* मदन कोथुनिया
पतिपत्नी यांचे आपसातील संबंध सुरळीत असणे हे फक्त दांपत्य जीवनासाठीच नाही तर आदर्श कुटुंबासाठीही गरजेचे आहे. इथूनच मुले शिकतात मधुर वाणी, समतोल वर्तन आणि ताळमेळ, ज्यामुळे त्यांचेही वैवाहिक जीवन आश्चर्याने व्यापते. तुम्ही दिला आहे का मुलांना हा वारसा?
तुम्ही एक गृहिणी आहात का आणि गोंडस मुलांची आईसुद्धा? मग तर आपल्या मुलांचे भविष्य उज्ज्वल व्हावे असे नक्कीच तुम्हाला वाटत असेल. पण याची योग्य पद्धत काय हे माहीत आहे का तुम्हाला? मुलांचे भावी आयुष्य सुखी असावे. यासाठी आईवडिलांचे नाते आपसात प्रेमपूर्ण असणे अत्यंत आवश्यक आहे.
तुम्हा उभयतांमध्ये जेवढे प्रेम, सन्मान असेल, मुलंही त्यांच्या वैवाहिक आयुष्य तितक्याच आनंदाने जगतील. शेवटी प्रत्येक गोष्ट जे तुमच्याकडूनच शिकणार आहेत. चला तर मग, या दांपत्य जीवनात गोडवा आणण्यासाठी जाणून घ्या काही बाबी :
लग्नाला प्राधान्य द्या
नेहमी लक्षात ठेवा की लग्नाला महत्त्व देणे गरजेचे आहे. थोडीशी चूकही महागात पडू शकते. लहान लहान बाबींमध्ये एकमेकांची बाजू घ्या, प्रेम दर्शवा. जेव्हा पती ऑफिसला जायला निघतील, तेव्हा दृष्टीआड होईपर्यंत त्यांना पाहात राहा. पतिनेही विनाकारण कधीतरी पत्नीला भेटवस्तू आणावी. यामधून मुलांना शिकायला मिळेल की पतिपत्नी एकमेकांसाठीच बनलेले असतात.
काही क्षण असावेत खाजगी
मुले झाली म्हणजे असे नाही की, तुमचे खाजगी आयुष्य संपुष्टात आले. सायंकाळी पती जेव्हा घरी परततात, तेव्हा मुलांसोबत वेळ घालवल्यानंतर १०-१५ मिनिटे खाजगी बोलण्यासाठी ठेवावीत. मुलांनाही स्पष्ट सांगावे की ही वेळ मम्मीपप्पांसाठी राखीव आहे. यावेळी तुम्ही दोघांनी सोबत राहा व मुलांना त्यांच्या कामात व्यग्र राहू द्या. १०-१५ मिनिटे केवळ आपल्याविषयी बोला.
दोघांनीही बाहेर जावे
पतिपत्नींनी एकत्र वेळ व्यतित करणे त्यांना नवी उर्जा मिळवून देते. मुले झाल्याने जबाबदाऱ्यांनी वेढून जाऊन हा आनंद गमावू नका. मुलांना घरी ठेवून तुम्ही बाहेरही फिरायला जावे. मुले जर लहान असतील तर तुम्ही शेजाऱ्यांची किंवा नातेवाईकांची मदत घ्यावी.
जर खूप खर्च होतो असे वाटत असेल तर कॉफी किंवा स्नॅक्स किंवा मग आवडत्या पुस्तकाच्या दुकानात जावे. जर आठवड्यात शक्य नसेल तर महिन्यातून एकदा तरी मुलांना घरी सोडून एखाद्या रात्री बाहेर पडा. यामुळे नक्कीच वैवाहिक आयुष्यात गोडवा येईल.
टीव्हीशी नाते तोडा
जर संध्याकाळ होताच तुम्हाला टिव्हीला चिकटायची सवय असेल तर तुमचे रूटीन बदला. ही सवय तुमचे दांपत्य जीवन नीरस बनवून टाकेल. टिव्ही पाहण्याऐवजी तुम्ही दुसरा एखादा छंद जोपासा आणि पुस्तकांवर वगैरे चर्चा करा. मुलांनाही हीच सवय लावा की रात्री जेवणानंतर मम्मीपापा थोडे फिरून येतात.
प्रत्येक क्षण आठवणीत ठेवा
प्रत्येक दिवस सोबत घालवणे तर पतिपत्नीला शक्य होत नाही. पण दिवसभरातील ही दरी नष्ट करण्यासाठी काही प्रयत्न तर नक्की करता येतील. जर पतिच्या ऑफिसमध्ये काही महत्त्वाचा प्रोजेक्ट सुरू असेल तर संधी मिळताच फोनवर खुशाली विचारा. पतिनेही दिवसातून एकदा फोन करून पत्नीची जरूर चौकशी करावी.
जे वाटते ते दाखवून द्या
थोडा विचार करा की तुमच्या जोडीदारामध्ये कोणत्या बाबी इतरांहून वेगळ्या आहेत. त्यांची कुठली वैशिष्ट्य तुमचे मन जिंकतात आणि घर आनंदी राखतात. आता वेळ न दवडता यादी तयार करा आणि जोडीदाराचे यासाठी आभार मानायला विसरू नका. मुलांसमोर त्यांच्या चांगल्या बाबींचा उल्लेख करायलाही विसरू नका.
खेळाखेळामध्ये प्रेम वाढवा
खेळ मुलांचा असो की मोठ्यांचा, तो चमत्कार साधतो. एक चांगला खेळ क्षणांतच नात्यांना गहिरे करतो. मग तुम्ही एकमेकांसाठी एखाद्या चांगल्या खेळाची निवड करावी. तुम्ही दोघांनीच खेळावे किंवा मुलांनाही सहभागी करून घ्यावे. अशाच छोटयामोठ्या क्लृरत्या कुटुंबात आपलेपणा वाढवतील.
नाविन्य टिकवावे
प्रत्येक जुन्या वस्तूमध्ये शिळेपणा जाणवतो. पण तुमच्या प्रेमाची अशी अवस्था आवडेल तुम्हाला? नाही ना? मग लहानमोठ्या खोड्या सुरू ठेवाव्यात. त्या ठिकाणी फिरायला जावे, जिथून तुमच्या वैवाहिक जीवनाची सुरूवात झाली होती. त्या बागेत किंवा रेस्टॉरंटमध्ये काही तास घालवल्याने तुमच्या गोड आठवणींना उजाळा मिळेल आणि तुमच्या आयुष्यात गोडवा निर्माण होईल.
पुन्हा एकदा
लग्नाला ५-१० वर्ष झाली, तरी काय? पुन्हा एकदा निघा दुसऱ्या मधुचंद्रासाठी. मुलांना आजीआजोबांकडे सोपवा आणि विसरून जा सर्व जबाबदाऱ्या. जर काही दिवसांचा वेळ नाहीच काढू शकलात तर कमीत कमी विंकेडला तरी घराबाहेर राहा. एकाच शहरात थांबा हवे तर, पण रात्र बाहेरच व्यतित करा आणि लक्षात ठेवा की तिथे घरातील बाबींचा उल्लेखही होता कामा नये.
आपली स्वप्नं वाटून घ्या
वर्षातून एकदा तुम्ही पतिपत्नीने घरातून बाहेर पडून आपल्या स्वप्न आणि ध्येयाविषयी जरूर चर्चा करावी. एखादा दिवस ठरवावा. उदा, नवे वर्ष किंवा लग्नाचा वाढदिवस. दरवर्षी या दिवशी डिनरला बाहेर जावे आणि आढावा घ्यावा की तुम्ही काय मिळवले, काय गमावले अन् काय मिळवायचे आहे? तुमच्या भविष्याची सोनेरी स्वप्नं विणा आणि सोबतच आपल्या ध्येयाकडे वाटचाल करा. तुमची मुले, तुमच्या या जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टीकोनातून आपले भविष्य कसे घडवायचे ते शिकतील.
जे प्रेमाने व्यतित कराल तेच आयुष्य आहे, या विश्वासासह, आपल्या मुलांसाठी आदर्श बना आणि आयुष्य आनंदाने जगा.