* पूजा भारद्वाज

आजकाल बाजारात स्वयंपाकघरातील अशी विविध उपकरणे उपलब्ध आहेत, जे काम सुलभ करतात आणि आपला वेळ वाचवितात, ज्याद्वारे आपण आपल्या कुटुंबासमवेत वेळ घालवू शकता. तर या वेळी दिवाळीला उपकरणांची शॉपिंग करण्यापूर्वी या उपकरणांवर एक नजर टाकूया :

स्लो कुकरमध्ये बनते चवदार अन्न

स्लो कुकर हा महिलांसाठी एक वरदान आहे, जो अन्न अतिशय सोयीस्कर पद्धतीने तयार करतो. आजकाल मार्केटमध्ये सिंगल, डबल आणि ट्रिपल स्लो कूकर उपलब्ध आहेत. आपण एकाच वेळी ट्रिपल स्लो कुकरमध्ये ३ डिशेस बनवू शकता आणि आपला बराच वेळ वाचवू शकता. जर वेळे बाबत म्हणाल तर यात अन्न शिजण्यासाठी सुमारे ४ ते १० तासांचा वेळ लागतो, परंतु या धीम्या प्रक्रियेमुळे अन्नाची चव वाढते. एलपीजीपेक्षा इलेक्ट्रिक स्लो कूकर अधिक सुरक्षित असतात. ते अशा प्रकारे डिझाइन केले गेले आहेत की आपण प्रत्येक प्रकारचे अन्न शिजवू शकाल.

स्लो कुकर आपल्या सर्व स्वयंपाकाच्या गरजा पूर्ण करतो. हा व्हर्सेटाइल आहे आणि त्यात बरीच फीचर्स आहेत आणि हा पोर्टेबल आहे. याला हाताळणे खूप सोपे आहे. याला मल्टीफंक्शनल वापरासाठी डिझाइन केलेले आहे, जे हे सूचित करते की त्याची दीर्घकाळ चालण्याची क्षमता आहे आणि त्यात सुमारे ४.५४ लिटरची क्षमता आहे. यास स्टील, एबीएस आणि सिरेमिकपासून बनविलेले आहे. त्यात अॅडजेस्टेबल नॉब असते, ज्यापासून तापमान नियंत्रित केले जाते.

काम सुलभ बनवणारे ज्युसर

ज्युसर हे एक स्वयंपाकघराचे परिपूर्ण उपकरण आहे, परंतु आपल्याकडे कोणत्या प्रकारचे ज्युसर असावे, हे आपण त्याचा किती वापर कराल यासारख्या अनेक गोष्टींवर अवलंबून आहे. तसे मार्केटमध्ये २ प्रकारचे ज्युसर उपलब्ध आहेत - पहिला सॅन्ट्रिफ्यूगल आणि दुसरा मॅस्टीकेटिंग ज्युसर, ज्यांना कोल्ड प्रेशर आणि स्लो ज्यूसरदेखील म्हटले जाते. या दोघांमधील फरक एवढाच आहे की त्यांची रस काढण्याची पद्धत भिन्न आहे. सॅन्ट्रीफ्यूगल ज्यूसर हा एक खूपच सामान्य ज्युसर आहे आणि तो अधिक परवडणारादेखील आहे, तर मॅस्टीकेटिंग ज्युसर सॅन्ट्रीफ्यूगल ज्युसरपेक्षा अधिक कार्यक्षम आणि महागदेखील आहे. जर आपण स्वत:साठी एक ज्युसर विकत घेऊ इच्छित असाल तर आपल्याला सांगावेसे वाटते की ज्यूसरची रचना जितकी साधी असेल तो तितकाच चांगला असेल, कारण त्याचे फीचर्स जितके अधिक जटिल असतील तितक्याच आपल्याला अधिक अडचणी येतील.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...