* डॉ. सागरिका अग्रवाल, इंदिरा आयव्हीएफ हॉस्पिटल्स
आरोग्याच्या दृष्टीने एक्सरसाईज किंवा व्यायामाचे बरेच फायदे आहेत. पण आजकाल आपण अशी जीवनशैली जगत आहोत, जिथे व्यायामासाठी जराही वेळ नसतो. बऱ्याच वर्षांपासून जीवनशैली एकाच प्रकारची असल्यामुळे अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. यामध्ये शारीरिक स्थितीसह मानसिक परिस्थितीचाही समावेश असतो.
कुठल्याही प्रकारे का असेना, पण आपल्या शरीराला रोज थोडया प्रमाणात सक्रिय राहाणे गरजेचे असते. यामुळे आपल्या शारीरिक विकासास प्रोत्साहन मिळते आणि आपली एकूण कार्यक्षमताही वाढते. व्यायामाचे जसे अनेक सकारात्मक पैलू आहेत तसेच नकारात्मक पैलूदेखील आहेत, ज्यांच्याकडे ठराविक लोकांचेच लक्ष जाते. जसे की भरपूर व्यायामामुळे प्रजनन क्षमतेवर दुष्परिणाम होऊ शकतात.
एक्सरसाईजचे सकारात्मक पैलू
हृदयाच्या स्थितित सुधारणा : आपण शारीरिकरित्या किती काम करतो यावर आपल्या हृदयाची स्थिती अवलंबून असते. जे लोक दररोज शारीरिकदृष्टया सक्रिय नसतात, त्यांनाच हृदयाशी संबंधित सर्वात जास्त आजार असतात.
चांगली झोप न येणे : अनेक अभ्यासांद्वारे हे सिद्ध झाले आहे की जे लोक नियमित व्यायाम करतात, त्यांना रात्री चांगली झोप येते. हे यामुळे घडते कारण व्यायामामुळे शरीराची सर्केडियन रिद्म व्यायामामुळे मजबूत होते, जी आपल्याला दिवसा सक्रिय ठेवण्यास मदत करते. यामुळे रात्री चांगली झोप येते.
शारीरिक उर्जेमध्ये वाढ : आपल्यापैकी अनेक लोकांच्या मनात एक्सरसाईजबाबत अनेक प्रकारचे गैरसमज असतात, जसे की एक्सरसाईज आपल्या शरीराची सर्व शक्ती शोषून घेते आणि त्यामुळे तुम्ही दिवसभर काहीही करू शकत नाही. प्रत्यक्षात याच्या अगदी उलट घडते. कारण एक्सरसाईजदरम्यान, तुमच्या शरीरातून काही खास प्रकारचे हार्मोन्स रिलीज होतात, जे तुम्हाला दिवसभर सक्रिय ठेवण्यास मदत करतात.
आत्मविश्वास वाढणे : नियमित व्यायामामुळे हवा तसा परफेक्ट शेप तुमच्या शरीराला मिळू शकतो. यामुळे तुमचा आत्मविश्वासही वाढतो. शरीराची उत्तम ठेवण आणि सकारात्मक विचारसरणीमुळे तुम्ही घर आणि कार्यालयातही पूर्वीपेक्षा अधिक चांगले काम करू शकता.
अति एक्सरसाईजचे नकारात्मक पैलू