– डॉ. यतीश अग्रवाल
प्रश्न : मी १६ वर्षांची तरुणी आहे. माझे नाक खूप रुंद आहे. ते चेहऱ्याला शोभत नाही. अशी काही सोपी युक्ती आहे का, ज्यामुळे माझे नाक आकाराने छोटे, पातळ आणि सुंदर दिसेल?
उत्तर : नाकाच्या सौंदर्यात सुधारणा करण्यासाठी एखाद्या सोप्या घरगुती उपायाचा प्रश्न आहे, तर विश्वास ठेवा अजूनपर्यंत असा कोणताही व्यायाम, मालीश, तेल किंवा क्रीम बनलेली नाही, जी आपली इच्छा पूर्ण करू शकेल. जर आपण या समस्येमुळे जास्त त्रस्त असाल, तर त्यासाठी एक व्यावहारिक उपाय आहे.
आपल्या समस्येबाबत आपण आईवडिलांसोबत कॉस्मॅटिक प्लास्टिक सर्जन किंवा ईएनटी सर्जनला भेटावे, जे नाक सुंदर बनवण्यासाठी राईनोप्लास्टी ऑपरेशन करतील. ऑपरेशनमुळे होऊ शकणाऱ्या सुधारणांबाबत सविस्तर जाणून घ्या. ऑपरेशनच्या वेळी येऊ शकणाऱ्या समस्यांबाबत प्रश्न विचारा. आरोग्य लाभ आणि सामान्य होण्यास किती वेळ लागेल, हे जाणून घ्या. ऑपरेशन आणि उपचारावर किती खर्च येईल इ. गोष्टी जाणून ऑपरेशनचा निर्णय घ्या.
पण हो, जर तुम्ही ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला असेल, तर आपण हे ऑपरेशन आपला शारीरिक विकास पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच १८-१९ वर्षांच्या वयानंतरच करणे योग्य ठरेल.
प्रश्न : मी २२ वर्षांची नवतरुणी आहे. माझे ब्रेस्ट खूप छोटे आहेत आणि पाळीही दर महिन्याला येत नाही. डॉक्टरने तपासणी करून सांगितले की माझ्या ओवरिजला सूज आणि गाठी आहेत. औषध घेतल्यानंतर सूज आणि गाठी बऱ्या झाल्या, पण पाळी अजूनही वेळेवर येत नाही. तसेच ब्रेस्टचाही पुढे विकास झाला नाहीए. मी काय करू?
उत्तर : आपल्या पत्रावरून एक गोष्ट स्पष्ट झाली की आपल्या शरीरात एक तर सेक्स हार्मोन्स नीट बनत नाहीत किंवा मग त्यांच्या प्रमाणात काहीतरी कमतरता आहे. याच केमिकल समस्येमुळे आपली पाळी वेळेवर येत नाहीए आणि आपल्या ब्रेस्टचा विकासही अर्धवट झाला आहे.
सेक्स हार्मोन्सची ही कमतरता अनेक पातळांवर उत्पन्न होते. मेंदूतील हायपोथॅलेमस ग्लँड, पीयूष ग्रंथी आणि ओव्हरीजमध्ये आपसातील ताळमेळ बिघडणे, तिन्हीपैकी एखाद्या गोष्टीचा रुग्ण होणे किंवा ओव्हरिज सुरुवातीलाच योग्य विकसित न झाल्याने ही समस्या निर्माण होते. परिणामी एका बाजूला ओव्हरिजमधून दर महिन्याला एक अंडे बाहेर येण्याच्या सामान्य प्रक्रियेत बाधा निर्माण होते, तर दुसऱ्या बाजूला एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन्स निर्मितीमध्ये अडचण निर्माण झाल्यामुळे स्त्री शरीराची नैसर्गिक जननांगीय लय बिघडते. साहजिकच ना वेळेवर पाळी येते, ना ब्रेस्टचा विकास योग्य प्रकारे होतो.
एखाद्या कुशल स्त्रीरोग तज्ज्ञाकडून आपण आपल्या सर्व टेस्ट करून घेणे उत्तम ठरेल. पेल्विक अल्ट्रासाउंड, हार्मोन टेस्ट आणि इतर गरजेनुसार दिलेल्या टेस्टचा रिपोर्ट पाहून, हा निर्णय घेता येऊ शकेल की समस्या कोणत्या पातळीवर आणि कोणत्या प्रकारची आहे. त्यानुसार डॉक्टर पुढे उपचाराचे मार्ग निश्चित करू शकतात. आपण आपल्या डॉक्टरांशी मोकळेपणाने बोलणे आणि समस्येचे मूळ जाणून घेणेही आवश्यक आहे. ही माहिती आपल्याला आपल्या जीवनाचे लक्ष्य सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण सिध्द होऊ शकते.
प्रश्न : मी ३९ वर्षांचा विवाहित पुरुष आहे. दिर्घ काळापासून एका मोठ्या समस्येतून जात आहे. जेव्हा मी पत्नीसोबत शारीरिक मिलन करतो, तेव्हा लवकर स्खलित होतो. या समस्येतून सुटण्यासाठी नेहमी मिलनापूर्वी १ पेग वाइन घेतो आणि लैंगिक संबंध बनवताना कंडोमचा वापर करतो, कंडोम वापरल्यामुळे पत्नीला समाधान मिळत नाही. एखादा व्यावहारिक उपाय सांगा, ज्यामुळे माझी या समस्येतून सुटका होईल.
उत्तर : आपण प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनच्या समस्येने ग्रस्त आहात. ही पुरुषांमध्ये आढळून येणारी सामान्य समस्या आहे. याचा संबंध जास्त करून आपल्या मानसिक अवस्थेशी जोडलेला असतो. वाइन घेतल्यानंतर व कंडोमचा वापर केल्यानंतर, जर आपण लैंगिक क्रीडा दीर्घकाळ करण्यास समर्थ ठरता, तर आपल्यात काही शारीरिक कमतरता नाही, हे सिध्द होते. खरे तर हे दोन्ही उपाय लैंगिक सेंसेशन मंद करतात, ज्यामुळे आपल्याला फायदा झाल्याचा अनुभव येतो.
पण डॉक्टरांच्या दृष्टीने पाहिले तर दोन्हीपैकी कोणताही उपाय समस्येतून सुटका करून देण्यात योग्य ठरवता येणार नाही. समस्येतून सुटका करून घेण्यासाठी तर आपण एखाद्या युरोलॉजिस्ट किंवा मग रिप्रोडक्टिव्ह मेडिसिन स्पेशालिस्टला भेटून योग्य औषध घेऊ शकता. यापेक्षाही उत्तम उपाय हा आहे की आपण एखाद्या सेक्सुअल थेरपिस्टच्या निगराणीखाली कीगल एक्सरसाइज शिकू शकता. त्यामुळे योनीच्या पेशी आधीपेक्षा जास्त मजबूत होतात. या सोप्या व्यायामाचे अनेक फायदे असतात, त्यामध्ये प्रीमॅच्योर इजॅक्युलेशनपासून सुटका होणे हाही आहे.
हा लाभ घेण्यासाठी कीगल एक्सरसाइज नियमित करावी लागते. अभ्यासातून हे आढळून आले आहे की २ ते ६ महिन्यापर्यंत सतत कीगल एक्सरसाइज करत राहिल्याने ५० टक्क्यांपेक्षा जास्त पुरुष प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनच्या समस्येतून सुटका मिळविण्यात यशस्वी होतात.