* पारुल भटनागर
लहान वयातच प्रत्येक मुलगी स्वत:च्या लग्नाची स्वप्नं पाहते आणि जेव्हा मोठी झाल्यावर हे स्वप्नं सत्यात उतरतं तेव्हा मात्र तिच्या मनात सतत ही चिंता असते की चोली लहेंगा वा साडीमध्ये मी बारीक दिसेन ना, कोणी मला लठ्ठ तर म्हणणार नाही ना. यासाठी कितीतरी दिवस अगोदर आहारात एकवेळचं खाणं बंद करायला सुरूवात केली जाते, खरंतर हा काळ उपाशी राहण्याचा नसून स्वत:ला आतून मजबूत बनविण्याचा असतो. कारण चेहरा आकर्षक दिसण्याण्याबरोबरच शरीर सुदृढ रहाणं गरजेचं असतं.
परंतु अनेकदा चांगलं फिजिक मिळविण्यासाठी महत्त्वाचा आहार बंद केला जातो, जो फिटनेससाठी खासकरून गरजेचा असतो. तर चला जाणून घेऊया या सर्व गोष्टींबद्दल ज्यामुळे तुम्ही तुमच्या फिटनेसकडे व्यवस्थित लक्ष देऊ शकाल :
पाण्याने करा दिवसाची सुरुवात
असं म्हणतात की स्वत:ला आजारांपासून वाचवायचं असेल तर तुमच्या दिवसाची सुरुवात पाण्याने करण्याबरोबरच पूर्ण दिवसभर ७ ते ८ ग्लास पाणी नक्की प्या आणि नववधूने यागोष्टी अमलात आणायला हव्यात. कारण पाणी शरीर हायड्रेट करण्याचं काम करण्याबरोबरच त्वचेलादेखील नैसर्गिक पद्धतीने उजळविण्यासाठीचं काम करतं.
हे शरीरातून टॉक्सीन्स बाहेर काढून पचन व्यवस्थित करतं, ज्यामुळे चेहऱ्यावर मुरूम पुटकुळयाची समस्या उद्भवत नाही आणि नववधूचा चेहरा उजळतो. सोबतच रक्ताभिसरण व्यवस्थित झाल्यामुळे त्वचा कायमच निरोगी राहते. तेव्हा तुम्हाला जेव्हाही तहान लागेल तेव्हा कोल्ड्रिंक्सच्या जागी पाणी व लिंबू पाण्याने स्वत:ला ताजंतवानं ठेवा.
तेजस्वी त्वचेसाठी नारळाचं पाणी
नारळाचे पाणी अनेक वर्षापासून खूपच प्रसिद्ध पेय आहे. एक ग्लास नारळ पाण्यामध्ये अनेक न्यूट्रीएंट्स असतात. यामध्ये कार्बस, फायबर प्रोटीन, व्हिटॅमिन सी, मॅग्नेशियम पोटॅशियम, कॅल्शियम, सोडियम असतं. हे शरीरासाठी खूपच फायदेशीर असतं. एक ग्लास नारळ पाण्यामध्ये फक्त ४५ कॅलरीज असतात. म्हणून प्रत्येकजण याचा आपल्या आहारात समावेश करतात. खासकरून नववधूने स्वत:च्या आहारात याचा दररोज समावेश करायला हवा. कारण हे शरीराला हायड्रेट ठेवून शरीरातील सर्व विषारी पदार्थ बाहेर फेकून त्वचेला क्लियर बनविण्याबरोबरच त्यावर नैसर्गिक तेज आणण्याचं काम करतात.