पाकृकती सहकार्य * अनुपमा गुप्ता

1) मल्टीग्रेन पालक टार्ट

साहित्य

* अर्धा कप ज्वारीचे पीठ

* अर्धा कप मक्याचे पीठ

* अर्धा कप बार्लीचे पीठ

* अर्धा कप गव्हाचे पीठ

* २ मोठे चमचे लोणी

* थोडी पालक पेस्ट

* १ लहान चमचा आले लसूण पेस्ट

* एका टॉमॅटोची पेस्ट

* थोडी हिरव्या मिरचीची पेस्ट

* ५० ग्रॅम पनीर

* १ मोठा चमचा किसलेले चीज

* मीठ चवीनुसार.

कृती

गव्हाचे पीठ, ज्वारीचे पीठ, बार्लीचे पीठ व मक्याचे पीठ चाळून घ्या. त्यात चवीनुसार मीठ व लोणी टाकून पाण्याने भिजवून घ्या. एका कढईत १ मोठा चमचा तेल गरम करून त्यात आले लसूणाची पेस्ट परतून घ्या. त्यानंतर टोमॅटो पेस्ट व हिरवी मिरची परतून घ्या. या नंतर त्यात पालक पेस्ट टाका. १-२ मिनिट हे शिजवा. पनीरचे लहान लहान तुकडे यात टाका. पिठाचे समान आकाराचे गोळे बनवा. गोळे थोडे मोठेच बनवा. ते टार्टच्या साच्यात टाका. १८० डिग्री वाट ओव्हनमध्ये बेक करा. वरून पालक पेस्ट ओतून चीज पसरवून परत ६-७ मिनिटे बेक करा व गरमगरम सर्व्ह करा.

 

2) ज्वारी बेसनाचे वडे

साहित्य

* पाऊण कप बेसन

* १ कप ज्वारीचे पीठ

* अर्धा कप दही

* १ हिरवी मिरची

* १ लसणाची पाकळी

* एक आल्याचा लहान तुकडा

* १ कप बारीक कापलेला पालक

* तळण्यासाठी तेल

* मीठ चवीप्रमाणे.

कृती

एका बाउलमध्ये बेसन, ज्वारीचे पीठ, दही, मीठ, एकत्र करून घ्या. यात लसूण, हिरवी मिरची, आले बारीक करून टाका. आता पालक व अर्धा कप पाणी या पिठात टाकून चांगले भिजवून घ्या. लहान लहान वडे तेल गरम करून तळून घ्या. सॉससोबत गरमगरम सर्व्ह करा.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...