* प्रमीला गुप्ता

सुगंधा एक आदर्श सूनबाई, पत्नी व आई होती. सर्वजण तिची कायमच स्तुती करत असत. लग्नापूर्वी माहेरी व शाळेतदेखील ती सर्वांची आवडती होती. याचं एक कारण म्हणजे तिने कधीही कोणालाही कोणत्याही कामासाठी नकार दिला नव्हता. लहानपणापासूनच तिला आईवडिलांनी हेच शिकवलं होतं. शांत स्वभावाच्या सुगंधाचे सर्वजण चाहते होते. यामुळे सुगंधाला मनोमन एकटेपणा जाणवत होता. तिला डिप्रेशनने घेरलं.

हे पाहून सुगंधाचे पती जीतेन तिला आपल्या एका मित्राकडे घेऊन गेले. ते एक मानसोपचारतज्ज्ञ होते. सर्व गोष्टी ऐकल्यानंतर ते म्हणाले, ‘‘सुगंधा, तुम्ही एक प्रतिभासंपन्न व कुशल गृहिणी आहात, तुम्ही कायमच दुसऱ्यांच्या आनंदाची काळजी घेता. तुम्हाला नकार देताच येत नाही. फक्त हीच तुमची खरी अडचण आहे. यातून बाहेर पडा. नाही म्हणायलादेखील शिका. थोडंसं तुमच्या इच्छेनेदेखील जगून पाहा.’’

घरी आल्यावर सुगंधानं डॉक्टरांच्या सल्ल्यावर विचार करायला सुरूवात केली. तेव्हा तिला त्यांच्या म्हणण्यात खरेपणा दिसून आला. दुसऱ्यांच्या आनंदासाठी तिच्या स्वत:च्या इच्छाआकांक्षा कुठेतरी दबल्या गेल्या होत्या. त्यामुळे तिने ठरवून टाकलं की ती आता स्वत:साठीदेखील जगून पाहाणार. स्वत:ची एक वेगळी ओळख बनवणार. हळूहळू ती ‘नाही’ म्हणायला शिकली.

सासूबाईंनादेखील मृदू स्वरात म्हणायची, ‘‘आई, मला तुमचं हे म्हणणं पटत नाही. आपण एखाद्याला घरगुती गोष्टीत हस्तक्षेप करता कामा नये.’’

पतींनादेखील सांगायची, ‘‘नाही, आज मी तुमच्यासोबत येऊ शकणार नाही. मला महिला समितीच्या मिटिंगला जायचंय.’’

सर्वजण सुगंधामध्ये आलेल्या आकस्मित बदलामुळे चकीत झाले होते. कालपर्यंत खूपच सरळसाध्या दिसणाऱ्या सुगंधाचं स्वत:च एक स्थान, व्यक्तिमत्त्व होतं. स्वत:ची एक ओळख होती. सून, पत्नी, आईबरोबरच ती एक सशक्त नारीदेखील होती. सुगंधाला आनंदी पाहून सासूसासरे, पती व मुलंदेखील आनंदी राहू लागली होती.

स्वत:चं अस्तित्त्व विसरू नका

अनेक स्त्रीपुरूष, तरूण कोणालाही नाराज न करण्याच्या विचाराने नकार देण्याचं साहस करत नाहीत. त्यांना सर्वांच्या नजरेत स्वत:ची एक सकारात्मक छबी निर्माण करायची असते. मग भलेही होकार दिल्यानंतर ते कटकट करत.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सब्सक्राइब करें

डिजिटल + 24 प्रिंट मैगजीन

(1 साल)
USD79
 
सब्सक्राइब करें
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...