* सोमा घोष
सर्जनशील कुटुंबात जन्मलेली मराठी अभिनेत्री तेजस्विनी लोणारीला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती, ज्यात तिची आई नीलिमा लोणारीने तिला पाठिंबा दर्शविला. तेजस्विनीने केवळ मराठीच नव्हे तर हिंदी मालिकांमध्येही काम केले आहे. तेजस्विनीला नेहमीच एका नवीन कथेवर काम करायला आवडते, कारण त्यात आव्हाने असतात, ज्यामुळे अभिनयात पुढे प्रगती करण्याची संधी मिळते. तिला प्रत्येक मोठे निर्माते आणि दिग्दर्शकाचे चित्रपट करायचे आहेत, मग भले मराठी असो किंवा हिंदी तिला काही फरक पडत नाही. तिने भरतनाट्यम आणि कथक नृत्यही शिकले आहे. हसतमुख आणि नम्र स्वभावाच्या तेजस्विनीशी तिच्या यशस्वी प्रवासाबद्दल चर्चा झाली. चला जाणून घेऊया, तिची कथा तिच्या शब्दांत :
तुला अभिनयाची प्रेरणा कोठून मिळाली?
जेव्हा मी तिसऱ्या वर्गात होते, तेव्हा एका शिक्षिकेने मला माझ्या छंदाबद्दल विचारले, तेव्हा मी अभिनेत्री होण्याची इच्छा व्यक्त केली होती. खरं तर लहानपणापासूनच मी अभिनयाशिवाय दुसरा काही विचारच केला नव्हता. मला शिकायचं होतं पण त्यात मला करियर करायचं नव्हतं. कारण माझे मामा जुन्या मराठी चित्रपटांसाठी वित्तपुरवठा करायचे आणि आईनेही दिग्दर्शक म्हणून काम केले होते. परंतु घरातील लोकांना मुलींना अभिनय करु द्यायला आवडत नसे. म्हणून मी आधीच विचार केला होता की मला अभिनय करायचा आहे.
तुला कुटुंबात कोणाचा सर्वात जास्त आधार होता?
आईचा आधार सर्वात जास्त होता, कारण आईच्या कुटुंबात सर्जनशील गोष्टी जास्त होत, तर वडिलांचे कुटुंबीय चांगल्या शैक्षणिक गोष्टींवर जोर देत. मी डॉक्टर व्हावे अशी माझ्या वडिलांची इच्छा होती. जेव्हा मी १० वी नंतर अभिनयाबद्दल बोलले तेव्हा त्यांना खूप राग आला कारण ते लष्कराच्या पार्श्वभूमीचे आहेत. पण माझ्या आईचे कुटुंबीय मला अभिनयासाठी विचारायचे. जेव्हा मी अभिनय करण्यास सुरूवात केली तेव्हा माझे वडील माझ्याशी वर्षभर बोलले नाहीत, परंतु बऱ्याच चित्रपटांचे काम पाहून त्यांना आनंद झाला कारण मी अभिनयाबरोबरच माझा अभ्यासदेखील सुरू ठेवला होता.