* सोमा घोष

आज सगळे श्रेया चौधरीवर फिदा आहेत! बंदिश बँडिट्स या सर्वांनी कौतुक केलेल्या वेब सीरिजमधील तिच्या अप्रतिम अभिनयापासून ते तिच्या आकर्षक रूपड्यापर्यंत, श्रेया रोजच चर्चेत आहे. पण श्रेयाचा फिटनेसचा प्रवास फारसा सोपा नव्हता. १९ व्या वर्षी स्लिप डिस्क झालं, वजन ३० किलोपर्यंत वाढलं, पण नंतर त्यावर मात करून तिने तिचे स्वप्न गाठले.

आठवडाभरापूर्वी, श्रेयाने तिच्या लहानपणीच्या आदर्श ऋतिक रोशनला तिच्या फिटनेससाठी प्रेरणा दिल्याबद्दल श्रेय दिलं होतं. आता, एका हृदयस्पर्शी पोस्टमध्ये, तिने तिच्या फिटनेसची गाडी रुळावरून का उतरली होती याचे खरे कारण उघड केले आहे.

"मी जेव्हा सोशल मीडियावर माझ्या फिटनेसच्या संघर्षाबद्दल सांगितलं, तेव्हा लोकांकडून इतका स्नेह आणि पाठिंबा मिळेल असं वाटलं नव्हतं. मला सशक्त वाटलं, म्हणून मी माझं मन मोकळं केलं. लोकांची सकारात्मक प्रतिक्रिया मला अजूनही काहीतरी शेअर करायला प्रेरणा देते. मी हे सगळं उघड केलंय, कारण लोकांनी स्वतःवर आणि त्यांच्या मानसिक सामर्थ्यावर विश्वास ठेवला तर ते कोणत्याही अडचणींवर मात करू शकतात."

श्रेया पुढे म्हणाली, "१९ व्या वर्षी माझ्या आयुष्यात अनेक समस्या होत्या. मी मानसिकदृष्ट्या खूपच खालावले होते. या सगळ्यात माझं वजन खूप वाढलं. यामुळे माझ्या आरोग्यावरही परिणाम झाला. कोणतीही शारीरिक हालचाल बंद झाली आणि परिस्थिती आणखी बिकट झाली. त्यात स्लिप डिस्क झाल्याने सगळं आणखी कठीण झालं. पण मी माझ्या स्वप्नांसाठी खूप महत्त्वाकांक्षी होते, त्यामुळे हा एक मोठा धक्का होता. मी स्वतःकडे दुर्लक्ष केल्याचं मला जाणवलं."

"एका रात्री मी स्वतःला सांगितलं की आता स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे. माझ्या कुटुंबासाठी आणि माझ्या स्वप्नांसाठी मला स्वतःला निरोगी ठेवायचं होतं. त्यानंतर मी माझ्या फिटनेसवर लक्ष केंद्रित केलं, ३० किलो वजन कमी केलं, आणि स्लिप डिस्कची समस्या कधीच परत आली नाही."

श्रेया पुढे म्हणाली, "आज मी माझ्या फिटनेसच्या उत्तम अवस्थेत आहे. फिट राहूनच मी अभिनेत्री होऊ शकले. मला वाटतं की जीवनातल्या अडथळ्यांकडे नकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याऐवजी, त्यांना सकारात्मकतेने बघायला हवं. शेवटी, जीवन ही एक भेट आहे आणि आपण ती संपूर्णपणे जगायला हवी."

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...