वेलरी सेट देऊन सरप्राईज करू शकता. ज्वेलरी सेटमध्ये पेंडेंट वा अंगठी वा स्वत:च्या आवडीची एखादी वस्तूच्या इनिशियलला जोडू शकता. यामध्ये त्यांचा आवडता रंगदेखील असू शकतो.

* मुलांची खोली वेगळया प्रकारे सजवून त्यांना सरप्राईज करू शकता.

* मुलांना पर्सनलाइज्ड वस्तू खूप आवडतात. जर त्यावर त्यांचा आवडीचा कार्टून बनलेलं असेल तर मग काय विचारूच नका. दुधासाठी कप, वॉटर बॉटल, मुलांचा टॉवेल, कलर्स, पेन्सिल इत्यादींवर स्वत:चं नाव तसंच आवडीच कार्टून बनविल्यास ते खूपच आनंदित  होतील.

* मुलं सणावारी नवीन कपडे घालण्यासाठी खूपच उत्सुक असतात. या दिवाळीत तुम्ही त्यांना ट्रॅडिशनल लूक देऊ शकता. तुम्ही मुलं आणि मुलींच्या ट्रॅडिशनल आणि ट्रेंडी कपडयांसाठी ऑनलाईनदेखील एक्सप्लोर करू शकता.

* मिठाई खासकरून ‘चॉकलेट’ मुलांसाठी सर्वात छान दिवाळीची भेट असेल. तुम्ही काही वेगळया स्टाइलच्या चॉकलेट्स घरच्या घरी बनवू शकता.

सोबत शॉपिंग करा

* दिवाळीसाठी खूप खरेदी करायची असते. हे खूपच थकविणारं काम असतं. परंतु या खरेदीत तुम्ही तुमचा जोडीदार आणि मुलांनादेखील सहभागी केलंत तर तुम्हाला फार त्रास होणार नाही, उलट आनंदच मिळेल.

* तुम्ही तुमची जाऊबाई, दीर वा खास मैत्रीणींना शॉपिंग करण्यासाठी बोलावू शकता. त्यामुळे सर्वांचं आउटिंगदेखील होईल, सोबत वेळ घालविण्याचीदेखील संधी मिळेल. यासोबतच तुमची खरेदी बजेटमध्येदेखील राहील, कारण सर्वजणांनी मिळून शॉपिंग केली तर बचतदेखील होते.

* दिवाळीच्या तयारीच्या दरम्यान अचानक घरी पाहुणे आलेत आणि नेमकं कुटुंबीयांसाठी शॉपिंग करण्यासाठी निघायचं असेल, तर मेकअप करायलादेखील वेळ मिळत नाही. अशावेळी घाईघाईत निघायचं असतं आणि वेळ नसेल तर अजिबात काळजी करू नका. तुम्ही बीबी क्रीम लावा. बीबी क्रीम तुम्हाला मेकअपसारखाच फिनिश देतं. हे लावून तासनतास बसावं लागत नाही. बस तुम्ही ते लावलं आणि तुमचा फेस ग्लो करू लागतो. मग हवं असल्यास पाहुण्यांसोबत बसा वा खरेदीसाठी जा. अशाप्रकारे उलट तुम्ही काही मिनिटात तयार व्हाल.

घरच्या फराळाचा आस्वाद घ्या

* दिवाळीत वेगवेगळया प्रकारचा फराळ घरोघरी  बनत असतो. तुम्हीदेखील बाहेरून भेसळ युक्त मिठाई  खरेदी करण्याऐवजी तुमचे पती आणि मुलांच्या आवडीचं काही स्पेशल ट्विस्ट फराळ बनवून खायला द्या.

* पती किचनमध्ये जाउन काही डिश तयार करू शकतात वा मदत करू शकतात. दररोजच्या व्यस्त जीवनशैलीमुळे त्यांच्याकडे तेवढा वेळ नसतो म्हणून हे सर्व शक्य होत नाही. परंतु दिवाळीच्या क्षणी या गोष्टीचा आनंद घ्यायला विसरू नका. विश्वास ठेवा मोठया आनंदाऐवजी अशा छोटया छोटया गोष्टींमध्ये आनंद शोधू शकता.

* जर तुमचे मित्र व नातेवाईक खाण्यापिण्याचे शौकीन असतील, तर तुम्ही बनविलेला फराळ खाण्यासाठी त्यांना घरी बोलवा वा त्यांच्या घरी फराळ घेऊन जा. हवं असल्यास दिवाळी सेलिब्रेशनसाठी रात्री आपल्या सर्व नातेवाईकांना निमंत्रित करा. अशाप्रकारे गेट-टुगेदरदेखील होईल आणि मुलेदेखील या आनंदी वातावरणाचा आनंद घेतील. दिवाळीत सर्वजण मिळून टेस्टी फराळाचा आस्वाद

घेतील तेव्हा नात्यांमध्ये आपलेपणा अधिक वाढेल.

नातेवाईक आणि मित्रांना भेटा

* आजच्या व्यस्त आणि तणावग्रस्त आयुष्यात आपल्याला आपल्या जिवलगांसोबत काही क्षणदेखील घालविण्याची संधी मिळत नाही. परंतु सणवार आपल्याला आपल्या लोकांशी पुन्हा एकदा जोडण्याची संधी देतात. दिवाळीदेखील असाच एक खास सण आहे, जो आपल्याला आपल्या नातेवाईकांना, मित्रांना आणि शेजाऱ्यांना भेटण्याची संधी देतो. अशा प्रकारे पाहायला गेलं तर दिवाळी आपल्या नात्यांना सुमधुर बनविते. तुम्हीदेखील या दिवाळीत असा प्रयत्न करू शकता, ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील आनंद अधिक द्विगुणित होईल .

* तुम्ही देखील तुमचा जिवनसाथी आणि मुलांसोबत मिळून आपल्या जवळच्या लोकांच्या घरी जा. त्यांनादेखील आपल्या घरी बोलवा. यादरम्यान खूप गप्पा मारा. जुन्या आठवणी उजळवा आणि नवीन आठवणींचे क्षण जतन करा.

* जर एखाद्या मित्र वा नातेवाईकांसोबत काही कारणामुळे जर दुरावा वाढला असेल तर अशा रागवलेल्या नातेवाईकांचा रुसवा दूर करा. त्यांच्या घरी भेटवस्तू घेऊन जा. त्यांना आपल्या आनंदामध्ये सहभागी करा. प्रत्येक रागरुसवा दूर करून आपलेपणाने हा क्षण साजरा करा. तुमच्या कुटुंबातील सदस्यदेखील यामुळे खूप आनंदित होतील.

या उत्सवात भीती नाही आनंद आणा

* पारुल भटनागर

सण-उत्सवाचा अर्थ आनंदाचा काळ, परंतु गेल्या वर्षभरापासून कोरोना आपल्यामध्ये राहील्यामुळे आपण सतत आपल्या घरात राहण्यास विवश झालो आहोत आणि जर बाहेर पडलो तरीदेखील अजूनही भीती मनात असतेच. यामुळे लोकांना भेटणं फारसं होतच नाहीए.

आता सणउत्सवात ती एक्साइटमेंटदेखील पहायला मिळत नाही, जी पूर्वी मिळत होती. अशावेळी गरजेचं झालंय की आपण सणउत्सव मोकळेपणाने साजरे करावेत. स्वत:देखील सकारात्मक रहावं आणि दुसऱ्यांमध्येदेखील ही सकारात्मकता निर्माण करावी.

तर चला आपण जाणून घेऊया अशा टीप्सबद्दल ज्यामुळे तुम्ही या सणावारी तुमच्या घरामध्ये सकारात्मक वातावरण कसं टिकवून ठेवू शकता :

घरामध्ये बदल करा

सणवार येण्याचा अर्थ घराची साफसफाई करण्यापासून खूप सारी खरेदी करणं, घरातील इंटेरियरमध्ये बदल करणं, घर व स्वत:साठी प्रत्येक अशी गोष्ट खरेदी करणं, जी घराला नवीन लुक देण्याबरोबरच आपल्या जीवनात आनंद आणण्याचेदेखील काम करेल. तर या सणावारी तुम्ही असा विचार अजिबात करू नका की कोण कशाला घरी येणार आहे वा जास्त बाहेर जायचंच नाहीए, उलट असा विचार करुन घर सजवा की यामुळे घराला नवेपणा मिळण्याबरोबरच तर घरात आलेल्या बदलामुळे तुमच्या आयुष्यातील उदासपणा सकारात्मकतेमध्ये बदलेल.

यासाठी तुम्ही जास्त बाहेर पडू नका तर स्वत:च्या क्रिएटिविटीने घराला सजविण्यासाठी छोटया-छोटया वस्तू बनवा वा बाजारातदेखील बजेटमध्ये सजावटीच्या वस्तू खरेदी करू शकता आणि जर तुम्ही बराच वेळापासून घरासाठी काही मोठं सामान विकत घेण्याबद्दल विचार करत असाल आणि तुमचं बजेटदेखील असेल तर या सणावारी त्याची खरेदी कराच. विश्वास ठेवा हा बदल तुमच्या आयुष्यातदेखील आनंद देण्याचं काम करेल.

करा सोबत सेलिब्रेट

सणवार असेल आणि तुमच्या जिवलगांची भेट होत नसेल तर सणावारी तेवढी मजा येत नाही, जी तुमच्या जिवलगांसोबत सेलिब्रेशन करण्यामध्ये येते. या सणावारी तुम्ही सावधानता बाळगून तुमच्या जिवलगांसोबत आनंदाने उत्सव साजरा करा. जर तुम्ही व तुमचे कुटुंबीय हे जिवलग आणि मित्रांसोबत सण साजरा करण्याचा प्लान करत आहात आणि जर ते पूर्णपणे व्हॅक्सिनेटेड असतील तर तुम्ही त्यांच्यासोबत योग्य काळजी घेऊन सण साजरा करू शकता. या दरम्यान मोकळेपणाने मस्ती करा. खूप सेल्फी घ्या, भरपूर खूप डान्स करा, पार्टी करा, आपल्या लोकांसोबत गेम्स खेळून आनंदाच्या रात्रीदेखील सजवा.

पार्टीमध्ये एवढी मजा करा की तुमच्या आयुष्यातील सर्व उदासीनता गायब होईल आणि तुम्ही या दिवसांमध्ये केलेली मजा लक्षात राहील, हाच विचार करा की सगळे दिवस असेच असोत. म्हणजेच सेलिब्रेशनमध्ये एवढी मजा असो की तुम्हाला त्याची आठवण येताच तुमच्या चेहऱ्यावर आपोआप समाधानाचं हास्य परतेल.

स्वत:लादेखील रंगांमध्ये रंगवा

तुम्ही सणावारी घर तर सजवलं परंतु सणाच्या दिवशी तुमचा लुक अगदीच साधा असेल तर तुम्हालादेखील उत्सवाची अनुभूती होणार नाही. अशावेळी घर सजविण्याबरोबरच तुमच्या आयुष्यातदेखील रंग भरण्यासाठी आनंदी राहण्याबरोबरच नवीन कपडे विकत घ्या आणि स्वत:ला सजवा म्हणजे तुमच्यामध्ये आलेला नवीन बदल पाहून तुमचादेखील उत्साह वाढेल.

स्वत:ला वाटू लागेल कि तुम्ही सण मनापासून साजरा करत आहात. तुमच्या नवीन आऊटफिट्सवर तुमचा फुललेला चेहरा दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरदेखील हास्य फुलवीण्याचं काम करेल. तुम्ही भलेही कोणाला भेटा वा भेटू नका, परंतु सणावारी नटूनथटून नक्की रहा, कारण हा बदल आपल्या मनामध्ये सकारात्मकता आणण्याचं काम करतं.

भेटवस्तूनी दुसऱ्यांमध्ये आनंद वाटा

जेव्हादेखील तुम्ही सणावारी कोणाच्या घरी जाल वा कोणी तुमच्या घरी येईल तेव्हा तुम्ही त्याला मोकळया हाताने परत पाठवू नका. आपापसात आनंद वाटण्यासाठी भेटवस्तूंची देवाण-घेवाण करा. भलेही भेटवस्तू जास्त महागडी नसेल, परंतु हे मनाला अशा प्रकारे आनंद देईल की याचा अंदाजदेखील तुम्ही लावू शकत नाही.

भेटवस्तू मिळाल्याच्या आनंदापासून ते खोलण्याचा व पाहण्याचा आनंद आपल्याला आतल्या आत उत्तम फिल देण्याचं काम करतं. सोबतच यामुळे कोणत्यातरी स्पेशल डेचीदेखील जाणीव होते. तुम्ही ऑनलाईनदेखील तुमचे गिफ्ट पाठवू शकता. तर मग या सणावारी तुमच्या जिवलगांच्या चेहऱ्यावर भेटवस्तूंनी आनंद आणा.

मिठाईचा आनंद घ्या

जर तुम्हाला सणावारी सणासारखा आनंद घ्यायचा असेल तर या दिवसात बनणाऱ्या पक्वान्नांचा खूप आनंद घ्या. असा विचार करू नका की जर आपण चार दिवस गोड, तळलेलं खाल्लं तर जाडजूड होऊ. उलट या दिवसात बनणाऱ्या प्रत्येक ट्रॅडिशनल फराळाची मजा घ्या. स्वत:देखील खा आणि दुसऱ्यांनादेखील  खायला द्या.

कोरोनामुळे सणउत्सव साजरा करण्याच्या पद्धतीत नक्कीच बदल झाला आहे, परंतु तुम्ही सणवार पुरेपूर एनर्जीसोबत साजरे करा, जसे पूर्वी साजरे करत होते. भलेही कोणी नाही आलं तरी तुम्ही तुमच्या लोकांसाठी फराळ बनवा. जेव्हा घरात फराळ बनेल आणि त्यांच्यासोबत तुम्ही एकत्रित बसून खाल तेव्हा सणाची मजा अधिक द्विगुणित होईल.

सजावटीमुळे मिळते सकारात्मकता

जर तुम्ही तुमच्या घरात एकच वस्तू अनेक वर्षापासून पाहून कंटाळला आहात आणि घरात सकारात्मकता आणायची असेल, तर घरात छोटया छोटया गोष्टींमध्ये बदल करा. जसं खोलीमध्ये एकच भिंत हायलाइट करा. यामुळे तुमच्या पूर्ण खोलीचा लुक बदलला जाईल. तसंच घरात नावीन्यपणा आणण्यासाठी कुशन कव्हर, टेबल कव्हर बेडशीटमध्येदेखील रंगसंगती आणा. तुम्ही बाहेर बाल्कनीमध्ये हँगिंगवाल्या कुंडया लावण्यासोबतच रिकाम्या बाटल्यादेखील सजवून त्यामध्ये रोपटी लावू शकता.

असं केल्यामुळे तुम्हाला मनापासून आनंद मिळण्या बरोबरच तुमच्या घरात पॉझिटिव्ह एनर्जी आणण्याचं कामदेखील करेल. तसंच खोलीतील भिंती ज्या घराची शान असतात, त्यांनादेखील तुमच्या हाताने बनविलेल्या वस्तुनी सजवा आणि पहा पुन्हा घर हसेल.

उत्सवी रांगोळी

diwal* डॉ. अनिता सहगल बसुंधरा

दिवाळी हा दिव्यांचा उत्सव आहे. यादिवशी जर रांगोळीदेखील साकारली तर सणाचा आनंद अधिक द्विगुणित होईल. आता तर दिवाळीच्या दिवशी प्रत्येक घरी रांगोळी साकारण्याची जणू काही परंपराच झाली आहे. या दिवशी लोक आपल्या घराची स्वच्छता करतात, ते सजवतात आणि दरवाजासमोर रांगोळी काढतात.

दिवाळीच्या दिवशी दरवाजावर रांगोळी बनवून लोक पाहुण्यांचं स्वागत करतात. या दिवशी जमिनीवर बनविलेल्या वेगवेगळया रांगोळया आपल्या प्रत्येक भागातील कलेचे महत्त्व दर्शवितात. प्रामुख्याने रांगोळी कमळ, मासोळी, पक्षी आणि साप इत्यादींच्या रूपात काढली जाते. जे माणसं, प्राणी आणि निसर्गाबद्दलच्या प्रेमाचं प्रतीक मानली जाते. अनेक रांगोळया एवढया सुंदररित्या साकारलेल्या असतात की त्यांना पाहताच असं वाटतं की जणू काही खऱ्या रंगांचं खरी रंगसंगती स्वत:मध्ये एक वेगळं रुप घेऊन अवतरीत झाल्या आहेत.

रांगोळीत २ त्रिकोण काढले जातात. ज्यांच्या चहूबाजूंनी २४ पाकळया साकारल्या जातात आणि नंतर बाहेर एक गोल बनविला जातो. अनेकदा कमळाच्या पाकळया त्रिकोणी आकारातदेखील काढल्या जातात. उत्तर बिहारच्या रांगोळीमध्ये पाऊलं काढली जातात.

वेगवेगळया राज्यातील वेगवेगळी रांगोळी

भारताच्या प्रत्येक राज्यात रांगोळी बनवण्याची पद्धत वेगवेगळी आहे.

आंध्रप्रदेशात अष्टदल कमळाच्या रूपात विविध पद्धतीने रांगोळी साकारली जाते.

तामिळनाडूमध्ये हृदयाच्या आकाराचे कमळ काढलं जातं. ज्यामध्ये ८ तारे बनवितात.

तर महाराष्ट्रात कमळाला विविध आकार देऊन रांगोळी साकारली जाते.

गुजरात एक असं राज्य आहे जिथे कमळाच्या रांगोळीचे १,००१ प्रकारच्या डिझाइन्स पाहायला मिळतात. या व्यतिरिक्त स्वस्तिक आणि शंख बनविण्याचीदेखील परंपरा आहे, जी पूर्णपणे आपली भारतीय संस्कृती आणि परंपरा दर्शविते.

संपूर्ण भारतात दिवाळीचा सण खूप उत्साहात साजरा केला जातो आणि या दिवशी साकारली जाणारी रांगोळी एक आनंदाचं प्रतीक मानली जाते. अनेक रांगोळया ज्या भौमीतिक आकार जसं की गोल, वृत्त, कमळ, मासोळी, झाड आणि वेलींच्या रुपात साकारली जाते.

रांगोळीचे साहित्य

रांगोळी काढण्यासाठी विविध प्रकारचं साहित्य वापरलं जातं. जसं रंगीत तांदूळ, लाकडाचा भुसा, फुलं, तांदळाचं पीठ, डाळी, पाने. संपूर्ण भारतात रांगोळीचा पांढरा रंग सर्वोत्तम मानला जातो. पांढरा रंग शांतीचे प्रतीक असतं. अनेक रांगोळी तांदळाच्या पिठाने व त्याच्या घोळाने काढल्या जातात.

दुसरा सुंदर रंग पिवळा असतो. कारण हळद पावडर वा पिवळया रंगाने रांगोळीचा बाहेरचा भाग साकारला जातो. केशर आणि हिरव्या रंगाचादेखील उत्तम रंगांमध्ये समावेश केला जातो.

तसंही बाजारात रांगोळीचे विविध रंग आहेत. परंतु दिपावलीबद्दल बोलत आहोत तर यावेळी तांदळाने रांगोळी काढण्याची परंपरा आहे. जर तुम्हाला त्यात रंग भरायचे असतील तर तुम्ही तांदळाला विविध रंगांमध्ये रंगवून दरवाजासमोर जमिनीवर रांगोळी काढू शकता. अशा प्रकारे सुसज्जित रांगोळीने सजवलेलं अंगण पाहून पाहुणे नक्कीच खूश होतील.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें