कथा * रूपा श्रोत्री

‘‘राजा, एकदा तरी म्हण ना, माझं तुझ्यावर प्रेम आहे.’’ ईशानं राजाच्या गळ्यात हात टाकत म्हटलं.

‘‘होय, माझं फक्त तुझ्यावर अन् तुझ्यावरच प्रेम आहे. तुझ्यावाचून मी जगू शकत नाही. तू परी आहेस, अप्सरा आहेस..अजूनही काय काय आहेस...अजूनही काही डायलॉग ऐकायचे आहेत?’’ राजानं हसतच म्हटलं.

ईशानंही हसतच कबूल केलं, ‘‘झालं...झालं, आता मला बरं वाटलं.’’

गेली आठ वर्ष राजा आणि ईशा एकमेकांना ओळखताहेत. एकाच कॉलेजात शिकायची दोघं. सुरूवातील मैत्री होती. अभ्यास सांभाळून दोघं एकत्र फिरायची, कॉलेजच्या कार्यक्रमात भाग घ्यायची. मैत्री पुढे प्रेमात बदलली. ईशा एका संपन्न कुटुंबातली एकुलती एक मुलगी होती. तिला पैसेवाला नाही, तर प्रेम करणारा, समजून घेणारा नवरा हवा होता. राजाच्या रूपात तिला तो मिळाला होता. ती वाट बघत होती, राजाचं प्रमोशन झालं की ती आईवडिलांकडे राजाबद्दल बोलणार होती.

तसाही राजा एका नामांकित कंपनीत चांगल्या हुद्यावर कामाला होता पण ईशाला वाटत होतं अजून एक प्रमोशन मिळालं की ती अभिमानानं राजाची तिच्या आईवडिलांशी भेट घालून देईल.

राजाचं प्रमोशन झालं अन् ईशानं त्याचं अभिनंदन करत म्हटलं, ‘‘आजच मी आईबाबांशी आपल्या लग्नाबद्दल बोलते. मला खात्री आहे, त्यांना तू नक्कीच आवडशील.’’

रात्री जेवताना ईशानं सांगितलं, ‘‘आईबाबा मी तुम्हाला एक आनंदाची बातमी देते आहे. मी माझ्या आयुष्याचा जोडीदार निवडला आहे.’’

आश्चर्यानं त्यांनी विचारलं, ‘‘अस्सं? अरे व्वा!! कोण आहे तो?’’

‘‘मी उद्या रात्री त्याला जेवायला बोलावते, म्हणजे तुम्ही त्याच्याशी नीट बोलू शकाल. त्याचं नाव राजा आहे.’’

दुसऱ्यादिवशी राजा ईशाच्या घरी गेला. त्याचं शिक्षण, नोकरीतला हुद्दा, त्याच्या इतर आवडी निवडी सगळंच इतकं छान होतं की ईशाचे आईवडिल एकदम खूश झाले.

‘‘ईशा, तुझी निवड एकदम परफेक्ट आहे. आम्हाला असाच जावई हवा होता.’’ त्यांनी म्हटलं.

पुढल्याच रविवारी ईशाचे आईवडिल राजाच्या घरी त्याच्या आईवडिलांना भेटायला गेले.

दोन्ही घराणी सुसंस्कृत, श्रीमंत होती. बोलताना राजाच्या वडिलांनी सांगितलं, ‘‘ईशा आम्हाला पसंत आहे. पण मी तुम्हाला एक गोष्ट आधीच स्पष्ट सांगतो की राजाला आम्ही दत्तक घेतलाय. तो आमचा मुलगा नाही. आम्हाला मुलबाळ नव्हतं. तोही आमच्यावर तेवढंच प्रेम करतो. ईशालाही आमच्या घरात प्रेम अन् सन्मान मिळेल याबद्दल तुम्ही नि:शंक असा.’’

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...