कहानी के बाकी भाग पढ़ने के लिए यहां क्लिक करें

दिर्घ कथा * मीना गोगावले

(अंतिम भाग)

आत्तापर्यंत आपण वाचलंत : राजन आपल्या राधिका वहिनीशी खूप मोकळेपणानं बोलायचा. त्यानं एक दिवस त्याच्या भावी वधूबद्दल आपल्या कल्पना वहिनीला सांगितल्या. राधिका काळजीत पडली की ही अशी स्वप्नं सुंदरी प्रत्यक्षात कशी अन् कुठं भेटणार? अनेक मुली बघितल्या गेल्या.

शेवटी दूरच्या कुणा नातलगानं सुचवलेली मुलगी राजनला पसंत पडली. खरोखर स्वप्न सुंदरीच होती ती. या परीकडून घरकाम करणं कसं करवून घ्यायचं हे राधिकेला समजेना. सुंदरी घरात आली अन् घरातलं वातावरण बिघडायला लागलं. राजनला हे सगळं माहीत नव्हतं किंवा तिच्या प्रेमात तो आंधळा झाला होता. सुंदरी जरा अधिकच आधुनिक विचारांची होती.

तिचा मित्र, खरं तर प्रियकर कायम घरात ठाण मांडून बसलेला असे. शेवटी राजनला हे असह्य झालं अन् त्यांनी घटस्फोट घेतला.

राजनचं आयुष्यच भकास झालं. त्याच्या मनातून सुंदरी अजूनही जात नव्हती. दुसरं लग्नं करायला घरातून दबाव येत होता. पण राजनला लग्न करायची इच्छा नव्हती. पण शेवटी त्यानं लग्न केलंच. कमी शिकलेली, दिसायला सामान्य, गरीब घरातली मुलगी राजनची पत्नी म्हणून घरात आली. तिनं घरातली कामं राधिकेच्या बरोबरीनं हातात घेतली. सासऱ्यांची सेवा करून त्यांना जिंकून घेतलं. राजनचंही मन तिनं जिंकून घेतलं. एकूण घरात आता आनंदाचं वातावरण होतं...

- आता पुढे वाचा

दुसऱ्या लग्नानंतर आता राजन खरंच सावरला होता. आनंदात होता. इतके दिवस त्याच्या मनांत सुंदरी ठाण मांडून बसली होती. ज्यामुळे तो अनुशी आलिप्तपणेच वागत होता. पण आता त्याला तिच्याबद्दल खरोखरच प्रेम वाटत होतं. जे प्रेम सुंदरीला तो देत होता, तेच प्रेम तो आता अनुवर उधळत होता. सुंदरीला त्याच्या प्रेमाची किंमत नव्हती, पण अनु मात्र राजनच्या प्रेमाला प्रतिसाद देत होती.

त्या रात्री दोघांच्या हसण्याबोलण्याचे आवाज राधिकेला ऐकू येत होते. तिला खूप समाधान वाटत होतं.

दुसऱ्या दिवशी राधिका उठली. नेहमीप्रमाणे अनु उठून खाली आली नव्हती. राधिकेनंच चहा केला. बाबांना त्यांच्या खोलीत नेऊन दिला अन् चहाचा टे्र राजनच्या खोलीच्या दाराबाहेर ठेवून तिनं दारावर टकटक केलं, ‘‘चहा तुमची वाट बघतोय.’’ तिनं सांगितलं अन् ती खाली येऊन कामाला लागली. अनुनं चहाचा ट्रे खोलीत घेतला. चहा तयार करून कप राजनच्या हातात देत म्हणाली,

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...