कथा * ऋतुजा कांबळे

बरेच दिवसांपासून अर्धवट विणून ठेवलेला स्वेटर पूर्ण करण्याच्या प्रयत्नात मी लॉनवरच्या खुर्चीत बसून होते. थंडी असल्यामुळे दुपारचं ऊन सुखदायक वाटत होतं. झाडाच्या सावलीतही ऊब सुखावत होती. त्याचवेळी माझी बालमैत्रीण राधा अवचित समोर येऊन उभी राहिली.

‘‘अरेच्चा? राधा? काय गं, आता सवड झाली होय तुला मैत्रीणीला भेटायला? लेकाचं लग्न काय केलंस, मला तर पार विसरलीसच. किती गप्पा मारतेस सुनेशी अन् किती सेवा करवून घेतेस तिच्याकडून? कधी तरी आमचीही आठवण करत जा की...!’’

‘‘अगं, कसल्या गप्पा अन् कसली सेवा घेऊन बसली आहेस? माझ्या सुनेला तिच्या नवऱ्याशीच बोलायला वेळ नाहीए, ती काय माझ्याशी गप्पा मारेल अन् कसली सेवा करेल? मी तर गेले सहा महिने एका वृद्धाश्रमात राहातेय.’’

बापरे! हे काय ऐकतेय मी? माझ्या पायाखालची जमिनच सरकली जणू. मला काही बोलणंही सुधरेना. काय बोलणार? ज्या राधानं सगळं आयुष्य मुलासाठी वेचलं, आपलं सुख, आपला आनंद फक्त मुलासाठी दिला आज तोच मुलगा आईला वृद्धाश्रमात ठेवतोय?

मधुकर राधेचा एकुलता एक मुलगा. त्याला वाढवताना तिनं आपल्या सर्व सुखांचा त्याग केला. आपल्या म्हातारपणी पैसा आपल्याजवळ असायला हवा याचा विचार न करता त्याला मसुरीच्या महागड्या शाळेत शिकायला पाठवलं. तिथून पुढल्या शिक्षणासाठी तो दिल्लीला गेला. पैशांची फार ओढाताण व्हायची. पण उद्या मुलगा उच्चशिक्षित होऊन मोठ्या पगाराची नोकरी करेल, भरपूर पैसा मिळवेल. एवढ्याच आशेवर ती सर्व कष्ट आनंदानं सहन करत होती. भेटली की सतत मुलाच्या प्रगतीबद्दल सांगायची, ‘‘माझं पोरगं म्हणजे शंभर नंबरी सोनं आहे,’’ म्हणायची.

राधा खूप काही सांगत होती. बरंच काही मला कळतही होतं, पण वर्मावर बोट ठेवावं असं वाटत नव्हतं. सायंकाळ होण्यापूर्वीच राधा तिच्या वृद्धाश्रमात परत गेली.

ती निघून गेली तरीही माझं मन मात्र तिच्यातच गुंतून होतं. बालपण ते तारूण्याचा काळ आम्ही दोघींनी एकत्रच घालवला होता.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...