* डॉ. स्नेह ठाकूर

प्रत्येक शहराची स्वत:ची खासियत, वैशिष्टये व स्वत:चं एक आकर्षण असतं. काही स्थळ इतिहासाची गाथा गात तुमचं मन मोहून घेतात, तर काही वर्तमानातील झगमगटामुळे तुमचे डोळे दीपवून टाकतात. असंच नैसर्गिक गोष्टी आणि आधुनिकतेने समावलेला कॅनडातील टोरँटो पर्यटकांच्या आकर्षणाचं प्रमुख केंद्र आहे.

टोरँटोचा सीएन टॉवर ५५५.३३ मीटर (१८१५ फुट ५ इंच) उंच जगातील सर्वात उंच इमारतीपैकी एक आहे. ६ काचेच्या लिफ्ट्स प्रेक्षकांना २२ किलोमीटर प्रतितास वेगाने ५८ सेकंदात ऑब्जर्वेशन डॅकपर्यंत पोहोचवितात.

जून, १९९४ साली बनलेल्या व जगातील पहिल्या सीएन टॉवरची फरशी काचेची आहे. ही काचेची फरशी पर्यटकांना वर जातेवेळी आपल्या पायाखाली रस्ता पाहण्याची सुविधा देतात.

टॉवरच्या ऑब्जर्वेशन डॅकवरून प्रेक्षकांना १६० किलोमीटर दुरपर्यंत नायगारा धबधबा आणि जर ढग नसतील तर ओन्टॅरियो झिलच्या पलीकडे आसलेलं नुयॉर्क शहर पाहू शकता.

दर ७२ मिनिटात इथल्या ३६० रेस्टॉरंट स्वत:ची पूर्ण परिक्रमा करतात जे तिथे बसलेल्या प्रेक्षकांना १००० फूटपेक्षादेखील खाली टोरँटोची बदलती दृश्य पाहण्याचा आनंद देतात.

असाधारण अनुभव

सेंट लॉरेन्स बाजार : टोरँटोचं एक दुसरं आकर्षण आहे सेंट लॉरेन्स बाजार. इथे ३ ऐतिहासिक इमारती येतात. इथे एंटीक बाजार, फूड कोर्ट आणि पब्लिक प्लेस आहे. बाजारात ५० प्रकारचे फूड जॉइट्स आहेत. इथे २०० वर्षे जुनं शनिवार शेतकरी बाजार आणि रविवारचा एंटीक जुना बाजारदेखील लागतो.

इटन सेंटर १९७९ मध्ये इटलीच्या मिलान शहराच्या ग्लास रुफ गॅलरियाच्या मॉडेल नुसार बनलंय. हे बहुमजली शॉपिंग सेंटर आहे. इथे विविध प्रकारची दुकानें, रेस्टॉरंटस तसंच सिनेमागृहे आहेत. हे टोरँटोचं क्रमांक एकचं टुरिस्ट आकर्षण आहे. यॉर्कविल टोरँटोचं सर्वात प्रसिद्ध शॉपिंग क्षेत्र आहे.

पाण्याच्या किनारी वसलेल्या इतर मोठया शहराप्रमाणे टोरँटो डाऊन टाऊन वॉटरफ्रंटदेखील हळूहळू १० एकर लेक साईड घटना स्थळाच्या रुपात परिवर्तीत होत गेलं. पुरस्कारप्राप्त हार्बरफ्रंट सेंटरमध्ये आर्ट गॅलरीज, सिनेमागृह, क्राफ्ट बुटीक्स, कार्यालये, हॉटेल आणि मरीना पाण्याच्या किनारी सैर करण्याचे सार्वजनिक मार्ग आहेत. टोरँटो हार्बर फ्रंट सेंटर एक सांस्कृतिक संघटना आहे. इथे हिवाळयात स्केटदेखील करू शकता.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...