- सोमा घोष

मन गुंतवून ठेवणारे कथानक आणि अभी (शब्बीर अहलुवालिया), प्रज्ञा (श्रुती झा), रिया (पूजा बॅनर्जी), रणबीर (कृष्ण कौल) आणि प्राची (मुग्धा चापेकर) या व्यक्तिरेखांची सशक्त साकारणी यामुळे ‘झी टीव्ही’वरील ‘कुमकुम भाग्य’ ही मालिका प्रेक्षकांमध्ये विलक्षण लोकप्रिय झाली आहे किंबहुना अभी आणि प्रज्ञाच्या प्रेमकथेने प्रेक्षकांवर गेली सहा वर्षे भुरळ घातली आहे. त्यामुळेच अलीकडेच त्यांच्या विवाहाचा सोहळा प्रेक्षकांमध्ये नवी उत्सुकता निर्माण करून गेला. पण आता सर्व प्रेक्षकांना एक जोरदार धक्का बसेल, असे दिसते. कारण आगामी भागात अभी हा पिस्तुलातील गोळी लागल्याने कड्यावरून खाली पडताना प्रेक्षकांना दिसेल. यातील एक गोष्ट म्हणजे आपल्याच मृत्यूचा हा थरारक प्रसंग शब्बीरने स्वत:च निडरपणे साकारला होता, हे ऐकून प्रेक्षकांना त्याच्याबद्दल अधिकच प्रेम वाटेल.

मालिकेच्या आगामी भागांमध्ये प्रेक्षकांना दिसेल की गुंडांची एक टोळी अभी आणि प्रज्ञा यांचा पाठलाग करते आहे. त्यांच्या तावडीतून हे दोघे कशीबशी सुटका करून घेतात. यानंतर हे जोडपे गाडीत बेशुध्द पडते. लवकरच त्यांना शुध्द येते आणि तेव्हा ते या गुंडांपासून पळ काढण्याचा प्रयत्न करतात, पण तेव्हा अभीवर गोळी झाडली जाते आणि त्यानंतर तो कड्यावरून खाली कोसळताना दिसेल. कड्यावरून कोसळण्याचा हा थरारक अॅक्शनप्रसंग स्वत: शब्बीरनेच साकारला आहे. अर्थात इतक्या उंचावरून खाली उडी घेताना त्याला सुरक्षितपणे पट्ट्याने बांधले गेले होते. शब्बीरने ज्या सहजतेने आणि थरारकपणे हा प्रसंग साकारला, त्याबद्दल त्याची पाठ थोपटावी लागेल. शब्बीरने थंड डोक्याने अचूकपणे हा प्रसंग चित्रीत केला होता.

या थरारक स्टंट प्रसंगाबद्दल शब्बीर अहलुवालिया म्हणाला, “निर्मात्यांनी जेव्हा मला सांगितलं की मला गोळी लागून मी कड्यावरून खाली कोसळतो, असा प्रसंग मला साकारावयाचा आहे, तेव्हा मला त्याबद्दल विलक्षण उत्सुकता निर्माण झाली. असे प्रसंग साकारताना नेहमीच खूप मजा येते. या प्रसंगासाठी मला उंचावरून उडी मारायची होती. तेव्हा मला पकडून ठेवणारे सुरक्षेचे सारे उपाय नीट योजले आहेत की नाहीत, याची निर्मात्यांनी पुरेपूर खबरदारी घेतली होती. हा प्रसंग कसा साकारावयाची याची नीट माहिती करून घेतल्यावर मी तो प्रसंग साकारला आणि आता प्रेक्षकांना तो कधी पाहायला मिळेल, असं मला झालं आहे.”

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...