* प्रतिनिधी

डिसेंबर महिना म्हणजे थंडी आणि थंडीसोबत येते ती वर्षभर जपून वापरलेल्या सुट्ट्यांचा आनंद घेण्याची संधी. मग सुट्टीचा अर्ज द्या ऑफिसला आणि या वर्षाचे अखेरचे दिवस मनसोक्त जगून घ्या. आपल्या देशातली काही स्थळं अशी आहेत, जी थंडीच्या दिवसांत मनोहारी बनतात. चला तर मग बॅग भरा आणि कुटुंबासह नाहीतर एकटेच फिरायला बाहेर पडा.

थाजीवास ग्लेशियर, सोनमर्ग, जम्मू आणि काश्मिर

घाटाचं सौंदर्य कोणाला माहीत नाही? डिसेंबरमध्ये बर्फाचा आनंद घेण्यासाठी आणि ग्लेशियरच्या अद्भूत दृश्यांचा अनुभव घेण्यासाठी सोनमर्गचा रस्ता धरा. स्लेज राइड असो नाहीतर स्कींग. तुम्हाला अॅडव्हेंचर आवडत असेल तर इथे नक्की भेट द्या.

डाव्की, शिलाँग

डिसेंबरमध्ये तर या ठिकाणी स्वर्ग अवतरतो, इथल्या उन्मगोत नदीचं पाणी तर इतकं स्वच्छ आहे की पाण्यात चालणारी होडी हवेत चालत आहे असं वाटतं. नदीशिवाय तुम्ही इथे ताइसीम फेस्टिवल, वाघमारा, पिंजेरा फेस्टिवल, तुरा विंटर फेस्टिवल यांचाही आनंद घेऊ शकता.

डलहौजी, हिमाचल प्रदेश

थंडीच्या दिवसांमध्ये डलहौजीचं सौंदर्य आणखीनच खुलून दिसतं. थंडगार हवा, बर्फाच्छादित डोंगर...हे दृश्य तुम्हाला काही काळ सगळ्या चिंता विसरण्यास भाग पाडेल. याशिवाय तुम्ही इथे नॅशनल हिमालयन विंटर ट्रेकिंग एक्सपीडिशनमध्येही भाग घेऊ शकता.

शिमला, हिमाचल प्रदेश

डिसेंबरमध्ये तुम्ही डोंगरांच्या राजाला बघण्याची संधी सोडू शकत नाही. हनीमूनसाठी प्रसिद्ध असलेल्या शिमलामध्ये थोडी गर्दी आहे. पण तुम्ही चैल टाउनमध्ये जाऊन काहीवेळ आराम करू शकता.

ऑली, उत्तराखंड

बर्फाच्छादीत निळेशार पर्वत आणि नंदा देवीचा डोंगर एक वेगळीच अनुभूती देतात. इथे आल्यावर तुम्हाला खूप मोकळं वाटेल. इथे तुम्ही स्कींग शिकू शकता आणि जर तुम्हाला स्कींग येत असेल तर नॅशनल चॅम्पियनशिप ऑफ स्कींगमध्ये भागही घेऊ शकता.

लेह, लडाख

आयुष्यात एकदा तरी लेह, लडाखला जावं असं प्रत्येक बाइकस्वाराला वाटत असतं. इथे देशातील एकमेव फ्रोजन आईस ट्रॅक आहे. गिर्यारोहणाची आवड असणाऱ्यांनी

लेह-लडाखला डिसेंबर महिन्यात नक्की जावं. बर्फावर बसून चहाचे घोट घेण्याची स्वप्नं बघत असाल तर इथे नक्की या.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सब्सक्राइब करें

डिजिटल + 24 प्रिंट मैगजीन

(1 साल)
USD79
 
सब्सक्राइब करें
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...