* डॉ. कावेरी बॅनर्जी
काही वर्षांपूर्वी माझ्याजवळ एक जोडपं आलेलं. ३४ वर्षांच्या प्रतिभाचं ३६ वर्षांच्या अशोकबरोबर लग्न झालेलं. ते दोघेही आयटी प्रोफेशनल होते आणि आमच्या क्लीनिकमध्ये प्राथमिक इन्फर्टिलिटीची तक्रार घेऊन आलेले. ज्याची त्यांना गेल्या ५ वर्षांपासून समस्या होती. त्यांच्याशी चर्चा केल्यावर असं लक्षात आलं की लग्नानंतर आपल्या व्यस्ततेमुळे त्यांनी कधीच चांगल्याप्रकारे शारीरिकसंबंध ठेवले नाही. त्या जोडप्याची काउन्सिलिंग केली गेली. त्यांना योनीमार्गातून कृत्रिम बीजरोपण प्रक्रियेबद्दल समजावलं गेलं. ते जोडपं यासाठी तयारही झालं आणि या प्रक्रियेच्या तिसऱ्या टप्प्यात प्रतिभा गर्भवतीही झाली. आता ती एका वर्षांच्या स्वस्थ मुलाची आई आहे.
प्रतिभाचं प्रकरण काही अशा प्रकारचं एकमेव प्रकरण नाहीए. अलीकडे प्रजननाचं वय असलेल्या प्रत्येक १० पैकी एका जोडप्याला गर्भधारणेस अडचण येते. शहरांमध्ये याचं प्रमाण वेगाने वाढत आहे, जिथे अशी जोडपी जास्त आहेत आणि दोघेही नोकरदार आहेत.
- वेगवेगळी कारणं
यासाठी कारणंही वेगवेगळी आहेत. अलीकडे अनेक स्त्रिया आपल्या करिअरच्या बाबतीत गंभीर असतात आणि स्वत:ला पूर्णपणे स्थिर केल्यानंतरच लग्न करण्याचा निर्णय घेतात. त्यामुळे त्यांच्या लग्नालाही उशीर होतो. अनेक प्रकरणांमध्ये लग्न होता होता मुली तीशी ओलांडतात. मात्र स्त्रियांच्या शरीराची निर्मिती अशाप्रकारे असते की वयाच्या तिशीनंतर तिच्या शरीरातील प्रजननयोग्य अंड्यांची उत्पादन क्षमता कमी होऊ लागते. यामागचं कारण म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या शरीरात मासिक पाळीच्या सुरुवातीला तीन ते पाच लक्ष अंडी असतात. वयाच्या तिशीनंतर तिच्या शरीरातील प्रजननयोग्य अंड्यांची उत्पादनक्षमता कमी होऊ लागते. यामागचं कारण म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या शरीरात मासिक पाळीच्या सुरुवातीला तीन ते पाच लक्ष अंडी असतात. मासिक पाळी संपण्याच्या वयापर्यंत पोहोचता पोहोचता तिच्या शरीरातील संपूर्ण अंडी नष्ट झालेली असतात.
पुरुषांच्या विपरीत स्त्रियांमध्ये दर महिन्याला अंडयांची उत्पत्ती होत नाही. वयाच्या पस्तीशीनंतर प्रजननक्षमतेत वेगाने घट होऊ लागते. अशात अंड्यांची गुणवत्ता खराब होऊ लागल्याने अनेक स्त्रियांना गर्भधारणेत समस्या येऊ लागते.