* प्रतिनिधी

अभिनेत्री नर्गिस फाखरीने तिच्या संपूर्ण कारकिर्दीत चित्रपटांच्या वेगळ्या निवडीसह प्रेक्षकांमध्ये छाप पाडली आहे पण अभिनयाच्या पलीकडे अभिनेत्रीने तिच्या काही प्रसिद्ध गाण्यांमध्ये तिच्या डान्स मूव्हने सर्वांना थक्क केले आहे. तिची यार ना मिले, गलत बात है, ओये ओये आणि अधिकसारख्या लोकप्रिय गाण्यांनी केवळ संगीत लायब्ररीवरच राज्य केले नाही तर आजही ती प्रेक्षकांच्या मनात आहे.

जागतिक नृत्य दिनानिमित्त नर्गिस फाखरी हिने तिची एक खास आठवण शेयर केली आहे. या बद्दल बोलताना नर्गिस म्हणते "मला ठाम विश्वास आहे की नृत्य हा पडद्यावरील अभिव्यक्तीच्या सर्वोत्तम प्रकारांपैकी एक आहे. माझ्यासाठी नृत्य म्हणजे एक प्रकारच ध्यान आहे आणि नृत्यातून ताण विसरते. 'रॉकस्टार' करताना मी खूप घाबरले होते पण एकदा संगीत वाजले की मी थांबू शकले नाही".

दरम्यान वर्क फ्रंटवर, नर्गिस फाखरी शेवटची 'ततलुबाज'मध्ये दिसली होती. अभिनेत्रीकडे तिच्या मार्गावर येत असलेल्या प्रकल्पांची एक रोमांचक लाइनअप आहे, जी ती या वर्षाच्या शेवटी जाहीर करेल.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...