* मेनका गांधी

मला एकदा एका तरुणाने जेवण्यासाठी बोलावलं. त्याचं लहानपण अनेक छोट्यामोठ्या अडचणींना तोंड देण्यात गेलं होतं. परंतु आता तो कुशल डिझायनर बनला होता व त्यामुळे त्याच्यात कमालीचा आत्मविश्वासही आलेला होता. रात्रीच्या जेवणासाठी त्याने कैव्हिअरचा बेत केला होता, जे समुद्री माशांच्या अंड्यांपासून बनविलेलं असतं व फारच महाग असतं.

मी कैव्हिअर बघून हैराण झाले. ज्याने लहानपणी इतक्या अडचणींशी सामना केलेला आहे असा माणूस अशा माशांपासून मिळविलेल्या अंड्याचा पदार्थ जेवणात कसा बनवू शकतो? कारण या माशांना समुद्रातून काढून त्यांची पोटं फाडून ती अंडी काढली जातात व त्या माशांना पुन्हा समुद्रात सोडलं जातं.

मी जेव्हा त्याला याबद्दल विचारलं तेव्हा दोन्ही कानावर हात ठेवून त्याने सांगितलं, ‘‘मेनका आंटी, मला हे काही आता सांगू नका. हे मला ऐकवत नाही.’’

त्याचं हे म्हणणं ऐकून मला समजलं की मनुष्याच्या रुचीसाठी किती जीवजंतूंना किती व कशाप्रकारे त्रास सहन करावा लागतो हे याला कधीच समजणार नाही.

आपण माणसं आपल्या स्वार्थासाठी, तोंडाच्या चवीसाठी व पैशांच्या कमाईसाठी कित्येक जीवांची शिकार करतो. त्यावेळी आपण हे विसरतो की हे प्राणीसुद्धा आपल्यासारखेच जगण्याची आशा बाळगून असतात.

पशुपक्ष्यांची अद्भूत दुनिया

पशुपक्ष्यांचं जगणंसुद्धा प्रेमळ रोमान्सने भरलेलं असतं. तेसुद्धा माणसांप्रमाणेच आपला वंश चालू ठेवतात. स्क्विड्स दिवसाच्या सुरुवातीलाच शारीरिक संबंध ठेवतात. मादी स्क्विड १ अंड देण्यासाठी थोड्या थोड्या अंतराने दिवसात कित्येक वेळ शारीरिक संबंध ठेवते.

पेग्विनचं जीवनसुद्धा खूपच रोमांचकारी असतं. जेव्हा नर पेंग्विनला संबंध ठेवण्याची इच्छा होते तेव्हा तो मादी पेंग्विनच्या पोटावर झोपतो. तो मादीला खूष करण्यासाठी तिच्या पायांवर दगड ठेवतो. मादी पेंग्विनला जेव्हा हे सगळं आवडतं तेव्हा ती खूष होऊन बैले डान्स करत करत आपले पंख हलवून गाणं गाते व नंतर ती शारीरिक संबंध ठेवण्यास तयार होते.

नर बुबीज आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी आपल्या पंखाना नखांनी ओरबाडून आपली पिसे मादीला भेट म्हणून देतो.

तर काटेदार पशू पोरक्यूपिन नराला स्वत:च मादी शोधावी लागते. यासाठी तो गाणं गाण्यास सुरुवात करतो. जर मादी परक्यूपिनचा मूड असेल तर दोघंही एकमेकांकडे तोंडं करून बैले डान्सला सुरुवात करतात. तर आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी मादी परक्यूपिनला आपल्या मूत्राने पूर्ण ओली करतो. ७ फुट अंतरावरूनसुद्धा तो मादीला पूर्ण ओली करू शकतो.

प्रेमाची अभिव्यक्ती

हिप्पो जेव्हा मादी हिप्पोकडे आकर्षित होतो तेव्हा तो मूत्राने पूर्ण भिजवतो. तो आपल्या शेपटीने मूत्र चारी बाजूला उडवतो. यामुळे मादी हिप्पो संबंध ठेवण्यास तयार होते व त्यानंतर दोघंही रतिक्रीडेला सुरुवात करतात.

मोर आपले प्रेम लांडोरीजवळ व्यक्त करण्यासाठी आपला पिसारा फुलवून नाचण्यास सुरुवात करतो. यामुळे खूष होऊन लांडोर संबंध ठेवण्यास तयार होते.

परंतु याची तुलना फ्रिगेट पक्ष्याशी केली जाऊ शकत नाही, नर फ्रिगेट मादीला खूष करण्यासाठी आपल्या गळ्याची पिशवी फुगवून हृदयाच्या आकाराइतकी करतो. मग आपलं डोकं व पंख हलवूनहलवून मादीला बोलवतो. ज्याचा फुगा सगळ्यात मोठा व चमकदार असतो त्याच्याबरोबर मादी संबंध ठेवण्यास राजी होते. संबंध ठेवताना नर आपल्या पंखांनी मादीचे डोळे झाकतो जेणेकरून ती दुसऱ्या नराचा फुगा बघून त्याच्याकडे जाणार नाही.

लव गार्डन बनविणारे कीटक

नर लाल मखमली किडे बसण्यासाठी आपल्या शुक्रजंतूपासून फांद्यामध्ये ‘लव्ह गार्डन’ बनवितात. जर मादीला ती आवडली तर ती त्यावर येऊन बसते. जर नराने ‘लव्ह गार्डन’ बनविल्यानंतर त्यावर तो पहारा देत बसला नाही तर दुसरा लाल मखमलीदार किडा ती नष्ट करून त्या जागी आपल्या शुक्रजंतूंपासून लव्ह गार्डन’ बनवितो.

निळ्या पक्षाच्या नावाने ओळखला जाणारा नर पक्षी मादी पक्षिणीला भुलविण्यासाठी झाडांच्या फांद्यांमध्ये स्वत:ला उलटा टांगून घेतो व आपल्या पंखांना छातीपाशी धरुन प्रेमपूर्ण आवाजात आपल्या प्रेमिकेला बोलावू लागतो.

दक्षिण अफ्रिकेतील नर सौंशबर्ड मादीला बोलाविण्यासाठी आपल्या पंखांतून सूर काढतो. त्या संगीताने खूष होऊन मादी त्याला समर्पित होते.

यानंतर मी आपणास हेच सांगू इच्छिते की, कोणत्याही प्राण्याची शिकार करण्यापूर्वी असा विचार करा की तोसुद्धा एक जिवंत प्राणी आहे. त्यालासुद्धा जगण्याचा पूर्ण हक्क आहे. यास्तव कोणत्याही प्राण्याला ठार मारू नका!

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...