गृहशोभिका टीम

‘‘ओह! इट्स टू टायरिंग, सो लाँग ट्रिप...’’ घाम पुसत पुनीतनं आपली सूटकेस दारासमोर लावली. डोअरबेल वाजवली अन् दार उघडण्याची वाट बघू लागला. घरात सर्वत्र शांतता होती. कुठं गेली सगळी? त्यात पुन्हा एकदा घंटीचं बटन दाबलं. दाराला कान लावून तो आतली चाहूल घेऊ लागला. तेवढ्यात त्याचं लक्ष दारावर लटकलेल्या कुलुपाकडे गेलं. खिशातून रूमाल काढून पुन्हा एकदा घाम पुसला. खांद्यावरची एयरबॅग सूटकेसवर ठेवली अन् त्यानं इकडेतिकडे बघितलं.

त्याचं घर दोन मजली होतं. त्यानं वरच्या मजल्याकडे नजर टाकली. त्या लेनमधील सगळी घरं एक सारखीच होती. घराचं छप्पर दोन्ही बाजूंनी उतरतं होतं. त्याच्या मधोमध पांढरी भिंत अन् भिंतीवर काळ्या अक्षरात पेंट केलेला घरनंबर वरच्या खिडक्याही बंद होत्या. पडदे ओढलेले होते. ‘कुठं बरं गेले असावेत हे लोक?’ मनाशीच पुटपुटत तो घराच्या मागच्या बाजूला गेला. तेच कुंपण, तेच लॉन अन् तिच झाडं...तीन वर्षांपूर्वी जसं होतं तसंच अजूनही आहे. गॅरेज उघडं होतं, गाडी नव्हती...म्हणजे गाडी घेऊन कुठं गेलेत का? कदाचित ते सकाळपासून वाट बघत असतील अन् आत्ताच त्यांना बाहेर जावं लागलं असेल...पण निदान जाताना दारावर एक चिठ्ठी अडकवायला काय हरकत होती? कधीपर्यंत परत येणार हे तरी समजलं असतं.

पुनीत तिथंच पायऱ्यांवर बसला. संध्याकाळचे सात वाजायला आले होते. अंधार दाटून आला होता. आता पुनीतला काळजी वाटायला लागली. हे लोक कुठं गेले असतील? आईला गाडी चालवता येत नाही अन् बाबांना संध्याकाळचं कमी दिसतं. ड्रायव्हर बोलावला असेल का? एव्हाना त्याच्या पोटात भुकेनं कावळे कोकलू लागले होते. त्यांनं सॅकमधून पाण्याची बाटली काढली अन् थोडं पाणी प्यायला. शेजारी पाजारीही तो कुणाला ओळखंत नव्हता. एक शिखा होती जिला विचारता आलं असतं, पण त्यानं तिला जी वागणूक दिली होती, त्यानंतर तर तिच्यासमोर जाणंही त्याला जमणार नव्हतं.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...