कथा *प्राची भारद्वाज

संध्याकाळ व्हायला आली तशी दीपिकानं पलंगावरच्या चादरी, उशा वगैरे आवरायला सुरूवात केली. तिचे रेशमी सोनेरी केस वारंवार तिच्या गुलाबी गालावर रूळायला बघत होते अन् आपल्या नाजूक लांबसडक बोटांनी ती पुन:पुन्हा त्यांना मागे सारत होती.

‘‘आता ऊठ ना, मला चादर बदलायची आहे.’’ दीपिकानं संतोषला हलवत म्हटलं. तो अजूनही आरामात बेडवर लोळत होता.

‘‘का पुन:पुन्हा त्या बटा मागे ढकलते आहेस? छान दिसताहेत तुझ्या सुंदर चेहऱ्यावर...जणू ढगात लपलेला चंद्र...’’ संतोषने म्हटलं.

‘‘सायंकाळ व्हायला आलीय. आता या ढगांना घरी हाकललं नाही तर तुझ्या चंद्रालाच घराबाहेरचा रस्ता धरावा लागेल. कळलं का?’’

‘‘तू घाबरतेस कशाला? तुला घरंही आहेत अन् घरी घेऊन जायला तत्पर असणारेही आहेत. ज्या दिवशी तू होकार देशील त्याच दिवशी मी...’’

‘‘पुरे पुरे...मी होकार दिलाच आहे ना? आता निघ तू...उद्या येतीलच थोड्या वेळात, तोवर मला हे सर्व आवरायला हवं.’’ दीपिका भराभर आवरत म्हणाली. चादरी, उशा सर्व व्यवस्थित ठेवून, इतर सर्व गोष्टी नीटनेटक्या केल्यावर तिनं विचारलं, ‘‘उद्या कधी येणार गुरूदेव?’’

‘‘असाच बाराच्या सुमाराला.’’ संतोषनं म्हटलं.

तो जरा तक्रारीच्या सुरात पुढे म्हणाला, ‘‘हे असं चोरून भेटणं मला अजिबात आवडत नाहीए. असं वाटतं आपण प्रेम नाही, गुन्हा करतोय...अपराध केल्यासारखं वाटतं.’’

‘‘गुन्हा तर करतोच आहोत संतोष...आपलं लग्न झालेलं असतं तर गोष्ट वेगळी होती...पण मी आता उदयची पत्नी आहे. तू माझ्या घरी मला संगीत शिकवायला म्युझिक टीचर म्हणून येतो आहेस. अशा परिस्थितीत आपल हे नातं म्हणजे गुन्हाच ठरतो ना?’’

‘‘का बरं? आधी आपलं दोघांचं प्रेम होतंच ना? उदय तर तुझ्या आयुष्यात नंतर आलाय. तुझ्या अन् माझ्या घरच्यांनी हे जाती पर जातीचं प्रस्थ माजवलं नसतं, आपल्या लग्नाला विरोध न करता लग्न लावून दिलं असतं तर? पण त्यांनी अगदी घाई घाईनं तुझं लग्न दुसरीकडे लावून टाकलं.’’

‘‘सोड त्या जुन्या गोष्टी. या दुसऱ्या शहरात येऊनही आपण दोघं पुन्हा भेटलो. माझ्या मनांतलं तुझ्या विषयीचं प्रेम बहुधा नियतीलाही हवं असावं. म्हणूनच आपली पुन्हा गाठ पडली.’’ दीपिकानं विषय संपवला.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...