- रितू वर्मा

मिना काहीशी त्रासून कपाट उघडून उभी होती. उत्सव पार्टीसाठी उद्या तिला मैत्रिणीच्या घरी जायचे होते पण काय घालावे हेच तिला समजत नव्हते. खूप भारी साडी तिला नेसायची नव्हती. थंडीचा मोसम होता. काय करावे तिला काहीच सुचत नव्हते. त्यातच रोहनने आगीत तेल ओतले की पूर्ण कपाट कपडयांनी भरले आहे, पण हा तर तुझा नेहमीचाच प्रॉब्लेम आहे.

रोहिणीचेही काहीसे असेच आहे. तिच्या कुटुंबात तर असे विनोदाने म्हटले जाते की तिचे सर्व कुटुंब रोहिणीच्या कपडयांवरच झोपते, कारण घरातील सर्व पलंगांच्या कप्प्यात तिचेच कपडे भरलेले आहेत.

सीमाला उत्सव पार्टीमध्ये हटके कपडे घालायचे होते. त्यासाठी तिने वनपीस निवडले, पण ते घातल्यानंतर ती सर्वांच्या थट्टेचा विषय ठरली. दुसरीकडे ऋतुने मात्र उत्सव पार्टीमध्ये आपल्या जुन्या बनारसी साडीचा स्वत:साठी एक सुंदर प्लाझा कुर्ता शिवला, यामुळे पूर्ण साडीचा नव्याने वापर झाला. शिवाय केवळ ड्रेसच्या शिलाईत नवीन पोशाख तयार झाला.

महिलांना कपडे खरेदीचे वेड असते. यामुळे त्यांच्याकडे भरपूर कपडे होतात. यातील ६० टक्के कपडे त्या कधीतरीच वापरतात. त्यामुळे कपडे खरेदी करताना दोनदा विचार का नाही केला याचे नंतर त्यांच्या मनाला वाईटही वाटते.

विचारपूर्वक करा खरेदी

अशा वेळी जर महिलांनी काही गोष्टींकडे लक्ष दिले तर त्यांची ही समस्या बऱ्याच अंशी कमी होऊ शकते :
* तुम्ही गृहिणी असाल किंवा नोकरदार महिला आणि जर तुम्हाला वेस्टर्न ड्रेस आवडत असतील तर एक निळी जीन्स, सफेद शर्ट आणि काळया टीशर्टला आपल्या वॉर्डरोबमध्ये जागा अवश्य द्या. जीन्स खरेदी करताना तुम्ही फॅशनऐवजी तुमचे वय आणि शरीराची ठेवण नक्की लक्षात ठेवा.
* तुम्हाला शर्ट किंवा टीशर्ट आवडत नसेल तर एक सफेद आणि एक काळया रंगाचा कुर्ता तुमच्याकडे असायलाच हवा. हे तुम्ही कुठल्याही छोटेखानी कार्यक्रमात बिनदिक्कत घालू शकता. हे दोन्ही रंग वापरताना तुम्हाला खूप विचार करावा लागत नाही आणि ९८ टक्के महिलांवर हे दोन्ही रंग खुलून दिसतात.
* जीन्सला पारंपरिक लुक द्यायचा असेल तर एक सुंदर स्टोल अवश्य घ्या. हे तुम्ही कुर्ता आणि स्कर्टसोबतही वापरू शकता.
* आपल्या कपाटात डझनभर स्वस्त स्टोल आणि दुपट्टे ठेवण्याऐवजी काही महागडे आणि कुठल्याही कार्यक्रमासाठी योग्य ठरतील असेच स्टोल आणि दुपट्टे खरेदी करा आणि मनसोक्त वापरा.
* वनपीस सर्वच महिलांना शोभून दिसेलच असे नाही. तुमचे पोट सपाट असेल तर कुठल्याही एका रंगाचे लांब वनपीस तुमच्या वॉर्डरोबमध्ये नक्की ठेवा. यासोबतच एक लाँग ड्रॅगलर्स तुम्हाला सेक्सी तसेच क्लासिक लुकही देईल. यात पोटाचा भाग जास्त दिसतोय असे वाटत असेल तर ते कधीच खरेदी करू नका कारण ते घातल्यानंतर तुमच्यासह सर्वांचे लक्ष तुमच्या पोटाकडेच जाईल.
* कधीतरी घालायला काय हरकत आहे असा विचार करून सेलच्या नादात कुठलाही ड्रेस खरेदी करू नका, कारण तुम्ही तो कधीच घालणार नाही आणि उगाचच तो तुमच्या कपाटातली जागा अडवून ठेवेल.
* आजकाल शॉर्ट्स आणि मिनी स्कर्टचीही चलती आहे. पण तुमच्या मांडया जास्त जाड असतील तर हे घालून इतरांसमोर स्वत:चे हसे करून घेऊ नका.
* कॉटनचा ड्रेस खरेदी करण्यापूर्वी आपले वय आणि शरीराची ठेवण लक्षात घ्या.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...