* पारूल भटनागर

जर तुम्हीही कुठेतरी फिरायला जाण्याचा विचार करत असाल, जेणेकरून निवांत क्षण घालवता येतील, पण त्यासाठी स्वत:च टूरचे नियोजन करायचे की टूर पॅकेज घ्यायचे, या संभ्रमात तुम्ही असाल तर दोन्ही गोष्टी योग्यच आहेत, पण या दोघांपैकी कोणताही पर्याय निवडण्यापूर्वी तुम्ही कोणत्या प्रसंगी, कधी, कोणासोबत आणि कसे फिरायला जाण्याचा विचार करत आहात, हे समजून घेणे फार महत्वाचे आहे.

त्यामुळेच आम्ही तुम्हाला काही अशा गोष्टींची माहिती करून देत आहोत, ज्या लक्षात घेऊन तुम्ही तुमच्या टूरचे नियोजन करताना, एकतर स्वत: टूरची योजना आखू शकता किंवा त्यासाठी संपूर्ण टूर पॅकेज घेऊ शकता. चला तर, जाणून घेऊया कोणता पर्याय कधी आणि कसा सर्वोत्तम ठरेल.

हनिमून टूर

लग्न आणि त्यानंतर हनिमूनला जाण्याचे नियोजन हा प्रत्येक जोडप्यासाठी वेगळा आणि रोमांचक अनुभव असतो, कारण ही वेळ पुन्हा फिरून येत नाही आणि त्यावेळेस एकमेकांसोबत घालवलेले क्षण कायम आठवणीत राहतात. त्यामुळेच तुम्हाला तुमची हनिमून टूर आरामदायी आणि तणावमुक्त करायची असेल, तर टूर पॅकेज घेणे तुमच्यासाठी योग्य ठरेल.

यामध्ये तुम्हाला घेऊन जाणे आणि परत आणून सोडणे, तुम्ही जाण्यासाठी ठरवलेल्या ठिकाणाची माहिती देणे, निवास, खाणे इत्यादींचा समावेश असतो, जेणेकरून तुम्हाला कशाचीही काळजी करण्याची, उगाचच भटकण्याची गरज नाही आणि तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत संपूर्ण टूरचा आनंद लुटू शकता, पण याऐवजी तुम्ही स्वत: टूर बुक केल्यास सर्व काही व्यवस्थित असेलच, परंतु त्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल आणि गंतव्यस्थानावर पोहोचल्यानंतर शोधाशोध करावी लागेल. कधीकधी घाईगडबडीत किंवा तुमच्या जोडीदाराला कोणताही त्रास होऊ नये म्हणून तुम्ही तिथे जाऊन महागडे हॉटेल, सोबतच इतर सर्व महाग गोष्टी बुक करता, जे तुमचा वेळ तर वाया घालवतातच, पण तुमच्या खिशावरही भार टाकतात.

म्हणूनच, पॅकेज बुक करणे चांगले. फक्त लक्षात ठेवा की, नेहमी एका विश्वासार्ह साइटवरून पॅकेज घ्या, कारण त्यात पैसे आधी भरावे लागतात.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...