पाकृकती सहकार्य * अनुपमा गुप्ता
ऑलिव्हचे लोणचे
साहित्य
* १०० ग्रॅम ऑलिव्ह
* अर्धा लहान चमचा मोहरी
* अर्धा लहान चमचा मेथी
* अर्धा लहान चमचा बडीशेप
* पाव चमचा तिखट
* पाव चमचा कलौंजी
* ३-४ कापलेल्या हिरव्या मिरच्या
* १ लहान चमचा हळद
* ३ मोठे चमचे मोहरीचे तेल
* मीठ चवीनुसार.
कृती
ऑलिव्ह धुवून, सुकवून कापून घ्या. मोहरी, बडीशेप व मेथी जाडसर कुटून घ्या. एका बाऊलमध्ये ऑलिव्ह व मोहरी, बडीशेप व मेथी याची पावडर, कलौंजी, तिखट, हळद, मीठ, हिरव्या मिरच्या व तेल चांगले एकत्र करा, मग काचेच्या बरणीत भरून २-३ दिवस उन्हात ठेवा. लोणचे तयार आहे.
बेसनाची चटपटीत भुर्जी
साहित्य
* १ कप बेसन
* २ कापलेला पातीचा कांदा
* १ टोमॅटो कापलेला
* २ कापलेल्या हिरव्या मिरच्या
* १-१ मोठा चमचा कापलेल्या लाल, पिवळया, हिरव्या, सिमला मिरच्या
* पाव कप मटार
* १ लहान चमचा आले
* १ मोठा चमचा तेल
* पाव लहान चमचा हळद
* अर्धा चमचा धणे पूड
* थोडे तिखट
* अर्धा चमचा छोले मसाला
* १ मोठा चमचा कापलेली कोथिंबीर
* मीठ चवीनुसार.
कृती
कढईत तेल गरम करून त्यात आले, पातीचा कांदा व सिमला मिरची परतून घ्या. त्यानंतर त्यात हिरवी मिरची, टोमॅटो आणि मटारचे दाणे टाका. नंतर त्यात हळद, धणे, तिखट व छोले मसाला मिसळा. बेसनात पाणी व मीठ मिसळून मिश्रण तयार करा. हे सर्व त्या गरम कढईत टाका व ढवळत रहा. ३-४ मिनिटे शिजवा. नंतर कोथिंबीरने सजवून सर्व्ह करा.