आश्मीन मुंजाल,  कॉस्मेटोलॉजिस्ट

*  गरिमा पंकज

आपल्या घराच्या पहिल्या मजल्यावरील एका खोलीतून २५ वर्षांपूर्वी आश्मीन मुंजाल यांनी ‘आश्मीन ग्रेस’ नावाचे पार्लर सुरू केले. हळूहळू महिलांना ते आवडू लागले आणि त्यामुळेच पार्लरचा विस्तार होत गेला आणि पहिल्या मजल्यावरील इतर खोल्यांमध्येही पार्लरचे काम सुरू झाले. ८ वर्षांनंतर प्रथमच साऊथ एक्सच्या कमर्शिअल मार्केटमध्ये त्यांनी पार्लर उघडले आणि त्याला ‘आश्मीन मुंजालस अंपायर ऑफ मेकओव्हर’ असे नाव दिले,  मागणी वाढत गेली आणि लोक युनिसेक्स सलूनची मागणी करू लागले. त्यावेळी त्यांनी ‘स्टार सलून प्रायव्हेट लिमिटेड’ या नावाने स्वत:ची कंपनी नोंदणीकृत केली,  जिथे त्या कंपनीच्या संचालक होत्या आणि इतर भागीदार होते. त्यानंतर २०१० मध्ये त्यांनी स्टार सलूनमध्ये ‘स्टार अकॅडमी’ सुरू केली,  जिथे लोकांना सुंदर बनवण्याचे शिक्षण दिले जाऊ लागले. अशाप्रकारे, केवळ एका खोलीतून सुरू झालेले पार्लर आंतरराष्ट्रीय दर्जाचे सलून बनले.

आश्मीन मुंजाल यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या हस्ते कौशल्य विकासासाठी पुरस्कार मिळाले. उपराष्ट्रपती एम. वैकय्या नायडू यांच्याकडूनही त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांना महिला सक्षमीकरणासाठीही पुरस्कार मिळाले आहेत. सुषमा स्वराज पुरस्कारही मिळाला आहे. मेकअप आणि सौंदर्य क्षेत्रात अनेक ऑल इंडिया एक्सलन्स पुरस्कारही त्यांना मिळाले आहेत.

आश्मीन मुंजाल मानतात की, जीवनात वेळेचे योग्य व्यवस्थापन करणे खूप महत्त्वाचे आहे. तुमचे करिअर घडत राहील. पैसा आणि प्रसिद्धीही येत-जात राहील. तुमची आवडही कधी ना कधी जोपासता येईल, पण तुमच्या मुलांचे बालपण मात्र कधीच परत येणार नाही. म्हणूनच आपल्या मुलांचे बालपण आनंदाने अनुभवा. त्यांना पूर्ण वेळ द्या,  नाहीतर येणारी अपराधीपणाची भावना भविष्यात तुम्हाला तुमच्या यशाचा आनंद घेऊ देणार नाही.

या क्षेत्रात महिलांची प्रगती कशी होईल?

जर तुमची आवड लोकांना सुंदर बनवण्याची असेल तर तुम्ही पार्लर उघडले नाही तरी तुम्ही फ्रीलान्सिंग करू शकता. आज इन्स्टाग्राम, फेसबुक, गुगल, जस्ट डायल इत्यादी गोष्टी आहेत, ज्याद्वारे सर्व काही फोनवर उपलब्ध आहे. तुम्हाला फक्त ब्युटी किट आणि इतर पार्लर प्रसाधनांसाठी थोडीफार गुंतवणूक करावी लागेल. बाकी तुम्ही सर्व काम तुमच्या घरातूनच व्यवस्थापित करू शकता. वेगळे दुकान असण्याची विशेष गरज नाही. ग्राहकांना तुमचा पत्ताही मोबाईलवरच मिळेल. नवीन तंत्रज्ञानामुळे सर्व कामं खूप सोपी झाली आहेत. त्यामुळे महिलांना घरून काम करणे सोपे आहे. तसेही, आजकाल लोकांमध्ये छान तयार होण्याची आणि सुंदर दिसण्याची खूप क्रेझ आहे. हेअरस्टाईल करणं असो किंवा मेकअप करणं असो,  महिला पार्लरमध्ये येतच असतात.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...