कथा * नीता दाणी

मोबाइलची घंटी वाजली म्हणून संध्याने फोन घेतला. त्यावरचा नंबर अन् नाव बघून तिच्या हृदयाची धडधड एकदम वाढली. ती मुकाट बसून राहिली. दहा मिनिटातच तिच्या लॅण्डलाइन फोनची घंटी वाजली. आय डी कॉलरवरून नंबर चेक केला तर तोच होता...क्षणभर तिला वाटलं फोन उचलून बोलावं...पण मनाला आवर घालून तिने त्याही फोनकडे दुर्लक्षच केलं.

मग ती आपल्या रोजच्या कामाला लागली. घराची स्वच्छता, ब्रेकफास्ट, चहा, डबा भरणं, ऑफिसला जाणं, दिवसभर काम करणं, सायंकाळी थकून घरी परत येणं हीच तिची दिनचर्या होती. घरी परतल्यावर रिकामं घर अन् एकटेपणा अंगावर यायचा. दमलेलं शरीर कसंबसं ओढत ती चहा करून घ्यायची. टीव्ही सुरू करून सोफ्यावर बसायची. कार्यक्रम डोळ्यांना दिसायचे. काही मेंदूपर्यंत पोहोचायचे अन् काही कळायचेही नाहीत. झोप येईपर्यंत टीव्ही सुरू असायचा. त्या आवाजामुळे घरात थोडं चैतन्य जाणवायचं. मध्येच केव्हा तरी सकाळी केलेली पोळीभाजी गरम करून ती जेवायची अन् मग झोप!

पण रात्रीच्या वेळी नीरव शांततेत थोडा जरी आवाज झाला तरी ती फार घाबरायची. दचकून जागी व्हायची. एकदा रात्री ती झोपलेली असताना बाहेरच्या दाराची घंटी वाजायला लागली. एवढ्या रात्री कोण आलं असेल या विचाराने ती घाबरली. कसाबसा धीर गोळा करून ओरडून विचारलं, ‘‘कोण आहे?’’ काहीच उत्तर मिळालं नाही. कापऱ्या हातांनी तिने खिडकी उघडून बघितली. कुणीच दिसलं नाही.

कंपाउंडच्या गेटची घंटी सतत वाजतच होती. शेवटी धाडस करून ती खोलीबाहेर आली. घराचा मुख्य दरवाजा उघडून लॉनवर आली, तेव्हा लक्षात आलं, बाहेरून जाणाऱ्या कुणा वात्रट वाटसरूने बेलचं बटन दाबलं होतं. अन् ते तसंच दाबलेलं राहिल्यामुळे घंटी अखंड वाजत होती. तिने घंटीचं बटन बंद केलं. भराभर आत येऊन पुन्हा दारं लावली. पण त्यानंतर सारी रात्र तिने जागून काढली होती.

संध्याच्या नवऱ्याच्या मृत्युला बरीच वर्षं झालीत. दोन्ही मुलींची लग्नं झालीत. एक मुलगी अमेरिकेत असते, दुसरी भारतातच पण बरीच लांब राहाते. संध्याची नोकरी चांगली आहे. भरपूर पगार व इतर सोयी आहेत. सकाळपासून सायंकाळपर्यंत ती बिझी असते. दिवस कसा संपतो ते कळत नाही. पण संध्याकाळी घरी आल्यावर मात्र दिवसभराचा थकवा अन् एकाकीपणा एकदम अंगावर येतो. मुलींशी रोजच फोनवर, स्काइपवर बोलणं होतं. पण त्या आपापल्या संसारात मग्न आहेत. त्यांना आपलं घर सोडून आईची काळजी घेणं जमत नाही. कधी तरी बरं नसलं तर हा एकाकीपणा अजूनच अंगावर येतो.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...