* प्रतिनिधी
- गोल्डन ओरियो बुंदी केक
साहित्य
* ६ बुंदीचे लाडू,
* ५-२० गोल्डन ओरियोची बिस्किटे
* ५० ग्रॅम लोणी
* थोडासा चॉकलेट सॉस आणि सजवण्यासाठी शुगर बॉल्स.
कृती
बुंदीचे लाडू फोडून चुरा करा. बिस्किटे मिक्सरमध्ये वाटा. एका बाउलमध्ये वितळलेलं लोणी घ्या. बिस्किटांचा चुरा मिसळून चांगल्याप्रकारे मळा. एक चौकोनी ट्रे घ्या. बिस्किटांच्या चुऱ्याचे २ भाग करा. एक भाग ट्रेमध्ये खाली चांगल्याप्रकारे पसरून व्यवस्थित लावा. त्यावर बुंदीचा चुरा चांगल्याप्रकारे दाबून लावून घ्या. सर्वात वर पुन्हा बिस्किटांच्या चुऱ्याचा थर लावून घ्या.
चाकूच्या मदतीने वरील थर एकसारखा करून घ्या. हा ट्रे काही वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवा. हा जेव्हा चांगल्याप्रकारे सेट होईल, तेव्हा वरून चॉकलेट सॉस आणि शुगर बॉल्सने सजवा. सर्व्ह करण्यापूर्वी मनपसंत आकाराच्या तुकड्यांत कापा.
- मार्बल रसमलाई
साहित्य
* २ लीटर दूध
* दीड छोटे चमचे कस्टर्ड पावडर
* थोडेसे केशर, पाव कप साखर
* २ चिमूट वेलची पावडर
* ८-१० पिस्ते
* ८-१० मार्बल केकचे पीस
* अर्धा कप मलाई.
कृती
दूध उकळून जेव्हा अर्धे राहील, तेव्हा २ चमचे थंड दुधात कस्टर्ड पावडर घोळून उकळत्या दुधात घाला. दूध घट्ट होऊ लागेल. मग त्यात केशर, साखर आणि वेलची पावडर मिसळून २ उकळ्या येईपर्यंत गरम करा. दूध फ्रीजमध्ये खूप थंड होईपर्यंत ठेवा. मार्बल केकचे स्लाइस एका ट्रेमध्ये ठेवा. घट्ट मलाईला चांगल्याप्रकारे फेटा.
काही स्लाइसवर ही मलाई लावा आणि २-३ स्लाइसला एकावर एक ठेवून सँडविचसारखं बनवा. हे मनपसंत आकारात कापा. बाउलमध्ये घट्ट केलेले दूध ओता. मार्बल केकचे तयार तुकडे वर ठेवा. मार्बल रसमलाई खाण्यासाठी तयार आहे.