Holi Special : ही होळी, ‘रंग’ तुमच्या सौंदर्यावर परिणाम करणार नाही

* गृहशोभिका टीम

होळी म्हणजे रंगांचा सण. प्रियजनांची कंपनी, मजा आणि उत्साह. रंगांचा हा सण जितका आनंद घेऊन येतो तितकाच काही समस्याही देतो. होळीनंतर लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. विशेषतः त्वचा आणि केसांशी संबंधित समस्या सामान्य आहेत.

जर तुम्हाला होळीच्या रंगांच्या आनंदात रंगायचं असेल आणि तुमचं सौंदर्य टिकवायचं असेल, तर त्यासाठी तुम्हाला आधीच तयारी करावी लागेल. होळीमध्ये रंगांमुळे होणारी हानी टाळण्यासाठी या टिप्स फॉलो करा.

घरी स्क्रब तयार करा

बेसन, मध आणि दूध एकत्र करून स्क्रब बनवा आणि चेहरा आणि शरीरावर स्क्रब करा. हे शरीरातील रंग काढून टाकण्यास मदत करेल. तसेच त्वचा चमकदार आणि मुलायम बनवते. अतिरिक्त पोषणासाठी, मॉइश्चरायझिंग करण्यापूर्वी शरीरावर ताजे कोरफड वेरा जेल लावा.

ऑइलिंग आणि मॉइश्चरायझर

रंगांच्या दुष्परिणामांपासून तुमच्या त्वचेचे रक्षण करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे रंगांशी खेळण्यापूर्वी तुमच्या शरीराला तेल लावणे. यानंतर मॉइश्चरायझर वापरा. हे थोडे चिकट नक्कीच असेल, परंतु ते तुमच्या त्वचेसाठी फायदेशीर ठरेल. होळी खेळण्यापूर्वी आंघोळ करावी आणि आंघोळीनंतर तेल लावायला विसरू नका.

केसांची विशेष काळजी घ्या

होळीनंतर लगेच केसांची योग्य प्रकारे कंडिशनिंग करा, पण जर त्या दिवशी वेळेची कमतरता असेल तर दुसऱ्या दिवशीही हे करू शकता. हे केसांना रंगांमुळे खराब होण्यापासून वाचवते. दोन अंडी आणि एक चमचा खोबरेल तेल दोन चमचे मधामध्ये चांगले मिसळा. हे केसांना लावा आणि सुमारे तासभर राहू द्या. सौम्य शैम्पू आणि चांगल्या कंडिशनरने ते धुवा. या होम कंडिशनिंगमुळे तुम्हाला तुमचे केस अधिक जिवंत आणि सुंदर दिसतील.

होळीच्या दहा दिवस आधी तुम्ही तुमच्या त्वचेची आणि केसांची काळजी घ्यावी, जेणेकरून ओलावा टिकून राहील. होळीचा हंगाम खूप कोरडा असतो. म्हणूनच भरपूर पाणी प्या आणि भरपूर फळे खा.

शैम्पू आणि तेल

होळीच्या एक दिवस आधी संध्याकाळी किंवा होळी खेळण्यापूर्वी लगेच केसांना तेल लावण्याची खात्री करा. बरेच लोक मानतात की केस घाणेरडे असतात, मग ते शॅम्पू करून काय उपयोग. पण रंगासोबत आधीच केसांमध्ये पडलेली घाण तुमच्या केसांना आणखीनच नुकसान पोहोचवू शकते. म्हणूनच प्रथम केस चांगले धुवा. त्यामध्ये कंडिशनिंग करा, नंतर कोरडे झाल्यानंतर त्यात खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह ऑईल वापरा. हे रंग तुमच्या टाळूपर्यंत (केसांच्या मुळापर्यंत) पोहोचण्यापासून प्रतिबंधित करते.

नेल पेंटचा डबल कोट लावा

होळीच्या रंगांचा आपल्या नखांवर सर्वाधिक परिणाम होतो. कारण ते लवकर सुटण्याचे नाव घेत नाही आणि आपली नखं जास्त काळ कुरूप ठेवतात. हे टाळण्यासाठी हात आणि पायांच्या नखांवर नेल पेंटचा डबल कोट लावा. होळीनंतर, जेव्हा तुम्ही तुमचे नेल पेंट पातळ करून काढाल, तेव्हा तुमचे नखे पूर्वीसारखे सुंदर आणि डाग नसतील.

बेस्ट पंप आता अडचणी झाल्या सोप्या

* पारुल भटनागर

आई होण्याचे सुख जीवनातील प्रत्येक सुखापेक्षा मोठे असते. ते कुटुंबात आनंद आणण्यासोबतच आईच्या जीवनाला एक वेगळी अनुभूती मिळवून देते. ती आपल्या चिमुकल्यासाठी सर्वस्वाचा त्याग करायला तयार होते. दिवस असो किंवा रात्र, ती आपली जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडते, मात्र अनेकदा इच्छा असूनही सुरुवातीचे ६ महिने बाळासाठी आईचे दूध सर्वकाही असतानाही आई बाळाला स्वत:चे दूध पाजण्यात असमर्थ ठरते. खरंतर या दुधामुळेच बाळाचा सर्वांगीण विकास होत असतो.

अशावेळी दूध पाजण्यात असमर्थ ठरणाऱ्या आईचा त्रास दूर करणारा उपाय म्हणजे ब्रेस्ट पंप. यामुळे आई कुठेही आणि कधीही आपल्या बाळाला आपले दूध पाजून त्याच्या गरजा पूर्ण करू शकते.

कधी येते अडचण?

अनेकदा स्तनांमध्ये दूध येत नाही किंवा जास्त दूध येत असल्यामुळे स्तनांमध्ये प्रचंड वेदना होतात. याव्यतिरिक्त नोकरी करावी लागत असल्यामुळे नाईलाजाने आपल्या बाळाचे पोट भरण्यासाठी फॉर्म्युला मिल्कचा आधार घ्यावा लागतो. तो बाळाची भूक भागवतो, पण त्यातून बाळाला आवश्यक ती सर्व पोषक तत्त्वे मिळत नाहीत. यामुळे भविष्यात याचा परिणाम बाळाच्या आरोग्यावर होऊ शकतो, मात्र ब्रेस्ट पंप आईची अडचण सोडवण्यासोबतच बाळाची सतत काळजी घेण्याचे काम करते. भलेही आई त्याच्याजवळ असो किंवा नसो, ते आई आणि बाळाला समाधानी ठेवण्यासोबतच त्यांच्यात प्रेमाचे दृढ बंध निर्माण करण्याचे काम करते.

ब्रेस्ट पंप म्हणजे काय?

ब्रेस्ट पंप हे एक असे यंत्र आहे ज्याच्या मदतीने आई आपल्या स्तनातून दूध काढून ते साठवून ठेवू शकते. ब्रेस्ट पंप मॅन्युअल आणि इलेक्ट्रिक अशा दोन्ही प्रकारचे असतात, जे वॅक्युमच्या दबावानुसार काम करते. मॅन्युअल ब्रेस्ट पंपमध्ये पंपाला हाताने दाबून दूध काढले जाते. इलेक्ट्रॉनिक ब्रेस्ट पंपमध्ये पंप स्तनाला लावताच दूध स्वत:हून निघून पाईपमधून बाहेर येऊन त्याच्यासोबत असलेल्या बाटलीमध्ये भरले जाते. ते साठवून आई गरजेनुसार बाळाला दूध देऊ शकते. तिच्या गैरहजेरीत कुटुंबातील कोणीही सदस्य बाळाला दूध देऊन आईची कमतरता भरून काढू शकतो आणि आई बिनधास्त होऊन आपले काम करू शकते.

ब्रेस्ट पंपचा वापर करणे अतिशय सोपे असते. सोबतच याचे सर्व भाग वेगळे होत असल्याने तुम्ही तो अगदी सहज स्वच्छ करू शकता. फार कमी जागा लागत असल्यामुळे तुम्ही तो कुठेही नेऊ शकता. तो पॉकेट फ्रेंडलीही आहे.

जाणून घेऊया ब्रेस्ट पंपच्या फायद्यासंबंधी

* तुम्ही नोकरदार महिला असाल आणि जबाबदारीच्या ओझ्यामुळे नोकरी सोडणे तुम्हाला शक्य नसेल तर अशा परिस्थितीत ब्रेस्ट पंप तुमच्यासाठी खूपच कामाचा ठरेल. याच्यामुळे तुम्ही असा विचार करून मन लावून काम करू शकाल की, माझ्या बाळाला माझ्या गैरहजेरीतही भरपूर पोषण मिळत आहे.

* काही कारणांमुळे ब्रेस्टमधून दूध निघत नाही. यामुळे स्तन घट्ट होऊन त्यात गाठी पडण्यासह प्रचंड वेदना होऊ लागतात. त्यामुळे मनात असूनही आई आपल्या बाळाला दूध पाजू शकत नाही. अशावेळी ब्रेस्ट पंप आईचा बेस्ट मित्र बनून तिची मदत करतो. यामुळे स्तनांमधून सहज दूध निघते. यामुळे आई आणि बाळ दोघांनाही दिलासा मिळतो.

* अनेकदा नवजात बाळाला आईच्या स्तनातून दूध पिताना त्रास होतो. ज्यामुळे त्याचे पोट भरत नाही. अशावेळी ब्रेस्ट पंपच्या मदतीने बाळ सहज दूध पिऊ शकते.

कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे?

* ब्रेस्ट पंप खरेदी करताना वजनाने हलका पंप खरेदी करा. त्यामुळे तुम्ही तो कुठेही सहज घेऊन जाऊ शकता.

* ब्रेस्ट पंप कमी आवाज करणारा असावा. यामुळे कोणालाही त्रास न होता तुमचे काम होईल.

* ब्रेस्ट पंप तुमची आवड आणि बजेटवर अवलंबून असतो, पण प्रयत्न करा की, हँड फ्री पंपच घ्या. यामुळे तुम्हाला बराच आराम मिळेल.

* तो संपूर्णपणे बीपीए फ्री हवा.

* बाळाला दूध देण्यापूर्वी बॉटल नेहमी स्वच्छ करून ठेवा. यामुळे बाळाला संसर्ग होण्याची भीती राहाणार नाही. अशा प्रकारे तुम्ही ब्रेस्ट पंपाने तुमचा अवघड काळ सर्वसामान्य बनवून स्वत:च्या कामासह आपल्या बाळाचीही संपूर्ण काळजी घेऊ शकाल.

लग्नापूर्वीचं आहार रहस्य

* पारुल भटनागर

लहान वयातच प्रत्येक मुलगी स्वत:च्या लग्नाची स्वप्नं पाहते आणि जेव्हा मोठी झाल्यावर हे स्वप्नं सत्यात उतरतं तेव्हा मात्र तिच्या मनात सतत ही चिंता असते की चोली लहेंगा वा साडीमध्ये मी बारीक दिसेन ना, कोणी मला लठ्ठ तर म्हणणार नाही ना. यासाठी कितीतरी दिवस अगोदर आहारात एकवेळचं खाणं बंद करायला सुरूवात केली जाते, खरंतर हा काळ उपाशी राहण्याचा नसून स्वत:ला आतून मजबूत बनविण्याचा असतो. कारण चेहरा आकर्षक दिसण्याण्याबरोबरच शरीर सुदृढ रहाणं गरजेचं असतं.

परंतु अनेकदा चांगलं फिजिक मिळविण्यासाठी महत्त्वाचा आहार बंद केला जातो, जो फिटनेससाठी खासकरून गरजेचा असतो. तर चला जाणून घेऊया या सर्व गोष्टींबद्दल ज्यामुळे तुम्ही तुमच्या फिटनेसकडे व्यवस्थित लक्ष देऊ शकाल :

पाण्याने करा दिवसाची सुरुवात

असं म्हणतात की स्वत:ला आजारांपासून वाचवायचं असेल तर तुमच्या दिवसाची सुरुवात पाण्याने करण्याबरोबरच पूर्ण दिवसभर ७ ते ८ ग्लास पाणी नक्की प्या आणि नववधूने यागोष्टी अमलात आणायला हव्यात. कारण पाणी शरीर हायड्रेट करण्याचं काम करण्याबरोबरच त्वचेलादेखील नैसर्गिक पद्धतीने उजळविण्यासाठीचं काम करतं.

हे शरीरातून टॉक्सीन्स बाहेर काढून पचन व्यवस्थित करतं, ज्यामुळे चेहऱ्यावर मुरूम पुटकुळयाची समस्या उद्भवत नाही आणि नववधूचा चेहरा उजळतो. सोबतच रक्ताभिसरण व्यवस्थित झाल्यामुळे त्वचा कायमच निरोगी राहते. तेव्हा तुम्हाला जेव्हाही तहान लागेल तेव्हा कोल्ड्रिंक्सच्या जागी पाणी व लिंबू पाण्याने स्वत:ला ताजंतवानं ठेवा.

तेजस्वी त्वचेसाठी नारळाचं पाणी

नारळाचे पाणी अनेक वर्षापासून खूपच प्रसिद्ध पेय आहे. एक ग्लास नारळ पाण्यामध्ये अनेक न्यूट्रीएंट्स असतात. यामध्ये कार्बस, फायबर प्रोटीन, व्हिटॅमिन सी, मॅग्नेशियम पोटॅशियम, कॅल्शियम, सोडियम असतं. हे शरीरासाठी खूपच फायदेशीर असतं. एक ग्लास नारळ पाण्यामध्ये फक्त ४५ कॅलरीज असतात. म्हणून प्रत्येकजण याचा आपल्या आहारात समावेश करतात. खासकरून नववधूने स्वत:च्या आहारात याचा दररोज समावेश करायला हवा. कारण हे शरीराला हायड्रेट ठेवून शरीरातील सर्व विषारी पदार्थ बाहेर फेकून त्वचेला क्लियर बनविण्याबरोबरच त्यावर नैसर्गिक तेज आणण्याचं काम करतात.

हे तुमचे वर नैसर्गिक मोहिस चर्चादेखील काम करतं. मुरुमांनादेखील दूर ठेवण्याचं काम करतं. हे त्वचेवर नैसर्गिक मॉइश्चरचं काम करून मुरुमांना दूर ठेवतात. म्हणून जर तुम्ही नववधू असाल तर नारळ पाण्याचा तुमच्या आहारात आवर्जून समावेश करा.

थोडया थोडया वेळाने खा

तुम्हाला दीर्घ काळ उपाशी राहून नंतर एकदम जेवण घ्यायची सवय असेल तर आजपासूनच ही सवय सोडून द्या. कारण असं केल्यामुळे तुम्ही गरजेपेक्षा जास्त खाता. जे लठ्ठपणा वाढविण्याचं काम करतात. अशावेळी जर तुमचं लग्न होणार असेल तर तुम्ही तुमचं खाणं बंद करू नका. उलट थोडया थोडया वेळाने काहीतरी हेल्दी खात रहा. यामुळे तुमचं मेटाबॉलिज्म बूस्ट होण्याबरोबरच, जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर यामुळे वजन वेगाने तुम्ही कमी करू शकाल.

जेव्हा देखील छोटे-छोटे मिल्स घ्याल तेव्हा त्यामध्ये स्प्राऊट्स, चणे, सूप, ज्यूस, ब्राऊन ब्रेड सँडविच, सलाड, पोहे इत्यादींचा समावेश करा. विश्वास ठेवा छोटया-छोटया मिल्समुळे तुमचं पोट भरलेलं राहण्याबरोबरच तुम्हाला फिट ठेवण्याचेदेखील काम करेल.

हाय कॅलरी फूडला करा बाय-बाय

एकदा लग्न ठरल्यानंतर घरात लग्नाचं वातावरण निर्माण होऊ लागतं. होणाऱ्या नववधूसोबतच घरातील इतर लोकदेखील खरेदीमध्ये व्यस्त होतात. अशावेळी या धावपळीत जे खायला मिळेल ते खाणे योग्य नसतं, कारण प्रोसेस्ड व स्ट्रीट फूडमध्ये स्टार्च, तेल कार्बस अधिक प्रमाणात असल्यामुळे ते शरीराला तेवढयापुरतं एनर्जी देण्याचं काम करतात, परंतु नंतर शरीरात फुगून आतल्या आत पोखळ बनवतात.

अशावेळी गरजेचं आहे की तुम्ही खरेदीबरोबरच तुमच्या आरोग्याचीदेखील काळजी घ्यावी. यासाठी सर्वोत्तम पद्धत म्हणजे रस्त्यावरचं न खाता फक्त घरचं अन्न खावं .

तेजस्वी त्वचेसाठी

तुम्हाला फक्त तुमच्या लग्नाच्या दिवशीच तुमची त्वचा मेकअपने तेजस्वी दिसलेली हवी आहे का आणि जसा तुमचा मेकअप उतरेल तेव्हा तुमचा खरा चेहरा सर्वांसमोर येईल तेव्हा काय? हे सर्व नको आहे ना, तर मग तेजस्वी त्वचा व केसांसाठी तुमच्या आहारात फळे, भाज्या, प्रोटीन रिच फूड यांचा समावेश करा, कारण हे सर्व न्यूट्रिएंट्सने पुरेपूर असण्याबरोबरच तुमच्या त्वचेला आतून उजळविण्याचं काम करतात आणि तुम्हालादेखील हेच हवं असतं की तुमच्या त्वचेवर कायम तेज दिसून यावं, जे पाहून सर्वांनी तुमची स्तुती करावी की किती तेजस्वी चेहरा आहे, याचं काय रहस्य आहे.

यासाठी तुम्ही हिरव्या भाज्या, मोसमी फळं, विटामिन सी युक्त फळं, डाळी, अंडी, पनीर इत्यादींचा तुमच्या आहारात समावेश करा. परंतु या गोष्टीकडेदेखील लक्ष द्या की त्याचं प्रमाण थोडंचं असावं. जसं एकावेळी एक बाऊल डाळ आणि ५० ग्रॅम पनीरचं कॉम्बिनेशन योग्य आहे, कारण दोन्हीही रिच प्रोटीन असल्यामुळे तुम्हाला याची कॉन्टिटी पाहूनच घेणं गरजेचं आहे. अशावेळी कोरडया हिरव्या भाज्यासोबतच एक बाऊल डाळ तुम्हाला आतून व बाहेरून दोन्हीकडून मजबूत व तेजस्वी बनविण्याचं काम करेल.

हेल्दी नाश्ता

अनेकदा आपण नाश्ता करत नाही. असं केल्यामुळे आपण फिट राहू असा समज असतो. परंतु तुम्हाला सांगावसं वाटत की तुमची ही सवय तुम्हाला फिट नाहीतर आजारी करू शकते. कारण रात्रीच्या दीर्घकाळानंतर तुम्ही जर तुमचा नाश्ता केला नाही तर तुमचं मेटाबॉलिज्म कमकुवत होऊन तुम्ही अधिक लठ्ठ होऊ शकता.

व्यायामाचं वेळापत्रक पाळा

लग्न ठरल्याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमचं व्यायामाचं वेळापत्रक सोडून द्यावं. जर तुम्हाला तुमच्या लग्नात सुंदर दिसायचं असेल तर व्यायाम करणं गरजेचं आहे. कारण  यामुळे शरीर फिट राहण्याबरोबरच तुम्हालादेखील प्रत्येकवेळी ऊर्जावान असल्याची जाणीव होईल. यासाठी घरच्या घरी स्किपिंग, जॉगिंग व रनींगदेखील करू शकता आणि जर घरी करण्यात आळस येत असेल तर जिम, योगा क्लासेसला जाऊन वेगाने वजन कमी कराल आणि तुमचा स्टॅमिनादेखील वाढेल.

आपल्या शरीरासाठी दररोज अर्धा तास काढणं आपलं कर्तव्य आहे. कारण जेव्हादेखील चांगलं खाल, व्यायाम कराल तेव्हा तुम्हाला त्याचा योग्य रिजल्ट मिळण्याबरोबरच तुमची त्वचादेखील ग्लो करेल. म्हणून जर तुमच्या लग्नाला थोडा काळ उरला असेल तर व्यायामाचं रुटीन सोडू नका. उलट थोडं अजून वर्कआउट वाढवून तुमचं शरीर मेंटेन ठेवा.

ड्रायफ्रुट्स खा

अनेकदा तुम्ही लोकांना बोलताना ऐकलं असेल की जास्त ड्रायफ्रुट्स खाता कामा नये, कारण यामुळे शरीरात फॅट वाढतं, खरंतर तुम्हाला सांगावसं वाटतं की ड्रायफ्रुट्स विटामिन्स व प्रोटिन्सने पुरेपूर असल्यामुळे शरीरातील इतर उणीव दूर करून आतून शरीराला मजबूत बनविण्याचं काम करतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल की १०० ग्रॅम ड्रायफ्रुट्स मध्ये १०० ग्रॅम ताज्या फळांच्या तीन पट अधिक फायबर, विटामिन्स व मिनरल्स मिळतील. म्हणजेच कमी क्वांटीटीत अधिक न्यूट्रीएंट्स.

म्हणून सर्वप्रथम हा संभ्रम काढा की ड्रायफ्रुट्सने शरीराचे नुकसान होईल. जर तुम्ही दररोज थोडेसे ड्रायफ्रुट खाल्लेत, तर तुमच्या शरीरातील अशक्तपणा दूर होईल आणि तुम्ही अधिक उत्साहाने छानपैकी तुमच्या लग्नाचा आनंद घेऊ  शकाल.

हातांची स्वच्छता का महत्त्वाची आहे

* सोनिया राणा

जेव्हापासून कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे, तेव्हापासून लोक हातांच्या स्वच्छतेकडे लक्ष देऊ लागले आहेत. पण हे फक्त कोविड-१९ बद्दल नाही. हात धुण्याबद्दल अनेकदा घरातील वडीलधारी मंडळी वेळोवेळी सल्ला देतात आणि खडसावत ही असतात की जेवण करण्यापूर्वी आणि नंतर बाहेरून घरात आल्यानंतर, बाहेरून आणलेल्या कोणत्याही वस्तूला हात लावल्यानंतर आणि शौचालयात गेल्यानंतर हात साबणाने चांगले धुतले पाहिजे.

कारण जेव्हाही आपण हात न धुता अन्न खातो तेव्हा आपल्या हातातील जंतू अन्नासोबत आपल्या शरीरात प्रवेश करतात, ज्यामुळे आपल्याला अन्न विषबाधेसह अनेक आजारांना सामोरे जावे लागू शकते.

अनेक आजार होऊ शकतात

हातांच्या स्वच्छतेच्या बाबतीत आपण कोविड-१९ सारख्या महामारीकडे क्षणभर दुर्लक्ष केले तरी ते आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. सौम्य विषाणूजन्य संसर्गापासून ते कॉलरापर्यंत असे अनेक रोग आहेत, जे तुमच्या दैनंदिन दिनचर्येत या छोटयाशा सवयीचा समावेश न केल्याने तुम्हाला आपल्या जाळयात अडकवू शकतात, जसे की डायरिया, गॅस्ट्रोएन्टेरिटिस, अतिसार, कॉलरा, टायफॉइड, हिपॅटायटीस ए आणि इ, कावीळ, एच १, एन १, सर्दी आणि खोकला.

हात स्वच्छ कसे ठेवायचे

हात धुण्याशी संबंधित जाहिरातींनी बाजार भरलेला आहे, वर्तमानपत्रांतून असो की मासिकांतून किंवा दूरचित्रवाणीवरील जाहिरातींमधून, आम्हाला हात व्यवस्थित कसे धुवावेत याची माहिती दिली जाते. मात्र गेल्या १ वर्षात या जाहिरातीच नव्हे तर बाजारात उपलब्ध सॅनिटायझर आणि हँड वॉशचे प्रमाणही वाढले आहे.

अशा परिस्थितीत आपण सर्वजण घरी असलो तर सतत साबणाने हात स्वच्छ करणे आणि घराबाहेर असलो तरी आता सॅनिटायझरने हात जंतूमक्त करणे गरजेचे झाले आहे. यामुळे तुम्ही कोविड-१९ महामारीपासून तर वाचालच पण इतर आजारांपासूनही तुम्ही स्वत:चे रक्षण करू शकाल. डब्ल्यूएचओच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्येही असे म्हटले आहे की आपण आपले हात २० सेकंदांपर्यंत चांगले घासून धुवावेत.

ग्लोबल हँड वॉशिंग डे

हात धुण्याबाबत जनजागृती करण्यासाठी ‘ग्लोबल हँड वॉशिंग डे’ साजरा केला जातो. यूएनने २००८ पासून तो साजरा करण्यास सुरुवात केली होती आणि जेव्हा तो पहिल्यांदा साजरा केला गेला तेव्हा जगभरातील सुमारे १२० दशलक्ष मुलांनी आणि प्रौढांनी आपले हात धुतले होते. त्यानंतर तो दरवर्षी १५ ऑक्टोबरला साजरा केला जातो. २०२० मध्ये ‘हँड हायजिन’ ही त्याची थीम ठेवण्यात आली होती.

हाताचे आरोग्यदेखील महत्त्वाचे आहे

कोविड काळात हात धुणे खूप महत्वाचे झाले आहे. अशा परिस्थितीत हात धुण्यासोबतच त्यांच्या आरोग्याची काळजी घेणेही महत्त्वाचे आहे.

हात धुतल्यानंतर क्रीम लावा : हातांच्या वरच्या त्वचेवर नैसर्गिक तेल आणि मेण असते. वारंवार हात साबणाने धुतल्याने आणि सॅनिटायझर वापरल्याने ते कोरडे होतात. त्यामुळे हे टाळण्यासाठी हात धुतल्यानंतर किंवा सॅनिटायझर वापरल्यानंतर मॉइश्चरायझर जरूर वापरा.

सुगंधित साबणाचा वापर कमी करा : कोरोना संसर्गाच्या काळात लोकांनी सुगंधी साबणाचा अधिक वापर सुरू केला आहे. म्हणून याचा कमीत कमी वापर करा, कारण ते फेसाचा जाड थर बनवते आणि नंतर जेव्हा तुम्ही हात चोळून धुता तेव्हा ते त्यांच्यातील नैसर्गिक तेलदेखील धुवून टाकते. असे सतत केल्याने हातांचे नैसर्गिक सौंदर्यदेखील खराब होऊ शकते.

हात फाटले असल्यास सॅनिटायर लावू नका : हाताची त्वचा फाटली असेल तर अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर लावणे टाळा. हँड सॅनिटायझर लावल्याच्या काही वेळानंतर मॉइश्चरायझिंग क्रीम वापरता येते. रात्री झोपण्यापूर्वी हातांवर मॉइश्चरायझिंग क्रीम लावा आणि सुती कापडाच्या हातमोजेने २० मिनिटे हात झाकून ठेवा जेणेकरून त्यात ओलावा येईल.

अशी वाढवा शरीराची प्रतिकारकशक्ती

* गरिमा पंकज

हिवाळयात ज्यांची प्रतिकारकशक्ती कमकुवत असते ते अनेकदा आजारी पडतात. या ऋतूत प्रदूषणही उच्चांकावर असते. हवेतील गारवा शरीराची काम करण्याची क्षमता कमी करतो. अशा परिस्थितीत प्रतिकारकशक्ती चांगली असणे अत्यंत गरजेचे असते.

प्रतिकारकशक्ती म्हणजे काय?

रोग प्रतिकारकशक्ती ही आपल्या शरीरात असलेल्या विषारी द्रव्यांशी लढण्याची क्षमता असते. शरीरात टॉक्सिन असण्याची अनेक कारणे असू शकतात, जसे की, जीवाणू, विषाणू किंवा अन्य नुकसानकारक परजीवी. शरीराच्या आजूबाजूलाही खूप सारे जिवाणू, विषाणू आणि संसर्ग असतो जो आपल्याला अनेक प्रकारचे आजार देतो. वायू प्रदूषणामुळे फुफ्फुस आणि श्वसनमार्गाशी संबंधित समस्याही निर्माण होतात.

या बाह्य संक्रमणांपासून, प्रदूषणामुळे निर्माण होणाऱ्या समस्या आणि रोगांपासून शरीराचे रक्षण करण्यासाठी शरीरात एक संरक्षण यंत्रणा असते ज्याला रोग प्रतिकारकशक्ती किंवा प्रतिकारशक्ती म्हणतात. तुमची प्रतिकारकशक्ती मजबूत असेल, तर बदलते हवामान आणि प्रदूषणामुळे होणाऱ्या आजारांपासून तुमचे संरक्षण होते.

चला, रोग प्रतिकारकशक्ती मजबूत करण्याचे उपाय जाणून घेऊया :

शारीरिक सक्रियता महत्वाची

स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी आणि प्रतिकारकशक्ती सुधारण्यासाठी तुमचे शरीर सक्रिय असणे गरजेचे असते. शारीरिक हालचालींमुळे एंडोर्फिन नावाचे संप्रेरक बाहेर पडते, जे तणाव कमी करते, मन प्रसन्न ठेवते आणि शरीराची कार्यक्षमता वाढवते. जेव्हा तुम्ही काम करत नाही आणि भूक लागल्यावर अन्न खात नाही, तेव्हा तुम्हाला पोटाशी संबंधित अनेक आजार होतात. शारीरिक निष्क्रियतेचा तुमच्या शरीराच्या प्रतिकारकशक्तीवरही परिणाम होतो. हे टाळण्यासाठी व्यायामाला आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवा.

व्यायामामुळे तुमच्यातील क्षमता वाढते. पचनशक्ती चांगली राहाते. नियमित व्यायामामुळे लठ्ठपणा, टाईप २ मधुमेह आणि हृदयरोग तसेच व्हायरल आणि जीवाणू, विषाणूंच्या संसर्गासारख्या जुनाट आजारांचा धोका कमी होतो. व्यायामामध्ये योगासह चालणे आणि सायकलिंगचा समावेश करा.

एरोबिक व्यायाम : जसे की चालणे, जॉगिंग, सायकलिंग आणि दीड तास, उच्च तीव्रतेचा एरोबिक व्यायाम जसे की धावणे तसेच रोज ४-५ मैल चालण्याची सवयही ठेवायला हवी. मार्च २०२० मध्ये ‘जर्नल ऑफ अमेरिकन मेडिकल असोसिएशन’मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, तुम्ही दररोज जितके जास्त चालाल, तितकी तुमचा अकाली मृत्यू होण्याची शक्यता कमी होते. चालणे आणि व्यायाम केल्याने आयुष्य वाढते.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ म्हणजेच राष्ट्रीय आरोग्य संघटनेच्या मते, आठवड्यातून किमान दोनदा स्ट्रेंथ ट्रेनिंगही तुमच्या आरोग्यासाठी वरदान ठरते. ते तुमची हाडे मजबूत करते, रोग दूर ठेवते आणि पचन सुधारते.

भरपूर झोप घ्या

झोप ही अशी वेळ असते जेव्हा तुमचे शरीर मुख्य रोग प्रतिकारक पेशी आणि रेणू जसे की साइटोकिन्स (एक प्रकारचे प्रथिन जे सूज रोखण्यासाठी लढू शकते किंवा ती वाढवू शकते) टी कोशिका (एक प्रकारची सफेद रक्त कोशिका जी प्रतिरक्षा प्रणाली नियंत्रित ठेवते) आणि इंटरल्यूकिन १२ ला नियंत्रित ठेवते. पुरेशी विश्रांती घेतल्याने आपल्या शरीराची नैसर्गिक प्रतिकारकशक्ती मजबूत होते.

बिहेवियरल स्लीप मेडिसिनच्या जुलै-ऑगस्ट २०१७च्या अंकात प्रकाशित झालेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, निरोगी तरुणांच्या तुलनेत (ज्यांना झोपेची समस्या नव्हती), निद्रानाश असलेल्या तरुणांना लस दिल्यानंतर त्यांना फ्लू होण्याची शक्यता जास्त असते.

झोपेच्या कमतरतेमुळे कोर्टिसोलची पातळीही वाढते जी रोग प्रतिकारकशक्तीसाठी निश्चितच चांगली नसते. झोपेच्या कमतरतेमुळे रोग प्रतिकारकशक्ती कमी होते आणि आजाराशी लढण्याची किंवा बरे होण्याची क्षमताही कमी होते.

‘नॅशनल स्लीप फाउंडेशन’ सर्व प्रौढांना चांगल्या आरोग्यासाठी ७ ते ९ तासांची झोप घेण्याची शिफारस करते. झोपण्याच्या किमान २ ते ३ तास आधी इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे बंद करणे, फोनपासून दूर राहणे आणि हिंसक किंवा तणावपूर्ण मालिका किंवा संभाषण टाळणे आवश्यक असते.

आहारात बदल

तुमच्या दैनंदिन दिनचर्येत आणि आहारात काही बदल करून तुम्ही स्वत:ला निरोगी ठेवू शकता तसेच तुमची प्रतिकारकशक्तीही वाढवू शकता. आहारात अशा गोष्टींचा समावेश करा ज्यामुळे तुमच्या शरीराला पोषण मिळेल तसेच रोगप्रतिकारकशक्तीही वाढेल. चिप्स, मॅगी, फ्रेंच फ्राईज, पास्ता, पिझ्झा, डबाबांद मिळणारे खाद्यपदार्थ, सोडा, शीतपेय इत्यादींचा चुकूनही तुमच्या आहारात समावेश करू नका. ज्यूस, लस्सी इत्यादींसोबत उकडलेली अंडी, हंगामी ताजी फळे, लापशी, सुकामेवा, मोड आलेली कडधान्ये इत्यादींचा आहारात समावेश करा.

प्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी टोमॅटोचा आहारात नक्कीच समावेश करा. यामध्ये असलेले लाइकोपिन, के जीवनसत्त्व, क जीवनसत्त्व आणि फायबर रोग प्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतात. त्याचप्रमाणे संत्री, लिंबू, आवळा यासारख्या लिंबूवर्गीय फळांमध्ये क जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते, जे सर्व प्रकारच्या संक्रमणांशी लढणाऱ्या पांढऱ्या रक्त पेशी तयार करण्यास मदत करते.

या सर्वांना तुमच्या आहाराचा नियमित भाग बनवा. लसूण शरीरात भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स बनवून शरीरातील रोगप्रतिकारकशक्तीला रोगांशी लढण्याची ताकद देते. त्यात अॅलिसिन नावाचा घटक आढळतो, जो शरीराला कोणत्याही प्रकारच्या संसर्ग आणि जीवाणूंशी लढण्याची ताकद देतो. पालक, मशरूम, मोड आलेली कडधान्ये इत्यादीदेखील तुम्हाला आतून मजबूत बनवतात.

आनंदी रहा

जेव्हा संधी मिळेल तेव्हा मोकळेपणाने हसण्याचा प्रयत्न करा. असे केल्याने, तुम्ही तणाव कमी करू शकता आणि दीर्घकाळपर्यंत आजारी पडण्याची शक्यता कमी होऊ शकते. याशिवाय तुमच्या नात्याला वेळ द्या. सामाजिक संबंध चांगले असल्यास सामाजिक आपलेपणाची सुखद भावना वाढीस लागते. तुम्ही मनाने आनंदी असाल, तर तुमचे शरीर बळकट होईल आणि वातावरणातील रोगांचे विषाणू तुमच्यावर हल्ला करू शकणार नाहीत.

निसर्गासोबत वेळ घालवा

तुमची रोग प्रतिकारकशक्ती सुधारण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात जास्तीत जास्त वेळ घालवा. निसर्गाचा सहवास शुद्ध हवा आणि आनंदी मन देते. झाडे आणि वनस्पतींचे सान्निध्य आपल्याला अनेक प्रकारे रोगमुक्त करते, आपली श्वसनसंस्था मजबूत करते. दररोज थोडा वेळ सूर्यप्रकाशात बसा, जेणेकरून सूर्याची अल्ट्राव्हायोलेट किरणे तुमच्यावर पडतील. ऊन हे ड जीवनसत्त्वाचा उत्कृष्ट स्त्रोत आहे, ज्यामुळे हाडे बळकट होतात तसेच रोग प्रतिकारकशक्तीही मजबूत होते.

अस्वच्छतेपासून दूर रहा

सभोवतालचे वातावरण स्वच्छ ठेवण्यासोबतच आपल्या शारीरिक स्वच्छतेची विशेष काळजी घ्या, कारण अस्वच्छता ही अनेक रोगांचे कारण असते.

सल्फेट मुक्त उत्पादनं का गरजेची आहेत

* पारुल भटनागर

सल्फेट अनेक सौंदर्य उत्पादनांमध्ये आढळतात, परंतु तुम्हाला माहित आहे का हे काय आहे? सतलिवाच्या कोफाउंडर नम्रता रेड्डी सिरूपा सांगतात सल्फेट एक प्रकारचं डिटर्जंट आहे. तुमच्या शाम्पूच्या मागे तुम्ही विविध प्रकारची सल्फेटची नावं वाचू शकता. त्यांना पेट्रोलियम आणि प्लांट ऑईल्ससने बनवलं जातं.

यामुळे शाम्पू आणि इतर उत्पादनांमध्ये फेस बनविण्याची क्षमता येते आणि हा फेस तुमची त्वचा आणि स्कल्पमधील धूळ काढण्यासाठी कामी येतो. परंतु कदाचित तुम्हाला याची माहिती नसेल की सल्फेट युक्त त्वचा व हेयर प्रोडक्टसचा वापर केल्यामुळे तुमच्या त्वचेतील नॅचरल ऑइलदेखील संपवून टाकण्याचं काम करतं. ज्याच्या वापरामुळे तुमची त्वचा व केस हळूहळू निस्तेज आणि डल होऊ लागतात.

अगदी जर तुम्ही सल्फेट कलर केलेल्या केसांमध्येदेखील वापरत असाल तर यामध्ये तुमचा कलर उडण्याचीदेखील क्षमता असते. म्हणून अलिकडे खास ब्युटी ब्रांडस सल्फेट फ्री प्रोडक्ट बनविण्यावर अधिक जोर देत आहेत.

बॅलन्स ठेवतो पीएच लेवल

सल्फेट फ्री प्रोडक्ट्स त्याला म्हणतात ज्यामध्ये सल्फेट नसतं. परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमचे केस व त्वचेला अशाप्रकारे क्लीन करू शकणार नाही. तर सल्फेट फ्री उत्पादनंदेखील तेवढीच स्वच्छता देतात. फक्त त्यांच्या वापरादरम्यान एवढा फेस होत नाही, जेवढा सल्फेट प्रोडक्ट्सने बनतो.

याच्या वापरामुळे तुमची त्वचा आणि केसांना नॅचरल ऑईल, स्किन सेल्स आणि कलरदेखील सुरक्षित राहतं. सल्फेट फ्री शाम्पू तुमच्या केसांमधली धूळ काढून त्यात तेल आणि पीएच लेवल बॅलन्स ठेवण्याचं काम करतं.

सल्फेट फ्री उत्पादनं पर्यावरणासाठीदेखील सुरक्षित मानले जातात. कारण सल्फेट आपल्याला पेट्रोलियम फॉसिल फ्यूल्सपासून मिळतं. जे जलवायू परिवर्तन करण्याचं प्रमुख कारण आहे. म्हणून आपण सल्फेटबद्दलचे इतर पर्याय जसं की हॅप सीड ऑईल्सचा वापर करू शकतो. त्यामुळे निसर्गात कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण संतुलित ठेवलं जाऊ शकतं.

सल्फेट फ्री प्रोडक्ट्सचे अनेक फायदेदेखील आहेत. जसे की हे तुमची त्वचा व केसांचं अजिबातदेखील नुकसान करत नाही. त्वचेतील मोइश्चर कायम ठेवतात. जर तुमच्या त्वचेवर एखादी अॅलर्जी, जळजळ वगैरे होत असेल तर सल्फेट प्रोडक्ट्स तुमच्यासाठी फायदेशीर होऊ शकतात.

कोणतंही उत्पादन खरेदी करण्यापूर्वी त्यावरचं लेबल नक्कीच वाचा. जर यामध्ये खाली दिलेल्या कोणत्याही घटकाचं नाव असेल तर याचा अर्थ हा आहे की प्रोडक्ट्स सल्फेट फ्री नाही आहे.

* सोडियम लॉरीएल सल्फेट

* सोडियम लॉरेथ सल्फेट

* प्लेट्स

* पॅराबिन्स

* थाईथेनोमाईन

आरोग्यासाठी देखील सुरक्षित नाही

तुम्हाला माहित आहे का सोडियम लॉरीएल सल्फेट व सोडियम लॉरेथ सल्फेट तुमची त्वचा व केसांमधील तेल शोषण्याबरोबरच तुमचे डोळे व त्वचेवर जळजळ निर्माण करण्याबरोबरच फुफ्फुसांसाठीदेखील नुकसानदायक आहेत. जेव्हा तुम्ही याने बनलेली उत्पादनं दीर्घकाळ वापरता, तेव्हा हे कॅन्सरचंदेखील कारण बनतं. तसंच ज्या लोकांची सेन्सिटिव्ह त्वचा असते त्यांनी जर सल्फेट युक्त प्रोडक्ट्चा वापर केला तर त्यांचे पोर्स क्लोज होण्याबरोबरच, ऐकण्याची समस्यादेखील निर्माण होऊ शकते.

हार्मोन्सचे संतुलन बिघडते

अनेक संशोधनात सिद्ध झालं आहे की केमिकलयुक्त उत्पादनांचा अधिक वापर केल्यामुळे हार्मोन्सचं संतुलनदेखील बिघडतं. यामुळे रिप्रोडक्टिव हार्मोन्ससारखं एस्ट्रोजन सर्वाधिक प्रभावित होतं. त्यामुळे अनेकदा पीसीओडीपासून इनफर्टिलिटीपर्यंतच्यादेखील समस्यांचा सामना करावा लागतो.

कॅल्शियमची कमतरता येऊ देऊ नका

* गरीमा पंकज

एका अभ्यासानुसार १४ ते १७ वर्षे वयोगटातील जवळपास २० टक्के मुलींमध्ये कॅल्शियमची कमतरता आढळली आहे, तर पूर्वी कॅल्शियमची कमतरता इतक्या मोठया प्रमाणात फक्त गर्भवती आणि वृद्ध महिलांमध्ये आढळून येत असे.

यामागील कारण म्हणजे आजची बिघडणारी जीवनशैली. आजकाल लोक पॅकेट फूडवर जास्त अवलंबून आहेत, ज्यामुळे त्यांच्या शरीराला संतुलित आहार मिळत नाही.

महिला आपल्या पती आणि मुलांच्या आरोग्याची तर काळजी घेतात, परंतु बऱ्याचदा स्वत:च्या तंदुरुस्तीबाबत निष्काळजीपणा बाळगतात. चांगले आरोग्य आणि सशक्त शरीरासाठी कॅल्शियम खूप महत्वाचे आहे.

यामुळे हाडे आणि दात मजबूत होतात. आपली ७० टक्के हाडे कॅल्शियम फॉस्फेटपासून बनलेली आहेत. यामुळेच हाडे आणि दात यांच्या चांगल्या आरोग्यासाठी कॅल्शियम सर्वात महत्वाचे आहे.

पुरुषांपेक्षा महिलांना अधिक कॅल्शियमची आवश्यकता असते. त्यांच्या शरीरात १००० ते १२०० मिली. कॅल्शियम असणे आवश्यक आहे, अन्यथा त्यांच्या कमतरतेमुळे बऱ्याच प्रकारच्या शारीरिक समस्या उद्भवू लागतात.

कॅल्शियम निरोगी हृदय, स्नायूंची तंदुरुस्ती, दात, नखे आणि हाडे यांना मजबुती देते. त्याच्या कमतरतेमुळे वारंवार फ्रॅक्चर, ऑस्टिओपोरोसिसचा धोका, असंवेदनशीलता, संपूर्ण शरीरात वेदना, स्नायू मुरगळणे, थकवा, हृदयाचा ठोका वाढणे, मासिक पाळीत जास्त वेदना होणे, केस गळणे यासमस्या सुरू होतात.

अशा परिस्थितीत आपल्या आहारातून कॅल्शियम पुरवठा होणे आवश्यक आहे, पूरक आहारांद्वारे नव्हे.

स्त्रियांमध्ये कॅल्शियमच्या कमतरतेची कारणे

रजोनिवृत्तीच्या वयातील म्हणजेच ४५ ते ५० वर्षे वयातील स्त्रियांमध्ये ही कॅल्शियमची कमतरता सर्वाधिक असते, कारण या वयात मादी हार्मोन इस्ट्रोजेनची पातळी कमी होऊ लागते, तर हे कॅल्शियम, चयापचयात महत्वाची भूमिका बजावते.

हार्मोनल बदल : कॅल्शियम समृद्ध आहाराचा अभाव विशेषत: दूध, दही इत्यादी डेअरी उत्पादने न खाणे.

हार्मोन डिसऑर्डर हायपोथायरॉईडीम : या स्थितीत शरीरात पुरेशा प्रमाणात थायरॉईड तयार होत नाही, जे रक्तातील कॅल्शियम पातळी नियंत्रित करते.

महिला आपला बहुतेक वेळ स्वयंपाकघरात घालवतात, परंतु त्यांना हे माहित नाही की स्वयंपाकघरातच असे बरेच घटक उपलब्ध आहेत, जे त्यांच्या शरीरातील कॅल्शियमची कमतरता दूर करू शकतात. हे सेवन केल्याने त्यांना वरून कॅल्शियम पूरक आहार घेण्याची आवश्यकता भासत नाही.

नाचणी : नाचणीमध्ये बऱ्याच प्रमाणात कॅल्शियम असते. १०० ग्रॅम नाचणीमध्ये सुमारे ३७० मिलीग्रॅम कॅल्शियम आढळते.

सोयाबीन : सोयाबीनमध्येदेखील कॅल्शियम पुरेशा प्रमाणात उपलब्ध असते. १०० ग्रॅम सोयाबीनमध्ये सुमारे १७५ मिलीग्रॅम कॅल्शियम असते.

पालक : पालक पाहून ज्या स्त्रिया नाक मुरडतात त्यांना हे माहित असणे महत्वाचे आहे की १०० ग्रॅम पालकमध्ये ९० मिलीग्रॅम कॅल्शियम आढळते. त्याची भाजी करण्यापूर्वी ते कमीतकमी १ मिनिट अवश्य उकळवा, जेणेकरुन त्यामध्ये उपस्थित ऑक्सॅलिक एसिडचे प्रमाण कमी होईल, जे कॅल्शियम निरीक्षणासाठी आवश्यक असते.

कोवळे ऊन खाणे : फक्त अन्नच नाही तर सकाळचे कोवळे ऊन खाणेही आवश्यक आहे, कारण त्यात असलेले व्हिटॅमिन डी कॅल्शियम शोषण्यासाठी आवश्यक असते. रक्तातील कॅल्शियमची पातळी नियंत्रित करण्यासाठी व्हिटॅमिन डी जबाबदार असते. याचे सेवन केल्याने कॅल्शियम शोषून घेण्याची शरीराची क्षमता वाढते आणि हाडे मोडण्याचा धोका कमी होतो.

गरोदरपणात त्वचेची काळजी

* पारुल भटनागर

जेव्हा तुम्ही गर्भधारणेची तयारी करत असाल आणि त्यादरम्यान जेव्हा तुम्हाला समजते की, तुम्ही गरोदर आहात त्यावेळी तुमच्या आनंदाला सीमा राहात नाही, असे वाटते जणू संपूर्ण जगच बदलणार आहे.

हेच स्किन केअर उत्पादनांनाही लागू होते. जरी तुमचे कपाट मेकअपच्या साधनांनी भरलेले असेल, जे तुमची त्वचा सुंदर आणि चमकदार बनवण्याचे काम करतात, मात्र गरोदरपणात शरीराप्रमाणेच त्वचेमध्येही अनेक बदल घडू लागतात. हार्मोनल संतुलन बिघडल्यामुळे त्वचा अधिक संवेदनशील बनते. त्वचेतील ओलावा कमी होतो.

त्यामुळे, या काळात तुम्ही तुमची दिनचर्या पाळू शकत नाही. पूर्वीप्रमाणे त्वचेची निगा राखणे तुम्हाला शक्य होत नाही. त्यामुळेच तुम्हाला तुमच्या स्किन केअर रूटीनमध्ये त्या सौंदर्य उत्पादनांचा समावेश करणे आवश्यक ठरते, जे तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी गर्भधारणेदरम्यान योग्य आणि सुरक्षित असते.

अनेक संशोधनांमध्ये हे सिद्ध झाले आहे की, स्त्रीला गरोदरपणात केमिकल्स अर्थात रसायनांपासून दूर ठेवणे अत्यंत गरजेचे असते. चला तर मग, त्या रसायनांबद्दल कॉस्मेटोलॉजिस्ट म्हणजे सौंदर्य प्रसाधनतज्ज्ञ पूजा नागदेव यांच्याकडून जाणून घेऊया :

रेटिनॉइड्स

चांगली त्वचा, प्रजनन आणि डोळयांच्या चांगल्या आरोग्यासाठी अ जीवनसत्त्व हा अत्यंत आवश्यक घटक मानला जातो. जेव्हा आपण ते थेट घेतो किंवा त्वचेद्वारे शोषून घेतो तेव्हा आपले शरीर त्याचे रेटिनॉलमध्ये रूपांतर करते. त्वचेची काळजी घेणाऱ्या बऱ्याच अँटीएजिंग उत्पादनांमध्ये रेटिनॉइड्स असते, हे एक प्रकारचे रेटिनॉल असते ज्यामध्ये मुरुम आणि सुरकुत्यांशी लढण्याची क्षमता असते.

रेटिनॉइड्स मृत त्वचेचे एक्सफॉलिएट करून कोलेजनच्या जलद निर्मितीमध्ये मदत करते. परंतु ओव्हर द काउंटर औषधांच्या तुलनेत, निर्धारित औषधांमध्ये रेटिनॉइड्सचे प्रमाण जास्त असते. जेव्हा हे जास्त प्रमाणात वापरले जाते तेव्हा ते बाळामध्ये अनेक समस्या निर्माण करू शकते. म्हणूनच गरोदरपणात त्वचेची काळजी घेणाऱ्या उत्पादनांमध्ये त्यांचा वापर करणे टाळले पाहिजे.

सॅलिसिलिक अॅसिड

जास्त प्रमाणात सॅलिसिलिक अॅसिडमध्ये अॅस्पिरिनच्या तुलनेत अँटीइम्प्लिमेंटरी प्रॉपर्टीज म्हणजे दाहक-विरोधी गुणधर्म असतात, ज्याचा उपयोग मुरुमांवर उपचार करण्यासाठी केला जातो. त्यामुळे, गर्भधारणेदरम्यान डॉक्टरांच्या सल्ल्यांशिवाय सॅलिसिलिक अॅसिड असलेली क्रीम वापरू नका, कारण डॉक्टर अनेकदा गरज असेल तेव्हा २ टक्क्यांपेक्षा कमी सॅलिसिलिक अॅसिड वापरण्याचा सल्ला देतात. म्हणूनच जर तुम्ही हे मोठया प्रमाणात वापरत असाल तर ते केवळ नुकसानकारक करेल.

फेथलेट्स

फेथलेट्स हा असाच एक घटक आहे, जो हार्मोन्सचे संतुलन बिघडवण्यास कारणीभूत ठरतो, असे मानले जाते. तो अनेक सौंदर्यप्रसाधने आणि त्वचेची वैयक्तिकरित्या काळजी घेणाऱ्या उत्पादनांमध्ये वापरला जातो. संशोधनात असे सिद्ध झाले आहे की, प्राण्यांची प्रजनन क्षमता आणि संप्रेरकांचे संतुलन बिघडवण्यासाठी तो जबाबदार ठरतो. त्यामुळे या रसायनापासून दूर राहणेच शहाणपणाचे आहे.

रासायनिक सनस्क्रीन

सनस्क्रीनमध्ये सर्वाधिक वापरले जाणारे अल्ट्राव्हायोलेट फिल्टर म्हणजे ऑक्सिबेझन आणि त्याचे विविध प्रकार. ते त्वचेचे संरक्षण करण्याचे काम करतात, मात्र ऑक्सिबेझन आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी चांगले मानले जात नाही, कारण ते अंत:स्रावात व्यत्यय आणते. त्यामुळे गर्भधारणेदरम्यान हार्मोन्सचे संतुलन बिघडू शकते. हे आई आणि बाळ दोघांसाठीही धोकादायक असते.

केसांना लावायचा रंग

हेअर डाय म्हणजेच केसांच्या रंगांमध्ये अमोनिया आणि पेरॉक्साइड असते, जे टाळूद्वारे शरीरात प्रवेश करते, ज्यामुळे चिडचिडेपणा, अॅलर्जी आणि शरीरावर इतर अनेक नकारात्मक परिणाम होतात.

ब्लीच

ब्लीचमध्ये हायड्रोजन पेरॉक्साईड असते, जे त्वचेला इजा करण्यासोबतच डोळयांच्या ऊतींचेही नुकसान करते. त्यामुळे गरोदरपणात त्याचा वापर टाळावा.

आता त्वचेच्या सुरक्षेची काळजी घेणाऱ्या पर्यायी घटकांबद्दल जाणून घेऊया :

पुरळ आणि हायपरपिग्मेंटेशन

जर तुम्ही गर्भधारणेदरम्यान मुरुम आणि त्वचेच्या रंगद्र्रव्याच्या समस्येने त्रस्त असाल, तर रेटिनॉइड आधारित सौंदर्य प्रसाधनांऐवजी ज्यात ग्लायकोलिक अॅसिडचे घटक असतील अशा सौंदर्य प्रसाधनांचा वापरा करा. ते निरोगी त्वचेच्या पेशींना चालना देतात, ज्यामुळे गर्भधारणेदरम्यान तुमची त्वचा उजळ राहण्यास मदत होते.

अँटीएजिंग

ज्याप्रमाणे क जीवनसत्त्व तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करते, त्याचप्रमाणे क जीवनसत्त्वासारखे अँटिऑक्सिडंटही कोलेजन कायम ठेवण्याचे आणि त्वचेला फ्री रेडिकल्सपासून वाचवण्याचे काम करते. यासोबतच तुम्ही इतर अँटिऑक्सिडंट्स जसे की, जीवनसत्त्व ई, जीवनसत्त्व के, जीवनसत्त्व बी-३ आणि गरोदरपणात ग्रीन टीचे सेवन करू शकता.

कोरडी त्वचा आणि स्ट्रेच मार्क्स

गरोदरपणात शरीरावर खूप दबाव आणि भार असतो, शिवाय गर्भाशयातल्या बाळाला केव्हाही पाण्याची गरज भासते, ती आईकडून पूर्ण होते. त्यामुळे आईची त्वचा कोरडी पडते. कोरडी त्वचा ही याचाच आणि हार्मोन्सच्या असंतुलनाचा परिणाम आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला स्ट्रेच मार्क्स टाळायचे असतील तर त्वचा कोरडी होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल.

यासाठी तुम्ही बदामाचे तेल, तिळाचे तेल किंवा ऑलिव्ह ऑईलचा वापर करू शकता. लॅव्हेंडर तेल, गुलाब तेल, चमेलीचे तेल लावून तुम्ही कोरडी त्वचा आणि स्ट्रेच मार्क्सच्या समस्येपासूनही सुटका मिळवू शकता.

सूर्यकिरणांपासून संरक्षण

सूर्य किंवा सूर्यकिरणांपासून त्वचेचे संरक्षण करणे खूप महत्त्वाचे असते. जर तुमची त्वचा उन्हापासून सुरक्षित असेल तर त्वचेच्या कर्करोगासोबत सुरकुत्या पडण्याचा धोकाही बऱ्याच अंशी कमी होतो. अशा वेळी गर्भधारणेदरम्यान नैसर्गिक सनस्क्रीन म्हणून तुम्ही रास्पबेरी बियांचे तेल वापरू शकता. गर्भधारणेदरम्यान रासायनिक सनस्क्रीनऐवजी खनिजे असलेले सनस्क्रीन वापरा.

 

चांगले बॅक्टेरिया आरोग्याची गुरूकिल्ली

* गरिमा पंकज

आपल्या शरीरातील अनेक आजारांचे मूळ म्हणजे आपले पोट अर्थात आपली पचनसंस्था. पोट नीट काम करत नसेल तर बद्धकोष्ठता, गॅस, लठ्ठपणा, मधुमेह, कोलेस्ट्रॉल अशा अनेक समस्या उद्भवतात. वास्तविक, आतड्यांमध्ये असलेले बॅक्टेरिया आपल्या शरीरातील पचनक्रिया वाढवण्यासाठी रोगप्रतिकारकशक्ती मजबूत करण्यासाठी आणि आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात.

पोटातील खराब आणि निरोगी अशा दोन्ही प्रकारच्या सूक्ष्मजंतूंच्या असंतुलनामुळे आरोग्य बिघडते. पोटात चांगल्या बॅक्टेरियांचे प्रमाण कमी झाले तर सकस आहार घेऊनही शरीराला पोषक तत्त्वे मिळत नाहीत आणि आपण सतत आजारी पडू लागतो.

या संदर्भात, मॅक्स सुपर स्पेशालिटी रुग्णालय, साकेतच्या आहारतज्ज्ञ रितिका समद्दर सांगतात की, आपली ७० ते ८० टक्के रोगप्रतिकारकशक्ती आतडयांमध्ये म्हणजेच आपल्या पचनसंस्थेत असते. आतडी निरोगी ठेवण्यासाठी मायक्रोबायोम आवश्यक असते, ज्याला मायक्रोजेनिझम असेही म्हणतात.

हे २ प्रकारचे असते, एक म्हणजे आपल्यातील चांगले बॅक्टेरिया ज्याला आपण प्रोबायोटिक्स म्हणून ओळखतो, प्रोबायोटिक्स हे जिवंत बॅक्टेरिया असतात. ते आपल्या पचनसंस्थेत असतात. आपण ते थेट आपल्या आहारात घेऊ शकतो, जसे की आपण दही खातो किंवा इतर कोणतेही आंबवलेले पदार्थ खातो तेव्हा त्यात प्रोबायोटिक्स असतात.

आपल्या आतडयांना निरोगी ठेवण्याचा दुसरा पर्याय म्हणजे प्रोबायोटिक्सचा वापर. हे न पचणारे कार्बोहायड्रेट असतात. आपण त्यांना खातो तेव्हा त्या क्रियेतून चांगले बॅक्टेरिया तयार होऊ शकतात. जसे की, केळी, कांदा, मध, काही हिरव्या भाज्या, ज्यांना आपण प्रोबायोटिक या नावाने ओळखतो.

जेव्हा आपण त्यांचा वापर आपल्या आहारात करतो तेव्हा ते प्रोबायोटिक्सच्या निर्मितीस मदत करतात. याशिवाय जर आपल्या आहारात पुरेशा प्रमाणात फायबर असेल तर त्यामुळेही आतडी निरोगी राहतात.

आतडी निरोगी राहण्यासाठी या गोष्टी खा :

आंबलेले दुगजन्य पदार्थ : आतडयांना निरोगी ठेवण्यासाठी आंबवलेले पदार्थ खास करून दुगजन्य पदार्थ जसे की, दही, योगर्ट इत्यादी खूपच फायदेशीर ठरतात. तुम्ही त्यांचा समावेश रोजच्या आहारात केला तर तुमची पचनसंस्था चांगली राहील आणि चांगले बॅक्टेरिया वेगाने वाढतील.

ब्लूबेरी : संशोधनानुसार, ब्लूबेरीमध्ये अँटीइंफ्लिमेंटरी एजंट असतात जे आतडयांमधील चांगल्या बॅक्टेरियांना भरपूर पोषण मिळवून देतात. म्हणूनच त्यांचे सेवन आरोग्यासाठी खूपच चांगले असते.

बीन्स : बीन्समध्ये कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन्स आणि प्रोटिन्स मोठया प्रमाणावर असतात, जे पचन चांगले होण्यासाठी खूपच उपयोगी ठरतात.

डार्क चॉकलेट : चॉकलेट चविष्ट असते, सोबतच आरोग्यदायी असते. ते आतडयांमधील चांगल्या बॅक्टेरियांसाठी खूपच उपयोगी असते. त्यातील कोकोआमध्ये मोठया प्रमाणावर अँटीऑक्सिडंट्स असते, जे चांगल्या बॅक्टेरियांच्या निर्मितीस मदत करते.

केळी : दररोज केळी खाणे चांगले असते. केळे हा प्रोबायोटिक्सचा चांगला स्रोत आहे. यातील स्टार्च मोठया आतडयांमध्ये जाऊन आंबण्याची प्रक्रिया सुरू करते, जी तेथे असलेल्या चांगल्या बॅक्टेरियांच्या पोषणासाठी अत्यंत गरजेची असते.

याशिवाय ते आतडयांमधील चांगले बॅक्टेरिया वाढवण्यास मदत करतात. म्हणूनच जेवणात बीन्सचा समावेश नक्की करा.

ग्रीन टी : ग्रीन टीला पॉलीफिनोलचा उत्तम स्रोत मानले जाते. ती पोटात चांगले मायक्रोब तयार करण्यासाठी मदत करते. चांगले बॅक्टरेरिया आणि फॅटी अॅसिडचे प्रमाण संतुलित ठेवते. यामुळे पोट निरोगी राहते. यात अँटीऑक्सिडंट्सचे गुणधर्म असतात. त्यामुळेच ग्रीन टी वेगवेगळया प्रकारचे संसर्ग आणि कर्करोगापासून वाचवण्यासाठी मदत करते.

रताळे : रताळयात अँटीऑक्सिडंट्सचे गुणधर्म असतात. ते चांगल्या बॅक्टेरियांच्या वाढीसाठी गरजेचे असतात. यात फायबरही असते आणि ते कुठल्याही प्रकारचा संसर्ग होऊ नये यासाठी उपयोगी ठरते.

६ फूड करतात दुर्गंधी दूर

* पारुल भटनागर

समजा तुम्ही एका पार्टीत गेला आहात आणि तिथे तुमच्या शरीराला येणाऱ्या दुर्गंधीमुळे सर्वजण तुमच्यापासून दूर पळत आहेत तर विचार करा तुम्हाला किती लाजिरवाणे वाटेल. तुमच्या शरीराला येणारा दुर्गंधी हा तुमच्या व्यक्तिमत्त्वावर परिणाम तर करतोच पण तुमचा कॉन्फिडन्सही लूज करतो. त्यामुळे तुम्ही काही अशा गोष्टी खाल्ल्या पाहिजेत, ज्या तुमच्या शरीराची दुर्गंधी दूर करतील.

याविषयी रचना डाएटचे डॉ. पवन शेट्टी यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी सांगितले की जेव्हा आपला फ्ल्युइड इंटेक चांगला नसतो, तेव्हा आपल्या युरिनचा कलर चेंज होण्याबरोबरच त्यातून दुर्गंधीही येऊ लागते आणि ती जागा प्रत्येक वेळी स्वच्छ न केल्याने आपल्या कपडयातून वास येऊ लागतो आणि त्याचबरोबर इन्फेक्शन होण्याचा धोकाही उद्भवतो. त्यामुळे दररोज दर २२ ते ३० मिनिटांनी पाणी पीत राहिले पाहिजे.

जेव्हा आपण ट्रान्सफॅटसारखे जंकफूड जास्त प्रमाणात खातो, तेव्हा त्यातून घामाच्या रूपातून जे विषारी पदार्थ निघतात, त्यांना फार दुर्गंधी येते. इतकेच नाही तर ट्रान्सफॅट युक्त पदार्थ खाल्ल्याने आपले लिव्हरही फॅटी होते. त्यामुळे हेल्दी खाणे घेतले पाहिजे. जेव्हा आपण योग्य आहार घेत नाही, तेव्हा आपल्या इन्टेस्टाइनमध्ये बॅड बॅक्टेरिया तयार होतात, जेणेकरून दुर्गंधी येते.

आहारात हे समाविष्ट करा

लक्षात ठेवा की फ्ल्युइड मेंटेन केल्याने ब्लड क्लॉट्स होत नाहीत आणि बद्धकोष्ठतेचा त्रासही होत नाही. त्याचबरोबर युरीन ट्रॅक क्लिअर राहिल्याने इन्फेक्शन होण्याचा धोकाही उद्भवत नाही. त्यामुळे प्रॉपर डाएट करण्यासाठी आपल्या आहारात खालील पदार्थ घेण्यास विसरू नका :

ग्रीन टी : ग्रीन टीमध्ये अँटी ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. शरीराला दुर्गंधीपासून वाचवण्याचे हे सर्वात सशक्त टूल आहे. त्यामुळे दिवसाची सुरुवात ग्रीन टीने करा.

लिंबू : लिंबात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असल्याने हा शरीराची दुर्गंधी दूर करण्याचे काम करते, त्याचबरोबर यात अॅसिडिक गुण असल्याने हा स्किनच्या पीएच लेव्हलला कमी करण्याचे कामही करतो. ज्यामुळे बॅड बॅक्टेरिया निर्माण होण्यात अडथळे येतात. याशिवाय लिंबात असलेल्या व्हिटॅमिन सीमुळे इम्युनिटी वाढण्यास मदत होते. त्यामुळे आपल्या सिस्टमला इंपुव करण्यासाठी दिवसाची सुरुवात एक ग्लास कोमट पाण्यात लिंबू पिळून पिण्याने करा. अंडरआर्म्स आणि पायांच्या खालच्या भागात लिंबू चोळल्याने थोडयाच वेळात दुर्गंधी नाहीशी होते.

टोमॅटो : टोमॅटोमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटिसेप्टिक गुण असल्याने हे शरीरात दुर्गंधी पसरवणाऱ्या बॅक्टेरियांना नष्ट करतात. यात असलेल्या नॅचरल अॅस्ट्रिजेंटमुळे चेहऱ्यावर घामही येत नाही. त्यामुळे दररोज १/२ कप टोमॅटो ज्यूस अवश्य प्या किंवा भोजनात सॅलड म्हणून टोमॅटोचा समावेश करा. ज्या जागी जास्त घाम येतो, तिथे १०-१५ मिनिटे टोमॅटो लावून ठेवा.

दही : यात उपयुक्त असे जीवाणू असल्याने हे जेवण पचण्यास साहाय्य करते. त्याचबरोबर हे सहजपणे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते.

वेलची : वेलचीसुद्धा फार उपयुक्त असते. जर तुम्हाला वाटते की तुमच्या शरीरातून छान सुगंध यावा तर खाण्यात १-२ वेलची दाणे अवश्य घाला, कारण यात बॅड बॅक्टेरिया शरीरातून बाहेर काढण्याची शक्ती असते.

आले : आले एकीकडे शरीराची दुर्गंधी दूर करून तुम्हाला फ्रेश फिलिंग देते, त्याचबरोबर हे शरीरातून विषारी पदार्थ बाहेर टाकण्याचे कामही करते.

स्वत:ला स्वच्छ ठेवण्यासाठी डेली अँटीबॅक्टेरियल साबणाने अंघोळ करा आणि स्नानानंतर स्वच्छ कपडे परिधान करा. जेव्हाही तुम्ही बाहेरून याल तेव्हा हातपाय, तोंड  स्वच्छ धुतले पाहिजे नाहीतर घाम येऊन दुर्गंधी येण्याची शक्यता असते.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें