गृहशोभिकेचा सल्ला

* प्रतिनिधी

मी २७ वर्षांची अविवाहित मुलगी आहे आणि रिलेशनशिपमध्ये आहे. सध्या लग्न करण्याची इच्छा नाही. सेक्स करताना प्रियकर कंडोम वापरतो. मला हे जाणून घ्यायचे आहे की गर्भधारणा रोखण्यासाठी कंडोम खरोखर प्रभावी आहे का?सेक्स पूर्णपणे सुरक्षित राहण्यासाठी २ कंडोम एकत्र वापरले जाऊ शकतात का?

गर्भनिरोधकासाठी कंडोम हा एक सोपा आणि चांगला पर्याय मानला जातो. ते बाजारातही सहज उपलब्ध ही आहे. त्याचा वापर केवळ गर्भधारणा रोकण्यासाठीच नव्हे तर एसटीडीसारख्या समस्यांपासूनही शरीराचे संरक्षण करणे आहे.

सेक्स दरम्यान कंडोम वापरूनही गर्भधारणा तेव्हाच होऊ शकते जेव्हा कंडोम फाटला गेला असेल. सामान्यत: निकृष्ट दर्जाचा कंडोम फाटण्याची भीती असते. म्हणून आपण आपल्या प्रियकराशी याबद्दल खुलेपणाने बोलले पाहिजे. त्याला फक्त ब्रँडेड कंडोम वापरण्यास सांगा. ब्रँडेड कंडोम दीर्घकाळ टिकणारे असतात आणि ते सहजपणे तुटत नाहीत. आजकाल बाजारात अनेक फ्लेवर्समध्ये कंडोम उपलब्ध आहेत, जे सेक्सला अधिक रोमांचक बनवतात.

जरी कंडोम हे गर्भनिरोधकांचे एक चांगले साधन असले तरी तुम्हाला हवे असल्यास तुम्ही सेक्सदरम्यान महिला योनीतून गर्भनिरोधक गोळयादेखील वापरू शकता. याद्वारे तुम्ही कोणत्याही भीतीशिवाय सेक्सचा पूर्ण आनंद घेऊ शकता. पण बॉयफ्रेंडला कंडोम लावण्यास जरूर सांगा.

मी २५ वर्षांची नोकरी करणारी मुलगी आहे. मी २ महिन्यांनी लग्न करणार आहे. मला स्वयंपाक करायला येत नाही, तर मी टीव्ही मालिकांमध्ये पाहिलं आहे की जेव्हा सुनेला स्वयंपाक करायला येत नाही तेव्हा सासरचे लोक तिची चेष्टाच करत नाही तर तिला त्रास ही देतात. मला सांगा मी काय करू?

छोटया पडद्यावर प्रसारित होणाऱ्या बहुतेक मालिकांचा खऱ्या जीवनाशी दूर-दूरपर्यंतही काही संबंध नसतो. सासू-सून टाईपच्या काही मालिका तर एवढया फसव्या असतात की त्या जनजागृती करण्याऐवजी समाजात गोंधळ आणि अंधश्रद्धा पसरवण्याचे काम करतात. क्वचितच अशी एखादी मालिका असेल ज्यामध्ये सासू-सुनेचे नाते यापेक्षा चांगल्या पद्धतीने मांडले गेले असेल.

तरीही तुम्ही तुमच्या मंगेतराशी बोला आणि याबद्दल माहिती द्या, लग्नाला अजून २ महिने बाकी आहेत, त्यामुळे आतापासून स्वयंपाक करायला शिकण्यास सुरुवात करा. स्वयंपाक हीदेखील एक कला आहे, ज्यामध्ये कुशल स्त्रीला इतर कोणावर अवलंबून राहावे लागत नाही, तसेच तिला पती आणि मुलांसह घरातील सर्व सदस्यांचे खूप प्रेमही मिळते.

मी २५ वर्षांचा अविवाहित तरुण आहे. माझी अडचण माझ्या प्रेयशीबद्दल आहे, जी मनाने चांगली आहे आणि माझ्यावर खूप प्रेमही करते, पण ती नेहमी नाराज असते. मी तिला नेहमी फिरायला घेऊन जावे, चित्रपट दाखवावा, शॉपिंग करावे असे तिला वाटते, ती मला वारंवार फोन करून त्रासही देत असते. ती म्हणते तू जे काही करशील ते मला सांगून कर. कधी कधी असं वाटतं की मी वाईटरित्या अडकलोय. मला सांगा मी काय करू?

प्रत्येक प्रेयशीला वाटते की तिच्या प्रियकराने तिच्यावर प्रेम करावे, तिला वेळ द्यावा, चित्रपट दाखवायला घेऊन जावे, शॉपिंग करावे, भेटवस्तू द्याव्यात तुमच्या प्रेयशीलाही तुमच्याकडून अशीच अपेक्षा आहे. जर तुम्ही काम करत असाल आणि तुमच्याकडे वेळ नसेल तर वीकेंडला किंवा सुट्टीच्या दिवशी प्रेयशीला नक्कीच वेळ द्या. होय, उर्वरित दिवसात हालचाल विचारत रहा.

विनाकारण ती तुम्हाला वारंवार फोन करत असेल, तर त्याबद्दल तिच्याशी बोला आणि वेळेनुसार भेटण्याचे आणि फिरायला जाण्याचे वेळापत्रक निश्चिंत करा. असे करूनही जर ती जुमानत नसेल आणि तुम्हाला त्रास देत असेल तर तिच्यापासून अंतर राखण्यातच फायदा आहे.

मी २९ वर्षांची विवाहित आहे. आमचं संयुक्त कुटुंब आहे. लग्नाआधीच आम्हाला सांगितले गेले होते की मला संयुक्त कुटुंबात राहायचे आहे, तसे तर इथे कुठल्या गोष्टीची अडचण नसली तरी सासरचे बहुतेक लोक मोकळया विचारांचे नाहीत, तर मी खूप मोकळया मनाची आहे. यामुळे मला कधी-कधी त्यांची नाराजी सहन करावी लागते आणि मोकळेपणामुळे माझ्या नणंदा आणि जाऊ माझ्याकडे विचित्र नजरेनेही पाहतात. पतीला इतरत्र फ्लॅट घेण्यास सांगू शकत नाही. मला सांगा मी काय करू?

कुटुंबात कधी कधी मतभेद, वादविवाद, भांडणे होणे ही सामान्य गोष्ट आहे. पण फॅमिली हे फेसबुक किंवा व्हॉट्सअॅपसारखे नाही, ज्यात तुम्ही शेकडो लोक तर जोडले आहेत, पण तुम्हाला कोणी आवडत नसेल तर तुम्ही त्याला एकाच क्लिकवर एका झटक्यात काढून टाकू शकता. कुटुंबातील काही सदस्य तुमच्याकडे कसे पाहतात, कसे वागतात याची अजिबात पर्वा करू नका. स्वत:ला अशा प्रकारे व्यवस्थित करणे चांगले होईल की आपण नेहमीच एक सुंदर व्यक्ती राहाल. कोण कसे पाहते हे त्याच्यावर अवलंबून आहे.

आजकाल जिथे बहुतेक लोक विभक्त कुटुंबात राहतात आणि सर्व निषिद्धांमधून जातात, तिथे आजच्या काळात तुम्हाला संयुक्त कुटुंबात राहण्याची संधी मिळाली आहे, ज्यामध्ये थोडी समज दाखवली तर भविष्यात हे तुमच्यासाठी फायदेशीरच सिद्ध होईल.

गृहशोभिकेचा सल्ला

* प्रतिनिधी

  • मी ३० वर्षीय अविवाहित तरुणी आहे. लहानपणापासूनच माझ्याबरोबरच घरात ३ मोठे भाऊ आहेत. मी एकुलती एक छोटी बहीण होते. त्यामुळे भावांची लाडकी असायला हवे होते, पण लाड तर दूरच राहिले, कोणी माझ्याशी सरळ तोंडी बोलतही नसे. आई सतत आजारी राहात असे. त्यामुळे अभ्यासाबरोबर मी घरातील कामही करू लागले. एवढे करूनही माझा मधला भाऊ कुणास ठाऊक का, माझा द्वेष करत असे. नेहमी भांडण आणि मारझोड करीत असे. एकदा त्याने गळा दाबून मला ठार मारण्याचाही प्रयत्न केला. त्यावेळी आईने मधे पडून मला कसेतरी वाचवले.

माझा भाऊ बहुतेक त्याच्या बेरोजगारीमुळे तणावात राहात असे. इतर कोणावरही त्याची जोरजबरदस्ती चालत नसे. त्यामुळे तो बघावे तेव्हा मला मारझोड करीत असे. कोणीही त्याला समजाविण्याचा प्रयत्न केला नाही आणि एके दिवशी त्याने आत्महत्या केली. त्याच्या मृत्यूनंतर आईची तब्येत दिवसेंदिवस ढासळू लागली आणि मग तिचाही मृत्यू झाला. मोठया भावाने लग्न केले. मला वाटले, वहिनी घरात असल्याने आईच्या मृत्यूनंतर घरात आलेले औदासिन्य दूर होईल. मलाही घरातील कामात थोडी मदत मिळेल. माझ्या जीवनात थोडे सुख येईल, पण स्थिती अजून वाईट झाली. वहिनी घरातील कुठल्याही कामाला हात लावत नसे. माझे काम अजून वाढले. ती येताच तिने माझ्यावर लग्न करण्यासाठी दबाव टाकायला सुरुवात केली. माझी शाळा तर आईच्या मृत्यूनंतर सुटली होती. मला शिक्षणाची आवड होती. म्हणून मी प्रायव्हेट परीक्षा देऊन ग्रॅज्युएशन केले.

मला लग्न करायचे नाहीए. मला माझ्या पायावर उभे राहायचे आहे, परंतु दोन्ही भाऊ यासाठी परवानगी देत नाहीत. छोटा भाऊ मारहाण करतो आणि सांगतो की लग्न करायचे नसेल, तर घरातून चालती हो. या घरात राहण्याचा तुला काहीही अधिकार नाही. घरावर त्या दोघांचा हक्क आहे.

अनेक वेळा वाटते की विष घेऊन स्वत:चे आयुष्य संपवून टाकावे. लहानपणापासून आतापर्यंत मी केवळ दु:खच पाहात आले आहे. कधीही कोणाकडूनही प्रेमाचे दोन शब्द ऐकायला मिळाले नाहीत.

मी जन्मल्यानंतर काही दिवसांतच माझे वडील वारले. त्यामुळे आई मला अपशकुनी, काळया तोंडाची आणि न जाणो, काय-काय बोलत राहिली आहे. मग भावांचा मार व शिव्या खात राहिले. उरली-सुरली कसर वहिनीने पूर्ण केली.

मला काही कळत नाहीए की मी काय करू? नोकरी ते मला करू देत नाहीत, मला लग्न करायची इच्छा नाहीए. कारण पुरुषांवरील माझा विश्वास उडाला आहे. मला जर माझ्या घरातच माझ्या भावांकडून प्रेम मिळाले नाही, तिथे बाहेरच्यांकडून मी काय अपेक्षा करणार. कधीतरी वाटते, घरातून पळून जावे, तर कधी जीवन संपविण्याची इच्छा होते. तुम्ही सांगा मी काय करू?

हा योगायोगच म्हणावा लागेल की लहानपणापासून आतापर्यंत आपले जीवन त्रासदायक राहिले आहे. यासाठी घरातील सदस्यांपेक्षा जास्त आपल्या कुटुंबाची प्रतिकूल परिस्थिती जबाबदार राहिली आहे.

वडिलांच्या अचानक जाण्यामुळे ४-४ मुलांची जबाबदारी आपल्या आईच्या शिरावर येऊन पडली. एकटया स्त्रीसाठी हे सर्व सांभाळणे आणि एकटीने संघर्ष करत जगणे सोपे नाही. याबरोबरच ती आजारीही राहात होती. समस्यांनी त्रस्त होऊन ती सगळा राग आपल्यावर काढत असे. यावरून आपण असे समजू नका की तिचे तुमच्यावर प्रेम नव्हते.

राहिला प्रश्न आपल्या भावांच्या आपल्याप्रती व्यवहाराबाबतचा, तर आईवडील नसल्यामुळे आपल्या विवाहाची जबाबदारीही त्यांच्यावर येऊन पडली आहे. म्हणून त्यांची इच्छा आहे की, तुम्ही लग्न करावे. आपल्या भावांचे आपल्यासोबतचे वागणे प्रेमपूर्वक राहिलेले नाही, याचा अर्थ असा काढू नये की, सर्व पुरुष त्यांच्याप्रमाणेच निष्ठूर असतात.

आत्महत्येसारखी भ्याड गोष्ट आपल्याला आपल्या मनातून काढून टाकली पाहिजे. हे कुठल्या समस्येचे उत्तर नाही. आपला दुसरा पर्याय घरातून पळून जाण्याचा, तर तोही विवेकपूर्ण नाही. त्यामुळे तुम्ही एखाद्या मोठया संकटात सापडू शकता. त्यामुळे अशी चूक मुळीच करू नका.

आपले विचार सकारात्मक ठेवा आणि घरच्यांचे म्हणणे ऐका आणि लग्न करा. कदाचित, लग्नानंतर आपल्याला ती सर्व सुखे मिळतील, ज्यापासून तुम्ही आतापर्यंत वंचित राहिला आहात. आपले हक्काचे घर असेल, आपले स्वत:चे कुटुंब असेल. तिथे तुम्ही पूर्ण सुरक्षित असाल.

  • मी २७ वर्षीय विवाहिता असून, ७ वर्षीय मुलाची आई आहे. माझे पती व्यावसायिक आहेत. आमचे संपन्न आणि एकत्र कुटुंब आहे. समस्या ही आहे की, संध्याकाळी माझे पती, माझे मोठे दीर आणि सासरे एकत्र बसून दारू पितात. पतीला हरप्रकारे समजावले की, मुलगा मोठा होत आहे. त्याच्यासमोर मोकळेपणाने दारू पिणे योग्य नाही, पण पती समजून घेत नाहीत. मी माझ्या भावाकडे माझी चिंता व्यक्त केली, तेव्हा त्याने सांगितले की, मुलाला बोर्डिंगमध्ये पाठविले पहिजे. कारण घरात अभ्यासाचे वातावरण नाही. पतीला विचारले, तर त्यांचीही काही हरकत नाहीए. पण मला भीती वाटते की, एकटा राहून मुलगा कठोर बनू नये. तुम्हीच सांगा माझी काळजी योग्य आहे की नाही?

जर तुम्हाला वाटते की, घरात मुलासाठी अभ्यासाचे वातावरण नाही, तर तुम्ही त्याला बोर्डिंगमध्ये पाठवू शकता. तिथे शिस्त आणि आरोग्यपूर्ण वातावरण मिळेल. अधूनमधून तुम्ही मुलाला भेटत राहाल आणि तोही सुट्टयांमध्ये आपल्याकडे येऊ शकतो. म्हणून आपल्यासाठी त्याचे प्रेम कमी होणार नाही. सुरुवातीला तुम्हाला मुलाबाबत काळजी वाटू शकते, पण त्याच्या उत्तम भविष्यासाठी आपल्याला आपले मन घट्ट करावे लागेल.

सौंदर्य समस्या

* समस्यांचे निराकरण ब्यूटी एक्सपर्ट, इशिका तनेजा

  • केस मुलायम आणि रेशमी ठेवण्यासाठी काय केले पाहिजे?

केसांची देखभाल करण्यासाठी तुम्ही क्रिमी शॅम्पूचा वापर केला पाहिजे. तसेच क्रिमी कंडीशनर नक्की लावा. याच्यासाठी केस शॅम्पूने व्यवस्थित धुवून घ्या. यानंतर लेंथवर कंडीशनर लावून काही मिनिटे तसेच ठेवा. मग केस पाण्याने धुवा. केस कॅराटीन नावाच्या प्रोटीनने बनतात. यांच्या वाढीसाठी आपल्या रोजच्या आहारात प्रोटीनचा समावेश करा जसे की दूध, दही, मोड आलेली कडधान्ये, अंड, मासे इत्यादी. यामुळे केसांना पोषण मिळते. आठवडयातून एकदा हेअर पॅक लावा. यासाठी पिकलेले केळे, २ चमचे दूधासह मिक्सरमध्ये स्मॅश करून पेस्टमध्ये आवाकाडो, मध आणि वाटलेली पुदीन्याची पाने एकत्र करा. हे मिश्रण लेपप्रमाणे केसांवर लावा आणि काही तासांनी केस पाण्याने धुवा.

  • माझे डोळे थोडे मोठे आहेत. जेव्हा कधी मी आय मेकअप करते, तेव्हा माझे डोळे बाहेर आल्यासारखे वाटतात. मला जाणून घ्यायचे आहे की, डोळयांचा मेकअप कसा असावा जेणेकरून माझी समस्या सोडवता येईल?

डोळे मोठे असल्याने चेहरा आकर्षक दिसतो, पण असे वाटते की तुमचे डोळे थोडे जास्त मोठे आहेत. तुम्हाला तुमच्या डोळयांना सुंदर आकार द्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या पापण्यांवर गडद रंगांच्या आयशॅडोचा वापर केला पाहिजे किंवा ब्राऊन शेडचा आयशॅडो चांगला आणि नैसर्गिक दिसेल. डोळयांच्या अगदी जवळून एक पातळ आयलायनरची रेघ बाहेरपर्यंत ओढा. ही रेघ शेवटी बाहेरच्या बाजूने जाड दिसली पाहिजे. तुम्हाला तुमची समस्या कायमस्वरुपी सोडवायची असेल तर परमनंट आयलायनर लावा. परमनंट आयलायनरमुळे तुमच्या डोळयांना योग्य आकार मिळेल. मग तुमचे डोळे प्रत्येकक्षणी सुंदर आणि आकर्षक दिसतील.

  • जास्त स्टीम घेतल्यामुळे माझी त्वचा सैल झाली आहे आणि तेज कमी झाले आहे. मला काय केले पाहिजे जेणेकरून त्वचा पूर्ववत होईल आणि सतेज दिसेल?

जास्त वेळा सातत्याने स्टीम घेतल्याने असे होणे स्वाभाविक आहे. आता त्वचा पूर्ववत करण्यासाठी ए.एच.ए क्रिमने चेहऱ्यावर मसाज करा. तसेच अंडयाचा पांढरा बलक चेहऱ्यावर ६-७ मिनिटे लावून मग चेहरा पाण्याने धुवून घ्या. यासह अॅलोवेरा जेल चेहऱ्यावर लावा. उत्तम आणि चांगल्या परिणामांसाठी तुम्हाला एका चांगल्या कॉस्मॅटीक क्लिनिकने लेझर आणि यंग स्किन मास्कच्या काही सिटिंग्स केल्या पाहिजेत.

  • मला कानातले घालायला खूप आवडतात. ते माझ्या चेहऱ्यावर खुलुन दिसतात. पण जेव्हा कधी मी कानातले घालते, तेव्हा माझ्या कानाजवळ पुरळ ऊठू लागले. यामुळे सूजही येते. कृपया माझ्या या समस्येवर उपाय सांगा.

अशाप्रकारची समस्या तेव्हा येते जेव्हा स्किन सेंसेटीव्ह किंवा अॅलर्जिक असेल. तुम्ही नेहमी सोने किंवा चांदीचे कानातले घालणे अधिक योग्य ठरेल. कारण इतर धातूंच्या तुलनेत यापासून अॅलर्जी होण्याची शक्यता कमी असते.

  • माझ्या चेहऱ्यावरचा रंग २ प्रकारचा आहे. काही ठिकाणी काळपट झालेला आहे तर काही ठिकाणी उजळलेला. सनस्क्रिनचा काहीच उपयोग झाला नाही. कृपया काही उपाय सांगा ज्यामुळे रंग एकसमान होईल?

तात्पुरता रंग एक समान करण्यासाठी तुम्ही मेकअप म्हणून कंन्सिलरचा वापर करा. याव्यतिरिक्त कच्च्या पपईचे तुकडे काळपट झालेल्या जागेवर लावा. कच्च्या पपईत पॅपिन नामक एंजाइम आढळते, जे रंग उजळवण्यास मदत करते.

  • मी जेव्हा कधी लिपस्टीक लावते, तेव्हा माझ्या ओठांवर पापुद्रे येतात. कृपया मला लिपस्टीक लावण्याची योग्य पद्धत सांगा?

कधी-कधी काही लिपस्टीक सूट करत नसातील तर अशी समस्या उद्भवू शकते. अशावेळी तुम्ही ब्रँड बदलून पाहू शकता. तसेच चांगल्या गुणवत्तेच्या मॉइश्चरायझिंग लिपस्टीकचा वापरून पाहू शकता. ओठांवरील मृत त्वचा काढण्यासाठी स्क्रबिंग गरजेचे आहे. यासाठी बदाम तेलाचे काही थेंब, साखर एकत्र करून टूथब्रशने ओठांवर हळूवारपणे स्क्रब करा. घरगुती उपाय म्हणून ओठांना हायड्रेट आणि नरीश करण्यासाठी बीटाच्या रसात मध मिसळून ओठांवर लावा. असे केल्यास ओठांवर रंग येईल आणि ते सॉफ्ट होतील.

  • मी २२ वर्षांची नोकरी करणारी मुलगी आहे. स्लिव्हलेस कपडे घालत असल्यामुळे अंडरआर्मचे केस लवकर लवकर रिमूव्ह करावे लागतात. त्यासाठी फिमेल रेारचा वापर करते. यामुळे अंडरआर्म काळपट होत आहे. यासाठी काय करू?

रेझरच्या नियमित वापरामुळे केसांची वाढ कठीण होते म्हणून त्वचा काळी पडते. सर्वप्रथम तुम्ही रेझरचा वापर बंद करा. या केसांपासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही वॅक्सिंगचा वापर करू शकता किंवा पल्सड लाइट तंत्राद्वारे कायमस्वरुपी केस कमी करण्याचा उपचार करून घेऊ शकता. हे एक इटालियन तंत्र आहे. हा नको असलेले केस काढण्याचा सर्वात वेगवान, वेदनाहिन आणि सुरक्षित पर्याय आहे. लेझर अंडरआर्मवर परिणामकारक ठरते. यामुळे २ ते ३ सिटींग्जमध्ये केस निघून जातील. डार्क अंडरआर्मचा तुम्ही ब्लीचद्वारे लाइट करू शकता, पण ब्लीच नेहमी वॅक्सिंग पूर्वी करावे.

 

आरोग्य परामर्श

* पद्मश्री प्रोफेसर डॉ. महेश वर्मा, डायरेक्टर व प्रिंसिपल, मौलाना आझाद इंस्टीट्यूट ऑफ डेंटल सायन्सेस

प्रश्न : दातांमधील संवेदनशीलतेचे तात्पर्य काय आहे?

उत्तर : जेव्हा थंड किंवा गरम पेय अथवा खाद्यपदार्थांद्वारे दातांमध्ये वेदना किंवा बेचैनी जाणवते, तेव्हा त्याला दंत संवेदनशीलता म्हणतात. दातांच्या वरील थर (इनॅमल) हटल्यामुळे आतील थर ‘डँटीन’ तोंडाच्या संपर्कात येतो. त्यामुळे त्यातील नसांमध्ये संवेदनशीलता निर्माण होते.

प्रश्न : दातांमध्ये संवेदनशीलतेची समस्या सामान्यपणे आढळते का?

उत्तर : हो, ही समस्या खूप सामान्य आहे. सामान्यपणे २०-५० वयोगटांतील लोकांमध्ये ही समस्या असते.

प्रश्न : संवेदनशीलता किती प्रकारची असते?

उत्तर : हिरड्यांच्या समस्येमुळे संवेदनशीलता.

* दात झिजल्यामुळे संवेदनशीलता.

* दात हिरड्यांच्या ठिकाणी झिजल्यामुळे संवेदनशीलता.

* दातांना कीड लागल्यामुळे संवेदनशीलता.

* आम्लामुळे होणारी संवेदनशीलता.

* दंतप्रक्रियेनंतर होणारी संवेदनशीलता.

प्रश्न : संवेदनशीलतेमागे काय कारणे आहेत?

उत्तर : जर तोंडाची स्वच्छता योग्यप्रकारे केली नाही, तर प्लाक एकत्र झाल्याने दातांच्या वरील थर (इनॅमल) हटतो व दातांमध्ये संवेदनशीलता सुरू होऊ लागते.

* वयाबरोबर हिरड्या दातांना सोडू लागतात. विशेषत:  जर स्वच्छता ठेवली नाही. यामुळेही संवेदनशीलता निर्माण होते.

* कडक ब्रशच्या वापराने व वेगाने मागे-पुढे ब्रश केल्यानेही दात झिजतात व संवेदनशीलता जाणवते.

* अनेक लोकांना रात्रीचे ब्रश करायची सवय असते. त्यामुळे दातांच्या वरचा थर हटतो व संवेदनशीलता सुरू होते.

* दातांना कीड लागल्याने बॅक्टेरिया इनॅमलला नष्ट करतात, त्यामुळे दात संवेदनशील होतात.

* दातांना जर मार लागला, तर त्याचा परिणाम आतील थरांवर होऊ शकतो व संवेदनशीलता उत्पन्न होऊ शकते.

* माउथवॉश, ज्यात आम्लता असते, त्याचा वापर इनॅमलच्या थराला हटवतो व संवेदनशीलता निर्माण होते.

* आम्लयुक्त खाद्यपदार्थांमुळेही इनॅमलच्या थराला नुकसान पोहोचते व संवेदनशीलता निर्माण होते.

* काही दंत प्रक्रियेनंतरही संवेदनशीलता निर्माण होते. उदा. दातांची सफाई, क्राउन लावल्यानंतर, दात भरून घेतल्यानंतर इ. काही आठवड्यानंतर ही संवेदनशीलता बरी होते.

प्रश्न : दंत संवेदनशील झाल्यावर कोणते उपचार केले पाहिजेत?

उत्तर : जर दातांवर कॅलकुलस किंवा टार्टर जमा असेल, तर मशीनद्वारे ते काढलं जातं. त्याबरोबरच संवेदनशीलतेसाठी टूथपेस्ट, जिला डिसेंसिटायजिंग टूथपेस्ट म्हणतात व माउथवॉशचा उपयोगही लाभदायक ठरतो.

* फ्लोराइड वार्निश इनॅमल व डेंटीनला मजबुती देतो व संवेदनशील दातांच्या वेदना व बेचैनीला कमी करतो.

* ज्या हिरड्या दात सोडत आहेत, त्यांच्यासाठी मुळांवर बाँडिंग एजेंट लावल्याने खूप प्रभाव पडतो. तोंडाच्या दुसऱ्या एखाद्या भागातून हिरडी घेऊन ग्राफ्टिंगही करू शकता.

* दातांना कीड लागल्याने संवेदनशीलता कमी होण्यासाठी त्यात योग्य मसाला भरू शकता. जर कीड आतपर्यंत लागली असेल, तर रूट कॅनलचा उपचार करून क्राउन लावता येईल.

* दातांच्या झिजण्याच्या सवयीसाठी माउथ गार्डद्वारे उपचार केले जातात, जेणेकरून दातांचे अजून पुढे नुकसान होऊ नये.

* दातांना मार लागल्यानंतर क्षतीनुसार उपचार केले जातात. मसाला भरणे किंवा रूट कॅनलचा उपचार व क्राउन लावला जातो.

प्रश्न : दातांच्या संवेदनशीलतेपासून वाचण्यासाठी काय उपाय आहे?

उत्तर :  तोंडाची स्वच्छता चांगल्याप्रकारे केली पाहिजे. दिवसातून २ वेळा ब्रश करण्यासोबतच माउथवॉशचा वापर करणेही चांगले असते.

* मऊ केसांच्या ब्रशचा वापर केला पाहिजे. ब्रश करण्याची योग्य पध्दत स्विकारली पाहिजे.

* फ्लोराइडयुक्त माउथवॉश, ज्यात आम्ल नसेल, त्याचा वापर केला पाहिजे.

* ज्या खाद्यपदार्थांमध्ये आम्लाचे प्रमाण जास्त असेल, त्यापासून दूर राहिले पाहिजे.

* दंत विशेषज्ञांद्वारे नियमितपणे तपासणी करून घेतली पाहिजे. जेणेकरून दातांना कीड लागलेली असेल किंवा हिरड्यांचा आजार असेल किंवा अन्य कोणती समस्या असेल, ज्यामुळे संवेदनशीलता निर्माण होऊ शकते, त्यावर सुरुवातीलाच उपचार होईल, तर ते पुढे वाढणार नाही.

गृहशोभिकेचा सल्ला

* प्रतिनिधी

  • मी 17 वर्षांच आहे आणि 20 वर्षांच्या मुलावर खूप प्रेम करत. त्यालाही माझी इच्छा आहे आणि लग्न करायचे आहे. दुसरा मुलगाही मला हवा आहे. मी त्याला मनाई केली आहे, पण तो सहमत नाही. मी काय करू?

तुमचे वय प्रेम आणि लग्नासाठी योग्य नाही. चांगल्या मुलांशी मैत्री ठीक आहे, पण पुढे जाऊ नका, तुमच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करा आणि एकट्या मुलांना भेटू नका.

हे पण वाचा…

तरुण राहण्यासाठी आयुष्यभर सेक्स करा

काही दिवसांपासून आलोक काही बदलांसह दिसत आहे. ते पूर्वीपेक्षा आनंदी होऊ लागले आहेत. आजकाल, तरुण त्यांची सक्रियता पाहून स्तब्ध झाले आहेत. वास्तविक, त्यांच्या घरात थोडा आनंद आला आहे. तो बाप झाला आहे. वयाच्या 52 व्या वर्षी पुन्हा एकदा वडील होण्याची भावना त्याला प्रत्येक क्षणी रोमांचित करते. त्यांची 38 वर्षांची पत्नी सुदर्शन या आनंदात भर घालते. सुदर्शनचे हे पहिलेच मूल असले तरी ते आलोकचे तिसरे आहे.

वास्तविक, आलोकच्या पहिल्या पत्नीला 5 वर्षे झाली आहेत. त्यांची मुलं तरूण झाली आहेत आणि त्यांच्या घराची उत्तम काळजी घेत आहेत. काही दशकांपूर्वी असती तर, या परिस्थितीत, आलोकच्या हृदयात आणि मनात, मुलांच्या योग्य तोडगा समोर काही बोलले नसते. या वयात त्याने आपल्या आनंदासाठी पुन्हा लग्न करण्याची इच्छा केली असेल, पण समाजाच्या दबावामुळे त्याला हा आनंद लागू करता आला नाही. आता काळ बदलला आहे. एम्प्टी नेस्ट सिंड्रोममधून बाहेर पडून लोक त्यांच्या आरोग्याबद्दल जागरूक झाले आहेत. आणि तो त्याच्या आनंदाबद्दल अधिक स्पष्ट आणि स्पष्टवक्ते आहे. आता लोक 70 वर्षांपर्यंत निरोगी आणि सक्रिय राहतात.

जेव्हा आलोकने पाहिले की त्याच्याबद्दल त्याच्या मुलांचे वर्तन दिवसेंदिवस बिघडत आहे. मुलांना त्यांचे करिअर आणि भावी आयुष्य सुधारण्याच्या गर्दीत त्यांचा आनंद जाणून घेण्याची आणि अनुभवण्याची वेळ नाही, म्हणून आलोकने त्यांच्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतलाच नाही तर पुन्हा एकदा त्याचे आयुष्य व्यवस्थित करण्याची इच्छा निर्माण केली.

एके दिवशी इंटरनेटच्या माध्यमातून त्याची भेट सुदर्शनला झाली, जी त्याच्यासारख्या चांगल्या नोकरीत होती. आर्थिक दृष्टिकोनातून एक तोडगा निघाला, पण करिअर प्रकरणामुळे लग्न योग्य वयात होऊ शकले नाही. ती 37 वर्षांची होती. एका सुंदर तरुणाचे स्वप्न ती विसरली होती. त्याला आता व्यावहारिक मित्राची गरज होती.

सुदर्शनाने व्यावहारिक जीवन साथीदाराचे सर्व गुण प्रकाशात पाहिले. दोघांनीही कायदेशीर मार्गाने लग्न केले.

कोक्षशास्त्रात असे म्हटले आहे की पुरुषांची लैंगिक क्षमता पूर्णपणे त्यांच्याच हातात असते. वास्तविक, ज्यांनी तारुण्यात त्यांच्या आरोग्याकडे लक्ष दिले त्यांच्यासाठी मध्यम वयासारखे काही नाही. सत्य हे आहे की या युगात मध्यमवयीन पुरुष आता अर्ध्या शतकापूर्वी पूर्वीसारखे नव्हते. स्त्रियांना रजोनिवृत्तीमुळे दीर्घकाळ निसर्गासमोर आपले मातृत्व टिकवून ठेवण्याची सक्ती केली जाते, परंतु वयामुळे स्त्रीत्वाचे आकर्षण त्यांच्यात राहिले नाही.

सेक्सचा आनंद घ्या

आज, माणूस 50 किंवा 55 किंवा 60 वर्षांचा असो, निरोगी असण्याची जाणीव त्याला या वयातही तंदुरुस्त ठेवत आहे, जरी त्याला यात निसर्गाचा पाठिंबा मिळाला आहे. खरं तर, वयानुसार, त्याच्या कामगिरीमध्ये काही प्रमाणात घट होत आहे, परंतु त्याची क्षमता अजिबात संपत नाही.

इथे गोंधळून जाऊ नका, हे सर्व यापूर्वी सहज होत आले आहे. परंतु अशा क्षमता सामान्यतः राजे, महाराज आणि अमीर उमराव यांच्यापुरत्या मर्यादित होत्या कारण ते सामान्यतः निरोगी आणि आरोग्य जागरूक होते. पूर्वी ना सामान्य माणसाला निरोगी राहण्याचे साधन इतके सहज उपलब्ध होते, ना त्याला त्याचे ज्ञान होते, म्हणून म्हातारपण त्याच्याकडे लवकर यायचे.

बरं हस्तमैथुन हा दीर्घकाळ सेक्समध्ये सक्षम आणि सक्रिय राहण्याचा एक सोपा मार्ग आहे. हस्तमैथुन ही अशी प्रक्रिया आहे ज्यात इतर कोणाचीही गरज नसते. शरीरशास्त्राचे धडे असे म्हणतात की शरीराचा जो भाग तुम्ही सक्रिय ठेवता, त्याचे आयुष्य दीर्घ असेल आणि ते त्या काळासाठी सक्षम राहील. खरं तर, सेक्सच्या बाबतीतही हे खरं आहे. खरं तर, एखादी व्यक्ती जितकी जास्त सेक्स करते, तितका जास्त काळ तो सेक्स करू शकतो.

प्रसिद्ध तज्ज्ञ डॉ जॉन्सन यांनीही सांगितले आणि आजचे सेक्सोलॉजिस्टदेखील मानतात की तारुण्यातील लैंगिक क्रियाकलाप दीर्घकाळ लैंगिक क्षमता राखण्यासाठी आवश्यक आहे. जर हा उपक्रम राहिला, तर वयाच्या पन्नाशीनंतरही पुरुषाला नपुंसक होण्याची भीती राहत नाही. एवढेच नाही तर त्याला 70 वर्षे वडील होण्याचा आनंदही मिळू शकतो.

लैंगिक शास्त्रज्ञ हस्तमैथुनला विशेष महत्त्व देतात. खरं तर, जो पुरुष आपले लिंग अधिक सक्रिय ठेवतो, त्याची सेक्सची इच्छा अधिक वाढते कारण या प्रक्रियेत पुरुषाचे जननेंद्रियाचा भरपूर व्यायाम होतो.

बऱ्याच वेळा पुरुष आपल्या बायकांना संतुष्ट करू शकत नाहीत कारण ते सेक्सच्या बाबतीत सतत सक्रिय नसतात. यामुळे त्यांच्या विशिष्ट भागांचा व्यायामही होत नाही आणि त्यांना शेवटच्या क्षणी लाजेला सामोरे जावे लागते. म्हणजेच, या प्रकरणात निष्क्रियता लैंगिक सुख नाकारते.

सेक्सोलॉजिस्टच्या मते, हस्तमैथुन लैंगिक क्षमता टिकवून ठेवण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. हे केवळ पुरुषांना निरोगी ठेवत नाही तर त्यांना चांगले सराव देखील करते. एवढेच नाही तर वयानुसार सेक्सची इच्छा वाढवण्यास मदत होते.

मी मास्कने मेकअप करू शकत नाही का?

*प्रतिनिधी

प्रश्न लॉकडाऊनमध्ये फेस मास्कमुळे मेकअप पूर्णपणे खराब होतो.
मी मास्कने मेकअप करू शकत नाही का?

उत्तर मास्कसह मेकअप शेवटपर्यंत टिकवण्यासाठी, तुम्ही मॅट फिनिश आणि लवंग घालून फाउंडेशन आणि कन्सीलर वापरता. यासह तुमचा मेकअप पसरणार नाही.

हे दोन्ही तुमच्या त्वचेमध्ये चांगले मिसळतात आणि कोरडे फिनिश आणण्यासाठी स्थिर होतात. बेस मेकअप लावण्यापूर्वी तुम्हाला हलके वजन, हायड्रेटिंग प्राइमर वापरावे लागेल. यामुळे तुमची त्वचा स्पष्ट आणि गुळगुळीत होईल.

मेकअप लागू केल्यानंतर, तुम्हाला मेकअप स्पंज किंवा मोठ्या फ्लेकी ब्रशच्या मदतीने तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेवर थोडी सैल पावडर लावावी लागेल. अतिशय हलकी पावडर लावल्याने तुमची त्वचा चांगली दिसेल आणि तुमचा मेकअपही दिवसभर अबाधित राहील. यानंतर, आपण पावडरवर सेटिंग फवारणी करा. ते कोरडे होऊ द्या. यानंतरच मास्क लावा म्हणजे तुमचा मेकअप योग्य राहील.

लिपस्टिक पसरण्याची शक्यता कमी करण्यासाठी हायड्रेटिंग घटकांसह मॅट फॉर्म्युला किंवा लिक्विड लिपस्टिक वापरा. हे तुमचे ओठ कोरडे होण्यापासून प्रतिबंधित करते.

एक पर्याय म्हणून, आपण कायम लिपस्टिकदेखील लावू शकता. तुमच्या चेहऱ्यावर फक्त तुमचे डोळे आहेत जे मास्क घातल्यानंतरही दिसतात. आपण यासाठी काहीही प्रयत्न करू शकता.

तुम्ही सॉफ्ट स्मोकी डोळ्यांपासून रंगीबेरंगी आयशॅडो, ग्राफिक आयलाइनर्सपर्यंत काहीही वापरून पाहू शकता. आपल्या भुवया भरण्यास विसरू नका आणि फटक्यांवर मस्करा लावा.

कशी हवी प्रेगनन्सीमध्ये सेक्स पोझिशन

– मिनी सिंह

प्रेगनन्सीवेळी महिला खूपच जागरूक होतात. गर्भातील बाळाला धोका निर्माण होऊ नये यासाठी त्या पतिसोबतचे शारीरिक संबंध टाळण्याचा प्रयत्न करतात. पण डॉक्टरांच्या मते, गर्भावस्थेतही संभोग करता येतो. हो, पण जर गर्भवती महिलेची प्रकृती नाजूक असेल किंवा काही कॉम्प्लिकेशन्स असतील तर शारीरिक संबंध ठेवू नये, पण पत्नीपासून खूप काळ दूर राहणे पतिसाठी अशक्य असते. यामुळे नात्यात दुरावा निर्माण होण्याची शक्यता वाढते. अशावेळी या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी जाणून घेऊया की गर्भावस्थेत सेक्स संबंध कसे साधावेत :

गर्भावस्थेदरम्यान सेक्सवेळी या पोझिशनद्वारे सुरक्षित सेक्सचा आनंद घेता येऊ शकेल आणि यामुळे होणारे बाळ आणि आईलाही त्रास होणार नाही.

पहिली पोझिशन : पती आणि पत्नीने एकमेकांसमोर झोपावे. पत्नीने आपला डावा पाय पतिच्या शरीरावर ठेवावा. अशा पोझिशनमध्ये सेक्स केल्याने गर्भाला झटके बसत नाहीत.

दुसरी पोझिशन : पत्नीने पाठीवर टेकून आपली पावले दुमडून पाय पतिच्या खांद्यावर ठेवावे. त्यानंतर सेक्स करावा. यामुळे पोटावर दाब येणार नाही.

तिसरी पोझिशन : पतिने खुर्चीवर बसावे आणि पत्नीने त्याच्यावर बसावे. सुरक्षित सेक्समध्ये हेदेखील येते.

काही व्यायामांद्वारेही सेक्स करता येतो. पण त्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

खबरदारी

* गर्भावस्थेत सेक्सदरम्यान पतिने पत्नीची विशेष काळजी घ्यायला हवी. पतिने जास्त उत्तेजित होऊ नये आणि पत्नीवर दबाव आणू नये.

* गर्भावस्थेत सेक्स करावा, पण कोणताही नवा प्रयोग करू नये.

* सेक्स करताना पत्नीवर जास्त दबाव पडणार नाही याकडे लक्ष द्यावे.

* गर्भावस्थेत प्रसूतीच्या कळांपूर्वीपर्यंत सेक्स करता येतो, पण गर्भवतीस याचा त्रास होऊ देऊ नये.

गर्भावस्थेत सेक्सचे फायदे

प्रेगनन्सीत सेक्स आई आणि बाळ दोघांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. कसे ते माहीत करून घेऊया :

* गर्भावस्थेत सेक्स केल्यामुळे तुमच्या पेल्विक मांसपेशी आखडतात आणि प्रसूतीसाठी जास्त मजबूत होतात.

* प्रेगनन्सीदरम्यान लवकर लघवी होणे, हसल्यावर किंवा शिंकल्यास पाणी निघणे इत्यादी समस्या मूल मोठे होऊ लागल्यामुळे मूत्राशयावर पडणाऱ्या दाबामुळे निर्माण होतात. हे थोडे असुविधाजनक होऊ शकते, पण यामुळे तुमच्या मांसपेशी मजबूत होतात, ज्यामुळे प्रसूतीवेळी फायदा होतो.

* सेक्स केल्यामुळे महिला जास्त फिट राहतात. यादरम्यान त्या फक्त ३० मिनिटांत ५० कॅलरीज कमी करू शकतात, जे त्यांच्या आरोग्यासाठी चांगले असते.

* गर्भावस्थेत सेक्स केल्यामुळे महिलांची सहनशक्ती ७८ टक्के वाढते. याचा फायदा तिला प्रसूतीवेळी होतो.

* सेक्सनंतर रक्तदाब कमी होतो. अधिक रक्तदाब आई आणि बाळ दोघांसाठीही नुकसानकारक असतो. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणेच चांगले असते.

* ऑक्सिटोसीन हार्मोन संभोगावेळी शरीरातून बाहेर पडते, जे तणाव कमी करण्यासाठी उपयोगी असते. यामुळे चांगली झोप येते.

जेव्हा डॉक्टरांना काही जटिल समस्या जाणवतात, तेव्हा ते सेक्स न करण्याचा सल्ला देतात. समस्या अनेक प्रकारच्या असतात जसे की :

* पूर्वी कधी गर्भपात झाला असेल तर.

* पूर्वी कधी वेळेआधी बाळाचा जन्म झाला असेल तर.

* जर गर्भपाताची भीती असेल तर.

* योनीतून जास्त रक्तस्त्राव होणे किंवा तरल पदार्थ वाहत असेल तर.

* एकापेक्षा अधिक मुले झाल्यास.

प्रेगनन्सी सुलभ आणि सुरक्षित व्हावी असे वाटत असेल तर गर्भरक्षा कवच, गर्भाच्या सुरक्षेसाठी चमत्कारी जादूटोणा, पुत्रप्राप्तीसाठी तंत्रमंत्र इत्यादींपासून दूर राहा. कारण अशा वेळी जादूटोणा नाही तर पती-पत्नीमध्ये प्रेम आणि चांगले संबंध असणे जास्त गरजेचे आहे. या काळात स्वत:कडे आणि होणाऱ्या बाळाकडे संपूर्ण लक्ष द्या. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागा आणि पौष्टीक आहार घ्या, जेणेकरून तुमच्या शरीराला पोषक तत्त्वे पुरेशा प्रमाणात मिळतील, जी तुमच्या होणाऱ्या बाळाच्या विकासासाठी गरजेची आहेत.

सौंदर्य समस्या

* समस्यांचं समाधान, एअरब्रश मेकअप एक्सपर्ट इशिका तनेजा

  • मला माझे कर्ली केस सांभाळायला खूप त्रास होतो. कारण ते खूप गुंततात. त्याबरोबर निर्जीव व कोरडेही झाले आहेत? आणि गळुही लागले आहेत. कृपया काही उपाय सांगा.

कर्ली केसांना कोमट तेलाने मालीश केल्याने केसांना फायदा होतो. असे नियमितपणे केल्यास आपले कर्ली केस खूप सुंदर होतात. कोकोनट ऑइल, ऑलिव्ह किंवा मग आल्मंड ऑइलने आपण केसांना मसाज करू शकता. दररोज शाम्पू केल्याने केस खराब होऊ शकतात, त्यामुळे केस गळती सुरू होते आणि केस डिहायड्रेट होऊ लागतात. त्यामुळे हा सल्ला दिला जातो की केस जास्त धुऊ नका.

कर्ली केस जास्त घट्ट बांधू नयेत. असं केल्यास कुरळे केस मुळातून कमजोर होऊन तुटू लागतात. जर आपले केस कुरळे असतील, तर ते हलके ओले असताना विंचरा. त्यामुळे केस कमी गुंततील. कुरळ्या केसांवर ड्रायरचा वापर कमी करा. कारण याच्या जास्त वापराने केस कमजोर होतात.

  • माझे वय ३५ वर्षे आहे. मी माझ्या कपाळावर मोठी टिकली लावते. त्यामुळे त्या ठिकाणी कायमचा स्पॉट पडला आहे. या स्पॉटला घरगुती उपायाने दूर केले जाऊ शकते का?

घरगुती उपचारांवर वेळ न घालवता जेवढ्या लवकर शक्य आहे, तेवढ्या लवकर स्किन स्पेशालिस्टला दाखवा. आपल्या मर्जीने कोणतेही औषध किंवा क्रीम वापरू नका. खरे तर खराब क्वालिटीच्या टिकलीमध्ये मोनोबँजॉइल इस्टस ऑफ हाइड्रोक्यूनोन पदार्थ आढळतो. त्यामुळे त्वचेला डाग पडतात. त्यामुळे ब्रँडेड टिकलीच लावा.

  • पेन्सिल आयलाइनर आणि लिक्विड आयलाइनरमध्ये कोण चांगला रिल्ट देतं?

लिक्विड आयलाइनरने डोळे जेवढे मोठे आणि आकर्षक दिसतात, तेवढे पेन्सिल आयलाइनरने दिसत नाही. लिक्विड आयलाइनर खूप वेळपर्यंत टिकून राहतो. ज्या लोकांची त्वचा ऑइली असते, त्यांच्यासाठी लिक्विड आयलाइनर एका जॅकपॉटप्रमाणे असतो. लिक्विड लाइनर दीर्घकाळपर्यंत त्याच शेपमध्ये राहतो. सोबतच हा अगदी स्वच्छही दिसतो. तर दुसऱ्या बाजूला पेन्सिल किंवा पावडर आयलाइनर डोळ्यांच्या आजूबाजूला ऑइल प्रोड्यूस झाल्यामुळे दिवसभर त्याचा शेप खराब करू शकतं किंवा मग संपूर्ण पुसूनही जाऊ शकतं. लिक्विड आय लाइनरचा एक सर्वात मोठा फायदा हा आहे की आपण याच्या मदतीने आपली काहीही क्रिएटिव्हिटी करू शकता.

माझे वय २० वर्ष आहे. माझी नखं खूप खरखरीत आणि कडक आहेत. ती सॉफ्ट करता येतील का?

नखे केवळ ती नाहीत, जी दिसतात. नखांच्या दिसणाऱ्या भागाला नेल प्लेट म्हणतात. त्याच्याखाली नेल बॅड असतो. तो सामान्य त्वचेसारखा असतो. नेल मॅट्रिक्सला मिळणारे पोषक तत्त्वच नखे हेल्दी किंवा कमजोर होण्यास जबाबदार असतात. कोरडी व निर्जीव नखे व्हिटॅमिन सी, फॉलिक अॅसिड, हृदयरोग किंवा रोगप्रतिकार क्षमतेच्या कमतरतेमुळे होऊ शकतात. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी १०० ग्रॅम बिटाचे सेवन रोज जरूर करा. त्याचबरोबर आयर्न, व्हिटॅमिन डी व कॅल्शियमयुक्त भोजन नियमितपणे घ्या.

  • माझे वय २६ वर्षे आहे. मला नखे वाढविण्याचा खूप शौक आहे. पण माझ्या नखांचा रंग पिवळा आहे, जो दिसायला चांगला दिसत नाही. काही घरगुती उपाय आहेत का, जेणेकरून माझ्या नखांवर चमक येईल व ती पिवळी दिसणार नाहीत?

ऑलिव्ह ऑइल नखांसाठी खूप चांगले असते. त्यामुळे नखांना पोषण मिळते आणि त्यात चमक येते. रोज रात्री झोपण्यापूर्वी ऑलिव्ह ऑइलला हलके गरम करून बोटे आणि नखांवर मसाज करा. काही दिवसांतच उत्तम परिणाम दिसू लागतील. प्रत्येक ती गोष्ट ज्यात व्हिटॅमिन ई आहे, नखांसाठी खूप चांगली असते. याबरोबरच व्हिटॅमिन ई ने परिपूर्ण आहार घेतल्यानेही नखांचे आरोग्य चांगले राहते.

  • मी २५ वर्षांची आहे. मी जेव्हा माझ्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारची क्रीम लावते, तेव्हा माझ्या चेहऱ्यावर व्हाइट हेड्स येतात. आपण ते दूर करण्यावर उपाय सांगाल का?

व्हाइट हेड्स अॅक्नेचा एक प्रकार आहे, जे त्वचेची रंध्रे तेलाच्या पाझारण्याबरोबरच घाण जमा झाल्यामुळे उत्पन्न होतात. व्हाइट हेड्स त्वचेच्या अंतर्गत पातळीवर तयार होतात. त्यांना प्रकाश वगैरे मिळत नाही आणि त्यांचा रंग सफेद राहतो.

आपल्या त्वचेमध्ये नैसर्गिकरीत्या तेल असते. जे आपल्या त्वचेमध्ये ओलावा आणि मॉइश्चरायजर टिकवून ठेवते. जर आपल्या त्वचेवर जास्त तेल तसेच राहील, तर त्यामुळे आपल्या त्वचेला अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. काही क्रीम अशा असतात, ज्या आपल्या त्वचेला अजून चिकट बनवतात. त्यामुळे आपल्या त्वचेवर मुरमे येऊ लागतात. जर आपली त्वचा ऑयली असेल, तर आपण ऑइल फ्री क्रीमच लावा

व्हाइट हेड्स दूर करण्यासाठी मेथीच्या पानात पाणी मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर चोळा. विशेषत: जिथे व्हाइट हेड्स असतील, तिथे चोळा. या प्रक्रियेमुळे व्हाइट हेड्स निघून जातात. पेस्ट सुकल्यानंतर आपला चेहरा कोमट पाण्याने धुऊन घ्या.

गृहशोभिकेचा सल्ला

*प्रतिनिधी

  • मी २५ वर्षीय विवाहिता आहे. लग्नाला एक वर्ष झालं आहे. आम्ही लव्ह मॅरेज केलं होतं, तरीही आम्हा पतिपत्नीमध्ये सतत भांडणं होतात. थोडीफार भांडणं तर प्रत्येक पतिपत्नीमध्ये होतात, पण जेवढे आम्ही भांडतो, तेवढे कदाचित कोणीच भांडत नसेल. आश्चर्य या गोष्टीचे आहे की लग्नापूर्वी सर्वकाही ठीक होते, पण लग्न झाले आणि परिस्थिती बदलली व माझे पतिही. मला विश्वास बसत नाही की ही तीच व्यक्ती आहे का, ज्याच्यावर मी प्रेम केलं होतं व जो माझ्या छोट्यातल्या छोट्या इच्छेचा मान राखत होता. आम्ही तासन्तास एकमेकांशी गप्पा मारायचो आणि आता तर बोलण्यासाठी काही विषय नसतो किंवा तोंड उघडलंही तरी एकमेकांवर गरळ ओकली जाते. कधी-कधी वाटते की खरंच मी माझ्या भावा-बहिणीप्रमाणे अॅरेंज मॅरेज केले असते तर किती बरं झालं असतं. ते सर्व आपल्या घरकुटुंबासोबत अनेक वर्षांपासून किती सुखी जीवन जगत आहेत आणि मी एका वर्षातच त्रस्त झाले आहे.

दोनवेळा तर पती आणि त्याच्या घरच्यांना कंटाळून मी माहेरीही निघून गेले होते. माझी समजूत काढण्यासाठी आणि घरी घेऊन जाण्यासाठी कोणीही आले नाही. दोन्ही वेळा मी स्वत:च परत गेले.

खरं तर सर्व भांडणाचे मूळ माझ्या २ नणंदा आहेत. दोघीही विवाहित आहेत, तरीही त्या आपल्या सासरी जात नाहीत आणि आमच्या घरात बस्तान मांडून बसल्या आहेत. मोठ्या नणंदेच्या विवाहाला १० वर्षे झाली आहेत आणि छोटीच्या लग्नाला ७ वर्षे झाली आहेत. लग्नापूर्वी माझे पती सांगायचे की दोघीही माझ्या लग्नानंतर लवकर आपल्या घरी जातील. आता त्या आईला मदत करायला राहात आहेत. जेव्हा आपले लग्न होईल, तेव्हा आईसाठी त्या निश्चिंत होतील. कारण घर सांभाळणारी त्यांची सून येईल ना, पण लग्नाला १ वर्ष झाले आहे आणि त्या त्यांच्या घरी जाण्याचे नाव घेत नाहीत.

दोन्ही नणंदा सासूसोबत मिळून मला त्रास देतात. एवढेच नाही, संध्याकाळी माझे पती घरी आल्यावर माझी चुगली करतात आणि आधीच त्रस्त झालेली मी जेव्हा पतिकडूनही बोलणी खाते, तेव्हा मात्र माझा धीर सुटतो. मी दिवसभराचा रागही त्यांच्यावर काढते. मानसिक त्रास झेलण्याबरोबरच मी शारीरिक रूपानेही त्रस्त आहे. मला थायरॉईड आहे, त्यामुळे मी खूप जाडी झाले आहे. परिणामी, मला गर्भधारणाही होत नाहीए. कुणास ठाऊक, मी आई बनेन की नाही.

जीवन खूप कठीण झाले आहे. लग्न करून मी काय मिळवले, हा विचार करून मी त्रस्त होते. डोके दुखू लागते. काहीही मार्ग दिसत नाही. छान राहावेसे, कुठे जावे-यावेसे वाटत नाही. घरात ३-३ महिलांनी माझं जगणं मुश्किल केले आहे. आयुष्यभर असंच कुढत जगावं लागणार का, कृपया सांगा काय करू?

आपले वैवाहिक जीवन सुखद नाहीए, याचा दोष आपल्या लव्ह मॅरेजला देऊ नका. अॅरेंज मॅरेजमध्येही समस्या येत नाहीत असे होत नाही. अडचणी बहुतेक सर्वच वैवाहिक जीवनात येतात. त्यामुळे आपल्या विवाहाचे तुलनात्मक मूल्यांकन करू नका की अॅरेंज मॅरेज केले असते, तर सुखी राहिले असते.

आपल्या प्रकरणात मुख्य मुद्दा आपल्या दोन्ही विवाहित नणंदा आहेत. एकट्या सासूबरोबरच जुळवून घेणे सुनेसाठी सोपे नसते. इथे तर ३-३ महिलांनी आपलं जगणं कठीण केले आहे. यामुळेच आपल्या पतिशी आपले संबंध खराब होत आहेत.

स्थिती कोणतीही असो, सामंजस्य निर्माण करण्याचा प्रयत्न आपल्याला स्वत:च्या हिंमतीवर करावा लागेल. कुठेतरी थोडंसं गोड बोलून, तर कुठेतरी निडरता दाखवत, जेणेकरून पतीच्या आई व बहिणींमुळे तुमचं नातं बिघडू नये. अर्थात, असे करणे सोपे नाहीए, पण याशिवाय आपल्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाहीए. पतिसमोर आपली बाजू मांडा, पण त्यांना टोमणे मारून दोष देऊ नका. जी गोष्ट तुम्ही सामान्य राहून प्रेमाने समजावू शकता, ती भांडण करून समजावू शकत नाही. त्यांचा मूड पाहून त्यांना समजावा की त्यांच्या बहिणींनी आपापल्या घरी जाऊन राहिले पाहिजे. कारण जवळ राहिल्याने संबंध खराब होतात. उलट अंतर ठेवून राहिल्याने प्रेम वाढते.

जिथे भांडून नाराज होऊन माहेरी जाण्याची गोष्ट आहे, तर अशी चूक पुन्हा मुळीच करू नका. त्यामुळे तुमची प्रतिमा बिघडते. समस्यांवर उपाय शोधल्याने त्या दूर होतात, ना की त्यांच्यापासून दूर पळाल्याने.

आपण आपल्या आरोग्याचीही काळजी घ्या. थायरॉइडवरही उपाय करा. त्यामुळे आपण लठ्ठपणापासून काही प्रमाणात सुटका मिळवू शकता.

मातृत्वाबाबत जिथे आपली काळजी आहे, तर आपल्या लग्नाला अजून १ वर्षच झालं आहे. वेळेनुसार आपण मातृत्वसुखही प्राप्त करू शकाल.

जवळच्या एखाद्या कुटुंब कल्याण केंद्रात जाऊन यावर सल्ला घेऊ शकता. पण सर्वात आधी महत्त्वाचे आहे की आपण आपल्या हुशारीने आपली कौटुंबिक स्थिती अनुकूल बनवण्याचा प्रयत्न करा.

यासाठी आम्ही आपल्याला केवळ सल्ला देऊ शकतो, प्रयत्न तर आपल्याला स्वत:लाच करावे लागतील. सकारात्मक विचार बाळगा, हिंमत आणि धैर्याने समस्यांचा सामना करा, मग तो दिवस दूर नाही जेव्हा आपण सर्व समस्यांतून मुक्त होऊन आपले वैवाहिक जीवन सुखी बनवलेलं असेल.

आरोग्य परामर्श

* डॉ. यतीश अग्रवाल

प्रश्न : मी २८ वर्षांची विवाहित महिला आहे. जवळपास ६ वर्षांपूर्वी मला सिझेरियनने मुलगा झाला होता. आता जेव्हाही पतिसोबत शारीरिक संबंध ठेवते, तेव्हा मला माझ्या जननांगात खूप वेदना होतात. त्या शरीरिक संबंध बनवल्यानंतर दीर्घकाळ मला त्रस्त करतात. यामागे काय कारण असू शकते?

उत्तर : आपल्याप्रमाणेच बऱ्याचशा महिला आई बनल्यानंतर त्रासदायक सहवासाच्या समस्येतून जातात. ज्या महिलांची मुले नैसर्गिकरीत्या योनीमार्गातून जन्म घेतात आणि त्यात योनीमार्ग मोठा करण्यासाठी डॉक्टर प्रसूतीच्या वेळी अॅपीसिओरोमीचा चीर पाडतात. त्यातील १७ ते ४५ टक्के महिला आई बनल्यानंतर या त्रासातून जातात. उलट सिझेरियनने आई बनणाऱ्या २ ते १९ टक्के महिला अशा प्रकारचा त्रास असल्याचे सांगतात.

म्हणजेच याचा अर्थ असा की सिझेरियननंतर त्रासदायक संबंधाची समस्या कमी दिसते, परंतु ती असू शकते. यामागे योग्य कारण काय आहे, याबाबत केवळ अंदाजच लावला जाऊ शकला आहे. असे समजले जाते की काही महिलांमध्ये सिझेरियनच्या प्रक्रियेतून जाण्याची मानसिक द्विधावस्था पुढे जाऊन त्यांच्या मनात एवढी तीव्र चिंता निर्माण करते की त्यांना संबंधांची भीती वाटू लागते. त्यांचे मन विचार करू लागते की पुन्हा जर गरोदर राहिले, तर पुन्हा सिझेरियनमधून जावे लागेल आणि याच मानसिक द्विधावस्थेत त्यांचे मन सेक्सबाबत नकारात्मक होते.

अन्य मानसशास्त्रीय कारणंही समस्या निर्माण करतात. नुकत्याच आई बनलेल्या महिलांची जर रात्री झोप पूर्ण झाली नाही, व्यवस्थित आराम मिळाला, व्यवस्थित पोषण मिळाले नाही, एकमेकांसोबत प्रेमळ सहवासाची संधी मिळाली नाही, तसेच पतीसोबत संबंध ठेवण्याची इच्छा झाली नाही, तर अशी मन:स्थिती निर्माण होणे स्वाभाविक आहे.

सिझेरियननंतर जर टाक्यांत पू झाला, तर नंतर ते भरल्यानंतरही वरील टिश्यूमध्ये झालेल्या दुष्परिवर्तनामुळे महिलांना वेदना जाणवतात. काही महिलांमध्ये हार्मोनल समस्याही निर्माण होत. एस्ट्रोजन हार्मोनच्या कमतरतेमुळे योनीची नैसर्गिक स्निग्धता घटते. परिणामी, संबंध कष्टदायक होतात.

काही शारीरिक समस्या जसं की योनीद्वाराला आलेली सूज, मूत्रनलिकेला आलेली सूज, त्यावर उत्पन्न झालेली मांसाची गाठ, योनीद्वाराशी सलग्न बार्थोलिन ग्लँडमध्ये आलेली सूज किंवा गुदद्वाराला फिशर झाल्यानेही सहवास क्रीडेच्या वेळी त्रास होणे स्वाभाविक आहे. अशाच प्रकारे गर्भाशयाची सूज आणि एंडोमिट्रिओसिससारखे रोगही त्रास देतात.

शिवाय समस्या हीसुध्दा आहे की एकदा सुरुवातीला वेदना निर्माण झाल्यावर पुढे मनात शारीरिक संबंधाबाबत तणाव जाणवतो. केवळ स्पर्शानेही योनी भागातील पेशी संकुचित होतात, योनी संकुचित होते आणि संबंध बनवणे कठीण होते. समस्या एकदा सुरू झाल्यानंतर पुढे नेहमीच चक्रव्यूह बनते. जेव्हा जेव्हा पती-पत्नीला मिलनाच्या बंधनात अडकायची इच्छा असते, पत्नी वेदनेने तळमळते.

सर्वप्रथम आपण एखाद्या योग्य स्त्रीरोग विशेषज्ञाला भेटून आपली अंतर्गत तपासणी करून घ्यावी. त्यामुळे समस्येच्या मूळ कारणाचे निदान होईल व आपण समस्येवर योग्य उपचार घेऊन त्यातून बाहेर पडू शकाल.

जर अंतर्गत एखादा विकार नसेल तर आपण आणि आपले पती दोहांनी दाम्पत्य मानसशास्त्रात निपुण एखाद्या विशेषज्ञाचा सल्ला घेणं योग्य ठरेल. आपसात प्रेमाचा सेतू असेल, तर सर्व समस्या कालांतराने दूर होतील. सहवासापूर्वी प्रणयक्रीडेला वेळ देणेही लाभदायक होऊ शकेल. त्यामुळे योनीची नैसर्गिक स्निग्धता वाढते, त्यामुळे संबंध सोपे होतात.

प्रश्न : मी २२ वर्षांची विवाहित महिला आहे. माझ्या पतिचे वय ३१ वर्षे आहे. आमच्या विवाहाला १ वर्ष झाले आहे. परंतु इच्छा असूनही मी गरोदर राहू शकले नाही. मी आई होण्याचे सुख मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे?

उत्तर : कदाचित आपल्याला हे सत्य माहीतच असेल की महिलेला प्रेग्नंट होण्यासाठी हे खूप आवश्यक आहे की, पतिपत्नीने त्या दिवसांत शारीरिक संबंध प्रस्थापित करावेत, ज्या दिवसांत महिलांमध्ये संतानप्राप्तीची शक्यता असते. हा संयोग महिलेच्या मासिकपाळीच्या चक्राच्या मध्यावर ओव्हरीतून डिंब सुटण्याच्या ४८ ते ७२ तासांपर्यंत आणि डिंब सुटल्यानंतर ४८ तासांपर्यंत जास्त असतो. त्या काळात झालेल्या  समागमात जर पतीच्या शुक्राणू बीजांनी पत्नीच्या डिंबाला फलित केले, तर प्रेग्नंसी येते.

आपण आपल्या पतीसोबत एखाद्या इन्फर्टिलिटी विशेषज्ञाचा सल्ला घेणे उचित ठरेल.

उपलब्ध आकड्यांनुसार, देशातील ७५ टक्के जोडप्यांना इच्छा असूनही संतानसुख प्राप्त होत नाही. वांझपणाची ही समस्या केवळ महिलांशीच जोडलेली नसते. संतान न होण्याच्या २५-४० टक्के प्रकरणांत ही समस्या पुरुष वंध्यत्वाशी जोडलेली असते. ४० टक्के प्रकरणात महिलांमध्ये प्रजनन क्षमतेची कमतरता असते. १० टक्के प्रकरणात समस्या स्त्रीपुरुष दोघांशीही संबंधित असते आणि जवळपास तेवढ्याच प्रकरणांत सर्व तपासण्या करूनही हे स्पष्ट होत नाही की प्रेग्नंसी कोणत्या कारणामुळे येत नाहीए.

आपण आपल्या पतिसोबत एखादद्या योग्य इन्फर्टिलिटी विशेषज्ञाला भेटा. कदाचित आपली समस्या छोटी असेल, असे होऊ शकते आणि त्यावर लवकर उपचार करता येतील. तसेही आपले वय अनुकूल आहे. १९ ते २५च्या दरम्यानचे वय महिलेला आई बनण्यासाठी सर्वात चांगले वय म्हटले जाते. या काळात तिचे प्रजनन अंग, लैंगिक हार्मोन्स आणि मानसिक लय प्रजननासाठी सर्वात अनुकूल अवस्थेत असते.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें