रोमांचक आणि धोकादायक स्काय डायव्हिंग

* प्रतिनिधि

जर तुम्हालाही खास बनवायचे असेल, तर तुम्ही काही अॅडव्हेंचर स्पोर्ट्सची मजा घेऊ शकता. आज आम्ही तुम्हाला अशा काही ठिकाणांबाबत सांगणार आहेत जिथे तुम्ही स्काय डायव्हिंग करू शकता.

बंगळुरूपासून काही अंतरावर चामुंडी हिल्सच्या खाली मैसूर येथे आधीपासून अनेक स्काय डायव्हिंग शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. दिल्लीची कंपनी ड्रॉप जोन, काकिनी एंटरप्राइजेसद्वारे आयोजित या शिबिरांमध्ये पर्यटकांना जमिनीवरील अद्भूत दृष्य पाहत स्टॅटिक जंप, टॅण्डम जंप आणि त्वरित फ्री फॉलची मजा येऊ शकते.

मैसूरमध्ये चामुंडी हिल्स स्काय डायव्हिंगसाठी प्रसिद्ध आहे. सर्वात आधी तुम्हाला येथे स्काय डायव्हिंगसाठी ट्रेनिंग दिली जाते. त्यानंतर तुम्हाला सर्व सुरक्षेसहीत डायव्हिंगवर पाठवले जाईल. इथे तुम्ही सकाळी ७ ते ९ या वेळात डायव्हिंग करू शकता.

दीसा, गुजरात

गुजरात खेळ प्राधिकरण ही पहिली अशी खेळासंबंधीची संस्था होती, जिने स्काय डायव्हिंगला अॅडव्हेंचर स्पोर्ट या दृष्टीने पाहिले. या संस्थेच्या मदतीने गुजरात हे भारतातील पहिलं असं राज्य बनलं आणि दिसामध्ये प्रमाणित ड्रॉप झोन बनवले गेले. या सरोवराकिनारी वसलेल्या शहराने अनेक स्काय डायव्हिंग टूर आणि शिबिरांचे आयोजन केले आहे. जे भारतीय पॅराशूटिंगच्या संघाने २०१२ मध्ये सुरू केले होते. यावर्षी अजूनही शिबिरांच्या आयोजनांची योजना आहे. दीसा टाऊन आणि तेथील आजूबाजूचे लोक येथे मिळून पॅराशूट स्काय डायव्हर्सना आकाशात जाऊन झेपावताना पाहतात. नवीन वर्षांत तुम्हीसुद्धा इथे जाऊन आकाशात झेपावू शकता आणि स्काय डायव्हिंगची मजा घेऊ शकता.

पाँडेचेरी, तामिळनाडू

पाँडेचेरी सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. इथे जाऊन फक्त स्काय डाव्हिंगचाच आनंद घेता येईल असे नाही तर येथील सौंदर्य तुमचे मन मोहवून घेईल. स्काय डायव्हिंगसाठी तुम्हाला सकाळी ७ ते ९ च्या दरम्यान इथे यावे लागेल.

अॅम्बी व्हॅली, महाराष्ट्र

महाराष्ट्रातील अॅम्बी व्हॅली पुण्यापासून खूपच जवळ आहे व हा भारतातील स्काय डायव्हिंगसाठी सर्वात चांगला स्पॉट समजला जातो. जर तुम्ही अॅम्बी व्हॅलीवरून उडी घेत असाल तर तुमच्या आयुष्यातील ही सर्वात संस्मरणीय उडी ठरेल. सध्या अॅम्बी व्हॅलीमध्ये फक्त १०,००० फूटांपर्यंतच टॅडम जंप घेतली जाऊ शकते. स्काय डायव्हिंगच्या दरम्यान इंस्ट्रक्टरला एक हार्नेस बांधलेला असतो. त्याला टँडम जंप असे म्हणतात. जे पर्यटक अॅम्बी व्हॅलीमध्ये स्काय डायव्हिंग करू इच्छितात, त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे.

धाना, मध्यप्रदेश

भारताच्या केंद्रस्थानी वसलेले आणि भोपाळपासून १८६ किमी दूर आहे मध्यप्रदेशातील धाना. अॅडव्हेंचर आवडणाऱ्या लोकांसाठी इथे अनेक स्काय डायव्हिंग शिबिरे आहेत. ४००० फूटांच्या उडीमध्ये तुम्हाला जास्त फ्री फॉल टाईम मिळत नाही, पण तरीही त्या उंचावरून उडीचा घेतलेला तो अनुभव कुठल्या सहायतेशिवाय घेतलेल्या उडीपेक्षा कमी नाही.

इथे सहभाग घेणारे दोन प्रकारच्या जंपची निवड करू शकतात. स्टॅटिक लाइन जंप आणि टँडम जंप. पहिल्या जंपमधील सहभागी ४००० फूटांवरून एकटा उडी मारतो आणि विमानाशी जोडलेल्या स्टॅटिक लाइनच्या मदतीने पॅराशूट आपोआप उघडते. ज्या पर्यटकांना जोखमीची कामे आवडतात. त्यांच्यासाठी स्काय डायव्हिंग हा उत्तम पर्याय आहे.

काय असावं पत्नीचं आडनाव

* नाज खान

आशियातील महाद्वीप असलेल्या जपानमध्ये स्त्री अधिकारांचा पराभव झाला. तांत्रिकदृष्ट्या संपन्न देश असलेल्या जपानमध्ये ५ स्त्रियांनी न्यायालयात याचिका दाखल करून आपल्या नावासोबत पतीचं आडनाव न लावण्याबाबत अर्ज दाखल केला होता. परंतु याबाबत न्यायालयाने स्त्रियांच्या विरोधात निर्णय सुनावला. यामुळे आता स्त्रियांना आपल्या नावासोबत पतीचं आडनाव लावणं गरजेचं आहे. हा त्या देशाच्या घटनेचा निर्णय आहे, ज्या देशात शिक्षासंपन्न लोक आहेत, जी तंत्रज्ञानात खूप पुढे आहेत आणि जिथे वृद्धांची संख्या तरुणाईपेक्षा अधिक वेगाने वाढतेय. खरं तर त्या देशात तर स्त्रियांबाबत अधिक उदारतेच्या गोष्टी समोर यायला हव्या होत्या, परंतु त्याच देशात या निर्णयानंतर स्त्रियांसाठी संघर्ष अधिकच वाढलाय.

जपानी न्यायालयाच्या मते हा कायदा संविधानाच्या विरोधात जाऊ शकत नाही. याव्यतिरिक्त अजून एक कायदादेखील आहे जो स्त्रियांना घटस्फोटानंतर ६ महिन्यांच्या आत लग्न करायला सहमती देत नाही. हे दोन्ही कायदे १९व्या शतकातील आहेत जे अजूनही बदलले गेले नाहीएत. त्या देशात स्त्रियांना आजदेखील पतीच्या नावापेक्षा स्वत:चं अस्तिव निर्माण करण्याचा अधिकार नाहीए.

पतीचं आडनावच का?

अशावेळी स्त्रियांच्या मनात प्रश्नांचं काहूर माजणं स्वाभाविक आहे की यासाठी पतीचं आडनाव आपल्या नावापुढे लावणं किती योग्य आहे.

आजच्या नव्या युगात काही नामवंत स्त्रिया आडनावाच्या सोबत पतीचं आडनावदेखील लावतात परंतु तरीदेखील प्रश्न मनात येतोच की आधुनिक समाजातदेखील पत्नीनेच पतीचं आडनाव का लावावं?

जी मुलगी लग्नापूर्वी वडिलांच्या आडनावासोबत आपलं शिक्षण पूर्ण करते आणि स्वत:ची ओळख निर्माण करते, लग्न होताच अचानक तिची ओळख बदलते. तिच्या नावासोबत पतीचं आडनाव जोडलं जातं. आपल्या नावासोबत पतीचं आडनाव लावायचं आहे की नाही हे तिला विचारलंच जात नाही. मात्र हे आडनाव जेव्हा तिच्यावर थोपवलं जातं तेव्हा तिथे स्त्रीच्या होकाराचा प्रश्नच कुठे निर्माण होतो? अर्धांगिनी म्हणत घरी आणल्या जाणाऱ्या स्त्रीला अर्धा अधिकार तरी कुठे दिला गेलाय? माहेराहून सासरी येताच तिचं नाव कधी बदललं जातं, याची तिला जाणीव कुठे होते आणि तिला एका नव्या नावाने हाक मारली जाते, जणू एका रात्रीत एका नात्याने तिची अनेक वर्षांची ओळख हिरावून घेतली.

सर्व देशांची वागणूक एकसारखी

जेव्हा पतीशी पत्नीचं नातं तुटतं तेव्हा यापेक्षादेखील अधिक दु:ख होतं. पती मुलंबाळं, घरदार प्रत्येक गोष्टींबरोबरच पत्नीकडून आपलं नावदेखील हिरावून घेतो आणि पत्नी वर्षानुवर्षं एकाच घरात राहूनदेखील अचानक आपली ओळख शोधू लागते की शेवटी तिचं अस्तित्त्व नेमकं काय आहे? लग्नापूर्वी वडिलांचं नाव तिची ओळख होती, जी रक्ताचं नातं असल्यामुळे आयुष्यभर तुटायला नको होती. जसं तिच्या भावाचं नाव तिच्या वडिलांच्या नावासोबत अतूट आहे, तसंच तिच्यासोबतदेखील व्हायला हवं होतं. परंतु ती मुलगी आहे, म्हणून तिची ओळख तिच्या पतीशी आहे आणि पती जेव्हा तिच्याशी नातं तोडतो तेव्हा तिने आपली ओळख कुठे शोधायची? मग पुन्हा वडिलांचं नाव आपल्या नावाशी जोडायचं वा पतीच्या आडनावालाच नावासोबत राहू द्यायचं का?

जगात प्रत्येक देशात स्त्रियांसाठी एकसारखा कायदा आहे. मग तो जपान असो वा चीन, इस्लामिक देश असो वा ख्रिश्चन देश वा मग सनातन समाज.

धर्ममजहबच्या साच्यात भलेही हे देश एक नसतील, परंतु महिलांवर लादल्या जाणाऱ्या अधिकारांच्या बाबतीत सर्व देशांची वागणूक एकसारखीच राहिलीय. मग ती स्त्री शिक्षित असो वा अशिक्षित, गरीब असो वा श्रीमंत सर्वांवर पुरुष अधिकार लागू होतात.

प्रश्न फक्त अस्तित्वाचा नाही

खरंतर प्रश्न फक्त अस्तित्वाचा नाहीए. जी व्यवस्था लग्नापूर्वी कायम होती, त्यामध्ये अचानक बदल होण्याने अडचणी निर्माण होतात. जसं लग्नापूर्वी सर्व शैक्षणिक कागदपत्रं, ओळखपत्रं, पासपोर्ट, रेशनकार्ड इत्यादींवर वडिलांचं आडनाव असतं, परंतु लग्नानंतर एक तर यामध्ये बदल केला जातो जे खूपच कटकटीचं काम आहे वा मग पत्नीचं व्यावहारिक नाव आणि कागदपत्रांमध्ये नाव दोन्ही वेगवेगळी ओळख असतात.

खरंतर आपण समाधान मानून होतो की स्त्रिया आपल्या या अधिकाराबाबत जागरूक झाल्या आहेत आणि भलंही जपानची घटना त्यांच्या पतीच्या नावापेक्षा वेगळी ओळख देत नसली, तरी तिथे स्त्रियांचा संघर्ष अजूनही सुरूच आहे.

२००७ सालचं कॅलिफोर्नियाचं एक विधेयकदेखील उदाहरण म्हणून देऊ शकतो. या विधेयकामध्ये कोणताही पुरुष आपल्या पत्नीचं आडनाव आपल्या नावासोबत जोडण्यास स्वतंत्र आहे. या विधेयकाचा निर्णय एका जोडप्याने दाखल केलेल्या याचिकेनंतर देण्यात आला होता. या याचिकेत पतीने पत्नीचं आडनाव आपल्या नावासोबत लावण्याची इच्छा प्रकट केली होती.

इतिहासात महिलांना अधिकार मिळाले आहेत, परंतु यासाठी त्यांना बराच त्रास सहन करावा लागला होता. कदाचित याच सामाजिक व्यवस्थेला पाहून ‘द सेकंड सेक्स’ची फ्रेंच लेखिका सीमोन द बसने म्हटलं होतं की स्त्री असत नाही तर ती बनविली जाते.

कसे करावे नवजात बाळाचे स्वागत

* मीरा उगरा

सकाळी सकाळी चांगली बातमी समजली की, आमचे जुने शेजारी खुराना काकांची सून पूनमने मुलीला जन्म दिला. आईने नाश्ता देताना पप्पांना सांगितले की, ‘‘संध्याकाळीच हॉस्पिटलला जाऊन त्यांचे अभिनंदन करू या.’’

पप्पांनी लगेचच तिला नकार देत सांगितले की, ‘‘मुळीच नाही. त्यांना थोडे स्थिरस्थावर व्हायला वेळ द्या.’’

यावरुन थोडा वाद झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी भेटायला जायचे ठरले. मी दुसऱ्या दिवशी फोन करुन हॉस्पिटलला भेटायला जायची वेळ विचारली असता काकांनी सांगितले की, ‘‘ वेळ ठरलेली नाही. प्रसूतीच्या केसेसमध्ये हॉस्पिटलवाले जास्त ताणून धरत नाहीत. तुम्हाला वाटेल त्या वेळेत कधीही या.’’

हे ऐकून थोडे विचित्र वाटले, पण आम्ही उगाच नको त्या वेळी जाण्याऐवजी संध्याकाळी ५ वाजता हॉस्पिटलला पोहोचलो.

रिसेप्शनवर रुम नंबर विचारून तेथे गेलो. मात्र, खोलीत पाऊल टाकताच तेथील दृश्य पाहून आम्हाला तिघांनाही आश्चर्य वाटले. खोलीच्या मध्यभागी पलंगावर पूनम तर पलंगाला लागूनच असलेल्या पाळण्यात मुलगी झोपली होती. त्या दोघींच्या सभोवती पूनमचे आईवडील, बहीण, काकू, त्यांचा मुलगा (बाळाचे वडील), मुलगी आणि आत्ये असे सर्व मिळून गप्पा मारत होते.

हा हॉस्पिटलचा रुम आहे की पार्टीचा हॉल, हेच कळेनासे झाले होते. आई काकूंना भेटली आणि त्यांचे अभिनंदन केले. पूनमच्या डोक्यावरुन हात फिरवला आणि बाळाला दूरूनच आशीर्वाद दिला. मी आणि पप्पांनीदेखील अभिनंदन करुन आनंद व्यक्त केला. त्यानंतर तेथे खाणेपिणे सुरू झाले. आम्ही कसेबसे खाणे संपवतो तोच आणखी एक दाम्पत्य तेथे आले. आम्ही सर्वांचा निरोप घेऊन निघालो.

कारमध्ये बसताच पप्पा रागाने म्हणाले की, ‘‘या…या मिसेसे खुरानांचे डोके फिरले आहे का? आनंद साजरा करायची एवढी काय घाई होती? घाईच होती तर मग बँडबाजा ही बोलवायचा होता. हे सर्व स्वत:ला सुशिक्षित समजतात. तू पूनमकडे पाहिले होतेस का? किती अशक्त दिसत होती ती. बिचारे बाळही थकलेले दिसत होते आणि हे सर्व पार्टी करत होते. हॉस्पिटलवाल्यांना तर काय म्हणायचे? किती कॅज्युअल, किती केअरलेस?’’.

उत्साहाचा त्रास होऊ नये

एखादा नातेवाईक, मित्र किंवा परिचितांच्या घरी बाळ जन्माला आल्याची बातमी समजताच आपण उतावीळपणे अभिनंदन करायला धावत जातो. क्षणभरही हा विचार करीत नाही की, आपल्या जाण्यामुळे त्या व्यक्तीला त्रास होऊ शकतो. त्यामुळे संयम आणि समजूतदारपणे वागा. आई आणि बाळ घरी आल्यानंतर अभिनंदन करायला जा, ते अशाप्रकारे :

*  सर्वात आधी फोन करुन त्यांना सांगा की, तुम्ही १०-१५ दिवसांनंतरच त्यांच्या घरी भेटायला याल, जेणेकरुन तोपर्यंत ते घरी व्यवस्थित स्थिरस्थावर झालेले असतील. बाळाचे झोपणे, जागे राहणे, बिछाना, शी, शू सर्व अनिश्चित असते आणि त्यामुळे घरातील लोकांचा दिनक्रमही बिघडलेला असतो. दोन आठवडयांनंतरच तो हळूहळू रुळावर येतो. ज्या दिवशी तुम्ही भेटायला जाणार असाल त्याच्या एक दिवस आधी त्यांना फोन करुन विचारा की, कोणत्या वेळी येऊ, जेणेकरुन त्यांची गैरसोय होणार नाही.

* नवजात बाळाचे स्वागत करायचे म्हणजे भेटवस्तू देणे गरजेचे आहे. बाळाच्या कुटुंबाशी तुमचे घनिष्ट संबंध असतील तर तुम्ही त्यांना विचारू शकता की, कोणती भेटवस्तू देऊ किंवा एखादी मऊ गादी, टॉवेल किंवा रोजच्या उपयोगातील वस्तू जसे की, बेबी केअर किट वगैरे देऊ शकता.

* तिथे गरजेपेक्षा जास्त वेळ उगाचच बोलत बसू नका. फार तर अर्धा तास बसा. या दरम्यान हलक्याफुलक्या गप्पा मारा. विचारल्याशिवाय उगाचच एखादा सल्ला किंवा निरर्थक गोष्टी उगाळत बसू नका.

* सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती काही दिवसांपूर्वीच फ्लू, व्हायरल ताप, कावीळ आदी आजारांपासून बरी झाली असेल तर त्या व्यक्तीने आई, बाळाकडे अजिबात जाऊ नये, कारण बरे झाल्यानंतरही संसर्ग दीर्घकाळ राहू शकतो. इतकेच नव्हे तर खोकला, सर्दी झालेल्यांच्या संपर्कात आल्यानेही खोकला, सर्दी होण्याची भीती असते.

प्रतिमा खराब करू शकते इमोजी

* मिनी सिंग

आपण व्हॉट्सअॅपवर आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी अनेक इमोजी वापरतो. आम्ही सकाळपासून रात्रीपर्यंत व्हॉट्सअॅपवर नेहमीच कनेक्ट असतो. यादरम्यान आपण बऱ्याचदा लिहून पाठवण्याऐवजी त्याच्याशी संबंधित इमोजी पाठवितो आणि असे वाटते की आम्ही आपले म्हणणे सांगितले आहे. परंतु आपण नकळत चुकीचे इमोजी तर पाठवत नाही आहात ना? जरी आपली मानसिकता चुकीची नसली तरी आपण असे काही इमोजीस सेंड करता, ज्याचा अर्थ खूप खराब असू शकतो. अशाच काही इमोजींबद्दल जाणून घेऊया, ज्यांचा अर्थ चुकीचा असू शकतो परंतु आपल्याला त्याबद्दल माहिती नसते.

आय रोलिंग : या इमोजीचा अर्थ तिरस्कार किंवा कंटाळा व्यक्त करणे असू शकतो.

नमस्कार : आपण बहुतेकदा आभार किंवा नमस्कार करण्यासाठी हे इमोजी वापरतो, परंतु याचा योग्य अर्थ दोन जणांतील टाळी देण्यासारखा आहे.

डोनट : जरी लोक याचा गोड म्हणून उपयोग करतात, परंतु गलिच्छ शब्दात ते योनीचे प्रतीक मानलेजाते.

लव्ह हॉटेल : हे इमोजी वेश्यागृह दर्शविते.

गर्ल्स विथ बन्नी इयर्स : या इमोजीचा उपयोग वेगवेगळया भावना दर्शविण्यासाठी केला जातो, परंतु बरेच लोक वेश्या व्यवसायासाठीदेखील याचा वापर करतात. जपानमध्ये हे लैंगिक बाहुलीचे प्रतीक आहे.

मूक चेहरा : या इमोजीचा अर्थ म्हणजे आपले तोंड बंद ठेवा.

स्प्लॅश : हा इमोजी ऑर्गेज्म (समागमाची पराकाष्ठा)साठी वापरला जातो.

चेरीज : हा इमोजी स्तन (बूब्स) दर्शवितो.

डोळे : लोक एखाद्याची सेक्सी सेल्फी मागत असताना हे इमोजी पाठवतात.

मॅक्रोफोन : हे मेल अवयवाचे प्रतिनिधित्व करते.

मुलीचे डोक्यावर हात ठेवणे : हा इमोजी मादी भावनोत्कटता दर्शवितो.

पीच : याचा अर्थ बॉम्ब आहे.

मेल बॉक्स : याचा अर्थ असा की प्रेषक आपल्याकडे लैंगिक इच्छा व्यक्त करीत आहे.

आग : जर कोणी आपल्याला हा इमोजी पाठवित असेल तर याचा अर्थ असा की आपण मादक दिसत आहात.

आणखी अशा बऱ्याच इमोजी आहेत, ज्यांचे अर्थ खूपच गलिच्छ असू शकतात आणि आपल्याला त्याबद्दल माहिती नसते.

काय आहे इमोजी?

हा इलेक्ट्रॉनिक चित्रांचा समूह आहे. यामध्ये आपण या इलेक्ट्रॉनिक संप्रेषणचा वापर करून आपल्या भावना व्यक्त करतो. इमोजी भावना, वस्तू किंवा चिन्हाच्या दृश्याचे प्रतिनिधित्व असते. या वेगवेगळया फोनमध्ये किंवा सोशल नेटवर्किंग साइटवर विविध प्रकारांमध्ये असतात.

प्रथम डिझाइन कोणी केले : शिगेताका कुरीता यांनी वयाच्या २५ व्या वर्षी इमोजीचा सर्वात पहिला सेट बनविला. ज्यात जवळपास १७६ इमोजी होते. विशेष म्हणजे, इमोजीचा फादर म्हणून ओळखले जाणारे शिगेताका कुरीता ना अभियंते होते किंवा ना डिझाइनर. त्यांनी तर अर्थशास्त्राचा अभ्यास केला होता.

इमोजी केव्हा आणि कशी सुरू झाली : १९९० च्या उत्तरार्धात म्हणजेच १९९८-१९९९ मध्ये रंगीबेरंगी इमोजी वापरण्यास सुरवात झाली. एका जपानच्या टेलिकॉम कंपनीचे कर्मचारी शिगेताका कुरीता यांनी या कंपनीच्या मोबाइल इंटरनेट सेवेसाठी इमोजी तयार केली. या मोबाइल इंटरनेटवर ईमेल पाठविण्यासाठी पात्रांची संख्या २५० होती, ज्यात हास्य, दु:ख, क्रोध, आश्चर्य आणि गोंधळाची भावना दर्शविणाऱ्या इमोजीदेखील सामिल होत्या.

जपानमध्ये इमोजी लोकप्रिय होत असल्याचे पाहून २००७ मध्ये प्रथम अॅप्पल आयफोनने त्यांच्या मोबाइल फोनमध्ये इमोजीचे की बोर्ड सामील केले, ज्यात एसएमएस, चॅटिंग, व्हॉट्सअॅप, मेसेजिंग करतांना आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी इमोजीचा वापर केला जाऊ लागला आणि मग इमोजी सर्वात वेगाने वाढणाऱ्या भाषांपैकी एक बनली.

* २०१३ मध्ये ऑक्सफोर्ड इंग्लिश डिक्शनरीमध्ये इमोजी शब्दाचा समावेश केला गेला.

* २०१५ मध्ये इमोजीला ‘वर्ड ऑफ द इयर’ घोषित केले गेले.

* २०१६ मध्ये, न्यूयॉर्कमधील ‘म्युझियम ऑफ मॉडर्न आर्ट’ने आपल्या कायमस्वरूपी संग्रहात शिगेताका कुरीताच्या १७६ इमोजींचा पहिला सेट समाविष्ट केला. हॉलिवूडमध्ये एक अॅनिमेटेड चित्रपटही बनला गेला. ज्यामध्ये २५० इमोजी दाखविली गेली. आतापर्यंत इमोजींची संख्या २,६६६ वर पोहोचली आहे.

इमोजी डे : इमोजीपीडियाचे संस्थापक जेरेमी बर्ज यांनी २०१४ मध्ये जागतिक इमोजी दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर, १४ जुलैपासून जागतिक इमोजी दिन हा जागतिक उत्सव म्हणून साजरा करण्यास सुरवात झाली.

इन्स्टंट मेसेजिंग आणि व्हॉट्सअॅपवर उपलब्ध इमोजी लोकांमध्ये स्पष्ट भावना व्यक्त करतात पण व्हॉट्सअॅपच्या एका इमोजीला आता धोका निर्माण झाला आहे. वास्तविक, व्हॉट्सअॅपच्या एका आक्षेपार्ह इमोजीसंदर्भात एका भारतीयाने कायदेशीर नोटीस पाठविली आहे. गुरमीत सिंह नावाच्या या भारतीय वकिलाने व्हॉट्सअॅपच्या मधल्या बोटाच्या इमोजीवर आक्षेप नोंदविला आहे. आपल्या तक्रारीत ते म्हणाले की मधल्या बोटाचे इमोजी केवळ बेकायदेशीरच नाही तर ते अश्लीलतेचे प्रतीकही आहे.

ब्रिटनच्या न्यायालयांनी सोशल मीडियामध्ये वापरल्या जात असलेल्या इमोजींबद्दल चिंता व्यक्त केली आहे. देशातील कायदेशीर वादांमध्ये या इमोजींचा वापर प्रकरणास अधिक गुंतागुंतीचे बनवित आहे. त्यामुळे वकिल या डिजिटल चिन्हांबाबत मार्गदर्शक सूचना जारी करण्याचा आग्रह धरीत आहेत. ब्रिटनच्या न्यायालयांमध्ये गुन्हेगारी, कौटुंबिक आणि व्यवसायिक किंवा नोकरीशी संबंधित कायदेशीर विवादांच्या सुनावणीच्या वेळी सादर केलेल्या पुराव्यामध्ये या इमोजी बऱ्याच पाहिल्या जात आहेत.

सॅन्टा क्लॅरा युनिव्हर्सिटीच्या कायदा विभागाचे प्राध्यापक एरिक गोल्डमॅन म्हणतात की २०१८ मध्ये ५३ प्रकरणांमध्ये इमोजी सामील होत्या, ज्या २०१७ मध्ये ३३ आणि २०१६ मध्ये २६ इमोजींच्या तुलनेत जवळपास दुप्पट झाल्या. गोल्डमॅनच्या म्हणण्यानुसार, लोकांची उपकरणे आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही एकच इमोजी वेगवेगळया प्रकारे प्रदर्शित करू शकतात आणि तेही प्रेषक आणि प्राप्तकर्त्याला माहिती नसताना, यामुळे सहजपणे वाद होण्याची शंका असते.

लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये अधिक उपयोग : गोल्डमॅनच्या संशोधनातून असे दिसून आले आहे की बहुतेक कायदेशीर प्रकरणांमध्ये इमोजी आता दिसू लागल्या आहेत. लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये या सर्वाधिक वापरल्या जातात. प्रकरणांची वेगाने वाढणारी संख्या असूनही, त्यांचे कायदेशीर स्पष्टीकरण झालेले नाही, उलट आता नवीन अॅनिमेटेड (जिफ फाइल्स) आणि पूर्वीपेक्षा जास्त वैयक्तिक इमोजी आल्या आहेत, ज्या आव्हान बनल्या आहेत.

कामाच्या ठिकाणी इमोजी वापरल्याने प्रतिमा खराब होऊ शकते : आपल्या सहकाऱ्याला ईमेल पाठवित असताना, खुष होऊन किंवा ईमेल प्रभावी बनवण्यासाठी आपण इमोजी वापरत असल्यास ते आपल्या व्यावसायिक कारकिर्दीसाठी चांगले नाही. नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार, कामाच्या ठिकाणी इमोजीचा वापर आपल्या प्रतिमेवर किती प्रमाणात परिणाम करू शकतो, आपण याची कल्पनाही करू शकत नाही. इस्त्राईलमधील एका विद्यापीठात केलेल्या संशोधनाच्या आधारे संशोधक म्हणतात की ईमेलसह स्माइली किंवा इतर इमोजी आपल्याला व्यावसायिकरित्या अपात्र ठरवतात.

या संशोधनात सामील असलेल्या डॉ. इला गिलक्सन यांच्या मते, पहिल्यांदाच एखाद्या संशोधनाचे निकाल इमोजी वापराच्या परिणामांचे पुरावे सादर करीत आहेत. त्यांच्या मते, जर आपण असा विचार करता की खऱ्या स्माईलऐवजी या इमोजीचा वापर करून आपण या ईमेलद्वारे गोड दोस्ती दर्शविण्यात सफल झाला आहात, तर ते चुकीचे आहे. आपल्या व्यावसायिक क्षमतेवर यामुळे शंका केली जाऊ शकते. औपचारिक बीजनेस इमेलमध्ये एक स्माईली, स्माईली नसते. या संशोधनात संशोधकांनी २९ वेगवेगळया देशांतील ५४ सहभागींना सामील केले होते.

आपण व्हॉट्सअॅप, फेसबुक किंवा इतर कोणत्याही मेसेजिंग सेवेवर कोणताही टॅक्स इमोजीशिवाय पाठविला नाही तर सेक्स आपल्या मनावर थोडे अधिराज्य मिळवू शकते. असे ‘डेटिंग वेबसाइट मॅच डॉट कॉम’ संस्थेचे एक नवीन संशोधन म्हणते.

संशोधन काय म्हणते : ‘डेटिंग वेबसाइट मॅच डॉट कॉम’च्या संशोधनानुसार जे लोक आपल्या जवळजवळ प्रत्येक मजकूर संदेशात इमोजी वापरतात, त्यांचे मन बहुतेक वेळा सेक्सबद्दल विचार करत असते. या संशोधनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या हेलन फिशरच्या म्हणण्यानुसार इमोजी वापरणारे ना केवळ जास्त सेक्सच करत नाही, तर ते जास्त डेटसलाही जातात, त्याचबरोबर या लोकांचे लग्न होण्याचीही शक्यताही जे लोक कमी इमोजी वापरतात किंवा अजिबात वापरत नाहीत अशा लोकांच्या तुलनेत दुप्पट असते.

कोणत्या लोकांवर झाले संशोधन : २५ देशांमधील ८ वेगवेगळया भाषांमध्ये काम करणाऱ्या या संकेतस्थळाने काही काळापूर्वीही संशोधन केले होते, त्यानुसार सर्वेक्षणात सामील झालेल्या अर्ध्याहून अधिक स्त्रिया व पुरुषांनी आपल्या डेटबरोबर फ्लर्ट करताना ‘विंक’ इमोजी वापरला. संशोधनात असेही आढळले आहे की अशा संभाषणांमध्ये ‘स्माइली’ ही सर्वात जास्त वापरली जाणारी दुसरी प्रचलित इमोजी होती.

५,००० लोकांवरील या संशोधनात ३६ ते ४०टक्के लोक असे होते जे प्रत्येक मेसेजमध्ये १ हून अधिक इमोजी वापरत असत. असे आढळले की हे लोक दिवसातून बऱ्याच वेळा सेक्सबद्दल विचार करत असत. त्याच वेळी, ज्यांनी सेक्सबद्दल कधीही विचार केला नाही, त्यांच्या संदेशात इमोजीचा वापर क्वचितच झाला होता. त्याचवेळी असेही बरेच लोक होते, जे दिवसातून फक्त एकदा सेक्सबद्दल विचार करीत असत आणि इमोजी वापरत तर असत, परंतु प्रत्येक मेसेजबरोबर नाही. या संशोधनानुसार, या संशोधनात सामील झालेले ५४ टक्के लोक, जे त्यांच्या संदेशांमध्ये इमोजी वापरत असत, ते त्या ३१ टक्के लोकांपेक्षा जास्त सेक्स करत असत, जे इमोजी वापरत नसत.

पीरियड्सवरील इमोजी : पीरियड्स इमोजीचा मार्च, २०१९ पासून इमोजीच्या यादीमध्ये समावेश झाला आहे. ही इमोजी लाल रक्ताचा एक थेंब आहे. लोकांची पुराणमतवादी वैचारिक सीमा तोडण्यास आणि पीरियड्सवर उघडपणे बोलण्यास ही पीरियड्स इमोजी एक मोठे पाऊल आहे.

मॅसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने आपल्या नवीन बीटा अपडेटमध्ये काही नवीन इमोजी आणल्या आहेत, ज्यांचे डिझाइन बदलले आहे. नवीन अँड्रॉइड बीटा अपडेटमध्ये अशा १५५ इमोजी आहेत, ज्यांचे डिझाइन बदलले आहे. अँड्रॉइड बीटा परीक्षक हे इमोजी नवीन अद्ययावत २.१९.१३९ मध्ये पाहू शकतात.

आज स्मार्टफोन ही आपली गरज बनली आहे. त्याशिवाय आपले कार्य पुढे जाऊ शकत नाही. दररोज आम्ही ट्विटर, फेसबुकसह अनेक गोष्टी वापरतो. आपण आपल्या गोष्टी अधिक कमी वेळात व्यक्त करण्यासाठी यांवर बनलेल्या इमोजी वापरतो. परंतु यामध्ये दिल्या गेलेल्या १,००० हुन अधिक इमोजींतील काहींचे तर आपल्याला अर्थही कळत नाहीत.

परंतु आता या सर्व इमोजी पात्रांना समजून घेण्यासाठी, सर्वात सोपा उपाय मिळाला आहे आणि तो म्हणजे इमोजीपीडिया. या इमोजीपीडियावर आपल्याला प्रत्येक इमोजीचा अर्थ सापडेल.

टाइल्स फ्लोरिंग सुंदर आणि स्वस्त

* अनुराधा गुप्ता

खोलीतील इंटीरियर आणखीन सुंदर बनवण्याचं काम करतं ती खोलीची फरशी. त्यामुळे अलीकडे लोक खोलीचं सीलिंग, भिंती आणि इतर सजावटीच्या गोष्टींबरोबरच फरशीकडेही लक्ष देऊ लागले आहेत. मात्र, ही गोष्ट केवळ फरशीचं सौंदर्य वाढवण्यापर्यंतच नाही तर तिची स्वच्छता आणि स्वत:च्या आरोग्याला अनुसरूनही आहे.

खरंतर फरशी खोलीचा तो भाग असते जी खूप लवकर अस्वच्छ होते आणि ती जर वेळोवेळी स्वच्छ केली नाही तर खोलीच्या सौंदर्याला डाग लागल्यासारखं वाटतं. पण आजच्या धकाधकीच्या जीवनात सौंदर्य आणि स्वच्छता दोन्हीमध्ये ताळमेळ राखणं तसं कठीणच होत असतं. अशात योग्य फरशीची निवड करणं खूप फायदेशीर ठरतं.

बाजारात वुडन, लॅमिनेटेड, कारपेट टाइल्स यासकट आणखीन अनेक पर्याय फरशीचं सौंदर्य वाढवण्यासाठी उपलब्ध आहेत. यामध्ये टाइल्स एक असा पर्याय आहे ज्याबरोबर स्वच्छता, सौंदर्य आणि आरोग्य तिन्हींचा ताळमेळ राखला जाऊ शकतो.

मग या जाणून घेऊया टाइल्स फ्लोरिंगचे काय काय फायदे आहेत :

* सिमेंट किंवा मार्बलची फरशी लवकरच खराब होते. दुसरीकडे सिमेंट फ्लोरिंगमध्ये भेगा पडतात, तर मार्बल फ्लोरिंगवर लगेच डाग लागतात. मात्र टाइल्स फरशीला मजबूत आधार देते.

* बाजारात टाइल्सचे दोन पर्याय आहेत-पहिलं : सिरॅमिक आणि दुसरं पोर्सिलेन. जर या चांगल्या प्रकारे लावल्या गेल्या आणि चांगली निगा राखली गेली तर यामुळे फरशीचं सौंदर्य दीर्घकाळ टिकून राहातं.

* इतर फ्लोरिंग पर्यायांऐवजी टाइल्स फ्लोरिंग आरोग्याच्या दृष्टीनेसुद्धा फायदेशीर ठरते. जर टाइल्स चांगल्याप्रकारे स्वच्छ केले गेले तर त्यामध्ये रोगजंतू इत्यादीदेखील उद्भवत नाहीत. टाइल्स फ्लोरिंगमुळे खोलीच्या आतली वायुची गुणवत्तादेखील टिकून राहाते. शिवाय टाइल्सना भट्टीमध्ये उच्च तापमानावर भाजलं जातं, त्यामुळे यामध्ये बाष्पशील कार्बनिक घटक (वोलाटिल ऑर्गेनिक कंपाउंड) असण्याची शक्यताही संपते. त्यामुले अनेक प्रकारच्या आरोग्यासंबंधी समस्या होण्याची भीतीही संपते.

* टाइल्सचं तिसरं मोठं वैशिष्ट्य हे आहे की यावर डाग पडत नाही. याला स्वच्छ करण्यासाठी नॉन एब्रेसिव्ह आणि नॉनएसिडिक प्रॉडक्ट्सचा वापर होतो.      टाइल्स स्वच्छ करण्याचा सर्वात सोपा उपाय साबणाच्या पाण्याने स्वच्छ करणं  आहे.

* जमिनीवर टाइल्स लावण्याचा खर्चही इतर डिझायनर फ्लोरच्या खर्चापेक्षा खूप कमी येतो. त्याचबरोबर टाइल्स तुटण्याची किंवा खराब होण्याचीही भीती नसते. त्यामुळे तुम्हाला हवं तेव्हापर्यंत तुम्ही त्या जमिनीवर लावून ठेवू शकता.

* टाइल्स तशा तर खूप मजबूत असतात आणि सहजपणे यामध्ये भेगाही पडत   नाहीत पण तरीदेखील जर भेगा पडल्या तर तुम्ही तुटलेली टाइल सहजपणे रिप्लेस करू शकता.

महिलांमध्ये पॉर्न बघण्याचे व्यसन वाढत आहे

* मोनिका अग्रवाल

पॉर्न मूव्हीची चटक अगदी त्यासारखीच आहे जशी ड्रगची चटक. आजकाल सर्व प्रकारचे अश्लील पॉर्न मूव्ही ऑनलाईन उपलब्ध आहेत. जो त्यांना एकदा पाहतो तो त्यांच्या व्यसनाधीन होतो आणि मग त्यांच्या तावडीतून बाहेर पडणे खूप अवघड होते.

आपणास असे वाटते काय की ऑनलाईन अश्लील चित्रपट किंवा व्हिडिओ पाहणे केवळ पुरुषांनाच आवडते? तर नाही, एका सर्वेक्षणानुसार अश्लील चित्रपट किंवा व्हिडिओ पाहण्यात महिलादेखील मागे नाहीत.

सायबर सेक्स म्हणजे काय

ही एक प्रकारची मानसिक समस्या आहे. ज्यामध्ये लोक अश्लील चित्रपट पाहण्याच्या व्यसनाधीन होतात. दररोज इंटरनेटवर थोडा वेळ घालवून अश्लील चित्रपट बघू इच्छितात.

एका कंपनीत झालेल्या संशोधनातून असे दिसून आले आहे की काही सदस्य ऑफिसमध्येच अश्लील चित्रपट डाउनलोड करत होते. या कर्मचाऱ्यांमध्ये एका महिलेचाही समावेश होता. जेव्हा या महिलेच्या लॅपटॉपची छाननी केली गेली तेव्हा धक्कादायक बाब समोर आली. या महिलेने २ आठवडयांत सुमारे १,१०० वेळा अश्लील क्लिप्स डाउनलोड केल्या आणि तिच्या हार्ड ड्राइव्हमध्ये ४०० हून अधिक अश्लील चित्रे आढळली. यावरून असे दिसून आले की पुरुषांप्रमाणेच महिलाही नोकरीच्या ठिकाणी पॉर्न पाहण्याच्या व्यसनाधीन असतात.

महिला पॉर्न का पाहतात

विश्रांतीसाठी : सोशल मीडियावर कायम क्रियाशील असणाऱ्या महिला आता कोणत्याही पॉर्न साइट पाहण्यास अजिबात संकोच करत नाहीत. त्यांनाही काहीतरी मसालेदार, काहीतरी खमंग पाहण्याची तीव्र इच्छा असते. काही महिला असे व्हिडिओ किंवा चित्रे पाहून तणावमुक्त झाल्याचे सांगतात. काहीजणी फक्त वेळ घालवण्यासाठी किंवा एन्जॉय करण्यासाठीच त्यांचा आनंद घेतात.

जोडीदारासाठी : बऱ्याच प्रकरणांमध्ये असे पाहिले गेले आहे की पुरुष मित्राला किंवा नवऱ्याला असे वाटते की आपल्या महिला जोडीदारानेदेखील त्याच्याबरोबर बसून पोर्न बघावे. अशा परिस्थितीत बऱ्याच स्त्रिया आपल्या जोडीदाराची इच्छा पूर्ण करण्यासाठीदेखील अश्लील पाहणे पसंत करतात.

लैंगिक कल्पनेसाठी : बऱ्याच स्त्रिया नवीन कल्पनांबद्दल विचार करण्यासाठी आणि त्या एक्सप्लोर करण्यासाठी पॉर्न व्हिडिओचा अवलंब करतात.

संशोधन काय म्हणतात

काही संशोधनात असे दिसून आले आहे की १५ ते २५ टक्के स्त्रिया ऑनलाईन अश्लील चित्रपट पाहण्यात व्यसनाधीन आणि हायपरसेक्सुअल बनत चालल्या आहेत. हायपरसेक्सुअल मानसिकता असलेल्या स्त्रिया इतक्या या व्यसनाच्या अधीन असतात की त्यांना नेहमीच लैंगिक संबंधाविषयी कल्पनारम्यता किंवा त्यासंबंधी गोष्टी करायलाच आवडते.

अशा स्त्रिया हस्तमैथुन किंवा मास्टरबेशन संकुचिततेने ग्रस्त असल्याचेही संशोधनातून समोर आले आहे. पोर्नोग्राफी चित्रपट इंटरनेट रहदारी वाढवतात, जे सामान्य साइटच्या तुलनेत खूपच जास्त आहे.

भिन्नलिंगी व्यक्तीकडे आकृष्ट होणाऱ्या महिला

या संशोधनाच्या परिणामी, शास्त्रज्ञांना असे आढळले आहे की ज्या स्त्रिया भिन्नालिंगी व्यक्तीकडे आकृष्ट होणाऱ्या असतात, त्या दररोज इंटरनेटवर नवीन प्रकारचे अश्लील व्हिडिओ शोधतात. अशा स्त्रिया इंटरनेट मिळताच अश्लील व्हिडिओ शोधू लागतात.

चांगले व्यसन नाही

म्हण आहे की अति तेथे माती. कुठल्याही गोष्टीचा अतिपणा वाईट आहे. होय, हे व्यसन लागणेदेखील चांगले नाही. या आजाराने ग्रस्त असलेल्या स्त्रियांना नेहमीच केवळ पॉर्न पहावेसे वाटते. यामुळे त्यांना जागेचेही भान नसते. संशोधनानुसार महिला ऑफिसमध्येदेखील अश्लील व्हिडिओही पाहतात, त्यामुळे त्या त्यांच्या कामाकडे कमी लक्ष देतात. पॉर्न पाहण्याची सवय असलेल्या महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे

असे निवडा पडदे

* ललिता गोयल

पडदे घराच्या इंटीरियरचा महत्त्वाचा भाग आहेत. हे घरात प्रवेश करणाऱ्या पाहुण्यांच्या मनात घराच्या सजावटीच्या बाबतीत जिज्ञासा उत्पन्न करतात. म्हणजेच प्रवेशद्वाराची खासियत हे पडदेच असतात. सप्तरंगी पडद्यांनी घराची शोभा तर वाढतेच परंतु ते खोल्यांच्या पार्टीशन व एकांतपणा राखण्यातदेखील मदतनीस ठरतात. आकर्षक पडद्यांमुळे घराच्या भिंती, दरवाजे, खिडक्या व फर्नीचरची शोभा वाढते.

चला तर मग पडद्यांची निवड जी तुमची क्रिएटिव्हिटी दर्शविण्याबरोबरच घराचं सौंदर्यदेखील कसं वाढवितं ते जाणून घेऊया :

  • पडद्यांची निवड करतेवेळी ते घराच्या भिंती, फर्नीचर, कारपेण्टशी मिळतेजुळते असावेत याची काळजी घ्या.

 

  • तुमच्या घरात ऊन येत असेल तर लायनिंगच्या पडद्यांची निवड करावी. हे उन्हापासून संरक्षण करण्याबरोबरच खोलीलादेखील सोबर लुक देतात.

 

  • तुम्ही जर २ लेयरच्या पडद्यांची निवड करणार असाल तर एक फॅब्रिक लाइट तर दुसरं फॅब्रिक हेवी निवडा जसं कॉटनसोबत टिश्यू.

 

  • दिवसा खिडक्यांचे पडदे एकत्र करून ते आकर्षक दोरीने बांधू शकता.

 

  • खोलीत ऊन येत नसेल तर खिडक्यांसाठी हलक्या रंगाच्या पडद्यांची निवड करा. अर्क शेपच्या खिडक्यांसाठी नेट, कशिदाकारी, बॉर्डर व लेसने सजलेल्या आकर्षक पडद्यांची निवड करू शकता.

 

  • किचन, बेडरूम व लिव्हिंगरूमसाठी वेगवेगळ्या पडद्यांची निवड करावी, किचनसाठी पातळ लायनिंगचे, बेडरूमसाठी कॉटनचे आणि लिव्हिंगरूमसाठी सॅटिन व कॉटन पॉलिस्टरसारख्या हलक्या मिश्रित फॅब्रिकची निवड करू शकता.

 

  • बेडरूमच्या खिडकीसाठी हलक्या म्हणजेच कॉटनच्या पडद्यांची निवड करा म्हणजे बाहेरच्या हवेची मजा घेता येईल.

 

  • पडद्यांना नवीन लुक देण्यासाठी त्यावर लेस व बटन लावा. यामुळे घराच्या सजावटीला नवीन लुक मिळेल. हवं असल्यास तुम्ही पडद्यावर घुंगरूदेखील लावू शकता. हवेसोबत पडदे हलताच ते विंड चाइमचं काम करतील.

 

  • पडद्यांची निवड करण्यापूर्वी घरातील दरवाजेखिडक्यांची लांबीरुंदी मोजून घ्या.

 

  • छोटं घर मोठं दिसण्यासाठी लेमन, ग्रीन, बेबी पिंक, स्काय ब्लू, इत्यादी रंग निवडा. छोट्या घरात गडद रंग निवडू नका.

 

फॅब्रिक व मटेरियलची निवड

  • बाजारात पडद्यांची अनेक व्हरायटीज उपलब्ध आहेत. तुम्ही तुमची आवड व गरजेनुसार निवड करू शकता.
  • अलीकडे पडद्यांमध्ये वेल्वेट, पॉलिस्टर क्रश, कॉटन, सिथेंटिक मिक्स, विस्कोस, सॅटिन सिल्कच्या अनेक व्हरायटीज उपलब्ध आहेत.
  • राजसी लुकसाठी सिल्क व वेल्व्हेट पडद्यांची निवड करा.
  • कंटेम्पररी लुक व छोट्या घरासाठी सिल्क सॅटिन, कॉटन पॉलिस्टर, सिल्क पॉलिस्टर फॅब्रिकची निवड करू शकता.
  • * एका रंगाच्या फर्निचरसोबत प्रिण्टेड वा टेक्सचरवाले पडदे निवडा. परंतु घराचं फर्नीचर प्रिण्टेड वा टेक्सचर असेल तर एका रंगाचे पडदे निवडा. प्लेन पडद्यांचं कॉम्बिनेशनदेखीव बनवू शकता.
  • प्रायव्हसीसाठी लायनिंगचे वा हलक्या प्रकाशासाठी ट्रान्सपरण्ट पडदे निवडा.
  • तुम्ही तुमच्या जुन्या सिल्कच्या बॉर्डरवाल्या साड्यांनादेखील पडद्याचा लुक देऊ शकता.

पडद्यांची देखभाल

  • वेळोवेळी पडद्यांची स्वच्छता करत राहा. स्वच्छता पडद्यांच्या फॅब्रिकनुसार करा. वेल्व्हेट व सॅटिनचे पडदे घरी धुण्याऐवजी ड्रायक्लिनिंग करून घ्या. कॉटन व कॉटन मिक्स फॅब्रिक घरी धुऊ शकता.

अद्भूत सौंदर्याची खाण अजिंठा-एलोरा (वेरुळ) लेणी

* प्रतिनिधी

अजिंठा-एलोराच्या लेण्यांच्या दुनियेचा फेरफटका म्हणजे एक सुंदर अनुभूती असते. तुम्ही जर कलाप्रेमी असाल आणि पुरातन काळातील ऐतिहासिक वास्तू व कलाकृतींचे प्रशंसक असाल, तर अजिंठा-एलोरा तुमच्यासाठी एक खूपच छान पर्यटन स्थळ आहे. या लेण्यांना १९८३ मध्ये वर्ल्ड हेरिटेजच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. येथील गुंफांमध्ये केली गेलेली चित्रकारी व मूर्तिकला खूपच अद्वितीय आहे.

औरंगाबादपासून जवळपास २ तासांच्या टॅक्सी प्रवासानंतर अजिंठाच्या गुंफांपर्यंत पोहोचता येईल. जगप्रसिद्ध अजिंठा-एलोराची चित्रकारी व गुंफा कलाप्रेमींसाठी नेहमीच आकर्षणाचे प्रमुख केंद्र राहिल्या आहेत. विशालकाय खडक, हिरवळ, सुंदर मूर्ती आणि इथून वाहणारी वाघोरी नदी येथील सौंदर्य द्विगुणित करतात.

अजिंठामध्ये छोटया-मोठया ३२ प्राचीन गुंफा आहेत. २००० वर्षे जुन्या अजिंठाच्या गुंफेच्या द्वारांना खूपच सुंदर पद्धतीने सजविण्यात आले आहे. घोडयाच्या नालेच्या आकाराच्या या गुंफा अत्यंत प्राचीन असून, त्यांना ऐतिहासिक महत्त्व आहे. आकर्षक चित्रे आणि भव्य मूर्तींबरोबरच येथील सिलिंगवर बनविलेली चित्रे अजिंठाच्या गुंफांना एक आगळेवेगळे सौंदर्य प्रदान करतात. या सुंदर कलाकृती साकारण्यासाठी कोणते तंत्र वापरण्यात आले, हे अजूनही एक गूढच आहे. हे गूढ उकलण्यासाठी जगातील कानाकोपऱ्यातून पर्यटक इथे येतात.

वाघोरा नदी येथील सौंदर्यात आणखी भर टाकते. या गुंफांचा शोध आर्मी ऑफिसर जॉन स्मिथ व त्यांच्या दलाने १८१९ साली लावला असे सांगितले जाते. ते या ठिकाणी शिकार करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांना या ओळीत बनलेल्या २९ गुंफा दिसल्या. त्यानंतरच या गुंफा संपूर्ण जगात प्रसिद्ध झाल्या.

येथील सुंदर चित्रकारी व मूर्ती कलाप्रेमींसाठी अनमोल भेट ठरल्या आहेत.

हातोडी आणि छेनीच्या मदतीने कोरलेल्या या मूर्ती सौंदर्याचा अप्रतिम नमुना आहेत. या लेणी पाहण्यासाठी आपल्याला अनेक वेळा पायऱ्या चढाव्या व उतराव्या लागतात. त्यामुळे इथे जाताना तुम्ही आरोग्याच्या दृष्टीने फिट असणे आवश्यक आहे. इथे प्रत्येक गुंफेबाहेर एक बोर्ड लावला आहे, त्यावर हिंदी व इंग्रजीमध्ये गुंफांची संख्या आणि त्यांच्यासंबंधी माहिती दिलेली आहे. चित्रांचे आयुष्य तीव्र प्रकाशामुळे कमी होत असल्यामुळेच, गुंफांमध्ये चार ते पाच लक्सचा प्रकाश असतो. अर्थात, मिणमिणत्या मेणबत्तीसारखा प्रकाश. कोणत्याही चित्राच्या सौंदर्याची जाणीव होण्यासाठी ४० ते ५० लक्स तीव्रतेच्या प्रकाशाची गरज असते.

एलोराच्या गुंफा

औरंगाबादपासून जवळपास ३० किलोमीटर अंतरावर एलोरा लेणी आहेत. एलोरामध्ये ३४ गुंफा आहेत. या गुंफा बसाल्टिकच्या डोंगराच्या किनाऱ्या-किनाऱ्यावर बनलेल्या आहेत.

महत्त्वपूर्ण बाबी

मुंबई, पुणे, अहमदाबाद, नाशिक, इंदूर, धुळे, जळगाव इ. शहरांतून औरंगाबादसाठी बसच्या सुविधा उपलब्ध आहेत. सोमवार सोडून आपण कधीही अजिंठा एलोराला जाऊ शकता. औरंगाबाद रेल्वे स्टेशनपासून दिल्ली व मुंबईसाठी ट्रेनची सुविधा आहे. औरंगाबाद रेल्वे स्टेशनजवळ महाराष्ट्र पर्यटन विभागाचे हॉटेल आहे.

* जर गरमीच्या मोसमात जात असाल, तर सकाळी लवकर पोहोचा. सोबत पाणी, हॅट आणि सनग्लासेस घ्यायला विसरू नका. अर्थात, इथे पर्यटनासाठी नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा सर्वात उत्तम काळ आहे.

* गुंफांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला चढावाचा मार्ग निवडावा लागेल. नंतरचा मार्ग सरळ आणि सोईस्कर आहे. म्हणूनच इथे जाताना आरामदायक चप्पल घाला.

* वानरांपासून सावध राहा.

* युनेस्कोचा वारसा असलेले हे ठिकाण संपूर्ण पाहण्यासाठी आपल्याला ३ ते ४ तास पुरेसे असतात. तसेही संपूर्ण दिवसभरासाठी ही ट्रीप तुम्हाला आनंद देऊन जाईल.

* जेवणासाठी एमटीडीसीची रेस्टॉरंट खूप चांगली आहेत.

* तिकीट विभागाजवळ फिरणाऱ्या फेरीवाल्यांपासून सावध राहा. ते खूप त्रास देतात.

आवश्यक गोष्टी

  • आपल्या ओळखीच्या दुकानांवर घेऊन जाणाऱ्या गाइड्सपासून सावध राहा. तिथे त्यांचे कमिशन ठरलेले असते. त्यामुळे त्या दुकानांत मिळणाऱ्या वस्तू महाग असतात.
  • वयोवृद्धांसाठी इथे जाणे थकवा आणणारे ठरू शकते. म्हणूनच जे प्रकृतीने स्वस्थ असतील, त्यांनीच इथे जावे. इथे जाण्याचा सर्वात उत्तम काळ म्हणजे थंडीचा मोसम.
  • सकाळी लवकरात लवकर गुंफांपर्यंत पोहोचा आणि संध्याकाळी ४ वाजेपर्यंत पुन्हा औरंगाबादला परता. जेणेकरून तुम्हाला बीबी का मकबरा, पंचकी, सिद्धार्थ गार्डन व प्राणिसंग्रहालय यांसारख्या पर्यटनस्थळांचाही आनंद घेता येईल.

तर चोरांची दृष्टी मौल्यवान वस्तूंवर पडणार नाही

* भारतभूषण श्रीवास्तव

जुन्या भोपाळमध्ये कोहेफीजा हा एक घनदाट लोकवस्तीचा परिसर आहे. येथील आरके टॉवरमध्ये राहणारा मुजीब अली मागील १४ सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता थोडया वेळासाठी त्याच्या एका मित्राला भेटायला गेला होता. पण तो परत येईपर्यंत चोरटयांनी दिवसाढवळया त्याच्या १ लाखांचे दागिने व रोख रक्मम घेऊन पोबारा केला होता.

चोरांना चोरी करण्यासाठी फारसा प्रयत्न करावा लागला नाही. काही मिनिटातच त्यांनी घराच्या खोल्या तपासल्या आणि कपाटात ठेवलेले दागिने व रोख रक्कम खिशात भरून आरामात चालते झाले. पण एक धडा मागे शिकवून गेले की काही तास किंवा काही दिवस घराबाहेर जायचे असेल तर अशा सोप्या ठिकाणी मौल्यवान वस्तू ठेवू किंवा लपवू नका, जेथे चोरांचे हात सहज पोहोचतात आणि ते त्यांच्या कार्यात यशस्वी होतात.

त्याचप्रमाणे भोपाळच्या गेहुखेडा भागातील रॉयल भगवान इस्टेटचे परवेझ खान, जे एका कंपनीत मार्केटिंग मॅनेजर आहेत, १८ सप्टेंबर रोजी आपल्या मोठया मुलाच्या साखरपुडयात सामील होण्यासाठी मुंबईला गेले होते. जेव्हा ते साखरपुडा आटोपल्यानंतर परत आले तेव्हा हे पाहून आश्चर्याने स्तब्ध झाले की घराच्या दरवाजाचे मध्यवर्ती लॉक तोडलेले आहे. घराच्या आत गेल्यावर कळले की चोरटयांनी अजून ४ कुलूपे तोडून कपाटात ठेवलेले दागिने, मौल्यवान घडयाळे आणि अडीच लाख रुपये चोरले आहेत. हे दृश्य पाहून परवेझकडे पश्चात्ताप करण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता. चोरटयांनी एकाच झटक्यात ६ लाखांचा माल लुटला होता.

त्यांना माहित असते

भोपाळमधील या दोनच नाही तर देशभरात चोरीच्या बऱ्याच घटनांमध्ये एकसारखी बाब म्हणजे घराच्या मौल्यवान वस्तू कोठे ठेवल्या जातात हे चोरांना माहित असते. म्हणूनच, तुमच्या कष्टाच्या पैशावर हात साफ करण्यात त्यांना कोणतीही अडचण येत नाही.

लोक घरांच्या भारीभक्कम दारावर मोठं-मोठे कुलूपे लावतात आणि निश्चिंतच मनाने निघून तर जातात, परंतु जेव्हा ते परत येतात तेव्हा हे पाहून आपले डोके बडवतात की, कमनशिबी लुटारु चोरांनी, माहित नाही कसे महागडया कपाटाचे सेफही तोडले आहे आणि त्यात ठेवलेल्या मौल्यवान वस्तू आता त्यांच्या मालकीच्या राहिल्या नाही आहेत.

आधुनिक आणि सुरक्षित मानल्या जाणाऱ्या महागडया शेल्फ आता अजिबात सुरक्षित राहिल्या नाहीत, कारण बहुतेक प्रकरणांमध्ये चोर त्यांनाच थेट टार्गेट करतात, कारण त्यांना माहित असते की माल येथेच ठेवला जातो किंवा ठेवला आहे. त्यांची ही कल्पना बहुधा चुकीचीही ठरत नाही.

जेव्हा कपाटाची तिजोरी सहज तुटू शकते तेव्हा घरातील इतर ठिकाणे अजूनही असुरक्षित होतात. उदाहरणार्थ, बॉक्सचा पलंग किंवा दिवाण ज्यामध्ये लोक दागिने आणि पैसे लपवतात, ते ही नेहमी चोरांच्या निशाण्यावर असतात. हा विचार करणे चुकीचे ठरेल की तिजोरी किंवा कपाटामध्ये माल सापडला नाही तर चोर दिवाण सोडतील, ज्यामध्ये कपडे आणि अंथरुणादरम्यान लोक मौल्यवान वस्तू चपळाईने आणि सुरक्षितपणे ठेवतात.

म्हणजेच, मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी लोक कोणकोणत्या जागा आणि पद्धती वापरतात हे चोरांना माहित असते. म्हणूनच त्यांना चोरी करण्यात कोणतीही विशेष अडचण येत नाही.

मग कुठे ठेवायचे

गोष्ट खरी आहे की घरात मौल्यवान वस्तू कुठे-कुठे असू शकतात याची कल्पना चोरांना असते तेव्हा कोणीही त्यांना चोरी करण्यापासून रोखू शकत नाही.

तथापि, चोरी टाळण्यासाठी बरेच लोक दागिने व इतर मौल्यवान वस्तू बँक लॉकरमध्ये ठेवतात. परंतु हेदेखील कमी अडचणीचे काम नाही. त्याचे कारण एकतर बँक लॉकर स्वस्त नसतात, दुसरे म्हणजे वर्षात असे २-४ प्रसंग येतात, जेव्हा दागदागिने काढावेच लागतात.

हे एक त्रासदायक काम आहे की जेव्हा पण आपल्याला एखाद्या समारंभात किंवा लग्नाला जायचे असेल तेव्हा बँकेत जाऊन दागदागिने काढा आणि पुन्हा ते ठेवण्यासाठी परत जा.

मग काय करावे आणि चोरांपासून वाचण्यासाठी मौल्यवान वस्तू कोठे ठेवाव्यात? या प्रश्नाचे उत्तर देणेदेखील सोपे काम नाही. परंतु हे अशा प्रकारे सुलभदेखील केले जाऊ शकते की जेव्हा चोर घरात प्रवेश करतील, कपाटे आणि तिजोरी तोडत असतील तेव्हा त्यांच्या हाती चिड-चिडण्याशिवाय दुसरे काहीचलागणार नाही. घरात मौल्यवान वस्तू अशा ठिकाणी ठेवा, जिथे त्यांचे हात पोहोचणारच नाहीत.

जर महागडया वस्तू तिजोरीत सापडल्या नाहीत तर चोर दिवानाला बघतील, फर्निचर खंगाळतील, फ्रीज, इतर शेल्फ आणि ड्रॉवर उघडतील, परंतु येथेही त्यांना कागद आणि कपडे वगळता काहीच सापडले नाही, तर ते आपल्या गरिबीला किंवा युक्तीला कोसत परत जातील.

जुने मार्ग आजमावून पहा

चोरी टाळण्यासाठी जुने मार्ग आजमावून पहा. या पद्धती मुळीच कठीण नाहीत, परंतु कपाट आणि तिजोरीपेक्षा जास्त सुरक्षित आहेत. सर्वात प्रचलित जुनी पद्धत म्हणजे जमिनीत दागदागिने गाडणे. हे खरं आहे की आजकाल बहुतेक घरे पक्क्या सिमेंटची बनलेली आहेत, जी खोदली जाऊ शकत नाहीत पण जर वृद्ध लोकांची समजदारी नव्या पद्धतीने आजमावून पाहिली तर काम बनू शकते. घराच्या बांधकामाच्या वेळी किंवा नंतर शयनगृहात, बेडच्या खाली दोन फरशा उपटून एक खड्डा बनविला जाऊ शकतो आणि त्याचप्रमाणे भिंतींमध्येही एक गुप्त जागा बनविली जाऊ शकते.

भोपाळच्याच पिपलानी भागातील ६४ वर्षीय दक्षिण भारतीय महिला एस.लक्ष्मीला वर्षातून एकदा आंध्र प्रदेशला जावे लागते. लक्ष्मीकडे २० तोळे सोने असून ते आजपर्यंत चोरीला गेले नाही, वस्तुत: दोनदा असे झाले की जेव्हा ती आंध्र प्रदेशहून परत आली तेव्हा चोरटयांनी घरात घरफोडी केली होती पण त्यांच्या हाती अपयशाखेरीज काहीच लागले नव्हते.

खरं तर लक्ष्मी जाण्यापूर्वी तिचे दागिने वीस लिटर तेलाने पूर्ण भरलेल्या कॅनमध्ये ठेऊन जाते. चोर स्वयंपाकघरापर्यंत आले आणि त्यांनी बॉक्स व डबेही उघडून पाहीले, पण त्यांना काहीच सापडले नाही. तेलाच्या कॅनवर त्यांचे लक्षच गेले नाही की दागिने यातही ठेवले असतील म्हणून.

लक्ष्मीप्रमाणे तुम्हीही थोडेसे शहाणपण दाखवू शकता आणि चोरांच्या नजरेपासून मौल्यवान वस्तू वाचवू शकता.

येथे मौल्यवान वस्तू लपवा

घरात अशी बरीच ठिकाणे आहेत, जिथे आपण मौल्यवान वस्तू ठेवून बिनधास्तपणे कोठेही येऊ-जाऊ शकता आणि परत येऊन त्या वस्तू सुरक्षितपणे बघू शकता.

* तेलाच्या किटलीसारखी सुरक्षित जागा म्हणजे पाण्याची टाकी असते, जिच्याकडे सहसा चोरांचे लक्ष जात नाही. प्रत्येक घरात पाण्याची टाकी अशा ठिकाणी असते, जेथे चोर कपाटाप्रमाणे सहज पोहोचू शकत नाहीत. दागदागिने त्यात लपविता येतील.

* घरात अधिक रोख रक्कम ठेवू नये पण काही कारणास्तव आपल्याला ठेवावी लागली तर घराबाहेर परताना ती वर्तमानपत्रांच्या रद्दीत तुकडया-तुकडयात ठेवली पाहिजे. हे काम आपण रद्दीच्या मध्यभागी केल्यास ते आणखी चांगले आहे.

* स्टोअररूम घरात एक अशी जागा आहे, ज्यामध्ये जगभरातील कचरा भरलेला असतो. यामध्ये दाग-दागिने इत्यादी कोठेही लपविता येतील. चोरी करताना चोरांकडे मर्यादित वेळ असतो. म्हणून ते स्टोअररूममधील प्रत्येक वस्तूत शोधणार नाही.

* सहसा चोरांचा असा विश्वास असतो की मौल्यवान वस्तू घराच्या आतच कोठेतरी ठेवल्या असणार. म्हणूनच ते घराच्या प्रवेशद्वारास किंवा पहिल्या खोलीस लक्ष्य करीत नाहीत. दागिने, रोकड वगैरे इथे लपविता येऊ शकते. मग भलेही ते शूज रॅक असले तरीही.

* पक्क्या घरांमध्ये खड्डे करणे शक्य नाही. परंतु कुंडया रिकाम्या करून त्यात दाग-दागिने भरून वरून ओली माती त्यांच्यावर टाकली जाऊ शकते.

* मुलांच्या शालेय पिशव्यादेखील मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

* लहान-लहान अंगठया आणि इतर लहान वस्तू औषधांच्या मोठया कुपीत टाकून वाचविता येतील.

निसर्गाच्या थीमवर घर सजवा

* नसीम अन्सारी कोचर

युग शोबाजीचे आहे. प्रत्येकजण एकमेकांपेक्षा चांगली स्थिती दर्शविण्यास उत्सुक आहे. सोशल साइट्स आणि इंटरनेटच्या युगाने शहरी राहणीमानात बराच बदल घडवून आणला आहे. फेसबुक किंवा व्हॉट्सअॅपवर टाकण्यात आलेल्या चित्रांमध्ये स्वत:च्या फोटोपेक्षा पार्श्वभूमीत कोणकोणत्या सुंदर आणि मौल्यवान वस्तू दिसून येतात यावर अधिक लक्ष दिले जात आहे. हे एखाद्या व्यक्तिची स्थिती दर्शवते. आमच्या गृहिणींवर या गोष्टींचा सर्वाधिक परिणाम होतो, ज्या त्यांच्या गोड घरांना अजून अधिक गोड बनविण्याच्या नादात असतात.

कमी बजेटमध्ये घर कसे सुंदर बनवायचे, आपल्या ड्रॉईंग रूममध्ये अशा कोणत्या अनोख्या गोष्टी लावल्या की भेट देणारे पाहुणे कौतुक केल्याशिवाय राहू शकणार नाहीत, याचा शोध चालू आहे. तसे, सुंदर दिसण्यात-दाखवण्यात काही चूकही नाही.

निसर्गाच्या आश्रयात परत या

चला, आम्ही आपले घर सुंदर बनविण्यास मदत करतो. आजकाल, धूळमाती आणि प्रदूषणांनी भरलेल्या वातावरणात धावते जीवन निसर्गाच्या आश्रयाकडे परतू इच्छिते. हिल स्टेशनांवरील लोकसंख्या वाढत असताना, निसर्गाच्या कुशीत मनुष्याला मनशांति मिळते हे समजणे कठीण नाही. परंतु आपल्या घरात जर आपल्याला ही मनशांति मिळाली तर…

एका रंगाच्या भिंती, खिडक्या आणि दारावर समान रंगाचे पडदे, बाबांच्या काळातील फर्निचर बदलण्याची वेळ आली आहे. आता हे इंटीरियर बदला. आपल्या आयुष्यात आणि घरात निसर्गाचे वातावरण निर्माण करण्यासाठी, आपल्या घराचा कोपरांकोपरा निसर्गाच्या थीमवर सजवा. प्राणी, पक्षी, पर्वत, बर्फ नद्या, हिरवे गवत, झुलणारी झाडे, जर तुमच्या डोळयांसमोर असतील तर मनाला खूप आराम व मनशांती मिळेल. दिवसभर कार्यालयात काम केल्यावर, जेव्हा कंटाळलेला माणूस संध्याकाळी अशा घरात प्रवेश करेल, तेव्हा त्याला मोठा आराम आणि आनंद वाटेल.

वॉल पेंटिंग आणि सजावट

सर्व प्रथम आपण घराच्या भिंतींबद्दल बोलूया. पांढऱ्या, पिवळया किंवा फिकट निळया रंगांच्या भिंतींचे दिवस संपले आहेत. आता तेजस्वी, नखरेबाज आणि खटयाळ रंगांचा कल आहे. आजकाल बाजारात हिरव्या वेल्वेटच्या बॅकग्राउंडवर उमलणाऱ्या सुंदर फुलांचे वॉल पेपर खूप विकले जात आहेत. जर घराचा ड्रॉईंगरूम चमकदार रंगाचा असेल तर तो सकारात्मक उर्जा आणि आशा प्रसारित करेल. निसर्ग-थीम असलेले वॉल पेपर आजकाल घरांमध्ये मोठया प्रमाणात वापरले जात आहेत. ते लावणेही सोपे आहे आणि स्वच्छ करणेदेखील.

गडद रंगाच्या वॉल पेपरने ड्रॉईंग रूमची एक भिंत आणि इतर तीन भिंती हलक्या रंगाच्या नैसर्गिक चित्रांच्या वॉल पेपरने सजवा. जर पडदे, सोफा कव्हर आणि कुशन कव्हर या रंगांशी जुळत असतील तर मग अप्रतिमच. आपण एका कोपऱ्यात बोंसाई किंवा सुंदर कुंडीत लहान रोपटे ठेवा तर खिडकीवरदेखील सुंदर लहान फुलांच्या कुंडया सजवा.

पडदे नेचर प्रिंटचे असावेत

घराच्या सौंदर्यात पडदे आपली विशेष भूमिका निभावतात. आपले घर सुंदर दिसण्यासाठी आपण आपल्या घरात हेवी, रेशमी आणि महागडे पडदे लावणे आवश्यक नाही. आजकाल, निसर्ग प्रिंट्स असलेले पडदेदेखील स्वस्त किंमतीत बाजारात उपलब्ध आहेत, जे दिसण्यात अतिशय सुंदर आणि डोळयांसाठी आल्हाददायक आहेत. घराच्या भिंतीशी मॅच करणारे पडदे बसवावेत. जर भिंतींवर गडद रंगाचा वॉल पेपर असेल तर पडदे किंचित फिकट शेडचे आणि छोटया-छोटया प्रिंटचे घ्यावेत.

फुलांच्या कुंडया सजवा

बागकाम हा एक चांगला छंद मानला जातो. हे केवळ मनालाच आनंदी ठेवत नाही तर जेव्हा आपल्या कठोर परिश्रमाने वाढवलेली झाडे जेव्हा घराच्या कोपऱ्यांना सजवतात-सुगंधित करतात तेव्हा त्यातून मिळणारा आनंददेखील अत्यधिक असतो, पायऱ्यांच्या बाजू, व्हरांडा आणि छतांना हंगामी फुलांच्या कुंडयांनी सजवा. असे केल्याने आपल्या घरात ताजेपणा आणि सौंदर्य वाढते. वनस्पतींना बेडरूममध्ये ठेवू नये कारण रात्री ते कार्बन डायऑक्साईड सोडतात, जे फुफ्फुसांसाठी चांगले नाही.

झाडे नेहमी मोकळया जागांवर किंवा खिडक्यांजवळच ठेवले पाहिजेत. बाल्कनीमध्ये टांगत्या कुंडया लावा. जर आपल्याला पेंटिंगची आवड असेल तर आपण आपल्या हातांनी कुंडयादेखील रंगवू शकता. यामुळे त्यांचे सौंदर्य वाढेल.

एक कोपरा असाही सजवा

ड्रॉईंगरूमचा किंवा व्हरांडयाचा एक कोपरा झाडे-वनस्पतींनी आणि पक्ष्यांच्या पिंजऱ्यासह असा सजवा की जेणेकरून त्यामध्ये मेणबत्त्या आणि दिवे मधे-मधे ठेवता येतील. या सुंदर रंगीत मेणबत्त्या काचेच्या छोटया सुंदर जारमध्ये मेण बसवून बनवता येतात. त्यांना संध्याकाळी पेटवा. आपण पहाल की घरातील सदस्यांची दृष्टी या कोपऱ्यावरून हटणार नाही.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें