कथा * प्राची भारद्वाज

पीयूषनं दोन्ही बॅगा विमानांत चेक इन करून स्वत: आपल्या नवविवाहित पत्नीला हात धरून आणून सीटवर बसवलं. हनीमूनवर सगळंच कसं छान छान असतं ना? नवरा आपल्या बायकोची पर्सही स्वत:च सांभाळतो. ती दमली तर तिला उचलूनही घेतो. ती उदास आहे हे जाणवलं तर खंडीभर जोक सांगून तिला हसवायला बघतो.

पीयूष आणि कोकिळाचं लग्न ठरवून झालेलं होतं. नव्या लग्नाची नव्हाळी होती. एकमेकांकडे चोरून बघणं, हळूच हसणं, हात हातात घेणं हे सगळं त्यात आलंच. हनीमूनही खूप छान झाला. एकमेकांवर प्रेमाच वर्षाव केला. एकमेकांच्या इच्छा अपेक्षा समजून घेतल्या. मतं जाणून घेऊन मान दिला. कुटुंबियांची माहिती घेतली अन् छान संसार करण्याची वचनंही दिली घेतली.

पीयूषनं हनीमून ट्रीप सर्वार्थानं यशस्वी व्हावी म्हणून खूप श्रम घेतले होते. आपला आयुष्याचा जोडीदार उत्तम आहे याबद्दल कोकिळेच्या मनांत कुठलाही संशय नव्हता. पीयूष स्वत:चं काम मनापासून करत होता. भरपूर कष्ट करायचे आणि भरपूर पैसा मिळवायचा. काम प्रामाणिकपणे करायचं अन् खोटा पैसा घ्यायचा नाही. हेच वय कष्ट करण्याचं आहे, दमलो, थकलो म्हणायचं नाही, चिडचिड करायची नाही.

कोकिळानंही त्याची कमाई प्रेमानं, अभिमानानं हातात घेतली. गरजेवर आधी खर्च करायचा. काही रक्कम शिल्लक टाकायची. उगीच मोठेपणाचा आव आणायचा नाही हे तिनं ठरवलं होतं.

एक दिवस तिची मोलकरीण उशीरा आली.

‘‘कां गं उशीर केलास?’’ तिनं विचारलं.

आपल्या अंगावरचे वळ व सुजलेला चेहरा दाखवत मोलकरीण म्हणाली, ‘‘काय करू ताई? काल नवरा पुन्हा दारू पिऊन आला अन् तमाशा केला. स्वत: कमवत नाही, मला पैसे साठवू देत नाही. माझ्या पैशानं दारू पितो, आम्हालाच मारतो.’’

‘‘पण तू सहन का करतेस? म्हणून म्हणतात थोडं शिकावं. राबराब राबून पैसा मिळवायचा अन् वर मार ही खायचा...आता नवरा छळतोय, मोठा झाला की मुलगा तेच करणार.’’ कोकिळेला मोलकरणीसाठी वाईट वाटंत होतं. त्यावर उपाय शोधायला हवा हे तिनं ठरवलं होतं.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...