* डॉ. पूजा राणी, आयव्हीएफ एक्सपर्ट, इंदिरा आयव्हीएफ हॉस्पिटल, रांची
प्रश्न : माझ्या सुनेचे वय ३१ वर्षे आहे. लग्नाला ६ वर्षे झाली आहेत. मात्र, अजून ती आई बनू शकली नाही. मुलगा आणि सुनेच्या अनेक तपासण्या आणि उपचार केले, परंतु समस्या दूर झाली नाही. सून खूप उदास राहू लागली आहे. कधी-कधी कारणाशिवाय रडू लागते. कृपया सांगा काय करू?
उत्तर : कुठल्याही महिलेसाठी आई बनणे हा तिच्या जीवनातील सर्वात सुखद अनुभव असतो. अशा वेळी तुम्हाला तुमच्या सुनेची मनस्थिती समजू शकते. तुमच्या सांगण्यावरून वाटते की आई न बनल्यामुळे तुमच्या सुनेला नैराश्य आले आहे. तुम्हाला तिला या स्थितीतून बाहेर काढावे लागेल. कारण तणाव वांझपणाची समस्या आणखी वाढवतो. तणावामुळे प्रजनन तंत्रासंबंधी अनेक समस्या निर्माण होतात. जगभरात वांझपणाची ५० टक्के प्रकरणे तणाव व इतर मानसिक समस्यांमुळे होतात. तुम्ही त्यांना एखाद्या चांगल्या मानसशास्त्र तज्ज्ञाला दाखवा. तिला खूश ठेवण्याचा हर प्रकारे प्रयत्न करा. कदाचित त्यांचे आई न बनण्याचे कारण मानसिकही असू शकते.
प्रश्न : मी लठ्ठपणामुळे आधी गर्भधारणा करू शकले नव्हते. परंतु आता मी माझे वजन कमी केले आहे, तरीही गर्भधारणा करण्यात मला समस्या येत आहे. गर्भधारणा करण्यासाठी आता आयव्हीएफ हाच एकमेव उपाय राहिला आहे का?
उत्तर : लठ्ठपणामुळे गर्भधारणा करण्यात समस्या येऊ शकते. परंतु लठ्ठ महिला कधीही आई बनू शकत नाहीत, असे नाही. आता तर तुम्ही तुमचे वजनही कमी केले आहे. सर्वप्रथम एखाद्या स्त्रीरोग तज्ज्ञाला भेटून आपल्या वांझपणाचे कारण जाणून घ्या.
आयव्हीएफ वांझपणावर उपचार करण्यासाठी एकमेव उपाय नाहीए. या समस्येची अनेक कारणे असू शकतात. जेव्हा यावर योग्य प्रकारे डायग्नोसिस आणि उपचार केले जातील, तेव्हा सहजपणे गर्भधारणा करता येऊ शकते. फर्टिलिटी ट्रीटमेंटमध्ये औषधे, हार्मोन थेरपी, आययूआय सर्वात प्रभावी उपचारपद्धती आहे.
काही वेळा जीवनशैलीत बदल करूनही वांझपणाची समस्या दूर होऊ शकते. जर या सर्व प्रयत्नांनंतरही संतानसुखाची प्राप्ती झाली नाही, तर मात्र आयव्हीएफ तंत्राची मदत घेता येईल.