* समस्यांचं समाधान, एअरब्रश मेकअप एक्सपर्ट इशिका तनेजा
- मला माझे कर्ली केस सांभाळायला खूप त्रास होतो. कारण ते खूप गुंततात. त्याबरोबर निर्जीव व कोरडेही झाले आहेत? आणि गळुही लागले आहेत. कृपया काही उपाय सांगा.
कर्ली केसांना कोमट तेलाने मालीश केल्याने केसांना फायदा होतो. असे नियमितपणे केल्यास आपले कर्ली केस खूप सुंदर होतात. कोकोनट ऑइल, ऑलिव्ह किंवा मग आल्मंड ऑइलने आपण केसांना मसाज करू शकता. दररोज शाम्पू केल्याने केस खराब होऊ शकतात, त्यामुळे केस गळती सुरू होते आणि केस डिहायड्रेट होऊ लागतात. त्यामुळे हा सल्ला दिला जातो की केस जास्त धुऊ नका.
कर्ली केस जास्त घट्ट बांधू नयेत. असं केल्यास कुरळे केस मुळातून कमजोर होऊन तुटू लागतात. जर आपले केस कुरळे असतील, तर ते हलके ओले असताना विंचरा. त्यामुळे केस कमी गुंततील. कुरळ्या केसांवर ड्रायरचा वापर कमी करा. कारण याच्या जास्त वापराने केस कमजोर होतात.
- माझे वय ३५ वर्षे आहे. मी माझ्या कपाळावर मोठी टिकली लावते. त्यामुळे त्या ठिकाणी कायमचा स्पॉट पडला आहे. या स्पॉटला घरगुती उपायाने दूर केले जाऊ शकते का?
घरगुती उपचारांवर वेळ न घालवता जेवढ्या लवकर शक्य आहे, तेवढ्या लवकर स्किन स्पेशालिस्टला दाखवा. आपल्या मर्जीने कोणतेही औषध किंवा क्रीम वापरू नका. खरे तर खराब क्वालिटीच्या टिकलीमध्ये मोनोबँजॉइल इस्टस ऑफ हाइड्रोक्यूनोन पदार्थ आढळतो. त्यामुळे त्वचेला डाग पडतात. त्यामुळे ब्रँडेड टिकलीच लावा.
- पेन्सिल आयलाइनर आणि लिक्विड आयलाइनरमध्ये कोण चांगला रिझल्ट देतं?
लिक्विड आयलाइनरने डोळे जेवढे मोठे आणि आकर्षक दिसतात, तेवढे पेन्सिल आयलाइनरने दिसत नाही. लिक्विड आयलाइनर खूप वेळपर्यंत टिकून राहतो. ज्या लोकांची त्वचा ऑइली असते, त्यांच्यासाठी लिक्विड आयलाइनर एका जॅकपॉटप्रमाणे असतो. लिक्विड लाइनर दीर्घकाळपर्यंत त्याच शेपमध्ये राहतो. सोबतच हा अगदी स्वच्छही दिसतो. तर दुसऱ्या बाजूला पेन्सिल किंवा पावडर आयलाइनर डोळ्यांच्या आजूबाजूला ऑइल प्रोड्यूस झाल्यामुळे दिवसभर त्याचा शेप खराब करू शकतं किंवा मग संपूर्ण पुसूनही जाऊ शकतं. लिक्विड आय लाइनरचा एक सर्वात मोठा फायदा हा आहे की आपण याच्या मदतीने आपली काहीही क्रिएटिव्हिटी करू शकता.